निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषी, तिथे मिळेल ही सिडी. बघितल्यावर कळेल कि माझे शब्द किती थिटे आहेत ते !!!

आणखी एक कथा तिबेटमधली. ८/१० वर्षांची दोन मूले. शाळेची सुट्टी संपून त्यांना आता शाळेत जायचे वेध लागलेत. हवामान बघून त्यांचे बाबा त्यांना घेऊन जाणार आहेत. प्रवास पायी करायचा आहे तो एका गोठलेल्या नदीच्या काठाने. पण बदलत्या हवामानामूळे नदी वितळायला लागलीय. तिच्या काठच्या अरुंद वाटेवरचा प्रवास. पावलापावलावर धोका. कधी कधी तर निव्वल वीस सेंमी एवढीच वाट तर कधी कपारीखालून सरपटत जायचे. प्रवास १०० किलोमीटर्सचा, तब्बल सहा दिवसांचा ..

=========

आज साधनाचा वाढदिवस ना ?
हार्दिक शुभेच्छा !!!

मानुषी, डिस्कव्हरी चॅनेलचा पण सहभाग आहे त्यात.
कालच नोस्टाल्जिया फॉर द लाईट या नावाचा अप्रतिम माहितीपट बघितला, त्याबद्दल पण सविस्तर लिहिन.

निकिता, कॉमन फूले आहेत ती सगळी.

दिनेशदा,
Happy
कॉमन तुमच्या साठी. मला ओळखता आलेली गुलाब, कर्दळ दोनच :-(. आणि एक कदाचीत गणेश वेल.

बाकीची नाही ओळखता येत :-(. म्हणजे आधी पाहिलेली आहेत पण नाव माहित नाही Sad

काल डीसीत कॅपिटॉल हिल ला गेलो होतो. तिथल्या तळ्यात बदकांची (बहुतक बदकंच)झुंड होती. आणि एक मजेशीर दृश्य पहायला मिळत होते. पोहता पोहता संपूर्ण टीमच एकदम शीर्षासनात! कंप्लीट खाली डोकं वर पाय! संपूर्ण टीमच एकदम जेव्हा शीर्षासनात पोहायला लागते ...ते इतकं मजेशीर दिसतं! त्याचा व्हीडिओ घेतलाय. पण फोटो नाही. पण बदकांचे साधे फोटो आहेत ते टाकते.

काय निकिता ! नि.ग. वाल्यांना इतके अज्ञान शोभत नाही हो.

==
मानूषी, म्हणजे सिंक्रोनाइज्ड स्विमिंगचाच खेळ केला कि त्यांनी.

==
आपल्या अनिलचा पण आज उद्या वाढदिवस आहे ना ? हार्दिक शुभेच्छा !

दिनेश आणि इतर नि.प्रे.,

(उशिराने) धन्यवाद अगदी मनापासुन.. Happy

अनिल तुलाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... एक रोपटे (गुलाबाचे) आणुन कुंडीत लाव आणि पुढच्या वर्षी बघ किती वाढते ते... Happy

हे कृष्णकमळाचे (धागा सुरु करताना दिलना?) फुल पांढरे पण असते ना? परवाच पुणे जवळ बालाजी मंदिरात पाहिले ते. त्याची लागवड कशी करता? त्या झाडाला चिकुसारखी मोठी फळे होती त्यात बिया असतात का? की फांदी लागते?

काय निकिता ! नि.ग. वाल्यांना इतके अज्ञान शोभत नाही हो.
Sad
Sad

माझा आणि स्मरणशक्तीचं वाकडं आहे. १०वेळा वाचल्यावर लक्षात राह्त माझ्या Sad

मोनालिपा तु म्हणतेस ती पॅशनफुटची वेल.

अनिल तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जिप्सि गुलाब मस्तच.

निकिता अग ऑफिसमधुन नाही उघडत लिंक काल घरुन पाहीली होती. पण जे ऑफव्हाईट कलरच फुल होत ते डेलिया आणि गुलाबी होता का दुसरा रंग तो गाजरा त्याला इंग्लिशनावही आहे. तुला जर सगळ्याची नाव पाहीजे असतील तर www.flowersofindia.com वर बघ.

जिस्प्या, अनिलला वाढदिवसाचे गुलाब आणि मला ठेंगा???????? Angry

अट्टी बट्टी बार गट्टी
बारा वर्षे बोलु नको
तुझी माझी कट्टी Angry Angry Angry Angry Angry Angry Angry

साधना त्याला आठवण तरी होती का ?
हा घे तूला गुलाब. मस्त आहे की नाही रंग ?
(आणि त्या जिप्स्याला म्हणावं आम्हाला फ़ुलांवर पाणी टाकावं लागत नाही काही,
आमच्याकडे चक्क पाऊस पडतो. आणि म्हणावं आम्हाला पण अस्से झूम झूम फ़ोटो काढता येतात.)

साधना हे घे गुलाबांचे गुच्छच :फिदी:, आत्ता बट्टी ना ??? Happy

साधनास वाढदिवसाच्या (उशिराने) खुप खुप शुभेच्छा!!!!!!
— आम्हा सर्वांकडुन

साधना त्याला आठवण तरी होती का ?>>>>दिनेशदा, भल्या पहाटे १० वाजता Proud शुभेच्छा द्यायला फोन केला होता. Happy

(आणि त्या जिप्स्याला म्हणावं आम्हाला फ़ुलांवर पाणी टाकावं लागत नाही काही,
आमच्याकडे चक्क पाऊस पडतो. आणि म्हणावं आम्हाला पण अस्से झूम झूम फ़ोटो काढता येतात.)>>>>:खोखो:

जिप्स्या.. लाल गुलाब बघुन गुलाबजामुन आठवले आणि भुक लागली.. Happy
आता बट्टी हा...... Proud

दिनेश तुमच्याकडे उन पाऊन दोन्ही चालु आहेत?? कांचन उन्हात फुलतात की पावसात??

आणि गुलाब चक्क जांभळट छटेचा वाटतोय.. मस्त आहे एकदम..

साधना आपल्याकडे कांचन पावसात फुलतात. आता कदाचित बारामहिने फुलत असेल. पण मला आठवते आमच्याघरी कांचनचे झाड होते त्याची फुले मी पावसात काढायचे.

साधना अनिलला दिलेला फोटो त्याने स्वतः काढलाय (आणि जास्त छान आहे) आणि तुला मात्र जालावरचे उचलून दिलेत. तुझ्या फोटोंवर त्याच्या नावाची जलखूण आहे का? तरी बट्टी करतेस त्याच्याशी? (प्रचंड काड्याखोर बाहुला) जिप्सी Happy Light 1

साधना वाढदिवसाच्या उशीराने शुभेच्छा. जिप्स्याचा पंक्तीप्रपंच तुझ्या ध्यानात आणून दिल्याबद्दल माझ्याशी कट्टी घेण्यात येऊ नये. Happy

साधना अनिलला दिलेला फोटो त्याने स्वतः काढलाय (आणि जास्त छान आहे) आणि तुला मात्र जालावरचे उचलून दिलेत. तुझ्या फोटोंवर त्याच्या नावाची जलखूण आहे का? तरी बट्टी करतेस त्याच्याशी? (प्रचंड काड्याखोर बाहुला) जिप्सी >>>>>>माधव Proud Rofl

साधना, माधवचं काही एक ऐकु नकोस. Proud वरील दोनही फोटो मीच काढले आहेत. घाईघाईत पोस्टायच्या नादात "जलखुण" (माधव, आवडला हा शब्द Happy Happy ) टाकायची राहिली. Happy

Pages