छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय ३ : "करिष्मा कुदरत का"

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:22

"दे ट्टाळी"

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!

मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".

दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.

चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".

************************************************************************

सर्वसाधारण नियम :

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

टीपः

गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.

आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.

************************************************************************


"छाया-गीत" : विषय ३: "करिष्मा कुदरत का "

karishma.jpgप्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत निसर्गात दिसणारे किंवा नैसर्गिक रित्या तयार झालेले/उपजलेले दगड धोंडे, डोंगर, झाडे, फळे, फुले, भाज्या इ इ यांचे अनोखे आकार.

गाणे/शीर्षक - कळीचे शब्द: निसर्ग, कुदरत, डोंगर, नजारा, धरती, पर्बत किंवा निसर्गाचे कौतुक गाणारे गीत इ इ उदा. "...पर्बत के इस पार...पर्बत के उसपार, गुंज ऊठी ......"

******************************************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाच रे मोरा अंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच
ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापुस पिंजला रे
आता तुझी पाळी, मिच देते टाळी
फुलव पिसारा नाच.

kudrat1.JPG

हा पसरलेला कांदेमुळा मोरासारखा व त्याची पाने मोरपिसांप्रमाणे वाटत आहेत.

IMG_0007_skw_0.JPG

कासवाच्या आकारातला दगड.

ससा तो ससा जणु कापुस जसा त्याने कासवाशी पैज लाविली
बिगीबिगी धावु नि डोंगरावर जाउ ही शर्यत रे आपुली

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !

सिंदुरचर्चित ढवळे अंग, चंदनऊटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग, जीव जडला चरणी तुझिया

गौरीतनया भालचंद्रा, देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा, अवघी विघ्ने नेसी विलया

bappa.jpg
बदामाच्या रूपात एक गणपती

बदाम आहे का? मला वाटले नारळ आहे.>>>> हो बदामच आहे..
एकदा खिरीसाठी म्हणून बरेच बदाम भिजवले होते. बागेत गप्पा मारत बदाम न बघताच सोलायचे काम सुरू होते. हाताला जरा खरबरीत बदाम लागला म्हणून पाहिले तर बाप्पांनी दर्शन दिलेले. फक्त मुकूट तेवढा सोलायचा बाकी होता.
ह्याच बदामाचा मागचा भाग पण खूप छान आहे.

नलिनी, सुपर्ब फोटो Happy
ह्याच बदामाचा मागचा भाग पण खूप छान आहे.>>>>जर फोटो असेल तर अपलोड करा ना.

चेटकीण.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तु मला शिकविली गीते
ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया

नले, खुपच सुंदर. एरवी अशा रुपात गणेशाचा आकार केवळ भासमान होतो, तूला तो बदाम आहे हे सांगावे लागतेय, यातच सर्व आले.
(तू मला मागे समुद्रातील खडकाच्या रुपातली युवती.. असा फोटो पाठवला होतास ना ?)

वर्षूचा चंद्र पण मस्तच.

मला नगरलाच एका झाडात गणेश दिसला होता. तो फोटो सापडतो का ते बघायला पाहिजे. डॉकयार्ड रोडला, पुर्वीच्या बी.पी.टी. रोडवर एक पिंपळाचे झाड आहे, त्यात चक्क नऊ गणेशाची रुपे दिसतात. कुणाकडे आहे का तिथला फोटो ?

तू मला मागे समुद्रातील खडकाच्या रुपातली युवती.. असा फोटो पाठवला होतास ना ?>> नाही आठवत मला मी पाठवल्याचे.
मला आणखी एक आकार सपडलाय बदामात.. तो नक्की काय बरं हेच नाही माहित मग त्याला समर्पक गीत कसे सापडावे?

Happy ह्म्म्म... अजून तरी दिस्तीये माझी चन्द्रकोर.. मागच्या 'मुझे जीने दो' मधले मी स्वतः काढलेले ग्रेट वॉल च्या उंच उंच आकाशाला भिडणार्‍या पायर्‍यांचे आणी उंच पर्वतांवरून खालपर्यन्त येणार्‍या भात शेतीचे फोटो टाकलेले दुसर्‍या दिवशी ब्लॅक ऑट करून त्यावर ! हे चिन्ह अवतरलं होतं.. का कोण जाणं ... Sad

सगळ्यांचे फोटो सुपर्ब!!!!!
संयोजक, धन्यवाद हा विषय झब्बुसाठी दिल्याबद्दल Happy

Pages