निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो दिनेश, परागीभवन व्हायच्या आधी फूल पिवळे असते. परागीभवन झाल्यानंतर लाल होत जाते.

नुकतेच उमलले फूल हिरवट असते.

म्हणजे ट्राफिक सिग्नलच कि... कधी कधी या वेलाला एकाच घोसात ४/५ फुले लागतात. नाजूक झुंबर वाटते ते.
मग तोंडल्यासारखी फळेही दिसतात. आता पनवेल पर्यंत तर दाट वस्ती आहे पण पुढे शेती सुरु झाली कि कुंपणावर
या वेली, अगदी रस्त्याच्या आजूबाजूला पण दिसतात.

मानुषी सेम पिंच्...मी पण रविवारी मुंबई पुणे..>>>>>>>> हो का!निकिता !!!!! गुड!
अरे ..हे कळलावी आहे का? असं का नाव दिलंय?

ससा.. अतिशय सुंदर फोटो..
ओहो..कळलावी चा अर्थ असा आहे काय.. आत्तातरी हा अप्रतिम सुंदर ,क्लिअर फोटो जीवाला कळ लावतोय Happy
दिनेश दा छान माहिती.. सिग्नल.. Lol

कळलावीला अजून एक समर्पक नाव आहे - अग्निशिखा! ........कारण पाकळ्या म्हणजे जणु काही लवलवत्या ज्वाळाच!

ससा आणि माधव, दोघांचेही फोटो मस्त!!

दिनेशदा, सिग्नल..:हाहा:

कळलावी मस्तच.. आणि एक्स्प्रेसवेही मस्त.. त्याचे फोटो पाहुन एकदम जुना मित्र भेटल्यासारखे वाटले. दर महिन्याला त्याची भेट व्हायची, आता तर शेवटची भेट होऊन किती महिने गेले तेही आठवत नाहीय...

आमच्या बिल्डींगमध्ये तळमजल्यावरील एकाने एक वेल लावली ती बाजुलाच असलेल्या पिंपळाच्या झाडावर पसरली आहे. आमच्या घरातुन अगदी जवळ दिसते. आधी त्याला कृष्णकमळासारखे एक फुल आले होते आणि आता छोटे गोल फळ आलेत. बहुतेक ते पॅशनफ्रुट असावे. सध्या कॅमेरा जवळ नसल्याने फोटो काढता येत नाही. पण लवकरत टाकेन फोटो. Happy

सध्या कॅमेरा जवळ नसल्याने फोटो काढता येत नाही.>>>>>> केव्हडा हा अन्याय???>>>>>हो ना Happy म्हणुन सलग तीन दिवस सुट्टी असुनही घरीच होतो
. Sad

https://fbcdn-sphotos-a-a.akamaihd.net/hphotos-ak-ash4/253806_4590523174...

आज अनेक दिवसांनी नि.ग वर आलोय कारण ही तसच आहे. काल अलिबाग मधे आम्हाला संपूर्ण वर्तुळाकार इन्द्रधनुष्य दिसल. मला नीट स्मरत असेल तर बहुतेक इंद्रवज्र असा शब्द आहे त्यासाठी. वर दिलेली लिंक क्लिक केली तर माझे मित्र राम जोशी यांनी काढलेल त्या मनोरम दृष्याच छायाचित्र पहाता येइल.

जाता जाता: आज ची सकाळ ही फार छान होती आज मी आयुष्यात पहिल्यांदा वासुदेव पाहिला. शुचिर्भूत असा, एकदम तरूण, पांढरा झब्बा व दुटांगी धोतर, भगवे उपरणे, खांद्याला झोळी हाती टाळ, डोक्यावर मोरपिसाची कुंची, कपाळी गोपी चंदनाचा टिळा, गळ्यात तुळसीमाळा, मुखी हरीनाम !!

उभा कसा राहिलाsss.... देव हा विटेवरी
पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला ? .... विटेवरी.

सुरेल आवाजात गायलेल वासुदेवाच भजन आज दिवस भर आता मनात गुंजत राहणार. आजचा दिवस छान आहे.

श्रीकांत, प्रचंड सुंदर आले आहे इंद्रवज्र. (हो बहुदा हाच शब्द आहे. मी पण इथेच माबोवरच वाचले होते त्या बद्दल)

इंद्रवज्र मस्तच व वासुदेवाचे वर्णनही भक्तिपूर्ण..... अशा प्रसंगांचं लगेच व्हिडिओ शूट करुन इथे शेअर करायला हवं होतं - वासुदेवाचं ते तुम्ही वर्णन केलेलं ध्यान बघता आलं असतं, तो अभंग ऐकता आला असता.....

अशा प्रसंगांचं लगेच व्हिडिओ शूट करुन इथे शेअर करायला हवं होतं - >>>> खरय तुमच पण आयुष्यात प्रथमच वासुदेवाच प्रसन्न करणार दर्शन झाल अन मला अस काही करायला सुचल नाही.

बी, वरच्या फोटोत आहे तसेच पान असते. साधारण बांबूच्या पानासारखे पण जरा लांब. वर लव नसते अगदी मुलायम पोत असतो. या पानांच्या टोकाने, हि वेल आधार पकडते.

जिप्स्या, पॅशन फ्रुटच असणार ते. कृष्णकमळ याच कूळातले.

हो दिनेशदा मलाही तेच वाटतंय. Happy

गेल्या महिन्यात श्रीनगरहुन मुंबईला विमानाने येताना महाराष्ट्राच्या जवळपास येताच मलाही इंद्रवज्र दिसले, फोटो काढण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण इंद्रवज्र खिडकीच्या थोडे खाली असल्याने फोकसच होत नव्हता. Sad संपूर्ण गोल इंद्रधनुष्य आणि त्यात विमानाची सावली असं खुपच सुंदर दृष्य होते. शूटिंग करायचे लक्षातच आले नाही. शेवटी कॅमेरा गप्प आत ठेवून दिला आणि त्या दृष्याचा आनंद घेत राहिलो.
एका बाजुला पाण्याने भरलेले ढग, मध्ये विमान आणि दुसर्‍या बाजुला सुर्य. सुर्यामुळे विमानाची सावली त्या पाण्याने भरलेल्या ढगावर पडली होती आणि सभोवती गोलाकार इंद्रधनुष्य. Happy आणि गमतीचा भाग असा कि विमानाची सावली जसजशी मोठी होत होती तस तसं ते गोलाकार इंद्रधनुष्यही मोठे होत होते. Happy
खुपच सुंदर दृष्य होतं. Happy

हे झाड पाहिले आहे पण सारखा गुलमोहरच डोळ्यापुढे येतो अहे.

दिनेशनी वर्णन केलेय तसेच असते साधारण. मी बघते मला फोटो मिळतो का ते. माझ्या जुन्या जिमच्या दारात आलेली कळलावी.

विमानातून खुपदा दिसते ते. पण शशांकला तर ते जमिनीवरून दिसले आहे. ( या वाक्यात हेवा ठासून भरलेला आहे. )

जिप्स्या, त्या फळावर लक्ष ठेव. हाती लागलं तर ते फोडून त्याच्या आतला फोटो टाक, म्हणजे मी सांगेन ते पॅशनफ्रुट आहे का ते !

Pages