निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांदण्या रात्री कुंतीच्या झाडाखाली उभे रहावे, सुगंधी चांदण्याच्या वर्षाव होतो ! >>> क्या बात है...

सध्या भरपूर पेरू आहेत. रोज दह्यातली पेरूची कोशिंबीर! कॅल्शियमच कॅल्शियम! >>>> शाळेत असताना दररोज किती पेरु खायचो याची गणनाच नव्हती, दारातच पेरुचं झाड, सर्व शेजा-यांकडेही पेरु त्यामुळे पेरु फारच फेवरिट होता.
आणि कुठल्याच घराच्या बागेला कुंपण हा प्रकारच नव्हता त्यामुळे आसपासच्या सर्व घरांच्या बागेतील सर्व फळे खाता यायची - शेजारचे मुद्दाम फळे खायला बोलवायचेही .....
पूर्वी म्हातारी/ जाणती माणसे म्हणायची - एक पेरु (आख्खा) एकट्याने खायचा, वाटून नाही खायचा - कारण त्या सर्व बियांमधे एक बी अशी असते की ती इतर बियांना न्युट्रलाईज करणारी असते. ख खो दे जा

इथे मुद्दाम विचारते आहे..

शिर्डी जवळ सगुणा फार्म सारखं काही आहे का? शिर्डीला जायच आहे पण तिथे रहायच नाही.

me ghari Madhu malati cha zaad lavala ahe. Pan tyachi pana thodi kali disat ahet ani khup wara asalyane ti galun padat ahet. Mala please kay karava lagel te sangnar ka?

लहानपणी कधी पिकलेला पेरु आवडायचा नाही. कच्चट, तुरटच गोड लागायचा.. आणि तो चिमणीच्या दाताने तोडून वाटून खायचा. आता चिमणीच्या दाताने म्हणजे, शर्टात किंवा फ्रॉकमधे घालून तो चावायचा, आणि तूकडे करायचे. असा चिमणीच्या दाताने तोडला तर तो उष्टा होत नाही.. कसल्या निरागस कल्पना होत्या ना !

रसिका, पाने काळी असली तरी तजेलदार आहेत ना ? वार्‍याने पाने नाही गळणार, मुळाशी उंदीर लागला असेल किंवा जर तेल / डिझेल पसरले असेल तर तसे होईल. मधुमालतीचा वेल हा सकर असतो, त्यामूळे मूळातूनच त्याला धुमारे फुटत असतात. अशी रोगट फांदी कापून टाकली, तरी त्याला धुमारे फुटतील. पण जपून, कारण हे धुमारे कधी कधी अति होतात.

Thank you Dineshda. Ekunach mala kuthalya zadana kiti pani ani kashi kalaji ghyawi hyachi mahiti kashi milel?

Mazya kade atta Ratrani, Madan baan, Jui, Madhu malati ani gulabachi ropa ahet. Madhu malatichi pana kadana kali hot ahet pan tyala navin palavi futate ahe.

लहानपणी एकाकडे वेगळ्याच जातीचं पेरूचं झाड पाहिलं होतं. त्याचे पेरू अगदी कडक असायचे दगडा सारखे.

रसिका, पाण्याचे प्रमाण अनुभवावरुन ठरते. झाड, माती, हवामान असे बरेच घटक असतात. लहान झाडांच्या बाबतीत मूळाशी माती ओलसर असेल तोपर्यंत पाणी देऊ नये. तसेही झाडाला थोडाफार पाण्याचा ताण देणे आवश्यक असते. म्हणजे मूळे खोल जातात व झाड मजबूत बनते.

जो.. आपल्याकडे डोंगरावर सापडणार्‍या गेळ / गेळाची फळे पण अगदी पेरूसारखीच असतात. त्यांना वासही गुळमट येतो, पण खायला गेलो तर अति कठीण आणि आत भरपूर चोथा असतो.

सुदुपार.

माझ्या आई कडे मधु मालतीचा वेल आहे. त्याचे धुमारे जवळ जवळ २ गुंठे जागेत पसरतात.

दिनेशदा,
तुमच्या लहानपणीच्या, मेंदीच्या आठवणी छान वाटल्या,ती मेंदी किती अस्सल होती,भारी रंगायची ते आठवलं.तुमचे अनुभव्,आठवणी खुप आहेत,विषेश भारी आहेत
वाचताना मलादेखील गावाकडच्या ओढयाकाठची मेंदीची सगळी झाडे केलेली भटकंती डोळ्यासमोर आली.

दिनेशदा मग ते गेळच असेल.
पावसाळ्यात तेरडा, अंबाडी, टाकळा, आघाडा अशी बरीच झाडं उगवायची. तेरड्याची फळं तयार झाली की टच करताच मस्त फुटतात आणि नागाचा फणा तयार होतो. अंबाडीची अंबट पानं मस्त लागतात. हल्ली तेरडा "रंग ३ दिवस" म्हणण्या पुरताही दिसत नाही.
काजवा नावाचा किटक असतो हे आता पुस्तकातच दाखवाव लागेल मुलांना.

जो-एस आमच्याकडे येतात काजवे माझी मुलगी मला रोज दाखवते. Happy

तेरडाही आता फुलायला लागला आहे. फोटो काढलेत उद्या टाकते.

पावसाळ्यात तेरडा, अंबाडी, टाकळा, आघाडा अशी बरीच झाडं उगवायची. तेरड्याची फळं तयार झाली की टच करताच मस्त फुटतात आणि नागाचा फणा तयार होतो. अंबाडीची अंबट पानं मस्त लागतात. हल्ली तेरडा "रंग ३ दिवस" म्हणण्या पुरताही दिसत नाही.
काजवा नावाचा किटक असतो हे आता पुस्तकातच दाखवाव लागेल मुलांना>>>>>>>अग त्या तेरड्याच्या पाकळ्या किती मुलायम असायच्या, आणि फ़ळे तर, आम्ही लक्ष ठेवूनच असायचो. फ़ोडण्यासाठी. आमच्या कडे काजव्यानी पूर्ण झाडावर लायटींग व्हायची. पण एकाच वेळी सगळे प्रकाशीत व्हायचे आणि एकाच वेळी बंदही. कमाल आहे ना? घरात आले की आम्ही हातात पकडायचो. आणि कधी अंगावर तर कधी बाटलीत ठेवून त्याकडे पहात बसायचो. खरच "बालपणीचा काळ सुखाचा" Happy

काजवे आपल्याला लहानपणापासुन माहित असतात पण निसर्गाने अनेक किड्याना, माश्यांना आणि बुरशीला देखील दिवे दिले आहेत.
मध्यंतरी मुंबईत विक्रोळीला समुद्र एकदम प्रकाशमान झाला होता, तो यामूळेच.
भीमाशंकराच्या आसपास बुरशीमूळे काही झाडे प्रकाशमान झालेली असतात. खास करुन पावसाळ्यात.
कुत्रा, कोल्हा अशा अनेक प्राण्यांचे डोळे रात्री प्रकाशमान होतात !

आणि आपण म्हणतो, दिवे घ्या !

मी समुद्रमेथीसारखीच घरी उगवली होती. ही मेथई ­बिनमातीची आणि घरात खुपच छान उगते.

साहीत्यः एक मोठी काचेची बाटली, झाकण नको, पातळ कापड किंवा जाळी, २ टेस्पू मेथी, २ कप पाणी किंवा मोड आलेल्या मेथ्या ३-४ टेस्पू...

मी आधी मेथ्यांना मोड आणून घेतले होते मग ही पोस्ट माझ्या चेपुवर आली आणि म्हटलं प्रयत्न तर करून बघूया आणि ते इतक्म मस्त जमलं. एका बाटलीत मेथ्या टाकून त्या बाटलीला जाळीचा कापड बांधला. मग त्या बाटलीत पाणी टकून चकलीसारखं गोल-गोल फिरवायचं (Swirl) म्हण्जे सगळ्या मेथ्यांना पाणी मिळेल, मग बाटली पलटून ते पाणी काढून टाकायचं...
हे दिवसातून दोनदा करायचं , एकदा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना, फार उष्णता असेल तेव्हा दिवसातून चारदा करावे. ३-४ दिवसांत समुद्रमेथी किंवा बाटलीमेथी Lol तयार होते.
याची भाजी अतिशय छान लागली.
इंटरनेटवर jar sprouting सर्च केलं तर भरपूर मटेरिअल सापडतं...

मेथी

हा फोटो या ब्लॉगवरून घेतला आहे, जार कसे ठेवावे ते दाखवण्यासाठी...http://adkjerseygirl.wordpress.com/

जागु..खरच टाक तेरड्याचे फोटो... कित्येक वर्षांपासून ही नाजुक्,सुंदर फुलं पाहिली नाहीयेत!!
मनी.. मस्त दिस्तीये बाटली मेथी.. करून पाहीन हा प्रयोग्..ती समुद्राच्या वाळूतली मेथी कितीदा धुतली तरी कचकच जायचं नाव घेत नाही..
दिनेश दा मस्त माहिती.. तुमचं वाचन तर जोरदार आहेच, स्मरणशक्ती ही तितकीच दांडगी आहे.. Happy

दिनेशदा, मेंदीची कहाणी मस्त रंगवून सांगितलीत की! अगदी सेम आठवणी. चिकट व्हावी म्हणून त्यात भेंडीचा चीक घालण्याचा प्रकल्पदेखिल एकदा राबवल्याचं आठवतंय. बोटांना पहिल्या पेरापर्यंत आणि नखंही रंगवणे. नखांवरची मेंदी मग साधारण महिनाभर कलेकलेनं कमी होत रहायची. तो मेंदीतलं चिमणीचं योगदान आम्हीही वापरलंय.

रात्रभर लावून ठेवली की हात प्लॅस्टिकच्या पिशव्यात घालायचे, मनगटाशी घट्ट नाही पण पिशवी निघणार नाही अशा पध्दतीनं रबरबँड लावायचे.

पुरंदरे शशांक, आताच्या पिढीला हीर म्हटलं की फक्त रांझाच आठवतो. Happy

मनी, मेथी मस्तच.

सुप्रभात.

मनी, बाटलीमेथीचा प्रयोग एकदम मस्त. नक्की करून पहाणार.

जो-एस, तेरड्याच्या बाबतीत मी लकी. माझ्या ऑफिसमधे माळी मेहनतीने वेगवेगळ्या रंगाचे तेरडे फुलवतात. आमचे माळी "पावसाचे पाणी पडल्यावरच तेरडा उगवतो आणि फुलतो" हा समज खोटा ठरवतात.

मनी, गुगलले तर हे सापडले - Always use seeds packaged for sprouting. Buying bulk seeds and grains may seem cheaper than seeds packaged for sprouting, but they may not be worth it. Unless they are packaged as high-germination spouting seeds, only a portion of them will sprout. The ones that do not sprout, will likely ferment and spoil the batch. Do not use seeds meant for planting. They are often treated with chemical pesticides, fungicides and mercury coatings. Also, do not use seeds that have molds growing on them. Molds produce toxins which can cause food poisoning.
पण भारतात तर आपण किराणा यादीत नॉर्मल कडधान्या भरतो व तेच भिजवतो / मोड आणतो.
मग ते चालतील का?
व दुसरे म्हणजे, मेथी वा अशी कडधान्ये आधी जरा भिजत घालायची का? फक्त धुवुन पाणी काढुन बाटली बंद करायची? ( ज्या साईट वर वरील माहिती आहे तेथे ते ८-१२ तास भिजवुन ठेवुन मग पुढील प्रोसेस सांगीतली आहे)

मी मेथ्यांना मोड आल्यावर वापरले होते. मेथ्यांना मोड जरा उशिराच येतात. पण मी एक व्हिडीओ पाहीला त्यात त्यांनी आधी २ चमचे कडधान्य भिजवून वापरले होते म्हणाजे बाटलीतच मोड आणले होते. प्लांटींगच्या बिया वापरू नये त्यांना केमिकल्स असतात. नेहमीचे कडधान्य वापरता येतील, मी घरातलीच मेथी वापरली होती.

जागू, madhu-makarand खरच नशिबवान आहात

दिनेशदा मस्त माहिती, मी एकदा एक प्रकाशीत होणारा किडा पाहिला होता. पण तो काजवा नव्हता.

मनी मेथीचा प्रयोग करून पाहू, मी एका ट्रेमधे १ ते दिड इंच मातीत मेथी लावली आणि उगवल्यावर कापून वापरली. छान भाजी झाली होती.

जो, त्या काजव्याच्याच अळ्या असतात. एकदा अंधारात हातात घेतली होती, मी ! मग बॅटरी मारून बघितल्यावर खरा प्रकार लक्षात आला.

मनीच्या पद्धतीने मूग, मटकी, मसूर, कुळीथ यांना पण छान मोड येतात.

मामे, किती लहानसहान गोष्टींचा खेळ करायचो ना आपण ! खेळायच्या साधनांची कधीच कमतरता नसायची. आणि निसर्ग हा शब्दही मुद्दाम उच्चारावा लागत नसे.

वा मनी मेथीचा प्रयोग खुप छान ही जास्त धुवावी लागत नसेल. कारण बाजारातून आणतो त्यात मातीच भरपुर असते. चाळणीत धरून भरपूर धुवावी लागते.

मामे, किती लहानसहान गोष्टींचा खेळ करायचो ना आपण ! खेळायच्या साधनांची कधीच कमतरता नसायची. आणि निसर्ग हा शब्दही मुद्दाम उच्चारावा लागत नसे.
>>> अगदी अगदी.

आताच्या शहरी मुलांना माती सहजासहजी दिसतच नाही. मैदानावर खेळत असतील तर नशीबवान म्हणायची. नाहीतर सतत सिमेंट, कॉंक्रिट नाहीतर घरातली लादी.

only a portion of them will sprout. The ones that do not sprout, will likely ferment and spoil the batch. >>>> मी मटकी भिजवते तेव्हा असे होते.
माझ्याकडचे मूग पाण्यात रात्रभर ठेवले तरी त्यातले निम्मे तसेच कडक राहतात. उरलेले भिजायला ३-४ दिवस लागतात. Sad

sonalist, मूग गरम पाण्यात भिजवून पहा. उपसून फडक्यात बांधताना ते गाठोडे थोडेसे आपटल्यासारखे करायचे म्हणजे मोड चांगले येतात. ...... घरातील वडीलधारयांचा अनुभव आणि सल्ला.

Pages