Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40
निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आयडा स्कडर अजुन वाचले
आयडा स्कडर अजुन वाचले नाहीय..
दिनेश खरेच सिडी बघितली पाहिजे. माणसे काय वेगवेगळे जीवन जगतात.. आपण भारतात जन्मलो याबद्दल आभार मानायचे की शहरी भागात जन्मलो आणि आयुष्य एकाच साच्यात बांधुन घेतले याबद्दल हळहळ
साधना भारतात नाही उपलब्ध असे
साधना भारतात नाही उपलब्ध असे वाटतेय.
पण इथे काय लिहिलेय ते नक्की बघ.
http://en.wikipedia.org/wiki/Human_Planet
कार्व्हर खरच संग्रही
कार्व्हर खरच संग्रही पाहिजे
संत शास्त्रज्ञ होता तो
दिनेश
कार्व्हर नंतर खानखोजेंवर पुस्तक लिहीलं होतं.
कार्व्हर बद्दल इथे मुलांच्या
कार्व्हर बद्दल इथे मुलांच्या शाळेतून पण सांगितलेलं गेल्या वर्षी. एक छोटं पुस्तक पण होतं तो एका शाळेत जाऊन मुलांच्या मदतीने वीड्स ने भरलेल्या जागेत भाज्यांचा मळा बनवतो त्याबद्दल. मोठीला फार आवडलेलं ते पुस्तक.
शून्याच्या जवळपास देखील न जाणार्या तापमानत रहायला मिळालं तर कमळ, पारिजात, बकुळ, जाई-जुई, सायली, केवडा, अबोली, चमेली , मोगरा, पाचू- मरवा हे सर्व लावायचंय. शिवाय केळी. रोजच्या जेवणाला, नास्त्याला वापरता येतील एवढी केळीची पानं निघाली पाहिजेत. केळिच्या पानांच्या मुळाशी दोरे असतात त्यावर गजरे अन वेण्या.
मग ती पानं वाया जाउ नयेत म्हणून एक गाय पाळायची ....
भारतातही कदाचित टिवीवर
भारतातही कदाचित टिवीवर दाखवतील ह्युमन प्लॅनेट.
आकुर्डी स्टेशनच्या बाहेर एका
आकुर्डी स्टेशनच्या बाहेर एका झाडाखाली मी चंपकची वाट बघत
उभा होतो. त्यावेळी डोक्यावरुन एकदम वेगळाच आवाज आला.
आवाज पक्ष्याचाच होता,पण आधी ऐकलेला नव्हता.
वर बघितले तर झाड कडुनिंबाचे होते आणि पक्षी कावळाच होता.
पण मी ऐकलेला आवाज मात्र नेहमीच्या कावळ्याच्या आवाजासारखा
नव्हता.
परत त्या कावळ्याने तसाच आवाज केला. अगदी कोकिळेइतका
मधुर नाही पण सुंदर होता. मला त्याक्षणी आठवलं नाही. पण मी
कुठेतरी नक्की वाचलय, कि निंबाच्या झाडावर बसल्यावर कावळीणीला
वेगळाच कंठ फ़ूटतो.(कदाचित चितमपल्लींच्या एखाद्या लेखात असेल)
त्यावेळी खरं वाटलं नव्हतं,पण प्रत्यक्ष ऐकल्यावर विश्वास ठेवावाच लागला.
कुणी ऐकलाय का असा आवाज ?
निंबाचे झाड आणि निंबोण्या कावळ्यांना अतिप्रिय. त्या झाडावर त्यांचा
नित्य वावर असतो. त्या झाडाला काकांबीर असे एक नावही आहे.
UAE मधील बुलबुलचे घर.
UAE मधील बुलबुलचे घर.
सही, बुलबुल नी घरटं कुठे आणी
सही, बुलबुल नी घरटं कुठे आणी कसं बांधलय ह्या पेक्षा तु ह्याचे फोटो कसे काढलेस ह्याचचं जास्ती कौतुक वाटलं.
छान टिपलय. भर रहदारीच्या
छान टिपलय. भर रहदारीच्या रस्त्यावर !!!
एवढ्या उन्हाळ्यात तग धरु शकतील का रे ?
कांचनातला हा रंग आपल्याकडे
कांचनातला हा रंग आपल्याकडे जरा कमी दिसतो. आणि त्याचे फूलपण
आकाराने लहान दिसते. इथे आता सगळ्या प्रकारच्या कांचनाला बहर
यायला लागलाय. पिवळा कांचन मात्र अजून दिसला नाही.
इथले पर्सनल फोटो बहुतेक
इथले पर्सनल फोटो बहुतेक अॅडमिनने उडवले
तरी काल मी सांगणारच होते की सगळ्यांचे फोटो बघुन झाल्यावर उडवा म्हणुन. आपला हा फोरम गृपसाठी नाही. गुगलवरुन सर्च केल्यास सगळ्यांना दिसु शकतो त्यामुळे नावासकट नाणसांचे फोटो टाकणे सुरक्षित नाही..
एकमेकांशी फोटो शेअर कराय्चे असल्यास त्या आयडिशी आपली समोरासमोर ओळख असेल तर मेलॅड्रेस मागवुन फोटोंची लिन्क दिलेली बरी
डेरिंगबाज आहे बुलबुल..
डेरिंगबाज आहे बुलबुल..
कांचनही मस्त. आपल्याकडे यातली थोडी हल्की छटा दिअते. तसा हाही मी पाहिलाय. सीवुड्स्ला आहे. पण अर्थात सगळीकडॅ नाही दिसत हा.
मी यातलाच पांढरा पाहिलाय. पिवळा मात्र अजुन पाहिला नाहीय.
एवढ्या उन्हाळ्यात तग धरु
एवढ्या उन्हाळ्यात तग धरु शकतील का रे ? >> दिनेशदा जरुर, बुलबुल ने खुप दिवस अभ्यास करुन ही जागा निवडलेली दिसते कारण, दिवसा दोन्ही दुकांनांच्या काचेतुन थंडावा तसेच फटींतुन आतील थंडगार हवा काही अंशी सरळ घरट्यांतुन पास होत राहते...शिवाय एसीचे थंड पाणी ज्या पाईप मधुन खाली उतरते तो ही जवळच आहे...त्यावरच 'वड'ही तग धरुन आहे.
एकुण या पाखरांने इथल्या निसर्गावरच मात केली आहे असे म्हणावे लागेल.
रात्री १२-३० वाजता सुध्दा पिल्लांसाठी अन्न गोळा करुन आणुन भरवताना पाहीले काल.
काही रात्री १०.४५-११ वाजताचे फोटो.
हे हे चातक मस्तच. दिनेशदा,
हे हे चातक मस्तच.
दिनेशदा, जिप्सि, मामी कालच माझ्या दिरांच्या घरात बुलबुलने घरटे पुर्ण केले. तुम्ही पाहीलात का त्यांचा झुंबर ? त्यांच्या झुंबरावरच केले आहे. ह्यावेळी त्यांना तिथला पाहुणचार घ्यायचा असेल. उद्या परवा फोटो टाकतेच.
माझ्याकडे कांचनचे छोटे झाड आहे. आमच्या एरियात पांढरे कांचन खुप आहेत. मी पिवळा पाहीला आहे. वरचा गुलाबी आमच्या ऑफिसच्या एरियात आहे.
जागूच्या घरच्या / चातकच्या
जागूच्या घरच्या / चातकच्या उदाहरणातून असे वाटतेय कि बुलबुल आता धाडसी होत चाललाय. बाकीचे पक्षी पण तसे करतील काय ?
तूम्हाला माहित नसेल, माझ्या लहानपणी शहरात हे पक्षी इतक्या संखेने दिसायचे नाहीत. पोपट पण इतक्या संखेने नसत. आता दोन्ही जास्त प्रमाणात दिसतात.
-----
हा कांचन गुलाबीपेक्षा जास्त गडद आहे. आपल्याकडे मी याची लहान फूले बघितली होती. पिवळा फक्त फोटोत बघितलाय.
धन्य त्या बुलबुलची. आणि लोक
धन्य त्या बुलबुलची.
आणि लोक म्हणतात की फक्त माणसालाच अक्कल आहे
बुल्बुलाने एसी घर निवडले.
असेच कावळ्याना मटेरियलचे
असेच कावळ्याना मटेरियलचे ज्ञान असते अस वाचल आहे. तशी उदाहरणंही होती एका लेखात.
अरे व्वा जागुतै झुंबरावर
अरे व्वा जागुतै झुंबरावर घरटे...
साधुतै दुसरी गोष्ट म्हणजे या घरट्यात फक्त एकच बुलबुल आहे...नर किंवा मादी असावी..पण एकच आहे. जोडा नाही.
माझ्या लहानपणी शहरात हे पक्षी इतक्या संखेने दिसायचे नाहीत. पोपट पण इतक्या संखेने नसत. >> हो अगदी ८-१० वर्षांपुर्वि बुलबुल, पोपट, मैना (कोकीळ), सारखे पक्षी शहरात दिसणे/पाहणे म्हणजे भाग्याचेच मानले जायचे. आता सध्या बरेच आढळतात अगदी अंगणातील छोट्या पेरुच्या झाडावर किंवा डाळींबाच्या झुडुपातसुध्दा पोपट पहायला मिळतो. (याचे कारण काँक्रिटी करणच असु शकते, त्यात तरीही असे काही पक्षी जगण्यासाठी संघर्षरत राहुन शहरातही आपले अस्तित्त्व टिकवुन जगत राहतात. )
बुलबुलाने घरटे बांधलेय ते ठिक
बुलबुलाने घरटे बांधलेय ते ठिक आहे पण त्या बिल्डिंगच्या मालकाने वडाचे झाड अगदी चिकटपट्ट्या वगैरे लावुन सुरक्षित ठेवलेय ते पुढे जाऊन इमारतीला धोकादायक ठरु शकते.
८-१० वर्षांपुर्वि बुलबुल,
८-१० वर्षांपुर्वि बुलबुल, पोपट, मैना (कोकीळ), सारखे पक्षी शहरात दिसणे/पाहणे म्हणजे भाग्याचेच मानले जायचे. आता सध्या बरेच आढळतात >> कारण बहुतेक शहरेच वाढत वाढत गावांना कवेत घेत आहेत. पक्षी बिचारे जाऊन जाऊन कुठे जाणार.
बिल्डिंगच्या मालकाने वडाचे
बिल्डिंगच्या मालकाने वडाचे झाड अगदी चिकटपट्ट्या वगैरे लावुन सुरक्षित ठेवलेय >> इथे लहानश्या दोन पानी रोपालाही खुप महत्त्व आहे.....त्यात दारातच एखादे रोप रुजले असेल तर., आयते घबाड मिळाल्या सारखे होते....मग त्याची सोन्या सारखी जपणूक सुरु होते...
ते पुढे जाऊन इमारतीला धोकादायक ठरु शकते.>> साधुतै, इथे इमारत बांधकामात वापरले जाणारे सिमेंट / काँक्रिट अती उच्च दर्जाचे आहे...आणि रचना भारतीय बांधकामा पेक्षा एकदम हटके आहे. वड /पिंपंपळासारख्या झाडांची मुळे इमारतीच्या भिंती टणक असल्यामुळे तिच्याशी सलगी न करता, आत न सामावता, सरळ खोल जमीनीकडेच वाढतात....म्हणुन दुकानवाल्याने टेप वैगेरेचा आधार दिला आहे.
खालील फोटोवरुन एक अंदाज येईल बांधकामाचा.....
या जाड्जुड भरीव जाळीच्या थराखालीही तितक्याच जाडीच्या थराची भरणी केली आहे... (भारतीय रचनेत सळईं इतक्या जाड नसतात आणि दोन सळईं मध्ये हवा तेवढा अंतर/ग्याप असतो)
(ईमारतीचा पाया)
चातक. बरीच माहिती दिसतेय...
चातक. बरीच माहिती दिसतेय...
चातक मी पण बांधकाम व्यवसायाशी
चातक मी पण बांधकाम व्यवसायाशी संबंधित होतो. मस्कत आणि दुबईमधे प्रखर उन्हाळ्यातदेखील बागा जोपासल्याच नव्हे तर फूलवल्यादेखील जातात, ते बघितले आहे.
मस्कतमधल्या बकुळीला, मोगर्याला तर या दिवसातच बहर यायचा. खजुराची झाडे मूळासकट उपटून दुसरीकडे लावली जायची. (ती तशी सहज जगतात तिथे.)
प्रखर उन्हाळ्यातदेखील बागा
प्रखर उन्हाळ्यातदेखील बागा जोपासल्याच नव्हे तर फूलवल्यादेखील जातात, ते बघितले आहे. >> हो दिनेशदा सर्वत्र ठिबक सिंचन पध्दत वापरण्यात आली आहे...त्यामुळे रोपांना मुळांजवळाच अक्षरशः २४ तास पाणी पुरवठा होत राहतो....तसेच वाढीसाठी दर्जेदार खातांचाही योग्य वापर केला जातो.
पुढील प्रचीवरुन प्रत्यक्ष रचनेचा अंदाज येईल..
रोपे लहान असताना.
सर्व लहान पाईप/नलीका नगर पालीकेच्या एका मोठ्या मेन पाईपाला संलग्न असतात...असा एक मेन पाईप रोपवाटीकेच्या एका मोठ्याविभागाला २४ तास पाणी पुरवठा करत राहतो. (+ २४ तास काळजी घेण्यास दोन माणसे असतात ती वेगळीच... हो रात्रीही बागेत विविध काम करताना मी त्यांना पाहीले आहे....काही विज्ञान असावं यात.)
भर उन्हात ४८ डीसे मध्ये फुललेल्या रंगबीरंगी बागेचेही पुढे टाकेन एक दोन प्रची...आहेत संग्रहात.
चातका, मस्तच माहिती रे आणि
चातका, मस्तच माहिती रे आणि फोटोपण
वरचे एकफांदीवडकर बुलबुल पाहुन
वरचे एकफांदीवडकर बुलबुल पाहुन एक संवाद आठवला..... संवाद अर्थात भारतातला..
आई बुलबुल : बाळा, मी तुझ्या वयाची होते ना, तेव्हा दाट जंगलात राहात होते.
बेबी बुलबुल : जंगल?? आता हे काय नविन?
आई बुलबुल : अरे जंगल म्हणजे जिथे खुप झाडे असतात ना त्याला जंगल म्हणतात.
बेबी बुलबुल: पण खुप झाडे असतीलच कशी? जागा कुठे आहे?
आई बुलबुलः अरे तेच तर सांगतेय. तेव्हा सगळीकडे भरपुर जागा असायची. आता जिथे बिल्डींगी उभ्या आहेत ना तिथे आधी झाडे उभी होती.
बेबी बुलबुलचा दोन दिवसांनी मोठा असलेला भाऊ बेबी बुलबुलच्या कानात: उगाच आता वाद घालु नकोस आईबरोबर. दिवसभर खिडकीत बसुन आतला टिवी पाहात बसते आणि मग व्हायला लागतात तिला एकेक भास.
साधना
साधना
हा आमचा डॅनी.
हा आमचा डॅनी.
माझ्या ब्रम्हकमळाला ३०-३२
माझ्या ब्रम्हकमळाला ३०-३२ कळ्या एकदम आल्या आहेत. झाड कुंडीत आहे आणि तसं खूप मोठ्ठं नाहीये. त्यामुळे त्यातल्या काही कळ्या गळून पडतायत/ पडणार आहेत. ५-६ तरी नक्की गळणार आहेत. तर अजून गळू नये म्हणून काय करू? का काहीच नको करायला? एकेका पानाला २-३, काही ठिकाणी ५-६ पण कळ्या आल्या आहेत. त्यामुळे पानांना जड होत असतील का त्या?
(झेपत नसताना खूप मुलं जन्माला घातली की सगळ्यांच पोषण व्यवस्थित होत नाही, ह्याचं उदाहरण बघायला मिळतंय )
~साक्षी
साधना : आणखी वाढव कि संवाद
साधना : आणखी वाढव कि संवाद !!
साक्षी कळ्या खुडायच्या नाहीत. जोमदार नसलेल्या कळ्या आपोआप गळून पडतील.
चातक - वाळवंटातील लोकांनाच झाडांचे महत्व कळते. सुलतान काबूस रोडवर बूचाची पण झाडे आहेत. कुरुम रोड, कोर्निश पार्कात बकुळीची. त्या रस्त्याने जाताना गाडीत पण सुगंध दरवळतो त्या फुलांचा.
Pages