Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40
निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिनेशदा, खुडणार तर नाहीच, पण
दिनेशदा,
खुडणार तर नाहीच, पण खत वगैरे घालून काही फायदा होइल का, असं विचारयचं होतं मला
~साक्षी.
चातक, दुबईतील फोटो
चातक,
दुबईतील फोटो पाहुन,झाडांबद्दलची घेतली जाणारी काळजी विशेष वाटली.
साधना,
छान सवांद, आणखी वाढवाच
अशा निसर्गाबद्दलच्या जुन्या गोष्टी,आठवणी,काही घटना,किंवा काही लोकांची विशेष माहिती,नविन पिढीला खरी वाटणार नाही अस वाटतं.
माझ्या ब्रम्हकमळालाही २८
माझ्या ब्रम्हकमळालाही २८ कळ्या लागल्या आहेत.
नमस्कार, मी इथे नेहमी
नमस्कार,
मी इथे नेहमी वाचनमात्र असते पण आता माझ्या बागेतच प्रॉब्लेम झाल्याने expert view घ्यायला आले.
माझ्या एका कुंडीत मी जरबेरा लावलंय, त्याला अगदी २ सोनटक्क्यासारखी पाने आली आहेत. त्यात अगदी बारिक्-बारिक सफेद किड झालंय, ते पाणी टाकल्यावर तरंगतं आणि किटकनाशक मारूनही काही फरक नाही पडत आहे. काही उपाय असेल तर प्लीज सांगा.
दिपाली
दिपाली, त्यावर हिंगाचे किंवा
दिपाली, त्यावर हिंगाचे किंवा तंबाखुचे पाणी शिंपडुन पहा.
साक्षी, कळ्या आल्यावर स्प्रे
साक्षी, कळ्या आल्यावर स्प्रे करायचे काही हार्मोन्स बाजारात आहेत. त्याने फूल मोठे होते पण ते सहसा जास्त दिवस टिकणार्या फूलांसाठी असतात. ब्रम्हकमळासारख्या अल्पजीवी फूलांवर त्याचा परिणाम काय होईल, ते सांगता येत नाही.
ठिक आहे दिनेशदा, मग मी आता
ठिक आहे दिनेशदा, मग मी आता काहीच करत नाही.
उमलल्यावर आठ्वणीने फोटो काढला, तर इथे टाकेन
~साक्षी
दिपाली ते पुर्ण पांढरे व
दिपाली ते पुर्ण पांढरे व लेडीबग सारख्या आकाराचे आहेत का? माझ्याकडे जास्वंदावर व त्यामुळे बाजुच्या सदफुलीवर गेले आहेत. परवाच मी जास्त होते ती फांदी काप्ली व चक्का हाताने पाने चोळुन ते धुतले. किडे उचलुन फेकुन दिले. उद्या परत पाहते काहि प्रोग्रेस आहे का. व त्यांना हाकलताना मी हळद व हिंग मिश्रित पाणी वापरले स्प्रे मधुन.
आज माझ्याकडे ब्रम्हकमळे
आज माझ्याकडे ब्रम्हकमळे फुलणार आहेत. फोटो काढेन रात्रि.
ह्यूमन प्लॅनेटची दुसरी सिडी
ह्यूमन प्लॅनेटची दुसरी सिडी पण बघून झाली.या भागात जंगले, डोंगराळ प्रदेश आणि गवताळ
प्रदेश असे विभाग आहेत. या भागातील काही दृष्ये बघायला त्रास होतो, पण ते लोकांचे
वास्तव जीवन आहे, हे ध्यानात ठेवावेच लागते.
नेपाळ, कंबोडिया, मंगोलिया असे आजवर फ़ारसे चित्रीत न झालेले देश इथे दिसतात. त्या
कहाण्या इथे लिहून तूमची उत्सुकता कमी करत नाही. पण एका कहाणीचा उल्लेख केल्याशिवाय
रहावत नाही. मी केनयात रहात असूनही अशी काही प्रथा इथे अस्तित्वात असेल, याची मला
कल्पना नव्हती. ह्या प्रथेचे चित्रीकरण यापुर्वी झालेले नाही.
काय आहे ही प्रथा ? तीन निशस्त्र जिगरबाज तरुण चक्क सिंहाच्या जबड्यातून त्यानी केलेली
शिकार पळवतात. जे बघितले त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. पण तो भाग कसा चित्रित केला
हे पण पुढे बघायला मिळते.
तीन तरुण आणि तब्बल १५ सिंह (त्यापैकी एक नुसत्या दाताने चित्रीकरण करणा-या टिमच्या
गाडीचा टायर फ़ोडतो.) असा सामना, कधीही बघायला मिळाला तर सोडू नका.
जागू, आजच तुझी सकाळी आठवण
जागू, आजच तुझी सकाळी आठवण काढली. असाच मस्त पावासाळी दिवस होता जेव्हा आम्ही तुझ्याकडे आलो होतो. बुलबुलाने घर शिफ्ट केलं काय? त्याला कळलं की तु त्याच्यावर लेख लिहून टाकतेस. प्रसिद्धी आवडत नसेल त्याला. असो, त्यालाही चेंज.
ब्रह्मकमळाला २८ कळ्या? मस्तच की. ए जागू, डॅनीचा फोटो आपल्या वृत्तांतातही टाक ना.
साधना, मस्त संवाद आहे.
चातक, कदाचित दिवसा खूप उन्हात काम करायला नको म्हणून रात्री करत असतील का?
दिनेशदा, ह्युमन प्लॅनेटचं वर्णन मस्त वाटतय. इथे कुठे मिळते का ते बघते.
दिनेशदा, ह्यूमन प्लॅनेटची
दिनेशदा,
ह्यूमन प्लॅनेटची सीडी बरीच महाग दिसते.
मी ही गुगलवर टाकुन सर्च केलं, आणि बीबीसीच्या साईटवर ते तीन लोक (हातातल्या बाणाची भिती दाखवत) पुढे जाऊन चक्क सिंहांची शिकार कशी घेऊन गेले ते पाहिलं.
याबद्दल असे नेटवर इतर कुठे लिंक असेल तर नक्की द्या.
अनिल त्याची लिंक दे इथेच,
अनिल त्याची लिंक दे इथेच, म्हणजे सगळ्यांना बघता येईल.
मला दुबईला ती साधारण ४००० रुपयांना मिळाली. अजून भारतीय
व्हर्जन यायचे असेल. कालच त्याचा एक स्टेज शो झाला, लंडनमधे.
पण सगळ्यांनी अवश्य बघण्यासारखी आहे ती. एखादा भाग सोडला
तर प्रत्येक भागात लहान मुलेच आहेत.
पण इगलच्या घरट्यात उतरुन त्यातले एक पिल्लू उचलून आणून
त्याला शिकारीसाठी प्रशिक्षण देणा-या मूलाला लहान तरी कसे
म्हणायचे.
या अशा नागफ़ण्या बघितल्या कि
या अशा नागफ़ण्या बघितल्या कि मला भारतातल्या श्रावणाची आठवण येते. अशा
नागफ़ण्या भीमाशंकराच्या वाटेवर खुप दिसतात.
श्रावण महिन्याशीच माझ्या शाकाहाराकडे वळण्याच्या आठवणी आहेत.
सोमवारी गायीला पान देण्यासाठी शोधाव्या लागलेल्या गायी. नागोबा, तेरडा, आघाडा,
अळू, दहीहंडी, शुक्रवारचे चणे, जिवतीदेवी, कहाण्या, आंबाड्याचे रायते, केळीच्या
पानावरचे जेवण, वरण, पिठोरी......माझे सगळे बालपण.
आता वाळवंटात आहे, अशी गत नाही...पण आपला श्रावण आठवतोच.
हा फ़ोटो मात्र दुबईच्या विमानळावरचा.
मामी अग खुष खबर आहे बुलबुलने
मामी अग खुष खबर आहे बुलबुलने अंड घातल घरट करुन. माझा पुतण्या अभिषेक आता अजुन उत्साही झालाय लेख वाचल्या पासुन. त्याने त्या घरटे तयार झाल्यावर त्यात कापुस भरुन ठेवला. त्यात बुलबुलने अंडे घातले आहे. आता पुन्हा आमच्या घरात बुलबुलचे बाळंतपण होणार.
जागू, अंडे पण काय मस्त दिसतेय
जागू, अंडे पण काय मस्त दिसतेय !
अय्या.. बुलबुल असे मस्त अंडे
अय्या.. बुलबुल असे मस्त अंडे घालते माहितच नव्हते. त्या बुलबुलला सांग कोणि बेलापुरची बहिण असेल तर माझ्याकडे जागा आहे म्हणावे...
दिनेश, ह्युमन सिडी बघायला मिळेल का माहित नाही. तुम्ही इथे लिहा त्याच्याबद्दल बिन्दास.. नशिबाने सिडी मिळाली तर आंखो पढा आंखो देखी करेंगे...
अय्या.. बुलबुल असे मस्त अंडे
अय्या.. बुलबुल असे मस्त अंडे घालते माहितच नव्हते. त्या बुलबुलला सांग कोणि बेलापुरची बहिण असेल तर माझ्याकडे जागा आहे म्हणावे...
दिनेश, ह्युमन सिडी बघायला मिळेल का माहित नाही. तुम्ही इथे लिहा त्याच्याबद्दल बिन्दास.. नशिबाने सिडी मिळाली तर आंखो पढा आंखो देखी करेंगे...
.. पावसात पोस्टी पण रेंगाळत
.. पावसात पोस्टी पण रेंगाळत रेंगाळत पडतात वाटते..
ह्युमन प्लानेटची एक लिंक
ह्युमन प्लानेटची एक लिंक सापडली, अजब सीन आहे
यातल्या इतरही विडीवो पाहता येतील अशी आशा करुया.
http://www.bbc.co.uk/nature/humanplanetexplorer/environments/grasslands#...
अरे वा जागू कितवी
अरे वा जागू कितवी खेप?(बुलबुलाची गं!)
मी आता माझा बुलबुलांवरचा लेख टाकतेच. एप्रिल मे तला आहे. काही कारणास्तव इथे अप्लोड करणं झालंच नाही.
<<<<<अरे वा जागू कितवी
<<<<<अरे वा जागू कितवी खेप?(बुलबुलाची गं!)>>>>>
जागू तुझा बुलबुलवरचा लेख वाचला. आज त्याचं घर पण पाहिल. छान.
आज ब्रम्हकमळाचे फोटो पाहिले . अप्रतिम.
साधनाला अनुमोदन दिनेश खरच इथे
साधनाला अनुमोदन
दिनेश खरच इथे लिहावे, वरचा किस्सा वाचून चित्र उभ राहिलं डोळ्या पुढे.
मनुषाचे पिवळे फूल अलमेंडाचेच
मनुषाचे पिवळे फूल अलमेंडाचेच आहे . त्याला मराठीत कर्णा म्हणतात. . पण सांभाळून त्याची अलर्जी येवू शकते
मनुषाचे पिवळे फूल अलमेंडाचेच
मनुषाचे पिवळे फूल अलमेंडाचेच आहे . त्याला मराठीत कर्णा म्हणतात. . पण सांभाळून त्याची अलर्जी येवू शकते
धन्स प्रज्ञा.
धन्स प्रज्ञा.
झाडाच्या मुळांनी इमारतीला
झाडाच्या मुळांनी इमारतीला खरोखरच धोका निर्माण होतो काय? मी लावलेले अनंताचे झाड छान पुरुषभर उंच झाले होते भरपूर फुले येत होती. लोकांनी तोडून टाकले. मी तिथे नसल्याने कोणी फांद्या ही छाटून दुसरीकडे रोवल्या नाहीत पावसाळा सुरु आहेच काही फांद्यातरी नक्की जगल्या असत्या
लोकांना साधी साधी झाडेही ओळखता येत नाहीत. पूर्वी लावलेले बेलाचे झाड ही असेच बोअर खणायच्या वेळी तोडून कुठेतरी फेकून दिले. ते ही छान वाढले होते. इतके सुंदर त्रिदळ होते त्याचे , माझ्या तळहाताएवढे मोठे मधले पान व बाजुने छोटी छोटी दोन पाने!! ते झाडतर इमारतींपासून दूर ही होते एकदा च फक्त अलिबाग जवळ्च्या कनकेश्वराला बेल वाहू शकलो.
अरेरे श्रीकांत खरच ती झाडे
अरेरे श्रीकांत खरच ती झाडे दुसर्या जागी लावली असती तर चांगल झाल असत.
माझी मुलं सध्या भारतात ,
माझी मुलं सध्या भारतात , त्यांच्या आजोळी आहेत. तिथे ब्रह्मकमळाची कळी अगदी फुलायच्या बेतात आलेली रविवारी. संध्याकाळी आईने माझ्या मुलांना अन भाच्याला ती दाखवली, मध्यरात्री फुलेल, सुरेख वास असतो, पण सकाळ पर्यंत कोमेजून जाईल वगैरे सांगितलं. नंतर बाकी खेळ वगैरे झाले अन नेहमीसारखी मुलं आठ साडे आठपर्यंत झोपून गेली. रात्री बरोबर १२ ला लेक उठून खाली आजीच्या खोलीत गेली अन तिला म्हणे , आजी वेक अप, वी नीड टु सी दॅट स्पेशल फ्लावर. मग आजीने उठून दिवा लाऊन, कड्या दारं उघडून तिला बाहेर नेलं, फूल पाहिलं, त्याचे लाड केले. माझी आई येईल तेंव्हा पण कळी फुलेल तर आपण तिला पण दाखवूया वगैरे झालं. मग त्या फुलाला एक फ्लाइंग किस अन आजीला खरोखरचा किस देऊन झोपायला गेल्या बाईसाहेब .
ऐकल्यापासून माझं मन एकदम थुईथुई होतंय
जागु, अग यावेळी बुलबुलाला सहज
जागु, अग यावेळी बुलबुलाला सहज घरटं सोडून ते कठीण बांधकाम करावं लागलय. पण किती सही बनवलय. कापसाची आयडिया मस्तच की. अंडंही किती सुरेख आहे. त्याच्या प्रत्येक टप्प्याचा फोटो काढता येईल का?
Pages