निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषी, आलो पण परत !!
मी काल बीबीसी ची ह्यूमन प्लॅनेट डिव्हीडी बघायला सुरवात केली. ३ डिव्हीडींचा संच आहे. भारतात उपलब्ध आहे का ते माहीत नाही पण कदाचित बीबीसी चॅनेल वर दाखवली असेल.
आजवर निसर्गाला भिडणारा माणूस, यावर कधी विचार केला नव्हता. पण यातल्या पहिल्याच भागात माणसाचे एक अनोखे दर्शन झालेय. समुद्राशी हरतर्‍हेने झटणारी माणसे (भर लाटांच्या थैमानात कडेकपारीतले शिंपले शोधणारे, समुद्राखाली शिकार करणारे, समुद्रातच राहणारे, शार्कला बोलावू शकणारे लोक) यात दिसतात.
या माणसांच्या क्षमता, धाडसे अफाट आहेत. चित्रीकरण तर नजरबंदी करते. निवेदन उत्तम आहे.
चित्रीकरणात उत्तम संयम बाळगलाय. रक्तपात मर्यादीत आहे. मॅन व्हर्सेस वाइल्ड सारखे बघायला त्रास होतील, असे शॉट्स नाहीत.
यातले बाकिचे भाग अजून बघायचे आहेत, तरिही कुठेही बघायला मिळाली तर ही मालिका बघाच, असेच सांगेन.

दिनेश, अ‍ॅटनबरोची नी ही सिडी दोन्ही मी शोधते रिदम हाऊसमध्ये. जर मिळाल्या नाहित तर तुम्हाला कळवते. पुढच्या वेळेस माझ्यासाठी आणायला Happy

दिनेशदा माझी बाग नाही :-(..कुंड्यां मध्ये आहेत झाडं तीन खिड्क्यां मध्ये.

गुलाबांच सांगा ना..

निकिता, आता पावसात मोठ्या कुंडीत लावली पाहिजेत. किमान माती तरी बदलायला पाहिजे. मग नक्कीच जोम धरतील.
साधना, लिव्हींग प्लॅनेट, ब्ल्यू प्लॅनेट नक्कीच सापडतील. त्या दोन्ही बघणीय आहेत. हि नसेल मिळत तर मला कळव !

कालच विणा गवाणकरांचे 'एक होता कार्व्हर' दुसर्‍यांदा वाचले. कार्व्हर म हा न होताच पण निसर्ग अनंत हातांनी कसा देतच असतो ते समजण्याकरता हे पुस्तक नक्की वाचा.

निकिता झाडांना खत घाल. शिवाय फुल येउन गेले की दोन इंच तरी छाटायचे. (मी तुला सांगते पण हे सगळ मी क्वचित करते कधीतरी वेळ नसतो म्हणून) हल्ली बाजारात टॉपरोझ म्हणुन खत मिळत ते कुंडीत १ ते २ चमचे घालायच. त्याने भरपुर फुले लागतात.

'एक होता कार्व्हर' दुसर्‍यांदा वाचले. >>>>>माधव अगदी अगदी! मीही खूप वेळा वाचलंय!

जिप्सी..
कुठे राहतोस?
हे पुस्तक, पार्ल्याल जवाहर मध्ये, मॅजस्टिक मध्ये, दादरला, आयडियल मध्ये, शिवाजी मंदिरात. कुठेहि सहज मिळेल.. तिथुनच घे आणि वाच. आयुष्यात जर एकच पुस्तक वाचायला मिळणार असेल तर ते हे वाचाव अस मत आहे माझं. फक्त वाचु नये पारायण करावी. संग्रही ठेवाव.

कुठेच नाही मिळाल तर मला सांग मी तोवर काढुन ठेवते.

माधव,
पुस्तकाची आठवण करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद. परत एकदा वाचलं पाहिजे कुठे आहे ते शोधुन. Sad (एक क्षण लाज वाटली स्वतःची एवढ छान पुस्तक माझ कुठे आहे ते मला माहित नाही Sad

माझ्याकडे आहे रे..

त्या निमित्ताने ये माझ्याकडे.. हॅमॉकवर लोळण्याची इच्छा पुरी करुन घे. Happy

नको साधना देउ नकोस...खरच विकत घेउ दे. तुला नाही वाटत का असं?

हॅमॉकवर लोळायला बोलाव.

मी वर खुप कठोर वगैरे लिहिल आहे का?

कठोर कुठे लिहिलेय्स?? बरोबरच लिहिलेस. काही पुस्तके परत परत वाचायची असतात, त्यासाठी संग्रही ठेवणे आवश्यक.

कार्वरची खरेच कमाल... त्या माणसाची सगळी बोटेच हिरवी होती बहुतेक. जिथे जाईल तिथे त्याने बागा फुलवल्या. शेतक-यांनी त्याचे ऐकुन शेंगदाण्याचे पिक घेतले. सगळीकडे शेंगदाणेच शेंगदाणे झाले. तर या पठ्ठ्याने फक्त्स शेंगदाणे वापरुन संपुर्ण जेवण तयार करुन दाखवले. पिनट बटरचा शोध त्यानेच लावला बहुतेक. परत पुस्तक वाचायला पाहिजे. मी तर थक्क झाले पुस्तक वाचुन.

आणि हे सगळे अशा माणसाने केले ज्याला आयुष्यभर त्वचेचा रंग काळा म्हणुन सगळीकडुन नाकारले गेले. विद्यापिठात गुणवत्तेवर प्रवेश मिळतो पण तो भेटायला गेल्यावर त्याचा काळा रंग पाहुन प्रिंसिपल प्रवेश रद्द करतो ते वाचुन भयानक दु:ख होते... Happy

(शेंगदाण्याचे जेवण वाचताना दिनेशदांची आठवण झालेली Happy )

Human Planet is an awe-inspiring, jaw-dropping, heart-stopping landmark series that marvels at mankind's incredible relationship with nature in the world today.

Uniquely in the animal kingdom, humans have managed to adapt and thrive in every environment on Earth. Each episode takes you to the extremes of our planet: the arctic, mountains, oceans, jungles, grasslands, deserts, rivers and even the urban jungle. Here you will meet people who survive by building complex, exciting and often mutually beneficial relationships with their animal neighbours and the hostile elements of the natural world.

Human Planet crews have filmed in around 80 locations, bringing you many stories that have never been told on television before. The team has trekked with HD cameras and state of the art gear to film from the air, from the ground and underwater. The result: a "cinematic experience" created by world-class natural history and documentary camera crews and programme makers.

http://www.youtube.com/watch?v=2HiUMlOz4UQ

वरचे वाचा आणि लिंकवरचे ट्रेलर पण अवश्य बघा.

हो जिप्सी संग्रहात असायलाच पाहिजे असे पुस्तक आहे. मी घेणारच आहे विकांताला. मागच्या वेळेस कार्वरने मोहीनीच केली होती पण या वेळेस निसर्ग पण खूप भावला. जरासेच का होईना कार्वरच्या नजरेने निसर्गाकडे बघता आले ह्या वेळेला. प्रत्येक गोष्टीचा काही ना काही उपयोग असतो फक्त आपल्याला तो ओळखता आला पाहिजे. मानव ती क्षमता गमावत चाललाय. एखादाच कार्वर घडतो की ज्याला निसर्ग दिसतो, त्याची कार्यप्रणाली समजते. बाकी आपण फक्त ओरबाडत असतो निसर्गाला - अलाबामातल्या शेतकर्‍यांसारखे!

म्हणून निकीतासारख्या माणसांचे अप्रूप वाटते जी एवढयाशा खिडकीत बाग फुलवतात, जिप्सी, यो सारख्या माणसांचे कौतुक वाटते जे निसर्गाचे सौंदर्य टिपून इथे मांडतात. जागूसारखी एखादी विसरत चाललेल्या अनेक रानभाजांची ओळख करून देते. आणि दिनेशबद्दल तर बोलायलाच नको. त्यांची माहिती अफाट आहे आणि वेळोवेळी ते इथे ती मांडतच असतात.

एक होता कार्व्हर मस्तच आहे.

या महिन्यात ग्राहक संघाच्या सामानातून नीमपेंड खत विकत घेतलंय. बघू कसं निघतं ते Happy

बाकी आपण फक्त ओरबाडत असतो निसर्गाला - अलाबामातल्या शेतकर्‍यांसारखे

आपण फक्त निसर्गालाच कुठे ओरबाडतो? जे जे शक्य आहे ते सगळेच ओरबाडतो की.

काल असेच बोलताना गाईम्हशींच्या कृत्रिम गर्भधारणेचा विषय निघाला. म्हटले माणसाने स्वतःच्या फायद्यासाठी बिचा-या प्राण्यांचेही मशिन करुन टाकलेय. माणसाने कितीही म्हटले की प्राण्यांना स्वतःची बुद्धी, भावना काही नसतात तरी ते माणसाचे मत आहे. प्राण्यांनी कुठे कधी सांगितलेय त्यांचे यावर काय मत आहे ते? त्यांनाही वंशवाढीच्या नैसर्गिक सायकलमधुन जाताना काहीतरी भावना येत असणार. पण माणसांने मात्र स्वतःला दुध नी मांस हवे यासाठी प्राण्यांवर कृत्रिम गर्भधारणा करुन १२ही महिने स्वतःची सोय होईल हे पाहिले.

स्वतःच्या स्वार्थासाठी शक्य तितका नीचपणा करणारा माणसाव्यतिरीक्त दुसरा प्राणी क्वचितच सापडेल. आणि नीचपणा करताना माणसाने स्वतःच्या स्त्रीलाही सोडले नाहीय. तिथेही त्याला हवा तोच जीव तिने जन्माला घालावा यासाठी तो तिच्या जीवाशीही खेळतो. धन्य ह्या माणुस नावाच्या भयानक प्राण्याची. जंगलात राहणे जास्त सुरक्षित वाटते मला कधीकधी.

कार्व्हच्या किती गोष्टी शिकण्या सारख्या..काहिच नव्हते त्याच्याकडे..अगदी जगण्याचा हक्कही नाही. जगला तो..जगला टिकला आणि किती जणांना जगवल.

बाकी सगळं बाजुला ठेवलं तरिही कुठल्याहि गोष्टी साठी अडुन न बसणारा तो आठवतोच. किती गोष्टी शिकला तो. तेही एकदम प्रत्येक बाबतीत सर्वोत्तम झाला. कपडे धुणे, भरतकाम, वीणकाम. प्रत्येक बाबतीत प्रोफेशनल.

त्याची प्रयोगशाळा पण वस्तुंसाठी अडुन नाही बसली. त्याच्यामुळे मीही पुडिला बांधुन आलेला दोरा ठेवायला शिकले. बाहेर जेवण मागवलं तर ते डबे पण. मग त्या डब्यात छाने पुदिना लावता येतो. एखादि लसुण पाकळी खोचता येते. आणि तेव्हाच जाणवतं पण किती सामन्यातील सामान्य आहोत आपण. काहितरी केलं पाहिजे हे जाणवणं आणि काहीतरी करणं ह्यातील अंतर सगळ्यात मोठं आहे.

प्रत्येक वेळी ते पुस्तक वाचताना नव्याने भारवुन जाते मी.

माझ्या रेकॉर्डची पिन अडकल्यागत मी परत परत ह्यूमन प्लॅनेट कडे येतोय. यातल्या कथा तर ८/१० मिनिटाच्याच. पण त्यातले साहस / जिवननिष्ठा वाखाणण्याजोगी.

एक दोन कथा लिहायचा मोह होतोय.

वाळवंटातील एक गुराखी. ५० गायींसाठी पाणी शोधायला निघालाय. ५०/६० किलोमीटर चालत जायचेय, कारण तिथे एक तळे आहे. त्याचवेळी हत्तींचा एक कळप पण पाण्याच्या शोधासाठी निघालाय. मधे रात्र झाल्यावर त्या मूलाला झोपण्याशिवाय गत्यंतर नाही, कारण गायी रात्री घेऊन जाणे कठीण. हत्ती मात्र रात्रभर चालू शकतात. त्या मूलाची शर्यत त्यांच्याबरोबर, कारण हत्ती आधी पोहोचले तर ते सर्व पाणी पिऊन टाकतील. पण शेवटी तो ते तळे गाठतोच. गायी पाण्याकडे धावतात. पण हत्ती आधीच पोहोचले आहेत. ते गायींचा रस्त्या अडवून धरतात. एकटा निशस्त्र मूलगा, हत्तींचा कळप, तहानलेल्या गायी...

अश्याच वाळवंटातील काहि स्त्रिया. वाळवंटातील एकमेव विहिर शोधायला निघाल्या आहेत. त्यातल्या एकीलाच रस्ता माहित आहे. ती आपल्या १० वर्षांच्या लेकीला घेऊन निघालीय. वाटेत एकही खूणेची जागा नाही. टेकड्या पण आज आहेत तर उद्या नसतील. वाट दाखवणारा फक्त ध्रुवतारा. ती विहिर पण फसवी. अगदी थोडक्या अंतराने पण चकवेल अशी. त्या विहिरीच्या शेजारी एक झाड आहे. तिच एक खूण.
तिथे पोहोचेपर्यंत पूरेल एवढेच पाणी सोबत आहे. उंटाना पण त्यातलेच पाजायचे. एका दिवसात पर्वतांच्या तेहतीस रांगा ओलांडायच्या. सापडेल ना ती विहिर ?

या वाळवंटात तर कधीच पाऊस पडत नाही. पण जमिनीखालच्या खडकात फॉसिल वॉटर आहे. त्यावरच तर सारी भिस्त. पण ते सापडणे कठीण. अपुर्‍या साधनांनी खड्डा खणायचा. मग आडवे खणत शेजारच्या विहिरीला तो बोगदा जोडायचा. क्षणोक्षणी वरचे दगड कोसळण्याची भिती. अनेक जणांना तिथे समाधी मिळालीय. पण धोका पत्करलाच पाहिजे. ते पाणी वाहतं राहिलं तरच शेती होणार. एक वयस्कर माणूस
कोयत्यासारख्या हत्याराने खणत निघालाय. बाकिचे सोबती जमिनीवर देवाची करुणा भाकताहेत..

बघाच या काहाण्या !!!

कार्व्हर नंतर, त्याच लेखिकेचे आणखी एक पुस्तक आले होते. आठवतय का नाव कुणाला ?

निकिता, पुस्तकापेक्षा मालिका जास्त प्रभावी आहे. अप्रतिम फोटोग्राफी आहे.
आता आणखी एक कथा लिहितो.

शार्कला बोलावणे हि एक कला आहे. एक वयस्कर माणूस एकटाच होडीत बसलाय. त्याच्या शरीरावर शार्कने केलेल्या अनेक जखमांचे व्रण आहेत. हातात एकही धारदार शस्त्र नाही. मोठ्या शिंपल्यांपासून केलेले एक वाद्य आहे. ते वाजवून तो शार्कला बोलावतो. एक भला मोठा शार्क येतोही. एका दोरीचा फास आणि त्याला वर बांधलेले लाकूड हेच शार्कला पकडण्याचे हत्यार. तो शार्कच्या गळ्यात अचूक फास टाकतो. शार्क थोडावेळ धडपड करतो पण बांधलेल्या लाकडामूळे तो पाण्यात बुडी घेऊ शकत नाही. मग शार्क मंत्रमुग्ध झाल्यासारखा निपचित पडुन राहतो. तो माणूस त्या शार्कला मोकळा करतो आणि जाऊ देतो, कारण हि कला राहिली पाहिजे, असे त्याचे मत आहे.

मी जरी या कथेचा शेवट लिहिला असला, तरीहि हे सगळे प्रत्यक्ष बघण्यात वेगळाच थरार आहे.

डॉ आयडा स्कडर या पुस्तकाविषयी..
हेच का ते दिनेशदा? या विकांतला घ्यायचा विचार आहे. बहुतेक घ्यायलाच पाहिजे.

Pages