निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)
मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||
हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.
- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
आणि जरा वेलबुट्टी काढता येत
आणि जरा वेलबुट्टी काढता येत असे. हिराच्या काढीवर ती अजिबात चिकटत नसे. >>>> आजकालच्या मुलींना हे "हिराच्या काढीवर" - हे देखील समजून द्यावे लागेल. त्यामुळे तुमचे असे जुन्या काळातले (?) लेख आले की खाली काही संदर्भही द्यावे लागतील हां....
बाकी सर्व वर्णन भारीच - मी तर पूर्ण नॉस्टाल्जिक झालो.
दिनेशदा > मेंदीचे कुंपण,
दिनेशदा > मेंदीचे कुंपण, वाटलेली मेंदीची पाने, मस्तच ! माझ्या काकूच्या माहेरी असे कुंपण होते. तिथून येताना एकदा तिने मेंदीची पानं आणलेली आणि आम्ही ती वाटून लावलेली आठवताहेत.
"हिराच्या काढीवर">>> हे मला
"हिराच्या काढीवर">>> हे मला माहित नाहिये..
बाकी मेंदी पुराण मस्तच.. पानं वाटुन मेंदीचा कार्यक्रम एकदा हौसेने आज्जीच्या देखरेखीखाली केला होता. पण तेव्हा पानं निवडण्याचा चोखंदळपणा केला नव्हता कारण आयती तोडलेली पानंच मिळाली होती..
हिराच्या काडीवर असे असावे
हिराच्या काडीवर असे असावे बहुतेक ते - पूर्वी केरसुण्या, खराटे असायचे त्याच्या काडीला (स्पेशली केरसुणीच्या ) हीर म्हणायचे - बरोबर ना दिनेशदा ??
हो तिच काडी. नारळाच्या
हो तिच काडी. नारळाच्या पानाच्या मधली शिर तो हिर, आणि तिचा झाडू तो हिराचा झाडू.
पुर्वी मालवणहून यायच्या सामानात हे झाडू, सुपं, कोकमे, सुके बांगडे, मालवणी खाजा, कुळथाची पिठी, गावठी तांदूळ हे सगळे असे. मंबईत हे सगळे त्या काळी चांगले मिळत नसे.
सर्व वर्णन भारीच - मी तर
सर्व वर्णन भारीच - मी तर पूर्ण नॉस्टाल्जिक झालो.>>+१
हिराच्या झाडूला आमच्याकडे 'खराटा' म्हणत. माझे आजोबा होते तोपर्यंत दर उन्हाळ्यात ते घरीच खराटा तयार करायचे.
मेंदी वाटायचा कार्यक्रम आम्हीपण ब-याचवेळा केला होता. मेंदी रंगायचीच नाही. तेव्हा एकदा माझ्या काकाने आम्हाला सांगितले कि त्यात चिमणीची विष्ठा टाका मग रंगेल....आणि तो प्रयोगही आम्ही केला होता. आता फार विचित्र वाट्ट ते
आमची खेळायची जागा अगदी हट्ट करुन आमची आम्हीच शेणाने सारवली होती. शेण तर गावभर हिंडून शोधून आणले होते. अन दिवसभर त्यातच खेळलो होतो.
घराजवळ एखादे बांधकाम निघाले कि वाळू आणून टाकली जाई. मग त्यात किल्ला करणे, बोगदा करुन खाली हात मिळवणी करणे, त्या वाळूत झोपून स्वतःवर गळ्यापार्यंत वाळू ओतून घेणे, वाळू ओली करुन त्याचा केक बनवणे, त्यावर आयसिंग म्हणून लाल वीट घासून ती पावडर त्या केकवर टाकणे, वाळूत चिकणमातीचे छोटे गोळे सापडले कि त्याची छोटी भांडी बनवणे हे आमचे उद्योग असायचे. मातीत खेळायचे आणि मातीशी खेळायचे!
मी दिवाळी आणि उन्हाळ्याची सगळी सुट्टी गावाकडेच असायचे त्यामुळे हे सगळे मला करता आले. आता घरातली नवी पिढी बघते तेव्हा वाटते कि माझे बालपण किती छान गेले.
हो, माझ्या लहानपणी सुद्धा
हो, माझ्या लहानपणी सुद्धा मेंदी वाटुनच लावावी लागे.
मला मेंदी हा प्रकार कधीच आव्डला नाही कारण ते हिराने मेंदी लावणे मला कधीच जमले नाही. माझे बाबा मात्र उत्साही होते... ते मला हातावर हिराने डिजाइन काढुन द्यायचे. कधीकधी तर खास भेंडीबाजारातुन माझ्यासाठी मेंदी पावडर आणि सोबत डिजाईन असलेला हात आणायचे. तो हात तळहातावर ठेवायचा आणि वर मेंदी फासायची की झाले..
आता माझ्या लेकीलाही मेंदी अजिबात आवडत नाही. तिला वासही सहन होत नाही. मी केसात मेंदी घातली की ती शेजारीही बसत नाही माझ्या. नाक मुठीत धरुन वावरते घरात.
ओह............दिनेशदा ही तर
ओह............दिनेशदा ही तर माझ्याच "बालपणीच्या काळ सुखा"तली कथा!
आमच्या घराभोवती बरचसं मेंदीचं कुंपण होतं. बाकी कोयनेल. तर सणासुदीला मी आणि माझ्या मैत्रिणी संध्याकाळी आधी एकदम टाइम पास करत(हो....ते वयच असं होतं की सगळ्या गोष्टी खूप टाइम पास करत मजेत करायच्या.............मैत्रिणींच्या बरोबर.) कुंपणाची मेंदी तोडून आणायची. मग आईकडून पाटा वरवंटा घ्यायचा.
आम्हा सर्व मुलींना पाटा वरवंटा वापरायला बर्यापैकी जमायचं. कारण मिक्सर अजून संपूर्णपणे प्रचलित नव्हता.
मग वाटून झालं की त्यात थोडसं चिमणीचं "हे" घालायचं. ते संध्याकाळ व्हायच्या आतच शोधून ठेवलेलं असायचं. कारण "ते हे" खूप मोठ्या प्रमाणात आणि सहजी उपलब्ध असायचं. कारण चिमण्या प्रचंड प्रमाणात असायच्या तेव्हा.
मग आलेल्या सगळ्यांची खाणीपिणी झाली की सगळ्यांना वाटण वाटण्यात (देण्यात )यायचं. मैत्रिणी घरी गेल्या की जेवणं आणि इतर "कामं" नीट उरकून(हो कारण एकदा मुठींवर फडकी बांधली की मग काही इमर्जन्सी आली तर आईची मदत घ्यायला अगदी कसंसच वाटायचं...म्हणून!) मगच मेंदी हातावर थापायची. हो........दिनेशदांनी म्हटल्याप्रमाणे त्या वाटणातून डिझाईन वगैरे काही अपेक्षितच नसायचं.
आणि मग एका हातावर स्वता:च थापायची आणि दुसर्या हातावर आईकडून थापून घ्यायची. आणि मग मुठी मिटून त्यावर फडकी बांधली जायची. कारण रात्रभर हाताची मेंदी अंथरुणात पडू नये म्हणून. आणि त्या दिवशी बेडशीट पिलो कव्हरही जुनं वापरायचं!
मग सकाळी उठल्यावर मुठी कडक झालेल्या उघडताना जरा दुखायचं पण तीही एक मज्जाच !
मग दुसर्या दिवशी कुणाची मेंदी कशी रंगली यावर पुन्हा मैत्रिणींच्यात निवांत चर्चा.
मला वाटतं आमच्या बालपणी हा जो इतका निवांतपणा होता प्रत्येकाला त्याचं मुख्य कारण म्हणजे, टीव्ही आणि कंप्युटर नव्हता. धुमसून खेळायला भरपूर वेळ असायचा.
>>>>>>>>>>मी दिवाळी आणि उन्हाळ्याची सगळी सुट्टी गावाकडेच असायचे त्यामुळे हे सगळे मला करता आले. आता घरातली नवी पिढी बघते तेव्हा वाटते कि माझे बालपण किती छान गेले.>>>>>>>>>>>
हं............सोनाली मलाही असंच वाटतं.......की आमच्या पिढीला जो निवांतपणा होता ....तो बिचार्या या लहान मुलांना नाही किंवा हे जे धुमसून खेळणे /धिंगाणा घालणे हे .......या मुलांच्या रूटीनमधे/नशिबात नाही.
पण नंतर असंही वाटतं की प्रत्येकच पिढीला पुढच्या पिढीविषयी हीच फीलिंग असेल बहुतेक.
दिनेशदा.. मस्तच वाटलं वाचून.
दिनेशदा.. मस्तच वाटलं वाचून. तुम्ही नेहेमीच असं काही खरडत जा म्हणजे आम्हाला असं छान छान वाचायला मिळत जाईल.माझ्याही लहानपणी मुंबईला आजोळी आजी मेंदी वाटून द्यायची आणि आई ती तळहातावर लावायची. त्यावर प्लॅस्टिकची पिशवी बांधून किंवा एखादं जुनं फडकं बांधून बसावं लागायचं. हा प्रकार मला कधीच फारसा आवडला नाही. पण माझे बाबा मात्र माझ्या हातांवर मेंदीचं कोयरी म्हणा किंवा स्वस्तिकाचं डिझाईन काढून द्यायचे. हा प्रकार मला खूप आवडायचा कारण ह्यात हात बांधावे लागायचे नाहीत, आणि अर्थातच आईची चित्रकला म्हणजे अग्दी 'ही' होती त्यामुळे बाबाच डिझाईन काढून द्यायचे........... आता मात्र मेंदीची कुंपणंच दिसत नाहीत..... तो हिरवा गारवा घालवलाच शहरीकरणाने....
सुदुपार. मेहेंदीची
सुदुपार.
मेहेंदीची फुले.
दिनेशदा माझ्याही मेहेंदीत लहानपणीच्या आठवणी गुंतल्या आहेत.
मला लहानपणी मेहेंदीचे झाडच माहीत नव्हते. त्यामूळे मी कोणत्यातरी झाडाचा पाला आणत आणि वाटून रंगतो का ते बघत :हाहा:. नंतर नंतर मला मेहेंदीच्या झाडाचा शोध लागला मग काय धमाल. आणायचा पाला आणि वाटायचा. पण वाटता वाटताच पुर्ण हात लाल व्हायचे. मग ते अजुन रंगावेत म्हणुन रात्री झोपताना पुर्ण हाताला मेहेंदी थापायची आणि हात फडक्याने बांधुन ठेवायचा असा उद्योग चालायचा. नंतर अजुन मोठी झाल्यावर हाताला लागणार नाही अशी व्यवस्थित मेहेंदी वाटायचे आणि मग गोळ्या गोळ्याची डिझाईन काढायचे. नंतर त्यात कात, सागाचे कोवळे कोंब टाकू लागले अजुन रंगा साठी. नंतर पावडर बाजारात मिळते हे पाहील्यावर पाने सुकवून त्याची पुड करण्याचेही उद्योग केले पण ते सक्सेस नाही झाले.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पुर्वी लग्नात मेहेंदी हा कार्यक्रम नसायचाच. कोणी कोणी नवर्या लावत पण नसत. लावलीच तर पावडर आणून त्यात चहापावडरचे पाणी,लिंबू, कात घालून भिजवत ठेवत त्यामुळे अजुन रंग चढे. अशा मेहेंदीचा वासही खुप सुवासीक असे. मग ती माचिस किंवा खराट्याच्या काडीने ठिपके, फुले किंवा सरळ मध्ये एक गोळा आणि बाजुला गोल बसतील तेवढे गोळे अशी डिझाईन काढली जात.
नंतर मेहेंदीचे तेलही मी बनवले होते. पावसाळ्यात अती पाण्यात राहील्याने पायांना कुये पडतात त्यासाठी मेहेंदी अगदी रामबाण उपाय आहे. पायाच्या बोटांमध्ये तळव्याला मेहेंदी लावली की लगेच कुये बरे होतात. शेतावर येणार्या कामगारांच्या पायाला नेहमी मेहेंदी लावलेली असल्याने त्यांचे पाय सतत लाल दिसत असत.
मेहेंदीची पाने.
दिनेशदा, मेंदी मस्त रंगलीय.
दिनेशदा, मेंदी मस्त रंगलीय. लहानपणी मेंदीची पावडर विकत आणून भिजवून हातावर थापत असू. दुसरयादिवशी तव्यावर लवंग तापवून त्याची धूरी घेतली जायची. जास्त रंगते म्हणे. बालपणीच्या कल्पना काही ऑरच!!
हे माझ्या घरासमोरील झाड आहे.
हे माझ्या घरासमोरील झाड आहे. ३-४ वर्षांपासून हे फुलायला लागले. वर्षातून १-२ बहर असायचे. गेल्यावर्षीपासून ३-४ वेळा बहरू लागले.
सध्या याची उंची १२-१५ फूट असेल. पण तसे भरगच्च असल्याने पक्षांचे आवडते आहे. गेल्यावर्षी सूर्य पक्षाने घरटे केले होते. थोडेसे मागे आणि आत होते पण दिसत होते. अगदीच जळमटांचा पुंजका लटकल्यासारखा.
या वर्षी त्यांची फक्त टेहाळणी झाली, घरटे नाही बांधले.
बुलबुल याचा वापर लपण्यासाठी करतात. चिमण्यांचा आवडता थांबा आहे. कावळेसुद्धा आवडीने बसतात. कधी कधी मांजर चढून बसते.
याची फुले फार सुवासिक आहेत. संध्याकाळी फुलू लागतात. पांढरी - ऑफव्हाईट रंगाची आहेत. ५-६ पा़कळ्यांचे फूल असते,
फुलांचा सुवास फुलपाखरांना बोलावल्याशिवाय रहात नाही.
कॉमन यलो ग्रास, डॅनिअल एग प्लाय, कॉमन क्रो, ब्लु मॉरमॉन, ग्रीन टेल जे अशी निरनिराळी फुलपाखरे, काही प्रकारच्या माशा / भूंगे यांचा अविरत वावर असतो. पण हा फुलांचा बहर दोनच दिवसात गळून पडतो.
फुले ईतकी नाजूक कि, हातात घेता येत नाहीत, पाकळ्या गळून पडतात. पाकळ्या गळल्यानंतर सुद्धा झाडाखाली गालिचा होतो.
याचे नाव माहीत नाही पण हे अनामिक झाड फार आनंद देते. विरंगूळा देते.
मधु-मकरंद हे कुंतीचं झाड आहे.
मधु-मकरंद हे कुंतीचं झाड आहे. खूप सुगंधी असतात याची फुलं. आणि तू काढलेले फोटोही छान आलेत. खूप भरगच्च बहरते ही. ही कुंती म्हणजे कढिपत्त्याची चुलत बहीण!
दिनेशदा, तुमच्या ह्या
दिनेशदा, तुमच्या ह्या लेखामुळे मन अगदि प्रसन्न झाले. आम्ही (मी व शोभा) सुद्धा लहानपणी मेंदी लावणे म्हणजे काय सरंजाम असायचा. रात्री लावून त्यावर साखरपाणी, निलगिरीचे तेल असे काही-बाही लावून ती कशी जास्त रंगेल ह्यासाठी प्रयत्न करायचे. सकाळी उठल्यावर तो मेंदीचा येणारा वास श्वासभरून घ्यायचा. आणि नंतर ती हळूवार धूवून काढायची. आणि ते रंगित साजिरे हात बघण्यात स्वतःलाच विसरून जायचे. काय मोहक दिवस होते ते !
माझ्या मुलाने तो चार्-पाच वर्षाचा झाल्यापासून माझ्या हाताचा ताबा घेतला. नागपंचमीला तो आवर्जून मेंदीचे कोन आणणे, प्रथम माझ्या हातावर नंतर आत्याच्या हातावर मग आजीच्या हातावर छान मेंदी काढतो. त्याचं डॉईंग खूप छान आहे.
जागू, फोटो मस्तच !
अहाहा --- काय मस्त चर्चा
अहाहा --- काय मस्त चर्चा चाललीये...............मेंदीच्या पानावर मन अजुन झुलते ग.........:)
जागू, दहाव्या भागाबद्दल
जागू, दहाव्या भागाबद्दल हार्दिक अभिनंदन!! असेच अनेक भाग येवोत ही सदिच्छा! >>>>+१
@जिप्सी बाकी तू काढलेला फोटो अगदी झक्कासच - खास जिप्सी इष्टाईल>>>>+१
@पुरन्दरे शन्शाक शशांक इथ अशा चांगल्या गोष्टींचा क्कोण्ण्णाला राग येत नाही. येउद्यात की अजुन माहिती. काय निगप्रेमींनो?>>>>+१
सर्वांनी टाकलेले फोटो अतिशय सुंदर, सर्वांना धन्यवाद.>>>>+१
पुन्हा एकदा सर्वाना सदिच्छा
शशांक, लगेच नाव सांगितल्रे,
शशांक, लगेच नाव सांगितल्रे, मनापासून धन्यवाद.
फोटो मी नाही मुलाने, मल्हारने काढले आहेत. तुमचा अभिप्राय त्याला दाखवला. त्याचे दोन प्रश्न...
१) कढिपत्त्याची चुलत बहीण - कढिपत्त्या सारखे वापरता येते का?
२) कुंतीचं झाड - महाभारतातील गोष्टींप्रमाणे सुगंध द्रोपदीला होता मग हे कुंतीचं झाड का?
सहजच विचारले.
वाह वाह मेंदी व त्या आठवणी.
वाह वाह मेंदी व त्या आठवणी. ते हातावर थापायचे प्रकरण तर अगदी अगदी. व त्या वाटण प्रकारातुन हात रंगले नसले तर ते ५ ठिपके व बोटांची पेरं रंगवणे.
अशीच एक आठवण, हळु हळु क्रांती झाली मिक्सर आले, पण आई ओरडेल म्हणुन दुपारी असाच मेंदी वाटण्याचा उद्योग करत होतो, अचानक आई उठुन बाहेर आली व आम्हाला पाहुन बोलली, की अरे मिक्सरवर वाटा की म्हणजे वाटणारीला पण ठिपक्यांची डिझाईन मिळेल, नाहीतर ती कोणी एक बिचारी सर्व हातावर मेंदी थापुन घ्यायची. हात मुळात रंगलेले असायचे ना.
काय अभिमान वाटला होता आईचा तेव्हा. लहान लहान गोष्टींत कसा आनंद मिळायचा
मधुरा - कृपया गैरसमज नसावा,
मधुरा - कृपया गैरसमज नसावा, शांकली (अंजू) माझी बायको - काल/परवा तिने बहुतेक माझ्या सदस्यत्वावरुन ही कॉमेंट टाकलेली दिस्तेय. कारण तिच्या तुलनेत माझे बॉटनीचे ज्ञान काहीच नाहीये (विनय नसून वस्तुस्थिती). तिचे याबाबतचे वाचन व निरीक्षण फारच असल्याने ती झाडे, फुले, वनस्पती लगेच (बोटॅनिकल नावासहित) ओळखू शकते. त्यामुळेच तिने कढीपत्त्याची कॉमेंट लगेच टाकलीये.
मी आता विकिपिडीयावरुन ही बोटॅनिकल नावे मिळवली आहेत ती देत आहे, बाकीच्या तुमच्या शंकांना तिच उत्तरे देउ शकेल.
कुंती /कामिनी - Murraya paniculata
कढीपत्ता - Murraya koenigii
दोघांचीही फॅमिली (कूळ) अर्थातच एक - Rutaceae
मधु..कसलं सुरेख झाड आहे..
मधु..कसलं सुरेख झाड आहे.. अगदी सुखासमाधानानी भरलेलं वाटलं..
मेंदी च्या गोष्टी फार आवडल्या.. अगदी जवळच्या वाटल्या..
मीही लहानपणी पानंबिनं तोडून ,वाटून ,कत्था आणी काय काय मिसळून लावण्याचे उद्योग केलेत.
आगपेटीच्या काड्या, टूथपिक असली काहीही साधने चालायची आम्हाला.
दुसर्या दिवशी सकाळी उठून कोणाची जास्त रंगली हे पाहत असू. एखाद्या ताईची जास्त रंगलेली असायची. मग तिने तिच्याहून लहान असलेल्या बहिणींना टुकटुक करणे, मग बहिणींची आपसात भांडणे होणे,,चिडणे,रडणे हे सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडायचे..
oooh!!! नॉस्टेल्जिक मेंदी!!!
मधुरा, कुंतीच्या पानांचा
मधुरा, कुंतीच्या पानांचा कढिपत्यासारखा वापर नाही करता येत. आणि नावाबाबत (द्रौपदीच्या अंगाला खूप सुगंध येत असे आणि या सुगंधी फुलाचे नाव द्रौपदी नसून कुंती कसं हे) मात्र मलाही माहीत नाही.
सुप्रभात.
सुप्रभात.
आहाहा.. कसली फुलं आहेत ही..
आहाहा.. कसली फुलं आहेत ही.. नितांत सुंदर... सुप्रभात जागु .. तुझं आत्ता उजाडलं कि काय...
जागू, पेरूची फुलं का गं ही?
जागू, पेरूची फुलं का गं ही?
वर्षू हो शांकली पेरूचीच
वर्षू
हो शांकली पेरूचीच फुले.
ओ पेरूची फुलं?? इतकी सुंदर
ओ पेरूची फुलं?? इतकी सुंदर असतात.. OMG.!!!
चांदण्या रात्री कुंतीच्या
चांदण्या रात्री कुंतीच्या झाडाखाली उभे रहावे, सुगंधी चांदण्याच्या वर्षाव होतो !
आपल्याकडे कुंती हवामानातील फरकानुसार वेगवेगळ्या काळात बहरते. काही झाडे वर्षभर फुले देत राहतात. पण हि फुले झाडावरच शोभतात. तोडायला गेलो तर देठ नसतो आणि पाकळ्या लगेच गळतात.
याला फुलांच्या संखेइतकी नाही पण मोजकी फळे लागतात. पिकल्यावर लाल होतात आणि त्या गर्द हिरव्या पानांत छान शोभून दिसतात !
माझ्या लहानपणी, केसांना मेंदी लावायची प्रथा नव्हती.. ती एका खास धर्माची मक्तेदारी मानली जात असे !
दिनेशदा, चांदण्या रात्री
दिनेशदा,
चांदण्या रात्री कुंतीच्या झाडाखाली उभे रहावे, सुगंधी चांदण्याच्या वर्षाव होतो ! >>> एकदम सही !!! कितीवेळा तरी अनुभवले आहे. फक्त झाडाखाली उभे न रहाता वरून झाड पहाताना.
फळे लागल्याचे कधी पाहीले नाही. आता मात्र लक्ष ठेवीन.
हं............अगदी सगळे
हं............अगदी सगळे मेंदीच्या रंगात रंगलेत. श्रावण आहे ना!
आणि कुंतीबद्दलची माहितीही अगदी नवीनच!
जागू पेरूचं फूल मस्तच! हे घे पेरू..........
सध्या भरपूर पेरू आहेत. रोज दह्यातली पेरूची कोशिंबीर! कॅल्शियमच कॅल्शियम!
ओह............दिनेशदा ही तर
ओह............दिनेशदा ही तर माझ्याच "बालपणीच्या काळ सुखा"तली कथा!>>> अगदी मनातलं
दिनेशदा.. मस्तच वाटलं वाचून. तुम्ही नेहेमीच असं काही खरडत जा म्हणजे आम्हाला असं छान छान वाचायला मिळत जाईल>>>> शांकली दिनेशदांचं जुन्या मायबोलीत रंगिबेरंगी वाचा असच छान छान वाचायला मिळेल.
त्यांचे बालपण अगदी शहरात गेले असले तरी, बहुतेक खेळ निसर्गाशी संबधितच असायचे. तशी शहरेही वाढलेली नव्हती.>>>> अगदी खरं, आमचं डोंबिवलीतर त्यावेळेला सेमी शहर्/खेडं होतं.
Pages