"दे ट्टाळी"
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!
मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".
दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.
चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".
************************************************************************
सर्वसाधारण नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
टीपः
गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.
आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.
************************************************************************
"छाया-गीत" : विषय ३: "करिष्मा कुदरत का "
प्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत निसर्गात दिसणारे किंवा नैसर्गिक रित्या तयार झालेले/उपजलेले दगड धोंडे, डोंगर, झाडे, फळे, फुले, भाज्या इ इ यांचे अनोखे आकार.
गाणे/शीर्षक - कळीचे शब्द: निसर्ग, कुदरत, डोंगर, नजारा, धरती, पर्बत किंवा निसर्गाचे कौतुक गाणारे गीत इ इ उदा. "...पर्बत के इस पार...पर्बत के उसपार, गुंज ऊठी ......"
******************************************************************
प्रकाश, सावली, मामी, योगेश,
प्रकाश, सावली, मामी, योगेश, जागू, पराग, वर्षू (दिसले एकदाचे तुमचे फोटो :फिदी:) जबरदस्त!
चेहरा नसलेली मत्स्यकन्या (?)
चेहरा नसलेली मत्स्यकन्या (?)
थकले रे डोळे माझे, वाट तुझी पाहता
वाट तुझी पाहता रे, रात्रंदिन जागता
सुकला रे कंठ माझा, तुज आळविता
तुज आळविता रे, नाम तुझे जपता
आटले रे अश्रु माझे, वाहता वाहता
वाहता वाहता रे, आठवणी काढता
शिणला रे जीव माझा, तुजविणे राहता
तुजविणे राहता रे, तुज नच भेटता
From Drop Box जंगल जंगल बात
From Drop Box
जंगल जंगल बात चली है पता चला है
चड्डी पहनके फूल खिला है...
कांचनजंगा ये हसीन वादियाँ ये
कांचनजंगा
ये हसीन वादियाँ ये खुला आसमान
आ गये हम कहां ऐ मेरे मेहेरबान
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला
कसले सह्ही फोटोज आहेत..
कसले सह्ही फोटोज आहेत.. सगळेच!!!
जिप्सि पेटलाय
जिप्सि पेटलाय
जागू
जागू
ह्या कावळ्याला मोर व्हायच
ह्या कावळ्याला मोर व्हायच आहे.
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला
वरती बघता इंद्रधनूचा गोफ
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे
एकावर एक मोफत दूर नभाच्या
एकावर एक मोफत
दूर नभाच्या त्या क्षितिजावर, इंद्रधनूचा अलगद वावर
करिष्मे पे करिष्मा, मस्त आहे
करिष्मे पे करिष्मा, मस्त आहे !
जिप्सी, तो मत्स्यकन्येचा फोटो
जिप्सी, तो मत्स्यकन्येचा फोटो लैच भारी...परिणामकारक !
वॉव..जिप्सी.. सुप्पर्ब रे
वॉव..जिप्सी.. सुप्पर्ब रे मत्स्यकन्या..
एक से बढकर एक फोटो सगळेच. हा
एक से बढकर एक फोटो सगळेच.
हा खेळ संपला की निवांत सगळ्या फोटोंवर प्रतिक्रीया देणार.
'निसर्गाचे देणे' एकाच ठि़काणी पहाण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संयोजकांचे आभार.
मेरा जीवन कोरा कागज कोरा ही
मेरा जीवन कोरा कागज
कोरा ही रह गया
सांझ ढले गगन तले हम कितने
सांझ ढले गगन तले
हम कितने एकाकी
From Drop Box रूपेरी वाळूत
From Drop Box
रूपेरी वाळूत माडाच्या बनात
चंदेरी चाहूल लावत.....
हिरवी मगर. पाण्यातली परी मी,
हिरवी मगर.
पाण्यातली परी मी, पाण्यातली परी मी
माझ्या मानातला मज, लाभेल काय स्वामी
मी आहे असा एकटा एकटा
मी आहे असा एकटा एकटा राहणारा
वाळके पान गळताना सुध्दा
तन्मेयतेने पाहणारा
:- चंद्रशेखर..
नी, सुंदर रंग आलेत. बादवे ,
नी, सुंदर रंग आलेत.
बादवे , हा स्कॅन आहे का ?
जागु, मगर परी ?
जागु, मगर परी ?
बादवे , हा स्कॅन आहे का ?<<<
बादवे , हा स्कॅन आहे का ?<<< हो हो.
२००० च्या उन्हाळ्यात सान्टा फे, न्यू मे मधल्या माझ्या अपार्टमेंटमधून काढलाय. वाळवंटात उन्हाळ्यातलं सूर्यास्ताच्या वेळचं आकाश भारी असतं.
गुलमर्ग...... ये हसीन
गुलमर्ग......
ये हसीन वादिया....ये खुला आसमान
From Drop Box फिटे अंधाराचे
From Drop Box
फिटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश..
हायला गुलमर्गमध्ये पण अरोरा
हायला गुलमर्गमध्ये पण अरोरा दीसतो ?!
अजब हे जुळे
अजब हे जुळे
जबरी फोटो आहेत सगळे.
जबरी फोटो आहेत सगळे.
जागू केवढी फुलली आहेत फड्या
जागू केवढी फुलली आहेत फड्या निवडुंगाची फुले. मस्त.
प्रकाश मस्तच प्रचि.
जिप्सी मत्स्यकन्या भारी.
माधव धन्स. प्रकाश मगरी पण
माधव धन्स.
प्रकाश मगरी पण त्यांच्या बाळांना परीच्या गोष्टी सांगत असतील ना ?
चांदणे झाले ग केशरी
पुसट न झाल्या तारा तोवर अरुण उतरला घरी
सरल्या काळ्या अबोल रात्री
नवचंद्रमास उगवे प्रीती
भाव पौर्णिमा अंती बाहेर उभयांच्या अंतरी
Pages