निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाव किती सुंदर फुल...

आठवून बघितले तर अशा खुपच कमी रात्री आठवल्या, कि ज्यावेळी शहरातील प्रदूषणापासून दूर कुठेतरी, रात्र काढली आणि आकाशभर ग्रहतारे दिसले

मी एकदा वांगणिला गेलेले सचिनबरोबर.. गॉड, काय अमेझिंग दिसत होते आकाश. कुठल्यातरी हट्टी मुलीने मुठी भरभरुन हिरे हातात घेतले आणि मग ते हवे तसे उधळून दिल्यासारखे आकाश दिसत होते. आकाशगंगेला गंगा का म्हणतात ते त्या रात्री कळले. आकाशगंगेचा प्रकाश पसरलेला असतो तो कसा ते त्या रात्री दिसले.

हा आकाशगंगेचा पसरलेला प्रकाश मी आंबोलीलाही पाहिलाय पण तिथे आकाश खुप लिमिटेड दिसते, झाडे खुप आहेत, बहुतेक वेळा मी गावी असते तेव्हा पुर्णचंद्रही तळपत असतो. आणि तिथे आपल्याला उंचीवर जाता येत नाही. घाटात अंधा-या रात्रीच जायला घरचे परवानगी देत नाहीत.

परत जायला पाहिजे एकदा. माझ्या एका पुतण्याला भारी वेड आहे ग्रहता-यांचे. तो कधी चा मागे लागलाय मला घेऊन चल म्हणुन.

खुप मोठे पठार पाहिजे, क्षितिजावर डोंगरही नकोत.. तर असे आकाश दिसते. वाळवंटात दिसते असे.
मुंबईजवळ वांगणीला आहे तसे. पण आकाशात काही ठळक घडणार असेल, तर बरेच लोक जातात, तिथे.

पाचगणीत पाहिलेली ही काही फुलं

नावं कळतीलंच इथे त्यांची, याच विश्वासाने फोटो काढलेत Happy

प्रचि १- आजकाल फूलबाजारांत, तलावांत कमळाची जागा आगाऊपणे पटकावणार्‍या वॉटरलिलींऐवजी
हे खरंखुरं कमळ पाहिलं आणी खूप प्रसन्न वाटलं!!!

प्रचि २

हे अजिब्बात ओळखता आलं नाही..

प्रचि ३- डांसिंग डॉल्स... लोकल्स नी सांगितलेलं नांव.. मागे सुकि ने पण टाकला होता ह्या फुलाचा फोटो

साधना.. खर्रयं तुझं...

किती गोड वर्णन केलंस तार्‍यांनी भरलेल्या रात्रीचं...

या वेळी अनेकानेक वर्षांनी पाचगणीत असं आकाश पाहायला मिळाला.. इतकंच नाही तर कोजागिरी पौर्णिमेला पूर्ण चंद्राचं स्वच्छ दर्शन इतक्या जवळून पाहायला मिळालं कि हात उंचावला तर सहज हाताला लागेलसा वाटलं..

आहाहा.. स्वच्छ, शुद्ध हवा , नितळ आकाश...इतकं बरं वाटलं ना अनुभवताना...

दिनेश दा.. Lol .. हवामान ठीकै पण ३० दिवसात सतत बाहेरचं जेवण अजिबात मानवलं न्हाय.. Sad
अजून ६,७ दिवस लागतील बहुतेक गाडी रुळावर यायला धडपणी...

वर्षु - प्र चि ३ फुक्शिया(Fuchsia) , Onagraceae या कुळातले आहे.

प्र चि २ - Etlingera elatior, टॉर्च जिंजर / जिंजर फ्लॉवर/ रेड जिंजर / वाईल्ड जिंजर हे असावे बहुतेक.

इतकंच नाही तर कोजागिरी पौर्णिमेला पूर्ण चंद्राचं स्वच्छ दर्शन इतक्या जवळून पाहायला मिळालं कि हात उंचावला तर सहज हाताला लागेलसा वाटलं

एकदा उटीला ट्रेकसाठी गेलो होतो, तेव्हा आकाशातले तारे इतके जवळ वाटत होते की हात लावावा आणि तोडावेच...

गोव्याला ट्रेकला गेले होते तेव्हाही एकदा रात्रीचे उठले होते, कोणालातरी बाहेर जायचे होते म्हणुन..

तिथेही आकाशात असाच हि-यांचा खच पडला होता. पण भोवतालच्या जंगलातुन असे काही आवाज उठत होते की कधी एकदा तंबुतल्या सुरक्षेत परत जातोय असे झाले Happy

रात्रीचे जंगल आपले नाही.. दिवसा फिरा त्यातुन हवे तेवढे, पण रात्रीचे फिरायला धाडसी माणुस लागेल, माझ्यासारख्या सशाच्या काळजावाल्यांचे ते काम नाही... Happy

धन्स शशांक.. Happy
साधना आज तार्‍यांच्या आठवणीत बुडालेली आहे... Happy मिसिंग ताराज इन मुंबई??????

तिथेही आकाशात असाच हि-यांचा खच पडला होता.>>>>>जिथे सिटी लाईट्स नसतात तेथील रात्री अशाच भन्नाट असतात. आपण पुण्या-मुंबईत रहाणारे याबाबत अगदीच कमनशिबी.
मध्यंतरी एका पौर्णिमेला चुकून पुण्यातल्या बर्‍याच मोठ्या भागात इलेक्ट्रिसिटी नव्हती तर माझ्या दोन्ही मुली मला व अंजूला मोठ्या उत्साहात सांगत आल्या - लवकर अंगणात चला - काय भारी प्रकाश पडलाय .... (बिचार्‍यांनी असे चांदणं कधी पाहिलंच नव्हतं....)

तीसेक वर्षांपूर्वी माझा एक मित्र - मिरज्/सांगलीकडचा - सांगायचा की दर पौर्णिमेला सांगलीतले रस्त्यावरचे दिवे मुद्दाम लावत नसत (यालाही बरीच वर्षे झाली असतील)- कोण एवढा रसिक इले. इंजिनिअर/ महापौर असेल म्हणून मी मनोमन नमस्कारही केला त्याला......

वर्षू, ते जिंजर लिली थाई जेवणात वापरतात. असे उमलायच्या आधीच म्हणजे कळा असतानाच कापतात.

खरं तर हे फूल नाही, पुष्पकोष आहे. या आले / कर्दळ कुळाची खासियत. फुलांपेक्षा, पुष्पकोष देखणा.

हा जर कापून घरी पाण्यात ठेवला ना तर सहज १०/१२ दिवस टिकतो. कोमेजत नाही.

०००

साधना,
गोव्यात पिळगांव म्हणून एक गाव आहे. तिथे बहुतेक याच महिन्यात अमावस्येला सगळा गाव ( निदान धाडसी पुरुष तरी ) रात्री जंगलात जातात. आणि एका ठिकाणी, लाल दिवे नाचताना (?) दिसले तरच परत येतात.
हे अगदी ४/५ वर्षांपुर्वी पर्यंत चालू होते. अजूनही नक्कीच असेल. मला आमंत्रण मिळाले असते, पण माझा विश्वासच नसल्याने.. बहुतेक नाही बोलावले त्या लोकांनी.

ओ अच्छा... थाय जिंजर किती वर्षं खाल्लं पण त्याचा उगम कधीच पाहिला नव्हता...

दिनेश दा.. लाल दिव्यांचा काय संबंध आहे अमावस्येच्या रात्रीशी???

आपल्यापैकी नसतात ते , लाल दिवेवाले.. पण असतात. ( कोकणात त्यांची नावे नसतात घ्यायची. घरी येतात मग ते ! )

वर्षू, याच कमळाचे ( त्याच्या बियांचे ) मखाणे करतात आणि कमलकाकडी पण याचीच.. तिकडच्या स्वारीला
आवडत असणार, हे दोन्ही.

जागुले नको ग्गा कट्टी माझ्याशी.....
तुला फोनवर सांगेन सर्व!!!!

तुझी छबी आणी बबी कश्याहेत????

वर्षू, फोटो मस्तच. Happy
साधन, काय सुंदर वर्ण केलेस ग? आम्ही अशा खूप रात्री अनुभवल्यात बालपणी. त्यांची आठवण जागी झाली.
हे पण पहा आता. Happy
http://www.maayboli.com/node/39400

वर्षू चल बट्टी Lol
माझ्या दोघी लेकी एकदम मजेत आहेत. राधा आता उपडी होते सारखी. तिला सारखे सरळ करावे लागते जागी असल्यावर.

आपल्याला भारतात, अचानक ऋतूबदलाची सवय नसते.
काल आमच्याकडे दुपारी जोरात पाऊस आला, संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान, अतिकडक ऊन पडले.
नंतर रात्री, जोरदार वारे वहात होते. आता ढगाळ हवामान आहे आणि चक्क थंड हवामान आहे.

समुद्रातून वाहणारे शीत / उष्ण प्रवाह, इथे वातावरणावर फार प्रभाव टाकतात.

कोण जागी असल्यावर ? >>>>>:हाहा:

काल आमच्याकडे दुपारी जोरात पाऊस आला, संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान, अतिकडक ऊन पडले.
नंतर रात्री, जोरदार वारे वहात होते. आता ढगाळ हवामान आहे आणि चक्क थंड हवामान आहे.>>>>>>>>>>दिनेशदा, तुमच्याकडे तिन्ही ऋतू एकदमच सुरू आहेत तर. Happy

फुलात भुंगा शिरताना पहिल्यांदाच (मी) पाहिला, त्यामुळे फोटू घेण्याचा मोह आवरला नाही

तो पिवळा सिल्वर ओक आहे ना ?
सर अटेंबरा, भुंग्याला कुरीयर म्हणतात. त्याला व्यवस्थित मोबदला मिळतो, परागकण वाहून नेण्याचा.

Pages