निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)
मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||
हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.
- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
आपल्या सगळ्यांच्या लाडक्या
आपल्या सगळ्यांच्या लाडक्या जागूमॅडमची गुड न्युज गेले तिन दिवस मला स्वस्थ बसु देत नाहीय.. कधी एकदा सगळ्यांना सांगते असे झालेले पण आधी मॅडमकडुन परमिशन घ्यावी म्हणुन वाट पाहात होते.
तर गुड न्युज ही की 23 taarakhelaa जागूच्या घरी एक मस्त गोडगोडूली बाहुली आलीय.... श्रावणी आता ताई झालीय आणि ताईपणाच्या जबाबदा-या ती हक्काने आणि आवडीने पार पाडतेय. जागूचे मनापासुन अभिनंदन.....
साधने, शेवटी सांगितलीस का?
साधने, शेवटी सांगितलीस का?
मी तुझ्यासाठीच, इथे लिहिल नव्हत.
जागू, मनापासून अभिनंदन!
जागू, मनापासून अभिनंदन!
लवकरच नवीन फ़ुलाचा फ़ोटो पहायला मिळेल.
साधने, मी बाळाचा काल आवाज पण ऐकला. :टुक टुक:
हार्दिक अभिनंदन, जागू. आम्ही
हार्दिक अभिनंदन, जागू. आम्ही सगळे या गोड बातमीची वाटच बघत होतो.
.. पाचवीची पूजा झाली कि येशीलच इथे तू !
आजच घरी गेलीय जागू.. आता
आजच घरी गेलीय जागू.. आता बाळाची ताईच स्वत: जातीने हजर राहुन सगळी व्यवस्था पाहतेय म्हटल्यावर बाळाच्या आईला काम तसे कमीच असेल...
शोभा तुला मी पण करेन टुकटुक बरे लवकरच... उरण काय माझ्यापासुन लांब नाही, पण पुण्यापासुन मात्र आहे..
हार्दिक अभिनंदन, जागू. आम्ही
हार्दिक अभिनंदन, जागू. आम्ही सगळे या गोड बातमीची वाटच बघत होतो. >>> येस्स....
हे गाणे - स्पेशल "ताई" साठी.....
बडबड गाणे - ताईचे
थेंब थेंब पाss णी
बोल बोल राss णी.....
चल चल जाss उ
गाऊ गाss णी
खेळू दोss घी
छानसे काssही ......
गोल गोल चेंss डू
छोटीशी भावss ली
झोका देss ते
तुझी गं ताss ई .....
मोठी होss तू
खेळू लंगss डी
आत्ता एss वढंच
अपडी थss पडी ....
थेंब थेंब पाss णी
बोल बोल राss णी.....
जागूच्या बुलबुलाची बातमी कळली
जागूच्या बुलबुलाची बातमी कळली का ?
शशांक, मस्त कविता.
जागूच्या घराभोवतीचा निसर्ग बघितला, तर आणखी कवित सूचतील.
मी इथे अल्ट्रा व्हायोलेट आणि
मी इथे अल्ट्रा व्हायोलेट आणि इन्फ्रा रेड बद्दल लिहिले होते त्यावर बीबीसी चा एक (आणखी कुणाचा असणार )
रंजक माहीतीपट आहे. एखादी कठीण संज्ञा समजावून सांगण्यासाठी ते जे प्रयत्न करतात, त्याला दाद द्यावी तेवढी थोडीच.
आपल्याला फक्त सप्तरंग दिसू शकतात हे माहित आहेच पण समजा हा वर्णपण जर पियानोचा कि बोर्ड मानला,
आणि आपल्याला पूर्ण वर्णपट बघायचा असेल, तर त्या कि बोर्ड ची लांबी किती वाढवावी लागेल माहित आहे ?
तब्बल ९ कोटी ३० लाख मैल !
बँकांमधे खोट्या नोटा ओळखण्यासाठी एक मशीन असते. त्यात अल्ट्रा व्हायोलेट किरणे वापरतात. काही मेडीकल
स्क्रिनिंगमधेही ते वापरतात. याबद्दल आपण पाठ थोपटायची तर या क्षेत्रात उंदरासारख्या छोट्या प्राण्याने जास्त प्रगती केलीय. तो आपले क्षेत्र दाखवण्यासाठी सीमेवर मूत्र विसर्जन करतो. या मूत्राला केवळ गंधच नव्हे तर अल्ट्रा व्हायोलेट रंग पण असतो, त्या रंगाची तीव्रता कालांतराने कमी होते पण ती तीव्रता बघूनच बाकीच्या उंदराना, त्या उंदराला तिथे येऊन किती काळ झाला, ते कळते.
पण निसर्गात शेराला सव्वाशेर सापडतोच. या रंगाचे तीव्र ज्ञान काही शिकारी पक्ष्यांना पण असते आणि त्यावरुनच ते आकाशातून नेमकी झेप घेऊन, उंदराची शिकार करतात.
इन्फ्रा रेड किरणे पुर्वी एका खास दिव्यात वापरत असत. त्या दिव्याच्या प्रकाशात दुखर्या अवयवाला शेक देता येत असे. आपल्या डोळ्यांना हि किरने दिसत नाहीत पण अनुभवता येतात.
समजा तूम्ही झाडाखाली शेकोटी केली तर आपल्याला जेवढ्या लाल पिवळ्या ज्वाळा दिसतात तेवढीच आग नसते, तर जिथपर्यंत तिची धग पोहोचते, तिथपर्यंत इन्फ्रा रेड किरणे पोहोचलेली असतात.
हे किरण वापरून, त्यांनी जी फोटोग्राफी केलीय, ती निव्वळ अफलातून आहे.
जागु, तुझे खुप खुप
जागु, तुझे खुप खुप अभिनंदन....:)
बारशाला नक्की येऊ....
वा... मस्त कविता..
वा... मस्त कविता..
शशांकजी मस्त कविता. दिनेशदा,
शशांकजी मस्त कविता.
दिनेशदा, मस्त माहिती.
खरंच मस्त न्युज आणि तीपण
खरंच मस्त न्युज आणि तीपण ऑगस्ट महिन्यातच.
जागू आणि नविन फुलराणीला खुप खुप शुभेच्छा!!!!!
जागू आणि नविन फुलराणीला खुप
जागू आणि नविन फुलराणीला खुप खुप शुभेच्छा!!!!! स्मित>>>>>>>>>>..तेच सांगायला तर तुला फ़ोन केला होता.
वॉव!!! ' जागु के घर आई एक और
वॉव!!! ' जागु के घर आई एक और नन्ही परी'
जागुले>>> अभिनंदन!!!!!
खूप खूप आनंद झाला..
मोठ्या आणी छोटुश्या दोन्ही फुलराणींना खूप खूप शुभेच्छा..
'a BIg BIg Hug for U
शशांक ची नवीन कविता ,नव्याने
शशांक ची नवीन कविता ,नव्याने झालेल्या ताईलाही नक्की आवडेल!!!
माझ्या नवीन कॅमेर्याने
माझ्या नवीन कॅमेर्याने काढलेले फोटो (Canon EOS 550D - 18-135mm Lense )
लाल सदाफुली
दिनेशदा, हे पॅशनफ्रुट आहे का?
फोकस पिंपळाच्या पानावर गेल्याने फळाचा फोटो थोडासा ब्लर आला आहे.
हा वेलीचा फोटो
फळ
भोपळा लावला. भोपळा किती
भोपळा लावला.
भोपळा किती दिवसात लागतो?
प्रिझनर ऑफ अझकाबान मधल्या भोपळ्यांइतका भोपळा मोठा व्हायला काय करायचे?
दोडकाही लावला आहे.
शेळी, आपल्याकडे दोडका सहज
शेळी, आपल्याकडे दोडका सहज फुलतो फळतो पण लाल भोपळ्याला भोपळे धरतीलच असे नाही. वेळ लागतो. फुले गळून पडतात खूप सारी. आमच्याकडे तर मी इतकी तग धरली होती लाल भोपळा यायला पण एक आला आणि मग तो मध्यम आकाराचा होऊन वाढतच नव्हता. मग आम्ही तोच तोडून घेतला. कधीकधी वेलीच्या मधे जेंव्हा चोरुन दडलेली कारली, दोडकी, वाल, भोपळा देखील गवसतो तेंव्हा मला फार आनंद होतो. कित्येकदा मला असे आत दडून बसलले वेलीवरची फळे दिसली आहे. काही वेली अतोनात बहरतात. जशी की वाल. खूप शेंगा येतात. किड पडली की मग त्रास पण तेवढा होतो. आमच्याकडे वावडींगाचा वेल होता. खाली फळे पडली की दाट जांभळ्या रसानी जमीन टचटचून जायची.
लाल सदाफुली फिकट जांभळ्या
लाल सदाफुली फिकट जांभळ्या सदाफुलीपेक्षा सुरेख दिसते आहे. ही फुले देवाला वाहत नाहीत ना?
जागूचे माझ्यातर्फे मनःपुर्वक
जागूचे माझ्यातर्फे मनःपुर्वक अभिनंदन!!!!
जागू अभिनंदन ... लडकीवालियों
जागू अभिनंदन ... लडकीवालियों के गँग मे सहर्ष स्वागत .
अरे वा! जागूचे अभिनंदन!
अरे वा! जागूचे अभिनंदन!
सध्या इथे बरेच दिवसात आले
सध्या इथे बरेच दिवसात आले नाही तर बर्याच गोष्टी घडून गेल्या की!
जागूचे खूप खूप अभिनंदन! मस्त बातमी. पण आता या लेकीचं नावही श्रावणी ठेवावं लागेल की!
जिप्स्या, उशीराने (का होईना) तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! आईस्क्रीम खायला कधी नेतोयस?
अन हे काय? जिप्सीनं पहिल्या बायकोला सवत आणली की काय?
मागच्या रविवारी मी विही,
मागच्या रविवारी मी विही, खोडाळा परिसरात लाँग ड्राईव्हला गेले होते. खोडाळा ते घोटी रस्ता केवळ स्वर्गीय आनंद देणारा आहे. त्या रस्त्यावर आजूबाजूला कितीतरी लाल भोपळ्याचे वेल उगवलेले दिसत होते. पण फुलं नव्हती. लवकरच येतील. माझ्या मनात एखाद महिन्यानं पुन्हा तिथे जाण्याचा विचार आहे. गाडीभर भोपळे घेऊन येईन म्हणते.
उन्हाळ्यात त्या रस्त्याच्या बाजूला करवंदं मिळतात.
जागु अभिनंदन.. शशांक कविता
जागु अभिनंदन..
शशांक कविता अन माहिती दोन्ही मस्तच
गाडीभर भोपळे घेऊन येईन म्हणते. >>>> भोपळा आवडत नाही, नाहीतर पुण्याला पण पाठवुन द्या म्हट्लं असतं
प्रिझनर ऑफ अझकाबान मधल्या भोपळ्यांइतका भोपळा मोठा व्हायला काय करायचे?>>>>>> हॅग्रिड वापरतो तो स्पेल वापरा की
जिप्सी, तु नवीन, जुण्या, मोबाईलच्या किंवा कोणत्याही कॅमेर्याने फोटो काढ.. सुंदरच येतात.. पण नवीन कॅमेर्याने फोटो काढताना तुला अवर्णनीय आनंद झाला असणार नक्कीच
वॉव्..जिप्सी ..अभिनंदन!!!
वॉव्..जिप्सी ..अभिनंदन!!! गुलाबी रंगाची शेड जबरदस्त पकडली आहेस कॅमेर्यात!!
बी.. चोरुन दडलेली कारली, दोडकी, वाल, भोपळा .. किती गोड!!!!
मामे.. गाडीभर भोपळे कि भोपळ्याची गाडी??
तर मग मामी कोणते गाणे म्हणेल??.. 'चल रे भोपळ्या टुणुक टुणुक!!'
४-५ दिवसांनी आले. बरयाच
४-५ दिवसांनी आले. बरयाच घडामोडी झालेल्या दिसतात.
जागू, अभिनंदन!! अधिक मासातल्या मुलीला सगळे काही अधिक मिळो.
जिप्सी, पुन्हा एकदा सुंदर फोटो. लाल सदाफुली छानच.
शनिवार, २५ ऑगस्टला "सिटि वॉक"
शनिवार, २५ ऑगस्टला "सिटि वॉक" केला होता. संजय गांधी नॅशनल पार्क, मुंबई विद्यापीठ आणि लोकसत्ता आयोजीत -- नॅशनल पार्क येथील सिलोंढा रान वाटेवर. सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत.
सामान्य माणसांना परवानगी नसलेला नॅशनल पार्कचा भाग. हिरवाकंच, पावसाळी रानफुलांनी फुललेला, पक्षांच्या किलबिलाटात रमलेला, दहीसर नदीचा आवाज, तिचे वहाळ आणि मधेच पावसाची सोबत.
श्री. सावरकर हे botonist आणि श्री. सावंत हे zoologist बरोबर होते. वनसंपदा-- त्यांची माहीती, प्रकार, उपयोग, खाणाखुणा असे फारच रोचक होते. निरनिराळ्या प्रकारचे किटक, नाकतोडे, फुलपाखरे, किटकांच्या अळ्या आणि विविध कोळी अशी सगळी सुंदर स्रुष्टी होती.
आगळा-वेगळा अनुभव.
वहाळ म्हणजे ओहळ म्हणायचे आहे
वहाळ म्हणजे ओहळ म्हणायचे आहे का? दहिसर नदीचे नाव आहे का?
जागू, अभिनंदन!! अधिक
जागू, अभिनंदन!! अधिक मासातल्या मुलीला सगळे काही अधिक मिळो. >>>> अरे व्वा, खरंच की अधिक महिना आहे की हा -"अधिका" नाव सुचवलं पाहिजे जागूकडे....
मधु-मकरंद - वर जे वर्णन केलेत नॅशनल पार्कचे ते वाचून अगदी हरखूनच गेलो... भाग्यवान आहात बुवा - केवढे निसर्गात रममाण होता आलं.....
Pages