छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय ३ : "करिष्मा कुदरत का"

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:22

"दे ट्टाळी"

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!

मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".

दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.

चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".

************************************************************************

सर्वसाधारण नियम :

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

टीपः

गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.

आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.

************************************************************************


"छाया-गीत" : विषय ३: "करिष्मा कुदरत का "

karishma.jpgप्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत निसर्गात दिसणारे किंवा नैसर्गिक रित्या तयार झालेले/उपजलेले दगड धोंडे, डोंगर, झाडे, फळे, फुले, भाज्या इ इ यांचे अनोखे आकार.

गाणे/शीर्षक - कळीचे शब्द: निसर्ग, कुदरत, डोंगर, नजारा, धरती, पर्बत किंवा निसर्गाचे कौतुक गाणारे गीत इ इ उदा. "...पर्बत के इस पार...पर्बत के उसपार, गुंज ऊठी ......"

******************************************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि स्पर्धा असती तर नक्कीच दडपण आले असते. खेळ असल्याने अनेक छुपे कलाकार समोर आले.
यावर्षीचे नव्या दमाचे संयोजक, कौतूकाला पात्र आहेत.

शुभ्र तुम्हारा वर्ण,
शुभ्र हैं वस्त्र , शुभ्र है हास्य.
शुभ्र हंस की शुभ्र काकली,
शुभ्र स्वरों का लास्य .

shvet.jpg

DSC05775.JPG
जाल्यात गावली, सोनेरी मासली
नको करू शिर्जोरी
अगं पोरी,संबाल दर्याला तुफान आयलंय भारी....

कशी मस्त कमान टाकलीये ना?

kamaan.jpg

कशी झोकात चालली कोळ्याची पोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर!

गालों पर दूध की बुंदकियां लगाए नन्हें से
बच्चे से तुम
अपने विशाल कलेवर के साथ खड़े हो
मेरे सम्मुख

मैं गंगोत्री की तरह फूट पड़ी हूं।

- सुमन केशरी

Gangotri.jpg

(गोमुख)

उत्तुंग ध्येय!

pahad.jpg

वारूळ वारूळ मुंग्यांचे वारूळ
कृमी कीटकांनी बांधले देऊळ
मृत्तिकेचा कण एकेक घेऊन
स्वतंत्र निर्गम बांधिले भुवन

कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आँखे
कितनी प्यारी आँखे है आँखोंसे छलकता प्यार
कुदरतने बनाया होगा फुरसत से तुझे मेरे यार Proud

लाख मना ले दुनिया, साथ न ये छुटेगा
आके मेरे हाथो में, हाथ न ये छुटेगा

badam_!.jpg

हा पण बदामच. आकार नक्की कसला ते मात्र माहित नाही.

मस्त फोटो योगेश !

"राकट देशा.. कणखर देशा.. दगडांच्याही देशा.. " ही ओळ इथे अमेरिकेतही लागू पडते ? Happy

Siamese Twins.jpg

Siamese twins, Colorado.. ह्यांचे आकार प्रत्येकाला वेगळे दिसू शकतात.. मला हे जुळे डोनाल्ड डक वाटतात.. Happy

मामी कमान मस्तच.

दिनेशदांशी सहमत खरच खुप चांगल संयोजन चालू आहे. संयोजकांनी खुप चांगल्या कल्पना अंमलात आणल्या आहेत.

राकट देशा कणखर देशा.. ग्रँड कॅनियन लाच लागु पडते महाराष्ट्रापेक्षा :).
अता हार्ड डिस्क वर टर्की (कप्पाडोकिया) चे फोटो शोधायलाच हवेत, जबरी स्टोन फॉर्मेशन्स आहेत तिथे तर..

फुल आहे की पाखरु?
nisarg.JPG
हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गा रे....
गीत गा रे... धुंद व्हा रे.....

काल माझ्या सोबतीला कुणीच नव्हते, म्हणून लागोपाठ तीन फोटो टाकले.
हा आकार आहे चंपकचे गाव असलेल्या करडकवाडी जवळचा.

देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी.

कम्माल फोटो आहेत एकेक आणि किती कल्पकतेने गाणी लिहिली आहेत. इतके सुंदर विषय आणि 'छाया-गीत' ह्या दोहोंबद्दल संयोजकांना खूप खूप धन्यवाद Happy

जिप्सी
मस्तं.. पाण्याच्या ज्वाला वाटतायेत त्या एकदम..
मला हेगाणं आठवलं..
'पानीने कैसी ये आग लगायी
दिल देने दिल लेने कि ऋत आयी

Pages