निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईकरांना गुंजेचे झाड शिवाजी पार्क, महापौर निवास बस स्टँड च्या मागे, पारसी कॉलनी ते खोदादाद सर्कल या रस्त्यावर आणि विल्सन कॉलेज ते बाबुलनाथ या सिग्नलजवळ दिसतील.
(म्हणजे आधी रस्त्यावर गुंजा दिसतील आणि मग वर बघितले कि झाड दिसेल.)
गुंजेची वेल मात्र अल्पायू असते.

पण गुंजा आणि तिचा पाला, दोन्ही खाण्यासारखे नसतात. पानपट्टीत वापरतात तो वेगळा पाला.
००००००००

झाडाखाली पडलेल्या चिंचा, बोरे, काजूच्या बिया, गुंजा, कैर्‍या, बकुळफुले, फणसाचे कोके, आवळे, पळसाची फुले, पांगार्‍याच्या शेंगा, पिकलेली उंबरे (हि मात्र क्वचितच धड राहिलेली असतात.) सुकलेले हिरडे, बिट्ट्या, पिंपळाची जाळी पडलेली पाने, वटांगळे (वडाची फळे), पक्ष्यांची पिसे, बाभळीच्या शेंगा, मोहाची फुले, ................ हे सगळे वेचण्यात आपले बालपण गेले !

जागू इथे जे फुलांचे फ़ोटो टाकत असते, त्यातले रंग बघून कधी कधी वाटते, कि आपल्याला
हे रंग बघण्याची शक्ती लाभली आहे, त्याबद्दल दात्याचे आभारच मानले पाहिजेत.
पण या बाबतीत तो दाता म्हणजे, परमेश्वर वगैरे नसून चक्क वनस्पति आहेत. नाही ना पटत ?
कसे ते बघू या.
एक भली मोठी उल्का पृथ्वीवर कोसळली आणि त्यात डायनासोर सारखे प्राणी नष्ट झाले, हे आपण
जाणतोच. (खरे तर फ़क्त हेच आपल्याला शिकवले जाते, ) मग त्या काळात अस्तित्वात असलेल्या
वनस्पतिंचे काय ? त्याही नष्ट झाल्याच कि. मग परत नव्याने त्या कशा निर्माण झाल्या ? आणि
डायनोसोर का नाही निर्माण झाले ?
कारण सोपे आहे. जरी स्पीलबर्गने रम्य कल्पना केली असली तरी केवळ डि एन ए वापरून, नवा
प्राणी तयार होणे, निदान निसर्गत: तरी शक्य नाही. पण तसे वनस्पतिंचे नाही. बीजरुपाने त्या
आपले अस्तित्व अखंड टिकवू शकतात. हि बीजे जी असतात, ती काळातच नाही तर अवकाशातही
(म्हणजे टाईम ऎंड स्पेस, बरं) प्रवास करु शकतात. फ़क्त त्यासाठी त्यांना, वारा, पाणी आणि प्राणी
यांची मदत लागते. आणि हि मदत त्या (बहुतांशी) काही उपकार म्हणून घेत नाहीत, तर त्यासाठी
चक्क खाऊ देतात.
या अशनीपातानंतर जे नव्या प्रकारचे प्राणी (मॅमल्स) निर्माण झाले, त्यांचा उपयोग वनस्पतिंनी
करायला सुरवात केली. त्यापुर्वी किटकांचा त्या वापर करत होत्याच, पण किटकांना थेंबभर साखरपाणी
दिले तरी चालत होते. पण किटक अगदी छोटे असल्याने ते जरी परागीवहन करु शकत असले तरी
त्यापे़क्षा मोठ्या असलेल्या बिया, त्यांना वाहून नेणे शक्य नव्हते.
आणि त्यासाठी प्राणी वापरायला वनस्पति शिकल्या. आणि त्यांना अमिष म्हणून त्यांनी फ़ळे निर्माण
केली. फ़ळात गर निर्माण केला. खरे तर फळे म्हणजे बहुतांशी फुलांचे गर्भाशयच असतात. (काजूच्या
फ़ळांसारखा, एखादा अपवाद. )
बहुतेक फळे हि कच्ची असताना, आंबट तुरट असतात. त्यातला गर घट्ट असतो आणि त्यांना सुगंध
देखील नसतो. कारण फ़ळ तयार करणे हे काही खायचे काम नसते, त्यासाठी वनस्पतिंना साखर
तयार करावी लागते. आणि त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे, बी विकसित करायची असते. त्याला अर्थातच
काहि वेळ लागतो. बी तयार झाली, कि फ़ळ गोड केले जाते आणि प्राण्यांसाठी म्हणून, झाडाखाली
टाकले जाते. त्याला सुगंध देखील दिला जातो.
झाडाखाली चरणारे प्राणी, (ससे, हरणे वगैरे ) या फळातील बियांचा प्रसार करतील अशी अपेक्षा.
पण त्यात परत एक घोळ झाला. काही प्राणी ( म्हणजे जास्त करुन आपले पूर्वज) अति चळवळे
होते. ते केवळ झाडाखाली चरत नव्हते तर त्यांनी झाडावर चढण्याची कलादेखील शिकून घेतली.
त्यासाठी त्यांच्या खांद्याचे स्नायू खास विकसित झाले. इतकेच नव्हे तर पंख नसताना, एका
झाडावरुन दुसऱ्या झाडावर उड्या मारायला देखील ते शिकले. फ़ळे हातात धरुन खाण्यासाठी आणि
फांद्यांवर पकड घेण्यासाठी त्यांच्या हाताचा अंगठा एका बाजूला आणि बोटे एका बाजूला झाली.

झाडांचे काही नुकसान नव्हते यात. पण झाले काय कि झाडांचा आधार मिळाल्याने, त्यांना हिंस्त्र
प्राण्यापासून संरक्षण मिळाले. या सुरक्षिततेमूळे त्यांची प्रजा वाढली.
प्रजा वाढल्याने निव्वळ फ़ळांचा आहार कमी पडू लागला. मग त्या प्राण्यांनी पाने, फ़ुले जे हाताला
लागेल ते खायला सुरवात केली. पानांचा आहार प्राण्यांनी करावा, हे आजही झाडाला नामंजूर आहे,
कारण पानात तसे पौष्टिक काही नसते, त्यामूळे ते प्राणी जरुरीपेक्षा जास्त खातात पण
पचवायची शक्ती नसल्याने, झोपा काढतात, ज्या दरम्यान त्यांच्या पोटातले बॅक्टेरिया, पानांचे
विघटन करतात.
ते असो, पण फळांचे काय ?
झाडे फळे निर्माण करतच होती, पण ती तयार होईपर्यंत माकडांना धीर निघत नसे, ती कच्ची फळेच
खात असतात. हेही झाडाला अपेक्षित नव्हते. कारण बी तयार व्हायच्या आतच, माकडाच्या हाती
देण्यात अर्थ नव्हता.
पण त्यावेळी सर्वच फ़ळे पानांप्रमाणेच हिरवी असत. कच्ची फळे आणि पक्व फळे यात फरक करणे
गरजेचे होते. त्यामूळे झाडांनी फळे पिकल्यावर त्यांना आकर्षक रंग द्यायला सुरवात केली.
रंग तयार करायची कला झाडांना अवगत होतीच कारण, त्या फुले आधीपासूनच तयार करत होत्या.
फळे रंगवली तर खरी, पण परत सगळेच मुसळ केरात गेले कारण ज्या प्राण्यांना म्हणजे माकडांना
हा रंगबदल समजावा, अशी अपेक्षा होती, ती तर रंगांधळी होती. त्यांना कळणार कसे, कुठले फ़ळ
पिकलेले आहे ते ?
त्यासाठी आपल्या डोळ्यात खास शंक्वाकृती स्नायू तयार झाले आणि त्यांची लाल, पिवळा आणि निळा
रंग ओळखण्याची क्षमता तयार झाली.
आणि अशा रितीने आपल्याला वनस्पतिंनी नवी दृष्टी दिली.

आजही तूम्ही बघा, रंगपटलातील पहिले काही रंग, म्हणले लाल, नारिंगी, पिवळा असेच जास्त करुन फ़ळांत
असतात. या रंगाचे आकर्षण तर आपल्याल्या मातेच्या गर्भात असतानादेखील असते. हेच रंग आपल्याला
अंधारातही थोडेफ़ार ओळखता येतात. (निळा, जांभळा नाही येत.)
आणि आपल्या नजरेची हि मर्यादादेखील आहे. आपल्याला लालच्या आधीचा, इन्फ़्रारेड आणि जांभळ्याच्या
पुढचा, अल्ट्रा व्हायोलेट, साध्या डोळ्यानी दिसत नाही.
आणि माझ्या पोस्टची सुरवात झाली, त्या फ़ुलांच्या रंगांबाबत म्हणायचे तर ते रंग आपल्यासाठी, नसतातच
मूळी. आपण फ़ुलांचे रंग बघतो ते आपल्या चष्म्यातून. किटकांच्या नजरेतून बघितले तर ते रंग फ़ारच
वेगळे दिसतात. खरे तर ते रंग म्हणजे त्यांच्यासाठी, पथदर्शक असतात, किंवा चक्क जाहीरात म्हणूया.
या रे, इथे तूमच्यासाठी खाऊ ठेवलाय अशी !!!

( या पोस्टला संदर्भ आहे तो अर्थातच बीबीसी च्या एका माहितीपटाचा.)

दिनेशदा, सुप्रभात!!
ईतका सुंदर, अभ्यासपूर्ण लेख वाचून दिवसाची सुरवात झाली. आता दिवस नक्कीच चांगला जाणार.

कालच ऐशू तिच्या शाळेतल्या एका रंगांधळ्या सरांबद्दल सांगत होती. त्यांचे आजोबा रंगांधळे होते. हा विकार म्हणे एक पिढी सोडुन दुस-या पिढीत उतरतो. त्यामुळे घरचे सर आणि त्यांची बहिण दोघांबद्दलही चिंतीत होते. सर लहानपणी ब-याच उशीरा बोलायला लागले, वर त्यांना रंग ओळखाय्लाही फारसा त्रास होत नव्हता त्यामुळॅ घरच्यांनी सुस्कारा सोडला, दोन्ही मुले नॉर्मल आहेत म्हणुन. पण त्यांनी सायन्सला जाऊन झुलॉजी घेतल्यावर आपल्याला लाल रंग ओळखताच येत नाहीय हे त्यांचा लक्षात आले. रंगांधळ्यांना लाल, निळा, पिवळा यातला एक रंग ओळखु येत नाही. म्हणजे लालभडक असेल तर त्यांना तिथे काळे दिसते, गुलाबी असेल तर करडे.... जसजसे वय वाढत जाते तसतसा रंग न ओळखता येण्याचा त्रास जास्त व्हाय्ला लागतो. अर्थात हे ऐशूने सरांकडुन ऐकलेले प्रवचन आहे, मला स्वतःला रंग ओळखता येतात पण मी शब्दांधळी आहे, रंग हिरवा दिस्तोय तरी नीळा आहे असे खुशाल ठोकते. Happy

वा दिनेशदा - खूपच गमतीशीर माहिती सांगितलीत की...

साधनाने रंगांधळेपणाबद्दल जे लिहिले आहे त्यालाच जोडून हे लिहित आहे - सुप्रसिद्ध रसायन शास्त्रज्ञ जॉन डाल्टन हा रंगांधळा होता व त्यावरुन डाल्टनिझम हा शब्द रंगांधळेपणाला समानार्थी म्हणून आला.

गुगलवर जर डाल्टनिझम टेस्ट असे टाईप केल्यावर आपली आपल्याला ही चाचणीही करता येईल. दुचाकी/ चारचाकी वाहन चालवताना (विशेषतः शहरात) हा रंगांधळेपणा सिग्नल बघण्यात मोठा घोटाळा निर्माण करु शकतो व पर्यायाने अपघाताला निमंत्रण देऊ शकतो.

त्यामुळे बघा आपली आपण ही टेस्ट / चाचणी करुन.......

साधना, लाल, निळा आणि पिवळा, या रंगांसाठी वेगवेगळे स्नायू आपल्या डोळ्यात असतात. पण या रंगाचे ठराविक प्रमाण बघितल्यावर आपल्याला रंगांच्या छटा दिसतात.

पुर्वीच्या काळी टिव्हीच्या स्क्रीनवर या तीनच रंगांचे ठिपके असायचे. हे संगळे रंग एकदम असले तर आपल्याला तो भाग पांढरा दिसायचा आणि तिन्ही नसले तर तो भाग काळा दिसायचा.

इंडोनेशियाला असाताना घरातल्या एकूणएक मेड्स (तरूण,प्रौढ) गडद हिरव्या रंगाला सर्रास निळाच म्हणत..
इथे चीन मधल्या ही असंच म्हणतात.. हे फारच कोडं वाटतं..
का या देशांत हिरव्या रंगाला 'निळा' हेच नांव आहे कि काय... Uhoh

सुप्रभात.

sontakka.JPG

दिनेशदा पटले. खुप छान माहीती.

रंग हिरवा दिस्तोय तरी नीळा आहे असे खुशाल ठोकते.
साधना Lol

देशांत हिरव्या रंगाला 'निळा' हेच नांव आहे कि काय... >>> साधना तुझा पुर्वजन्मावर विश्वास आहे काय Wink
---
दिनेशदा खुपच छान माहिती अतिषय सोप्या शब्दात दिलीत Happy

जागू सोनटक्क्याचा सुवास दरवळला.
रच्याकने - लहानपणी (आमच्या) असे म्हटले जायचे की हि फुले डोक्यात घातल्याने उवा होतात. आता त्या उवा तेथे तर परागीभवन नक्कीच करणार नाहीत. :फिदि: मग नक्की दुसर्‍याच कारणांमुळे हे सुंदर फुल बदनाम व्हायचे काय? की त्या सुगंधाचा व उवांच्या वाढीचा काही संबंध आहे?

मोनालिप Proud
बाप्रे..सोनटक्का आणी उवा?? आई गं!!! सोनटक्क्याच्या फुलात बारीक किडे असतात का?,त्यांनाच तर उवा समजत नव्हते ना...

बाप्रे..सोनटक्का आणी उवा?? आई गं!!! >>> घाबरू नये अज्जिबात ......उवांना व्यवस्थित कळतं डोकं कुठलं आणि "फूल" कुठलं ते ....
अवांतर - अशा फुलांनी वगैरे काही उवा होत नाहीत..... त्या बिचा-या (!) आपले डोकेच खातात... (ते पराग, साखरपाणी सोडून...)

ही पुर्वीची समजूत आहे की सुवासीक फुले घातली की डोक्यात उवा होतात. पण असे काही नाही असे मला वाटते.

सुवासिक फुलांमध्ये किडे असतात, डोक्यात फुले माळल्यावर ते किडेही सोबत बाय वन्-गेट वन फ्री सारखे मिळु नयेत म्हणुन आया उवांची भिती घालायच्या.

माझे केस लहानपणी बरेच लांब होते आणि मला नेहमी उवा व्हायच्या. त्यांच्या निर्मुलनासाठी आईच्या हातात डोके द्यायला मी नाखुश असायचे कारण केस खुप दुखायचे. मग आई सांगाय्ची की या उवा तशाच ठेवल्या तर खुप मोठ्या होतात आणि मग आपण झोपल्यावर आपले केस खेचत आपल्याला समुद्रात खेचुन नेतात. मी तेव्हा समुद्र पाहिला नव्हता पण नुसत्या कल्पनेनेच घाबरुन मी डोके द्यायचे आईला Happy

पण तसे वनस्पतिंचे नाही. बीजरुपाने त्या आपले अस्तित्व अखंड टिकवू शकतात.

अगदी अनुमोदन.. आमच्याएका भिंतीजवळ काही वर्षापूर्वी एरंडाची झाडे होती... भिंतीच्या कुंभीवर बर्‍याच बिया पडायच्या... नंतर ती झाडेही गेली..... पण गेल्याआठवड्यात पावसाने तीभिंत पडली.... मातीदगडाचा ढीग झाला. आता त्यातून एरंडाची झाडे आली आहे... आठ दिवसात दोन फूट आणि हातभर मोठी पाने आहेत .. सकाळी सकाळी ती लहान मुलांएवढी दिसनारी झाडे छान दिसतात.

मी आता भोपळा लावायचा विचार करत आहे.... भोपळा, दोडका , काकडी अशा वेलींची वाढ रोज जाणवण्याइतपत असते. छान वेळ जातो.

दिनेशदा, फार उद्बोधक माहिती रंजनात्मक पद्धतीने सांगण्यात तर तुमचा हातखंडा ! गंमत वाटली वाचताना.

साधना Proud

केस खेचत आपल्याला समुद्रात खेचुन नेतात. मी तेव्हा समुद्र पाहिला नव्हता पण नुसत्या कल्पनेनेच घाबरुन मी डोके>>> हे भारीच. Happy
बाकी असे काहिहि ऐकले तरी मी ती फुले माळायचेच. Happy शिवाय आईने उवांशीपण यशस्वी लढा सतत ठेवला होता. काय बिशाद त्या येतिल याची. Wink

भोपळा, दोडका , काकडी अशा वेलींची वाढ रोज जाणवण्याइतपत असते. छान वेळ जातो.>>

बरोबर. मी तर वेलीचे तंतू किती वाढले नि कुठे गुंतले हे रोज निरखायचो. आमच्याकडे वालाच्या शेंगाची वेल होती. चार पाच वर्ष तिने रोज टोपलीभर शेंगा दिल्यात.

दिनेशदा, मस्त माहिती रंगांविषयी!
मेंदीची झाडं आमच्याघरी पण होती. ती वाटून लावणं हा आवडता उद्योग होता उन्हाळ्याच्या सुट्टीतला.

Pages