निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरा संपर्कातून तुझा मो. नं पाठव. माझा मो. बंद आहे. >>>>>>>>जागू नसल्यास, दुसर्‍या कुणी दिला तरी चालेल. मी सध्या कोणालाच फोन करू शकत नाही. नंबर पाठ नाहीत ना. Uhoh

जागु आणि सर्व निसर्गप्रेमींच हार्दिक अभिनंदन !
या दहाव्या भागात (नविन सुंदर फोटोंचा,विविध माहितीचा) राज्यात खुप पाऊस पडावा,सर्व धरणे भरली जावीत अशी आशा करतो !

शशांकजी,जिप्सी
सर्व फोटो भारी आवडले !

आज शनिवार असल्याने बागा ओस पडलेल्या दिसताहेत

Happy

हल्ली हाफिसात कामाचे प्रेशर खुप वाढलेय त्यामुळेही बागा ओस पडल्यात.

रच्याकने, मुळ नावे वाचायची गंमत मस्त आहे. मला त्या नावांची फोड करायचा खुप आवडते,.

जिथे नव्हती आस तिथे अशोका तू फुललास
पाना-डहाळींना डावलून फांदीवर बहरलास!

हा फोटो मी सिंगापुरच्या वनस्पती-उद्यानात घेतलेला आहे. वेळ अगदी संध्याकाळची होती. त्यामुळे तो केशरी रंग पुर्णपणे नाही उतरला छायाचित्रात! जवळून थेट पहाताना मला अशोकाचे हे रुप फार फार आवडले. केवळ अशक्य नजराना होता माझ्यासाठी. आणि विशेष म्हणजे कुणाही पर्यटकाची ह्या झाडाकडे नजर वळत नव्हती तरी बिचारा आपल्याच तालात फुलला..
Ashok1.JPG

बी - हाच तो सीता अशोक किंवा Saraca asoca, Family: Caesalpiniaceae (Gulmohar family) (संदर्भ - www.flowersofindia.net), रावणाने सीतामाईला पळवून लंकेतील अशोकवनात बंदी करुन ठेवले होते त्यामुळे याला सीता अशोक म्हणतात - अशी एक दंतकथा.

Sita Ashok.jpg

हं.........काव्यात, कथेतला तो हाच का कदंब? छानच आहे फूल.

ओक्के आता ही वाळकी शेंग म्हातारीचीच का? सांगा........(म्हातारीने पिछ्छा पुरवलाय ना?)...
ही आतली पोकळ बाजू

Photo0158.jpg

आणि ही वरची बाजू

Photo0159.jpg

हे झाड संपूर्ण डवरलं आहे. प्रत्येक शूट लाललाल कणांनी भरलाय.
आजच हे फूल उमललं.

DSCN1006.JPG

आणि बाकी कळ्या अजून नीट दिसत नाहीत.

Photo0179.jpg

हं........धन्यवाद साधना, हे एडेनियम चाफ्यासारखंच दिसतं. आणि झाड तर अगदी १ फूटच आहे. असं बघताना बॉन्साय वाटतं पण हे चाफाही नाही आणि बॉन्सायही नाही.

शेंग म्हातारीचीच आहे, कारण यातूनच मी म्हातार्‍या उडताना पाहिल्या आहेत.

खरच हा एडेनियम (येडे-नियम Happy ) चाफाच वाटतो आणि बॉन्साय सुद्धा वाटतो. (केवढे गाढे निरिक्षण तुम्हा निप्रेंचे Happy

मानुषी - तुला मागेच लिहिलेय मी - ती वेल, ते फूल व शेंग विलायती वाकुंदीच (Cryptostegia grandiflora) आहे व विषारी असल्याने जरा जपूनच रहाणे. आता किती वेळा तुलना करत बसणारेस - हीच का शेंग, हीच का म्हातारी..... (कृ ह घेणे, म्हातारीसारखे....)

एडेनियम - डेझर्ट रोज - वाळवंटी वनस्पती, जास्त उंच वाढत नाही, फुलांचे रंग अगदी भारी असतात.

शशांक धन्यवाद! अरे पण तेव्हा वेल आणि फूल दाखवलं होतं. शेंग (तीही मागून पुढून!!!!हाहाहाहाहा!!) कुठे दाखवली होती? म्हणून बरं!
आता म्हातारी पिच्छा सोडेल बहुतेक........हो ना वर्षू ? व्हॉट से?
आणि हो अगदीच कृ ह घेतलं बर्का!

हो ना.. मानुषी तुला शशांकने वॉर्निंग दिली होती ना या वेलीबद्दल..
तूच पिच्छा सोड बरं या म्हातारीचा आता.. जपून राहा.. Happy

अगं हो ना पण मी सीरियसली विचार करतेय की इतकी ती वेढे घालत कुठून कुठून वर गेलेली ती वेल कशी काढायची? असो.............शशांक वाचू नको हं तू हे......म्हातारीबद्दल आहे(कृ ह घेणच!)
असो.......... ही चर्चा थांब(व)लेली आहे.

मानुषी - तुझ्या वि पू त लिहिले आहे - प्रॅक्टिकल (जरा आगाऊ वाटेल असा) सल्ला - बी कॉशस.....

शशांक ...जोक अपार्ट.............बघते विपू. धन्यवाद!

इतकी ती वेढे घालत कुठून कुठून वर गेलेली ती वेल कशी काढायची? >>>

ती म्हातारीची वेल त्रासदायकच
मुळालगत त्याचा बुंधा तोड मग वेल वाळल्यावर काढणे सोपे जाईल

ती म्हातारीची वेल त्रासदायकच >>>>> वेल् वेल् वेल् वेल् .............
म्हातारी वेल ?
वेल म्हातारी ?
- दोन्ही त्रासदायक ???? वेल् वेल् वेल् वेल् ............. दिवे घ्या, म्हातारीगत हलके घ्या......

सुदुपार. Happy
आज जागू दिसत नाही. Uhoh जागुउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउ

Pages