Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40
निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा धागा हल्ली मला खूप आवडू
हा धागा हल्ली मला खूप आवडू लागलाय. संथ चालती ह्या मालिका पण आवडू लागला (फक्त पिंजरा बघते एकदिवसाआड). निर्मळ वातावरण असतं इथे. असंच राहुदे
अके, येत रहा इथे. बरीचशी झाडे
अके, येत रहा इथे. बरीचशी झाडे ओळखु लागशील
मलाही आधी बहावा आणि पितमोहर यातला फरक कळायचा नाही
आता (त्यातल्या त्यात) बर्यापैकी झाड/फुलं ओळखता येतात.
मी पण मी पण.. मी आधी पासुनच
मी पण मी पण..
मी आधी पासुनच इकडे तिकडे बघत फिरायचे..आता नवीन काही दिसल की नावांचा विचार करते
माझ्याकडे तिन कलिंगडे
माझ्याकडे तिन कलिंगडे वाढताहेत
माझ्याकडे तिन कलिंगडे
माझ्याकडे तिन कलिंगडे वाढताहेत >>> कुंडीऽऽत?
साधना एक येताना घेउन ये.
साधना एक येताना घेउन ये.
अरे वा....साधना माझ्याकडच्या
अरे वा....साधना माझ्याकडच्या कुंडीतली कलिंगडाची रोपं माना टाकताहेत...आता बहुतेक नाही जगणार!
आणि ते पिवळं फूल आलमांडा का? माहिती नव्हतं> धन्यवाद.
नमस्कार मित्रांनो, आपल्या
नमस्कार मित्रांनो,
आपल्या "निसर्गाच्या गप्पा"चा विभाग वाचून मलाही माझी बागेची हौस पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली.गेल्या दोन महीन्यांपूर्वी विविध रोपे आणून लावली.
मी माझ्या बागेचे काही फोटो डकवित आहे.
बागेला दोन महिने झाले आहेत.आंबा,पाम,क्रिसमस ट्री,बांबू, फायकस, वाघनखी इ.बरोबरच अॅडेनिअम,काश्मीरी गुलाब,लिली,अनंत, मदनबाण,मोगरा, जरबेरा, जिरेनिअम, जास्वंद, आलामांडा,तूती,यूफ्रोबिया तसेच घराच्या मागील बाजूस मधूमालती,रातराणी, कढीपत्ता,आळू,चिक्कू,पेरु,अंजीर इ.झाडे बागेची शोभा वाढवीत आहेत.
बागेचं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी तसेच देखभालीसाठी काही सूचना असल्यास नक्की कळवा.
कळस
कळस, तुमचे स्वागत.. तुम्ही
कळस, तुमचे स्वागत..
तुम्ही भाग्यवान आहात एवढी मस्त जागा मिळालीय तुम्हाला बागेसाठी. छान आहे बाग
लॉन अजुन ट्रिम केली नाही काय??
क्या बात है कळसराव्,दिल अगदी
क्या बात है कळसराव्,दिल अगदी बाग बाग हो गया.
बागेतल्या पेरूला पानोपानी
बागेतल्या पेरूला पानोपानी पेरू आले आहेत. पण मागच्या बहरात पेरू वरून छान दिसायचे. पण आतून लिबलिबित आणि खाण्यायोग्य नव्हते. काहींमधे आळ्याही असायच्या. सगळेच नाही पण बहरातले शेवटचे.
या वेळी बघू काय होतं ते.
कळस.......छानच आहे तुमची बाग.
होय साधना,काही ठिकाणी ट्रिम
होय साधना,काही ठिकाणी ट्रिम करावी लागेल.खरेतर ही तैवान लॉन आहे,त्यामुळे वापरली गेल्यास (पायाखाली आल्यास ) ट्रिम करायची गरज सहसा पडणार नाही,असे वाटतेय.परंतू आंब्याचे झाड लावले आहे,विशेषतः त्याठिकाणी वावर नसल्याने लॉन वाढलेली दिसतेय आणि ट्रिम करावी लागेल ही गोष्ट तूम्ही अचूक हेरलीत. थॅंक्स !
कळस, बाग अगदी सुंदर आहे हं,
कळस,
बाग अगदी सुंदर आहे हं, खूपच आवडली. शिवाय व्हरायटी पण खूप आहे.
क़ळस, तुमची बाग खूप छान आहे.
क़ळस, तुमची बाग खूप छान आहे.
अश्विनी के बरोबर अगदी सहमत.
अश्विनी के बरोबर अगदी सहमत. मला पण हा धागा खुप आवडायला लागलाय. खुप निर्मळ वातावरण असतं इथे. आणी सगळ्यांचे परमेश्वराने निर्माण केलेल्या गोष्टींवर इतके मनापासून प्रेम, आदर, कौतुक, अचंबा, हे पण खुप inspiring आहे. मला ग्रीन थंब अज्जिबात नाही त्यामुळे कोणतेही रोप विकत घेताना "आता आपल्या हातून हे एक पण जाणार" हीच भिती मनात येते. तरी पण इथे नेहमी यावसं वाटतं आणी खूप काही शिकायला पण मिळतं. हल्ली मला पण सकाळी jogging ला जाताना सगळ्या झाडांकडे, फुलांकडे वेलिंच्या कडे हमखास लक्ष जातं
कळस च्या बागेचे फोटो फारचं छान. भिंती वरच लोखंडी ग्रिल पण खूप आवडलं.
प्रतिक्रियेबद्द्ल सर्वांचे
प्रतिक्रियेबद्द्ल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !
> खुप निर्मळ वातावरण असतं इथे.
= निराली,अगदी खरं आहे.निर्मळ आणि अनौपचारिक! आत्ताच माझ्या पत्निला मी सर्व प्रतिसाद दाखवित होतो.शी इज हाऊसवाइफ अँड यट नॉट सो कंफर्टेबल विथ काँप्यूटर (नेट)! पण हे सर्व प्रतिसाद वाचून तिलाही येथील चर्चेत भाग घ्यावासा वाटतोय,ह्यातच सर्व आले. रच्याकने-बागेच्या उभारणीत तिचेही मोलाचे काँट्रिब्युशन आहे.
कळच तुमच्या पत्निला नक्कीच
कळच तुमच्या पत्निला नक्कीच येउद्या. त्या.न्च स्वागतच आहे.
मी मागे गो-ग्रिन नर्सरीचे फोटो टाकले होते त्या नर्सरीची माहीती आजच्या लोकसत्ताच्या वास्तुर.न्ग पुरवणीत सौ. शुभदा पटवर्धन या.न्नी टाकली आहे.
कळस, दुसर्या फोटोतलं झाड
कळस, दुसर्या फोटोतलं झाड आंब्याचं आहे का - पूर्ण मोठं झालं की झाड किती मोठं होईल ? नेहमीच्या पाहण्यातलं आंब्याचं झाड असेल तर ते कुंपणाच्या भिंतीच्या अन बहुतेक घराच्याही फार जवळ होईल. मुळांमुळे घराच्या, कुंपणाच्या भिंतीला धक्का पोचू शकतो. शिवाय फांद्या डेरेदार झाल्या की त्याही घराच्या फारच जवळ येतील.
लॉन मात्र एकदम मस्त आहे - गच्च दाट, हिरवंगार अन कुठेही वीड्स नाहीत. फार छान वाटलं पाहून.
<<<खुप निर्मळ वातावरण असतं
<<<खुप निर्मळ वातावरण असतं इथे.>>>>
अगदि खरं आहे. हा धागाच मुळी 'निसर्गाच्या गप्पा' असा आहे. त्यामुळे साहजिकच इथे येणारे सर्वजण तसेच निकोप वृत्तीचे , निर्मळ मनाचे असतात. निखळ आनंद घेण्यासाठीच तर आपण इथे जमतो.
आज सकाळी एक वेगळाच पक्षी
आज सकाळी एक वेगळाच पक्षी गच्चीच्या वरच्या तारेवर बसला होता. रंगाने पांढरटसर आणि कावळ्यापेक्षा थोडा मोठा साईज होता. खालून तरी पोटावर डॉट्स दिसत होते. फोटो घेतला पण खूप लांबून घेतल्याने नीट आला नाही. होला नक्कीच नव्हता. ??
नागरहोळेच्या जंगलात दिसलेले
नागरहोळेच्या जंगलात दिसलेले फूल, जाणकार नाव सांगतीलच.
आशु मस्तच फोटो रे... ऐशुच्या
आशु मस्तच फोटो रे...
ऐशुच्या मते वरची फुले एकमेकांवर चिडुन गुस्सा होऊन तोंडे फिरवुन बसलीत
कळस, मेधाचे बरोबर आहे. आंब्याचे झाड कधीच घराच्या जवळ लावू नये. झाड वर जसे डेरेदार होत जाते तशी त्याची मुळेही जमिनीखाली गोल पसरत जातात.
आंब्याच्या झाडाला खत घालायचे एक शास्त्र आहे हे मला गार्डनिंगच्या कोर्सला शिकवले होते. झाडाchyaa वरच्या गोल पसा-याच्या अगदी खाली खोडापासुन दुर जमिनीत हलका चर पाडायचा. खत व अन्न शोषुन घेणारी मुळे अगदी बरोबर या परिघापर्यंत पोचलेली असतात. एकुण वर्तुळाचे चार भाग कल्पिले तर एक चतुर्थांश भागात हलका चर खोदायचा व तिथे खत द्यायचे. काही दिवसांनी दुस-या एक चतुर्थांश भागात चर खोदुन खत द्यायचे. असे करत वर्तुळ पुर्ण करायचे. आंब्याला त्याच्या खोडाच्या मुळाशी खत देऊन काहीच उपयोग होत नाही कारण खत शोषुन घेणारी मुळे कधीच खोडापाशी थांबत नाहीत. आणि म्हणुनच आंबा कधी घराशेजारी लावायचा नाही. त्याची मुळे जमिनीखालुन कधी घराखाली पसरतील सांगता येणार नाही
कळस, तुमची बाग छान
कळस,
तुमची बाग छान आहे,नशीबवान तर आहात हेही खरं आहे.
आशु,
फोटो खास आलाय,आता जाणकार नाव सांगतीलच
अगदी पहिल्यापासुन या पानावरच्या गप्पांमुळे निसर्गाबद्दल एक वेगळाच आदर किंवा ओढ ही निर्माण झाली आहे.
आशु खुप सुंदर आहेत फुल.
आशु खुप सुंदर आहेत फुल. झाडाच्या पानांचा पण फोटो असता तर कदाचित ओळखता आल असत.
कळस मोठी झाडे लावल्याने त्यांचा पसारा झाल्यावर छोट्या झाडांवर सावली पडते व ती चांगली बाजत नाहीत, फुले धरत नाहीत. म्हणुन मोठी झाडे शक्यतो बागेच्या कडेला लावावीत. माझ्याकडे तेच झाले आहे. फळांची झाडे वाढल्यामुळे आता मला इतर छोटे वृक्ष लावायला तितकिशी जागा राहीली नाही. त्यामुळे मला निट प्लॅन करुनही लावायला जमत नाही.
आशुतोष, त्या फुलाला
आशुतोष, त्या फुलाला बिग्नोनिया असं म्हणतात. त्याला मराठीत नाव नाहीये. जमल्यास पानांचा पण फोटो टाका ना!
फ्लॉवर ऑफ इंडियावर याचे नाव
फ्लॉवर ऑफ इंडियावर याचे नाव केप हनीसकल म्हणुन सापडले. बिग्नोनिया फॅमिलीतलेच.
विकीवर याचे संस्कृत नाव पाटल म्हणुन दिलेय.. पण मी तरी कधी ऐकले नाही.
साधना, हो . ते हनीसकल आहे.
साधना, हो . ते हनीसकल आहे. माझ्याकडे आहे हे . नुकताच त्याचा बहर येऊन गेला. पुन्हा येईल तेव्हा फोटो टाकेन. नावाप्रमाणेच फुलं मधानी लोडेड असतात बहुधा. मधमाशा आणि हमींग बर्ड फुलांभोवती घोंघावत असतात.
कळस, बाग छान आहे बाबा तुमची,
कळस,
बाग छान आहे बाबा तुमची, मेंटेन पण छान केलीत्......बागेवरचे प्रेम जाणवते आहे तुमचे.
सगळ्यांना अनुमोदन. खुपच मस्त
सगळ्यांना अनुमोदन. खुपच मस्त गप्पा चाललेल्या असतात या धाग्यावर.
कळस, तुमची बाग खुपच छान दिसतेय. तुमची बाग आणि हा धागा असाच बहरो.
मध्यंतरी अॅम्बी व्हॅलीला
मध्यंतरी अॅम्बी व्हॅलीला जाण्याचा योग आला. तेथिल काही प्रचि :
ही मेन गेटावर स्वागत करणारी गोड फुलं
जरा जवळून
काय सुरेख रंगमेळ आहे ना? (या फुलाचं नाव काय बरं?)
ही थेट करमळांसारखी दिसणारी फळं पण करमळं नव्हेत. यात काही गर नव्हता. चवही नव्हती. पण याची झाडं खच्चून भरल्येत अॅम्बीव्हॅलीत. आणि झाडावर ही खोटी करमळंही खच्चून भरली होती. पण ती करमळं खच्चून भरली नव्हती. (कळलं नं मला काय म्हणायचय? की गोंधळवून टाकलं? :फिदी:)
ही बदकं (यांचं काही विशेष नाव आहे का?) तळ्याकाठी मस्त विहरत होती.
ही एक लव्हेंडर सारखी दिसणारी फुलं. (यांचही नाव काय ते माहित नाही. खरी लव्हेंडरची फुलं मी अमेरीकेत पाहिली आणि शिवाय त्यांचं केलेलं घरगुती आईसक्रीमही खाल्लंय. मस्त लागतं.)
हा असा जिवंत ओला-हिरवा रंग निसर्गातच मिळतो. न राहवून या बाळ गवताचा फोटो काढलाच.
हे जांभळाचं लहानसंच झाड पण भरपूर जांभळं बाळगून होतं. दिसतायत का?
हे एक वारूळ. कोणाचं होतं? मुंग्यांचं की नागोबाचं?
Pages