निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आह्हा.. ,' काँग्रॅचुलेशन्स!!! मानुषे.. सस्पेंस दूर झाला... Happy

आर्या, १२/१४ एप्रिल दरम्म्यान मेघालयात ( हो भारतातील मेघालयात ) या वनस्पतिंचा उत्सव असतो.
आपल्याकडे भीमाशंकरला याची खुप रोपे, या दिवसात उगवलेली दिसतात.

बिया सूक्ष्म असतात. वार्‍यामार्फतच प्रसार होतो. (त्या तुर्‍यात बिया तयार होतील !)

मायबोलीकर क्षिप्रा च्या घरी कळलावीचा वेल पण असाच आपोआप रुजला होता. त्याला फुले पण येत.
(विषारी असल्याने हा वेल कुणी घरी लावत नाही. ) या वर्षी अधिक महिना आल्याने, हा वेल वाचेल. नाहीतर गौरीच्या पूजेसाठी, रानातली सगळी फुले खुडली जातात.

या वेलाला पण तोंडलीच्या आकाराचे (पण किंचीत शिरा असणारे ) फळ लागते.

ग्लोरिया सुपर्बा, असे शास्त्रीय नाव !

शशांक Happy लक्षात ठेवीन नक्कीच.
माझ्याघरी ते आळुच्या पानावर ठिपके असलेले कंद इतके झालेत की प्रत्येक कुंडीत येतात त्याचेही वार्‍यामुळे प्रसार होत असावा. उन्हाळ्यात कुंड्या अगदीच रिकाम्या असतात आणि पावसाळा येतात सगळीकडे हिरवळ.
उद्या परवा टाकते फोटो.

हं.................वर्षू .........त्याचा वास तर हल्ली ते फळांच्या वासांचे पर्फ्यूम्स मिळतात ना तसाच !
कित्ती वेळा हुंगलं ते फळ तरी समाधानच नाही.

शुभांगी ही आवळ्याची झाडे माझी आवडती होती. पालकभेटीच्या आधी मुलींना 'कोणालाही आवळ्यांना हात लावू देऊ नका' हे बजावलेले असायचे, तरीही काही पालक जायचे तोडायला Happy

नंतर मुलांची एक अजुन जत्रा असते त्यात या आवळ्याची सुपारी इ.इ. गोष्टी करुन विकतात. मुलांना वस्तु विकण्याच्या खुप छान अनुभव येतो.

मानूषी, तूमच्या नगरातली मोसंबी मात्र खुपच चवदार असते बरं का ! तिथल्या तिथे खाल्ली तर आणखीनच छान लागते. मुंबईच्या बाजारात येईपर्यंत मात्र खुपदा सुकल्यासारखी होते.

सोमवारी रमझान ईद आहे ना ? कलिंगडे भरपूर असतील बाजारात आता.

मी स्वतः गोव्याला पिवळा गर (साल नव्हे, गर ) असलेले कलिंगड खाल्ले होते. छान चव होती.
गोवा महोत्सवात फळांचे प्रदर्शन भरत असे. पांढरा चिक्कू, अनेकपदरी अननस असे अनोखे प्रकार असत तिथे.
गोव्यात आजही, घराच्या अंगणात एखादे फळाचे झाड लावण्याची प्रथा आहे आणि त्याची फळे कुणीही तोडत नाहीत. याबाबतीत तिथल्या मूलांची देखील शिस्त वाखाणण्यासारखी आहे.

(कुणाकडे चोरी झाली तर, हाव सांगता, भायेल्लो चोर तो... असे म्हणतात तिथली लोकं.)

मानुषी.. Happy
दिनेश दा.. थायलँड मधे पहिल्यांदाच पाहिले होते पिवळ्या गराचे कलिंगड.. गम्मत वातली होती तेंव्हा..
बाकी पांढरा चिक्कू, अनेकपदरी अननस... कधीच पाहिले आणी ऐकलेही नाहीत !!

घरात तुळसीची अनेक रोपे आली आहेत. खूऊऊऊऊऊऊउप सारी
इतर झाडांच्या कुंड्यांमध्ये आल्याने इतर झाडांवर त्याच्या असर होऊ शकतो ना?
काय करता येईल त्याच?

रीया, वाढवायची नसतील तर ज्यांना हवीत त्यांना देऊन टाकता येतील.

सत्यनारायण पण घालता येईल !

मला माझ्या घरातील बाल्कनी मध्ये सोनटक्का लावायचा आहे.

मी अस ऐकले आहे कि त्याची मुळे खूप पसरतात म्हणून ते जमिनितच लावावे.

सोनटक्का हे झाड घरातील कुंडी मध्ये लावू शकतो का ?

सोनटक्का हे झाड घरातील कुंडी मध्ये लावू शकतो का ?>>>>>>> मी लहानपणी कुंडीतच लावलं होतं. त्याला फुलं पण आली होती.. नंतर काय झालं आठवत नाहिये. जमीन नसेलच तर कुंडीत लावायला हरकत नसावी. Happy

शुकु, कलिंगड बघायला येइन आता Happy

बाकी पांढरा चिक्कू, अनेकपदरी अननस... कधीच पाहिले आणी ऐकलेही नाहीत !!>>>>>> +१

सोनटक्का हे आले हळदी कुळातले. साधारण मोठ्या कुंडीत सहज वाढते. जास्त दाटी झाली, तर जूनी खोडे काढून टाकायची.
सोनटक्क्याच्या रोपाला एकदाच फूल येते.

हळदही लावता येईल. तिचाही फुलोरा सुंदर असतो. शिवाय पानेही मिळतात आणि हळदही !

(कुणाकडे चोरी झाली तर, हाव सांगता, भायेल्लो चोर तो... असे म्हणतात तिथली लोकं.)>>>>>>>>>.दिनेशदा, अगदी कोकणात आहे असंच वाटल. Happy

माझ्याकडे आहे सोनटक्का. मोठ्या टबात लावला आहे. गेल्यावर्षी वर्तुळाकार वाढला होता. भरपूर फुले आली होती. सिझन नंतर मधल्या रिकाम्या जागेत कबूतरांनी घरटे केले. एका वेळी दोन अशी आठ बाळंतपणे झाली. पहीली पिले ग्रीलमधे बसायला शिकेपर्यंत दुसरी अंडी घातलेली असायची. कबूतरे फार घाण करतात.

मे महिन्याच्या शेवटी एकदाच रिकामे दिसले, लगेच झाडाची छाटणी केली. काही कंद अंगणात लावले. तेथेसुद्धा छान वाढले आहे. घरातला सोनटक्का जोम धरून आहे. आतापर्य्ंत दोन कणसे लागली, सुंदर फुलली. पुन्हा तसेच वर्तुळाकार वाढत आहे. कबूतराच्या फेरया वाढल्या आहेत. परवा गुलमोहराच्या काड्या आणून अंथरल्या होत्या. मी रागारागाने काढून टाकल्या. यांची बाळंतपणे आणि त्यांचे शिटणे, तो वास सहन होत नाही. तशीही कबूतरे परीसराशी लवकर जुळवून घेतात. भरपूर वाढतात.

हाय, सगळे कसे आहात ? गप्पा चांगल्या रंगल्या आहेत.
सोनटक्का कुंडीत होतो चांगला.

भोपळ्याबद्दल माहिती दिली. धन्यवाद... मलालाल भोपळा आवडतो... मी तोच लावणार आहे. कसा का येईना ... भोअपळा आणि काकडी

धन्यवाद दिनेशदा, धन्यवाद जागू.

दिनेशदा, हळद लावताना देशी दुकानातील सफेद हळद लावणे योग्य ठरेल कि आंबे हळद

आणि हळद लावताना हळकुंड भिजवून मोड आणून लावू का नुसतेच हळकुंड कुंडीत पेरू.

रीया, वाढवायची नसतील तर ज्यांना हवीत त्यांना देऊन टाकता येतील.
>>>>
आता सोसायटीत फिरावं लागेल कोणाला हवं का म्हणुन विचारत Sad

सत्यनारायण पण घालता येईल !
>>>
Lol
नालेसाठी घोडा प्रकार झाला हा Lol

दिनेशदा मोसंबीबद्दल+१००.
मागील वर्षी साउथ ईस्ट एशिया टूर केली तेव्हा प्रत्येक ठिकाणी ब्रेकफास्टला हे पिवळ्या गराचं कलिंगड खाल्लं. पहिल्यांदाच पाहिलं त्यामुळे आधी आश्चर्यवाटलं होतं!
पण चव फारच गोड आणि अगदी क्रिस्प!
काही दिवसांपूर्वी रोपलेल्या आंब्याच्या कोयींना मस्त कोंब आले आहेत. भोपळ्याचेही कोंब तरारले आहेत. आणि खरबूजाला अजून ३ खरबूजे आली आहेत.

हा पहा आमचा नवा झाडूवाला.....

Photo0199.jpg

नवा झाडूवाला.. Lol
मानुषे.. खरबुजच्चेत ना Wink Proud खूपसारे Light 1 घेच!!!

माझी बोटं अजिब्बात हिरवी नाहीत हे कृपया लक्षात घेऊन मलाही प्लीज सांगा कुंडीत ओली हळद कशी लावायची..
स्टेप बाय स्टेप प्लीज..

Pages