"दे ट्टाळी"
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!
मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".
दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.
चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".
************************************************************************
सर्वसाधारण नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
टीपः
गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.
आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.
************************************************************************
"छाया-गीत" : विषय ३: "करिष्मा कुदरत का "
प्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत निसर्गात दिसणारे किंवा नैसर्गिक रित्या तयार झालेले/उपजलेले दगड धोंडे, डोंगर, झाडे, फळे, फुले, भाज्या इ इ यांचे अनोखे आकार.
गाणे/शीर्षक - कळीचे शब्द: निसर्ग, कुदरत, डोंगर, नजारा, धरती, पर्बत किंवा निसर्गाचे कौतुक गाणारे गीत इ इ उदा. "...पर्बत के इस पार...पर्बत के उसपार, गुंज ऊठी ......"
******************************************************************
राकट देशा, कणखर देशा....
राकट देशा, कणखर देशा.... दगडांच्या देशा!
अफलातून आहेत सगळेच फोटो.
अफलातून आहेत सगळेच फोटो.
केसरीया बालम आओ नी पधारो
केसरीया बालम आओ नी
पधारो म्हारे देस..
आसीनानाम् सुरभितशिलम्
आसीनानाम् सुरभितशिलम् नाभिगन्धैर्मृगाणाम्
तस्या एव प्रभवमचलम् प्राप्ते गौरम् तुषारैः।
वक्ष्यस्य ध्वश्रमदिनयने तस्य श्रृंगे निषण्ण : शोभाम्
शुभ्रत्रिनयन वृशोत्खात्पंकोपमेयाम्।।
- कालिदास (मेघदूत)
(तपोवन)
महाश्वेता
महाश्वेता
संधीकाली या अश्या... धुंदल्या
संधीकाली या अश्या... धुंदल्या दिशा दिशा!
है कौनसा फल सबसे
है कौनसा फल सबसे मीठा,---मेहनत का !
मोसंबीमधे भासमान झालेला श्री गणेश.
मृग सोन्याचा जगी असंभव, तरीही
मृग सोन्याचा जगी असंभव, तरीही तयाला भूलले राघव.
कोलवा, गोवा इथे एका खोडात दिसलेले हरीण आणि डायनासोर
पक पक पकाक..... हे काय आहे
पक पक पकाक.....
हे काय आहे ते नि.ग. वाले सहज ओळखू शकतील.
मी नियम तोडला आहे, आप अब शौकसे, चाहे जो सजा देते हो....
दिनेशदा सह्हिच आहेत फोटो. पण
दिनेशदा सह्हिच आहेत फोटो. पण एका मागुन एक नका टाकु दोन पोस्ट मध्ये दुसरा कोणाचातरी झब्बू हवा. वरचे नियम वाचा.
इस नदी को मेरा आईना मानलो...
इस नदी को मेरा आईना मानलो...
निसर्गाचा तरल कुंचला
निसर्गाचा तरल कुंचला ....
जलरंगी रंगुनी निघाला ....
गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी
काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी ....
सुर्रेख फोटो आहेत एकेक सफर
सुर्रेख फोटो आहेत एकेक
सफर भी है हसीन
हमसफर भी है हसीं
न सोचिये कि हम किधर चले
न मै सुनूं ,न तुम सुनो
बस धडकने सुनें
अब बात जो भी
दो दिलोंके बीच चले
सगळ्यांचे फोटो मस्त आहेत
सगळ्यांचे फोटो मस्त आहेत .
नलिनी खुपच छान फोटो !
चंदाराणी चंदाराणी, का गं
चंदाराणी चंदाराणी, का गं दिसतेस थकल्यावाणी?
चंदाराणी चंदाराणी, का गं दिसतेस थकल्यावाणी?
शाळा ते घर, घर ते शाळा.
आम्हा येतो कंटाळा.
रात्रभर तु चालचालशी,
दिवसा तरी मग कोठे निजसी?
पडत्याला काडीचा आधार ??
पडत्याला काडीचा आधार ??
Balanced Rock, Colorado Springs, CO, USA.
पराग धन्यवाद छान फोटो. बाकी
पराग धन्यवाद छान फोटो.
बाकी सगळ्यांचेच फोटो एक से एक आहेत
हा अजुन एक
इस मोड से जाते है
कुछ सुस्त कदम रस्ते,
कुछ तेज कदम राहे|
कारच्या काचेला पावसाने नविन
कारच्या काचेला पावसाने नविन साज चढवलाय .....
रीमझिम रीमझिम, रूमझूम रूमझूम
भिगी भिगी रूत में तुमहम हमतुम ......
जागूचा मुळ्याचा मोर, नलिनीचा
जागूचा मुळ्याचा मोर, नलिनीचा बदामातला गणपती ... सह्हीच.
सगळ्यांचेच फोटो
सगळ्यांचेच फोटो मस्त.
स्वरूप,मामी,दिनेश,जिप्सी, नलिनी, आशुतोष- टाकते रहो.
चिनूक्स- फोटु लै मस्तय.
पराग- लै फॉर्मात. तो स्टेडियमचाही फार मस्त आणि समर्पक
सावलीताई आल्या मैदानात. गुड.
प्रकाश तो फुलाचा फोटो सुरेख.
पराग, मामी सुंदर फोटो. तो
पराग, मामी सुंदर फोटो. तो पाण्याचा दगडांचा मस्तच.
निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरू सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणात आपोआप
पहिलीच भेट झाली पण ओढ ही
पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची
डोळे मिटून घेता दिसतोस तू समोर
फुलवून पंख स्वप्नी अन् नाचतात मोर
झाली फुले सुगंधी माझ्याहि भावनांची
नाचू किती नाचू किती कंबर
नाचू किती नाचू किती कंबर लचकली
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू, दिसशी तू, दिसशी तू नवतरूणी काश्मिरी
पुन्हा लेकरू होउन नदी वाजविते
पुन्हा लेकरू होउन नदी वाजविते वाळा
पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा.
लख लख चंदेरी तेजाची न्यारी
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
कोई लौटा दे मेरे बीते हुए
कोई लौटा दे मेरे
बीते हुए दिन!!
धमाल आहेत सार्यांचे सारेच्या
धमाल आहेत सार्यांचे सारेच्या सारे फोटो. कुणाचे नाव घ्यावे आणि कुणाचे नको असे बिलकुल वाटत नाही. सगळेच फोटो [आणि त्यामागील कल्पनाही] डोळ्याचे पारणे फेडत आहेत.
संयोजकांच्या कल्पकतेचे कौतुक करावे तितके थोडेच.
(या जिप्स्याच्या कॅमेर्याला तर कोणत्याच विषयाचे वावडे नाही असेच वाटते.)
नलिनी, अफलातून आहे तो
नलिनी, अफलातून आहे तो बदामातला गणपती !
(मला आधी वाटलं की तू कोरला आहेस!)
बाकी सर्वांचे फोटोही मस्त आहेत.
आमच्या वस्तीत करतो सूर्य
आमच्या वस्तीत करतो सूर्य टाळाटाळ देवा
गोठला आहे कधीपासून येथे काळ देवा
-चित्तरंजन भट
धन्यवाद अशोकजी प्रक्स,
धन्यवाद अशोकजी
प्रक्स, अफलातुन फोटो आणि साजेशा ओळी
Pages