निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओली हळद, म्हणजे आल्यासारखे दिसणारे कंद असते. (ओल्या हळदीचे लोणचे, या माझ्या पाककृती मधे फोटो आहे. ) तेच लावायचे. साधारण दिवाळीच्या सुमारास ते भारतात बाजारात येते. (तामिळ लोकांना ते कुठल्यातरी पुजेसाठी लागते. ) त्याला मातीत पुरल्यावर कोंब फुटतात. आल्यालाही फुटतात.

वर्षू, गलांगलवर प्रयोग करता येईल. त्याला नाहीतरी कोंब असतातच ना.

रताळ्याचा वेलही छान दिसतो. थोडे दिवस रताळे घरात राहिले (फ्रिजमधे नाही ) तर त्याला कोंब आलेले दिसतात. तेवढा तूकडा कापून लावायचा. बटाट्याच्या कोबही रुजतो. रताळे आणि बटाटा यांना
छान फुलेही येतात.

मानुषी, गरीब बिचार्‍या लुईकडून किती कामे करुन घ्यायची ती ?

मधू, इथे चर्चा झाली होती. कुंडीमधे जर बॉलपेनच्या रिकाम्या रिफिल्स खोचून ठेवल्या, तर कबुतरे अंडी
घालू शकत नाहीत.

जर सुकवायची सोय असेल तर तुळशीची हिरवी पाने, सावलीत ठेवून सुकवता येतात. रोजच्या चहात वापरता येतात. सूप / काढा पण करता येतो.

भोपळा किती दिवसात येतो? मांडव घातला तर त्यावर भोपळे लगडतील का? की ते जमिनीवरच जास्त चांगले येतील..

मानुषी, गरीब बिचार्‍या लुईकडून किती कामे करुन घ्यायची ती ?>>>>>>>>>
दिनेशदा...............लुई आणि गरीब.!!!!!!!!!!!!! तो हसेलच हे वाचून!!!!!!!!
कुंडीमधे जर बॉलपेनच्या रिकाम्या रिफिल्स खोचून ठेवल्या, तर कबुतरे अंडी
घालू शकत नाहीत.>>>>>>>>> चांगली आयडिया आहे.

हो आणि मीही बटाट्याचे कोंब कापून रोपले तर त्यालाही मस्त फुटवे आले आहेत.
आता बघू त्याला बटाटे येतात का!
रविवारी पुणे मुंबई एक्सप्रेसवे वर गाडीतूनच घेततेले फोटो.(पण तशी नेहेमीसारखी हिरवाई/छोटे धबधबे काहीच नव्हतं. कारण पाऊसच कमी झाला होता तोपर्यंत.)

Photo0255.jpgPhoto0258.jpgPhoto0259.jpgPhoto0267.jpg

पोळी च्या तुकड्या कडे डिसइंटरेस्ट नी पाहात असलेल्या बोक्याच्या मनात काय चालले असेल..?
शेवटी त्याला राग आलाच..
.. शेवटच्या फोटूत दिस्तोय खरा वाघा चा रागावलेला मामा !! Happy

शेवटचा फोटो खतरनाक!!! Happy

यातल्या 'आमचा' शब्दाला आईची अनुमती आहे?>>>>माधव Proud अगदी अगदी Happy

यातल्या 'आमचा' शब्दाला आईची अनुमती आहे? >>>>>>> हे मात्र एकदम पटेश!!

वाघाचा मामा!!..:हहगलो:

झरबेरा, एसचे फोटो मस्तच!!

मानुषी, खरंच गं...............किती बिचार्‍याकडून कामं करून घ्यायची ती? आणि ते कुंडीत जुनी रिफिल्स खोचून ठेवण्याचा उपाय मीच सांगितला होता.......... माझ्या बर्‍याच मैत्रिणींचा रामबाण..सॉरी.. रिफीलबाण उपाय आहे हा!! अगदी हमखास उपयोग होतो याचा.

यातल्या 'आमचा' शब्दाला आईची अनुमती आहे??

नाईलाज को क्या इलाज????

तरी अधुनमधुन ऐशूची नजर चुकवुन मी एखादी फुटबॉल किक मारतेच... Happy

रिफीलबाण उपाय आहे हा!! >>>>>>>> शांकली हे मस्त!
आणि झरबेरा.........जर तो कबूतरांना पळवत असेल तर मग आईच्या अनुमतीचा प्रश्नच नाही! नाही का गं?
पण फोटो मस्तच!

रिफील बाण उपाय मस्तच Happy

एस आणि लुई मस्तच.. फोटोतच बरं का.. Wink

कोणाकडे तुळशी जास्त झाल्यात?? कोणी त्यांना घ्यायला नसेल तर रोज घरातल्या सगळ्यांनी २-३ पानं खा की आवडत असतील तर.. Happy

वनस्पतीना मेमरी (लक्षात ठेवण्याची शक्ति) असते का?

काही रेफ्रेन्सेस ??

वनस्पतीशी स्पर्शसन्वाद होतो असे वाचल्यासारखे झाले आहे

विकु

दिनेशदा, राणीबागेत मणीमोहर बहरला असेल का? त्याचा सीझन कधीपर्यंत असतो?
सध्या १०-१२ दिवस माझा कॅमेरा सोबत नाही आहे, त्यामुळे तीन दिवस सुट्टी असुनही राणीबागेत गेलो नाही. Sad

झरबेरा चा, एस व मानुषीचा लुई मस्त्च Happy
मला स्वतःला कोणताच प्राणी घरात आवडत नाही. एकतर त्यांना असे बंद करणे व ते मांडीवर वगैरे येऊन बसतात हे आवडत नाही.
लांबुन मस्त दिसतात पण ते Happy

तुळशी जास्त झाल्यात?? कोणी त्यांना घ्यायला नसेल तर रोज घरातल्या सगळ्यांनी २-३ पानं खा की आवडत असतील तर.>>> अगदी +१. पिण्याच्या पाण्यात टाकुन ठेवायची पाने. अर्क उतरत रहातो.

मला स्वतःला कोणताच प्राणी घरात आवडत नाही

तुझ्या आजुबाजुला मनुष्य"प्राणी" वावरत नाहीत का रे???????????????

तुझ्या आजुबाजुला मनुष्य"प्राणी" वावरत नाहीत का रे????>>>>त्यांना सहन करावेच लागते. तेथे चॉईस नसतो ना? Wink

आजुबाजुला मनुष्य"प्राणी" वावरत नाहीत का रे????>>>>त्यांना सहन करावेच लागते. तेथे चॉईस नसतो ना? >>>>> +१०००००००० Wink

शशांक, तुम्ही बोटॅनिकल नेम्सवर एक धागा काढणार होता त्याचे काय झाले??? >>> एकटा मी नाही, "आपण सारे" असायला पाहिजे त्यात .....
मुहुर्ताचा "नारळ" फोडलाय मी २-५ पाने मागे.. याच धाग्यावर.... काय करायचे पुढे ते सर्वानुमते ठरवून "नावे" ठेवणे चालू करुयात..

जिप्सी, एक फेरी मार. बहुतेक फुलला असेलच आता !
या महिन्यात जर तू रायगड जिल्ह्यात फेरी मारलीस तर कळलावीचे मस्त फोटो मिळतील. अधिक महिना असल्याने, कुणी तोडणार नाहीत !

कळलावी किती सुंदर दिसते. बॅले नर्तकी दोन्ही हात वर धरुन उभी आहे असे वाटते.. Happy

शशांक, नविन धागा उघडा ना. तिथे नावे 'ठेवायला' अजुन मजा येईल. फक्त चुकून गप्पांचा धागा मात्र उघडु नका, नाहीतर पावसात वाहुन जातील आपली नावे. Happy

Pages