प्रकाशचित्रे - मूळाक्षरे व बाराखड्यांची

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 07:31

मंडळी, ह्या प्रकाशचित्रांच्या खेळासाठी तुम्हाला पार तुमच्या बालवर्गातल्या मूळाक्षरांच्या उजळणीपासून सुरुवात करायची आहे. तर मग काय तय्यार?

या खेळाचे नियम व सूचना काळजीपूर्वक वाचा बर्का! नाहीतर छोटीशीच चूक सुद्धा तुम्हाला बालवर्गात नेऊन सोडेल. Wink

खेळाचे नियम व सूचना :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा भाग घेऊ शकेल, मात्र सलग दोन प्रकाशचित्र देऊ शकणार नाही.
४. येथे वापरण्यात येणारे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
५. मराठीत मूळाक्षरं ४८. यात १२ स्वर (अ ते अ:) व ३६ व्यंजनं (क ते ज्ञ). आजच्या खेळासाठी आपण 'क' ते 'ज्ञ' पर्यंतची ३६ व्यंजन व त्यांच्या बाराखड्या प्रकाशचित्रांच्या माध्यमातून वापरणार आहोत.
उदाहरणार्थ - पहिले प्रकाशचित्र 'क' च्या बाराखडीने (क पासून कः पर्यंतच्या कुठल्याही एका अ़क्षराने) सुरु होणारे, क क कमळाचा आहे. पुढचे प्रकाशचित्र 'ख' च्या बाराखडीचे (ख पसून खः पर्यंतच्या कुठल्याही एका अक्षराचे) असेल.
६. अशापद्धतीने आपण बाराखडी चालवत 'ज्ञ' पर्यंत पोचल्यावर पुन्हा 'क' च्या बाराखडी पासून नवीन प्रकाशचित्रांनी सुरुवात करावी. बाराखडी मधील 'ङ', 'ण', 'ञ' आणि 'ळ' ही अक्षरं वगळू शकता.
७. प्रतिसादाच्या खिडकीच्या वर जे निळे प्रश्नचिन्ह आहे त्यावर टिचकी मारा, बाराखडी मिळेल.

चला तर मग सुरू करूयात...

क क कमळाचा
IMG_0580.JPG

आता यापुढचे प्रकाशचित्र तुम्ही ख च्या बाराखडीपासून (ख ते खः) सुरू होणारे द्यायचे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओली सुपारी आहे. कौलावर टाकलीये. मागल्या पानी पहा.
जरा जपून. 'फट्ट म्हणता प्राण कंठाशी आणणार्‍या ओल्या सुपारीचे गुण' पु.लं.नी सांगून ठेवलेत अंतू बर्व्यात.

ओली सुपारी आहे. कौलावर टाकलीये. मागल्या पानी पहा.
जरा जपून. 'फट्ट म्हणता प्राण कंठाशी आणणार्‍या ओल्या सुपारीचे गुण' पु.लं.नी सांगून ठेवलेत अंतू बर्व्यात.>>>>आठवलं आठवलं. Lol

ए यार, ते क्षमा लै झालं.
दुसरं शोधा काहीतरी प्लीज Sad

गाव...

चॉकलेट....

छ-छप्पर

Image0183.jpg

झ झाडाचा

z.jpg

डोंगर...

Pages