छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय ३ : "करिष्मा कुदरत का"

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:22

"दे ट्टाळी"

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!

मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".

दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.

चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".

************************************************************************

सर्वसाधारण नियम :

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

टीपः

गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.

आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.

************************************************************************


"छाया-गीत" : विषय ३: "करिष्मा कुदरत का "

karishma.jpgप्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत निसर्गात दिसणारे किंवा नैसर्गिक रित्या तयार झालेले/उपजलेले दगड धोंडे, डोंगर, झाडे, फळे, फुले, भाज्या इ इ यांचे अनोखे आकार.

गाणे/शीर्षक - कळीचे शब्द: निसर्ग, कुदरत, डोंगर, नजारा, धरती, पर्बत किंवा निसर्गाचे कौतुक गाणारे गीत इ इ उदा. "...पर्बत के इस पार...पर्बत के उसपार, गुंज ऊठी ......"

******************************************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त झब्बू आहेत एक एक.

सुकलेल्या ओंडक्याला फुलाचा आकार.

ये कौन चित्रकार है ?

छत आकाशाचे आपुल्या घराला सखये
तृणांकुरांची शय्या आणिक, तुझाच बाहु उशाला

PB9.jpg

पेबल बीच, कॅलिफोर्निया

तटि: संपुर्णतः निसर्गनिर्मित, मानवाने फक्त फिनिशिंग ट्च दिलाय. Happy

नाट्यगीत इथे ऐका: http://www.4shared.com/audio/OS7STq3i/10_chat_aakashache_aapalya.html

Oregon राज्यामधील Crater Lake National Park - निळेशार आकाश आणि नीलवर्णी पाणी. Happy
निळे गगन निळी (करडी म्हणा हव तर ;)) धरा, निळे निळे पाणी पाणी पाणी
ही आगळी कहाणी, ही वेगळी कहाणी.

IMG_4956.JPG

येऊरच्या जंगलातली रानतिळाची शेंग. (फोटोत दिसणार्‍या अंगठ्याच्या नखावरून शेंगेच्या आकाराचा अंदाज येईल. इतक्या चिमुकल्या शेंगेत तिळांची रचना मात्र अगदी सुबक आहे.!)

DSC00404-compressed.JPGकुणीतरी समर्पक ओळी सुचवा रे.... Sad

हिमालय: डलहौसी ते मनालीच्या प्रवासात दिसलेली ही टेकडी.

गारवा, वार्यावर भिरिभर पारवा, नवा नवा प्रिये नभात ही ...

ललिता-प्रीति | 9 September, 2011 - 15:01
कुणीतरी समर्पक ओळी सुचवा रे.... >>>>
नन्हे मुन्हे बच्चे तेरे मुठि में क्या है
नन्हे मुन्हे बच्चे तेरे मुठि में क्या है
मुठि मे है तकदीर हमारी..

झाडावर लागलेले साप (पडवळ)

कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी.

Pages