मंडळी, ह्या प्रकाशचित्रांच्या खेळासाठी तुम्हाला पार तुमच्या बालवर्गातल्या मूळाक्षरांच्या उजळणीपासून सुरुवात करायची आहे. तर मग काय तय्यार?
या खेळाचे नियम व सूचना काळजीपूर्वक वाचा बर्का! नाहीतर छोटीशीच चूक सुद्धा तुम्हाला बालवर्गात नेऊन सोडेल.
खेळाचे नियम व सूचना :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा भाग घेऊ शकेल, मात्र सलग दोन प्रकाशचित्र देऊ शकणार नाही.
४. येथे वापरण्यात येणारे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
५. मराठीत मूळाक्षरं ४८. यात १२ स्वर (अ ते अ:) व ३६ व्यंजनं (क ते ज्ञ). आजच्या खेळासाठी आपण 'क' ते 'ज्ञ' पर्यंतची ३६ व्यंजन व त्यांच्या बाराखड्या प्रकाशचित्रांच्या माध्यमातून वापरणार आहोत.
उदाहरणार्थ - पहिले प्रकाशचित्र 'क' च्या बाराखडीने (क पासून कः पर्यंतच्या कुठल्याही एका अ़क्षराने) सुरु होणारे, क क कमळाचा आहे. पुढचे प्रकाशचित्र 'ख' च्या बाराखडीचे (ख पसून खः पर्यंतच्या कुठल्याही एका अक्षराचे) असेल.
६. अशापद्धतीने आपण बाराखडी चालवत 'ज्ञ' पर्यंत पोचल्यावर पुन्हा 'क' च्या बाराखडी पासून नवीन प्रकाशचित्रांनी सुरुवात करावी. बाराखडी मधील 'ङ', 'ण', 'ञ' आणि 'ळ' ही अक्षरं वगळू शकता.
७. प्रतिसादाच्या खिडकीच्या वर जे निळे प्रश्नचिन्ह आहे त्यावर टिचकी मारा, बाराखडी मिळेल.
चला तर मग सुरू करूयात...
क क कमळाचा
आता यापुढचे प्रकाशचित्र तुम्ही ख च्या बाराखडीपासून (ख ते खः) सुरू होणारे द्यायचे...
ट टोपीचा
ट टोपीचा
बाद म्हणजे तो जळू चा फोटो बाद
बाद म्हणजे तो जळू चा फोटो बाद जास्वंद टाकलंय ना आधी
एका अक्षराचा एकच अलाऊड आहे
एका अक्षराचा एकच अलाऊड आहे का? मला वाटलं नेक्स्ट अक्षर येई पर्यंत कितीही येऊ शकतात.
ठेला.
ठेला.
मस्त आहे ह धागा.
मस्त आहे ह धागा.
ड ड डिस्नेलँडचा किंवा मग
ड ड डिस्नेलँडचा किंवा मग डोळ्यातला ..
मी केव्हाची प किंवा छ ची वाट
मी केव्हाची प किंवा छ ची वाट बघतेय.
ढ ढगातला
ढ ढगातला
त तलावातला ..
त तलावातला ..
थ- थांबा
थ- थांबा
.
.
अश्विनी, थ नंतर द येतो आणि मग
अश्विनी, थ नंतर द येतो आणि मग ध.
द द दोदोलचा
द द दोदोलचा
केश्वी बालवर्गात
केश्वी बालवर्गात
ध - धवल (पांढरा) कैपण
ध - धवल (पांढरा)
कैपण
आर्च, स्वारी नीरजा, ठेंकू
आर्च, स्वारी
नीरजा, ठेंकू
मी पण बालवर्गात. फोटो टाकायची घाई झाली होती.
न न नटसम्राटाचा
न न नटसम्राटाचा
न...... नीलगाय
न...... नीलगाय
जोरदार सुरुय की. बालवर्गात
जोरदार सुरुय की.
बालवर्गात नवीन भरती बरीच झाली.
मस्त फोटो पहायला मिळाले.
बाय द वे, मी इथे जेवढे फोटो टाकले होते ते स्वतः काढलेलेच.
मी टाकलेली सर्व चित्रे मी
मी टाकलेली सर्व चित्रे मी स्वतः काढलेले फोटो किंवा स्वतः डिजिटली रंगवलेले आहे. वरचा नटसम्राटाचा फोटो हा त्या शूटींगच्या फुटेजमधून फ्रेम कॅप्चर करून घेतलेला आहे.
नी तुझे ह्यातील बरेच फोटो आधी
नी तुझे ह्यातील बरेच फोटो आधी पाहिले होतेच.
उदा. लफ्फा
आता प आहे.
शोधतो.
झक्या, मला नीट जागा करुन दे.
झक्या, मला नीट जागा करुन दे. तिकडे सरक..
पिसारा झाडाचा केश्वे आपण
पिसारा झाडाचा
केश्वे आपण दोघे एका बेंचवर मावणं शक्य आहे काय??
म्हणून तर म्हटलं तू अर्धा
म्हणून तर म्हटलं तू अर्धा बाहेर बस (आणि थोड्यावेळाने खाली पड)
फ - फलकारा (पदराचा)
फ - फलकारा (पदराचा)
ब बर्फी चा
ब बर्फी चा
भवानी मंडप, कोल्हापुर
भवानी मंडप, कोल्हापुर
अश्विनी
म मोदकांचा
म मोदकांचा
डोकी ,ढग , पाणी आणि बरीचशी
डोकी ,ढग , पाणी आणि बरीचशी चित्रे पटली नाहीत. (चित्रे म्हणून ती अप्रतिम आहेत). त्यात अनेक तपशील आहेत. त्यामुले नक्की कशासाठी आहे ते कळत नाही. धवल साठी एक वस्त्र दाखवले आहे .ते न वाचता पाहिल्यास कुर्ता असल्याचा फील येतो व नाव वाचल्यावर धवल अपेक्षित आहे असे दिसते. त्याचा एक निकष असावा . काहीही सन्दर्भ नसताना चित्र पाहिले असता अभावितपणे सगळ्यांच्या तोंडून एकच शब्द यावा त्यात ते मूळाक्षर असावे.अंकलिपीत जशी मांडणी असते तशी मांडणी अपेक्षित असावी असे वाटते. चु भू दे घे... इव्हन 'ण' साठी पाणीही पटले नाही. 'ण' च असावा एक्स्क्लुजिव्हली...
बर्याचशा चित्रात तर विषयही कळत नाहीत मुद्दाम सांगितल्याशिवाय.
संयोजकांचा हा हेतू नसावा.
पण मी लावलेली चित्रे
पण मी लावलेली चित्रे माझ्यापुरतीच प्रताधिकार मुक्त आहेत. सर्व प्रताधिकार माझ्याकडे आहेत त्या चित्रांचे. इतरांसाठी प्रताधिकार मुक्त नाहीत ती. ते चालणारे ना?
Pages