"दे ट्टाळी"
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!
मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".
दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.
चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".
************************************************************************
सर्वसाधारण नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
टीपः
गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.
आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.
************************************************************************
"छाया-गीत" : विषय ३: "करिष्मा कुदरत का "
प्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत निसर्गात दिसणारे किंवा नैसर्गिक रित्या तयार झालेले/उपजलेले दगड धोंडे, डोंगर, झाडे, फळे, फुले, भाज्या इ इ यांचे अनोखे आकार.
गाणे/शीर्षक - कळीचे शब्द: निसर्ग, कुदरत, डोंगर, नजारा, धरती, पर्बत किंवा निसर्गाचे कौतुक गाणारे गीत इ इ उदा. "...पर्बत के इस पार...पर्बत के उसपार, गुंज ऊठी ......"
******************************************************************
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला..
(मैत्रेयीच्या जुन्या घराचं बॅकयार्ड) :).
निसर्गराजा ऐक सांगतो गुपित
निसर्गराजा ऐक सांगतो
गुपित जपलंय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रं
मोती लावलेले फुल. तुझ्या गळा
मोती लावलेले फुल.
तुझ्या गळा माझ्या गळा गुंफु मोत्यांच्या माळा.
देवाचा आशीर्वाद.. गगन सदन
देवाचा आशीर्वाद..
गगन सदन तेजोमय, तिमिर हरुन करुणाकर, दे प्रकाश, देई अभय
सारिका मस्तच अग कालच असा सिन
सारिका मस्तच अग कालच असा सिन होता मी ऑफिसमधुन येत होते तेंव्हा पण रस्त्यात थांबुन फोटो काढण्याची सोय नव्हती.
तूsss बिजलीची नक्षी अंबरात
तूsss बिजलीची नक्षी अंबरात ..
(हा फोटो मीच काढलेला आहे .. ;))
वा सहिच सशल.
वा सहिच सशल.
आहा !! सर्वच फोटोंसाठी.
आहा !! सर्वच फोटोंसाठी.
सप्तरंगी रिंगण आकाशी, निसर्ग
सप्तरंगी रिंगण आकाशी, निसर्ग किमया खाशी
आकाशात क्वचितच दिसणारं विलोभनीय दृश्य : इंद्रवलय, म्हणजेच सूर्याभोवती पूर्णवर्तुळाकार सप्तरंगी कंकण
स्थळ : बोरिवली (मुंबई) - दत्तपाडा तारीख : २८-९-२०१० वेळ : दुपारी ११-३०
(गर्दीच्या रस्त्यावरून मोबाइलच्या सहाय्याने फोटो काढल्यामुळे, पूर्ण वर्तुळाचा फोटो काढता आला नाही
तसंच फोटो क्वालिटी तितकीशी चांगली नाही)
माझ्या आयुष्यात इंद्रवलय दिसण्याची ही चौथी वेळ होती.
आधीच्या ३ वेळी कधी, कुठे दिसलं होतं याबद्दल माहिती इथे
http://www.maayboli.com/node/18940 वाचावी.
ह्या पानावरील सर्व फोटो
ह्या पानावरील सर्व फोटो अप्रतीम! सशल यलोस्टोन ला जाऊन आलीस का हल्ली हल्ली? सगळीकडे नुसती चमकती आहेस.
हिरा है अनमोल !!!
हिरा है अनमोल !!!
माझ्या हाती नाविन्याच्या
माझ्या हाती नाविन्याच्या रेषा!
हे कलेक्शन सर्वांत जास्त
हे कलेक्शन सर्वांत जास्त आवडले.
नी, फारच कल्पक हं!
Pages