निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कळस,
मीही असाच घोणस पाहिला हा आवाज खुप करतो,पण हालचाल/चपळता कमी दिसली,(बहुतेक काही गिळला असेलही) पुर्वी गावाकडे साळुंकी पक्षी किलकिलाट करु लागले कि हमखास तिथे साप दिसायचा.

दिनेशदा,
तुमच्यासमोर आम्ही म्हणजे अजुन खुप अज्ञानी आहोत.हा अर्जुन देखील मी अगदी अलिकडे बघितला.
पुर्वी दुसर्‍यालाच अर्जुन समजत होतो,अनेक लोकांनी तसे (अगदी छातीठोकपणे) सांगितल्यामुळे
Happy

ओळखा पाहू हे काय?
RSCN0018.jpg

आज मी खूप आनंदात आहे. माझ्या पहिल्या-वहिल्या कॅमेरातून नि. ग. साठी काढलेला पहिला फोटो.
प्रज्ञे, खूप खूप आभार.

सुशोलभा,

मला पण या सोनचाफ्याच्याच बिया वाटताहेत. या बिया रुजून झाड येईल. all the best! Happy

मॅग्नोलीया मस्तच आहे.. मेधा फुल फुलल्यावरही टाक फोटो.

आशु, मला हे अलामांडाच्या फॅमिलीतलेच वाटलेय नेहमी, फुल्/पान सेम तसेच पण जरा मोठा आकार नी वेगळा रंग. नाव अर्थात माहित नाही. खुप कुंपणावर पाहिलेय. लांबुन तर खुपच छान दिसते.

जॅकोबिनीया पहिल्यांदाच पाहिले, याआधी फक्त फोटो पाहिले होते.

सुलोभना, त्या चाफ्याचाही फोटो टाकशील?

सुशोलभा,
या छान चाफ्याच्या बिया पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या.नविन कैमेराचा आनंद मलाही लवकरच मिळेल अस दिसतयं.
शांकली,
वाह ! फुलात काय नजारा आहे,पाकळ्या सापांच्या फण्यासारखा वाटल्या.
Happy
दिनेशदा भेटीचा वृतांत (अजुन लिहिल नसेल तर) कोण लिहितयं ?

श्रीकांत पहिल्यांदाच बघितले लाजाळूचे फुल. कोकणात नेहमी पायाखाली असायची जाण्यायेण्याच्या वाटेवर. उगीचच जाता-येता पाय लावायचो. पण पुल बघितले नाही कधी.

मेधा, मॅग्नोलियाच्या कळीचा फोटो सुंदर आलाय हं! झाड फुलांनी डवरलं की त्याचेही फोटो टाका ना.

श्रीकांत, तुम्ही दिलेली लाजाळूची लिंक बघितली, मस्त आलेत फोटो, माहिती पण छान दिलियेत. आणि व्हिडिओ पण मस्त आलाय.

अनिल७६, मी दिलेली ती पाने लावली का?
शांकली फोटो मस्तच!!
मेधा, आशुतोष तुमचेही फोटो सुरेखच!!!

ह्याला शाल्मली म्हणतात का ? मे मध्ये ही वेल सगळीकडे बहरलेली असते. ही बोरीच्या झाडाला गुरफटलेली वेल.

IMG_0391_skw.JPG

तेरड्याचे फूल्....बांदीपूरच्या जंगलात दिसलेले

भारी आहात तुम्ही सगळे लोक! Happy

मी पण यावरुन प्रेरणा घेउन मोगर्‍याचं रोप विकत घेतलं. तेव्हा त्याला चिक्कार कळ्या होत्या पण कुंडीत लावल्यावर एका दिवसात त्यातल्या बर्‍याचशा वाळुन गेल्या. :(. मुंग्या पण दिसताहेत मातीत आणि काही ठिकाणी मुळे उघडी पडली होती.. यातलं काय कारण असेल?

जागू,
शाल्मली म्हणजे काटेसावर...... Bombax cieba. त्याचा मोठा वृक्ष असतो.
ही वेल वेगळी आहे. मी फोटो झूम करून बघितला, पण फुलं नीट कळली नाहीत. माझ्याकडे काटेसावरीच्या फुला-पानांचा फोटो असेल, मी शोधून इथे टाकीन.

पुण्यात म्हात्रे पुलाजवळ राजा मंत्री उद्यान आहे. तिथे हे Scarlet Cordia फुलले आहे. त्या फुलाचा फोटो.....

Image0611.jpg

ही काटेसावर............ कात्रजच्या घाटात खूप बघायला मिळते. साधारणतः मार्च मधे फुलते ही..........

SHEWARI.jpg

Pages