"दे ट्टाळी"
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!
मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".
दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.
चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".
************************************************************************
सर्वसाधारण नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
टीपः
गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.
आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.
************************************************************************
"छाया-गीत" : विषय ३: "करिष्मा कुदरत का "
प्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत निसर्गात दिसणारे किंवा नैसर्गिक रित्या तयार झालेले/उपजलेले दगड धोंडे, डोंगर, झाडे, फळे, फुले, भाज्या इ इ यांचे अनोखे आकार.
गाणे/शीर्षक - कळीचे शब्द: निसर्ग, कुदरत, डोंगर, नजारा, धरती, पर्बत किंवा निसर्गाचे कौतुक गाणारे गीत इ इ उदा. "...पर्बत के इस पार...पर्बत के उसपार, गुंज ऊठी ......"
******************************************************************
.
.
आजचा श्रीगणेशा टॉमेटोमध्ये
आजचा श्रीगणेशा
टॉमेटोमध्ये साकारलेली प्रतिमा
जिकडे बघावे तिकडे "श्री"
व्यापिले अवघे चराचर
चमत्कार तयाचे पाहून
माझे जुळले कर
जिप्स्या, झब्बूची सुरुवात
जिप्स्या, झब्बूची सुरुवात जबरदस्त!!
जय गणेश!!!
लाजो
लाजो
सर्वच झब्बुविषय ग्रेट आहेत.
सर्वच झब्बुविषय ग्रेट आहेत. लई भारी.
संयोजकांच्या कल्पना फारच
संयोजकांच्या कल्पना फारच भन्नाट आहेत...टोमॅटोतले श्री छानच.
जिप्सी, छानच आहे फोटो. या
जिप्सी, छानच आहे फोटो. या दिवसासाठीच राखून ठेवला होतास बहुतेक !!!
जबरीच आहे.
जबरीच आहे.
या दिवसासाठीच राखून ठेवला
या दिवसासाठीच राखून ठेवला होतास बहुतेक !!!>>>>दिनेशदा, यावर्षीच्या गणेश चतुर्थीलाच (१ सप्टेंबर) मित्राच्या घरी दिसली हि प्रतिमा.
वादळामुळे उन्मळून पडलेल्या
वादळामुळे उन्मळून पडलेल्या झाडाची मुळे
अपनी कहानी छोड जा, खुद की निशानी छोड जा
कौन कहे इस ओर, तु फिर आये ना आये
मौसम बीना जाये .... मौसम बीता जाये ......
जिप्सी फारच योग्य आणि सुरेख
जिप्सी फारच योग्य आणि सुरेख प्रचि.
त्या फुलांच्या गंधकोषी सांग
त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का
त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसू तू तेज का
त्या नभाच्या नीलरंगी होउनीया गीत का
गात वायूच्या स्वराने सांग तू आहेस का
संपेल ना कधीही, हा खेळ
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा ..
योगेश, मामी, दीपांजली, मस्तच
योगेश, मामी, दीपांजली, मस्तच आहेत फोटो.
दीपांजली, गाण्याची निवड अगदी चपखल.
अश्याच एका दिवशी अवचित देखिले
अश्याच एका दिवशी अवचित देखिले ऐसे
हवा खायला नुसते मूळच आले वरते
माबोकर नी म्हणे प्रचि बघा हो झणी
वेड लागले तैशी निसर्गाची ही करणी
आम्ही लटिके ना बोलू...
योग्य गाणं आठवलं नसल्यामुळे
योग्य गाणं आठवलं नसल्यामुळे नामदेवांच्या ताजमहालाला वीटेचा तुकडा जोडला आहे. गोड मानून घ्या
अरे लवकर टाका कोणीतरी. अजून
अरे लवकर टाका कोणीतरी. अजून एक फोटो तयार आहे
जिप्सी ~ दोन्ही फोटो
जिप्सी
~ दोन्ही फोटो अप्रतिमच. त्यातही 'त्या फुलांच्या गंधकोषी' या गीताच्या निवडीमुळे एक फार हृदयस्पर्शी आठवण जागी झाली. तुम्ही टिपलेल्या त्या गीताचे कवी डॉ.सूर्यकांत खांडेकर हे मराठीचे नामवंत प्राध्यापक होते. त्यांच्या मुलाच्या ओळखीने एकदा खांडेकरसरांच्याच अक्षरातील हे गीत आम्हास त्यांच्या घरी पाहायला मिळाले. माय गॉड, काय मोत्यासारखे अक्षर ! पुस्तकरूपाने प्रकाशित झालेल्या त्या कवितेपेक्षा त्या वहीतील अक्षरांमुळे आम्ही मित्र भारावून गेलो होतो.
[हृदयनाथ मंगेशकर सादर करीत असलेला 'भावसरगम' कार्यक्रम कधी पाहिला आहे तुम्ही ? पंडित हृदयनाथ आपल्या प्रत्येक 'स्टेज शो' ची सुरुवात खांडेकरांच्या याच गीताने करीत असत.]
बंजर है सब बंजर है जब ढुंडने
बंजर है सब बंजर है जब ढुंडने हम फिरदौस चले..
मुझे तुम 'मिल गये' हमदम सहारा
मुझे तुम 'मिल गये' हमदम सहारा हो तो ऐसा हो
जिधर देखू उधर तुम हो नजारा हो तो ऐसा हो
मस्त. जिप्सी, नी, दीपांजली,
मस्त. जिप्सी, नी, दीपांजली, मामी- मस्तं. मस्त.
वाह, एकसे बढकर एक फोटो आणि
वाह, एकसे बढकर एक फोटो आणि त्याला साजेशी गाणी.
नीधप, 'मुझे तुम मिल गये' -
नीधप, 'मुझे तुम मिल गये' - जबरी फोटू आहे.
(खरेतर 'फोटू' ऐवजी 'प्रकार' हा शब्द बोटात आला होता. )
धन्स अशोकजी, सुंदर आठवण शेअर
धन्स अशोकजी, सुंदर आठवण शेअर केल्याबद्दल
पान जागे फुल जागे भाव नयनी
पान जागे फुल जागे
भाव नयनी जागला
चंद्र आहे साक्षीला.......चंद्र आहे साक्षीला
जागे है देर तक हमे कुछ देर
जागे है देर तक
हमे कुछ देर सोने दो
थोडीसी रात (?) और है
सुबह तो होने दो
From Drop Box
एक से बढकर एक!
एक से बढकर एक!
(No subject)
निसर्गराजा ऐक सांगतो गुपित
निसर्गराजा ऐक सांगतो
गुपित जपलंय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रं
छोटा सा घर है ये मगर.. तुम
छोटा सा घर
है ये मगर..
तुम इसको पसंद कर लो..
Pages