Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40
निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कारण फक्त पंख आणि शेपुट खायला
कारण फक्त पंख आणि शेपुट खायला वापरतात म्हणे. मग बिचारा पोहोता न येणारा शार्क समुद्र तळाशी आक्रोश करत रहातो >>अरेरे!!...
पण पोहता न येणार्या माशाला पुन्हा पाण्यात सोडुन काहीच 'अर्थ' निघत नाही....उलट शार्क माशाला जगभरात प्रचंड मागणी आहे....त्याच्या प्रत्येक अंगाचा उपयोग करुन घेतला जातो... (ते फक्त त्या मुवितच दाखवलं असावं)
इथे नेरुळ्/दिवाळे गावात मोठी सुरमई/हलवा इ. मंडळी ४०० रु किलो या भावानेच जातात. >> म्हणजे तिथेही महागले...
मग बिचारा पोहोता न येणारा
मग बिचारा पोहोता न येणारा शार्क समुद्र तळाशी आक्रोश करत रहातो >>>:(
अश्विनी अगदी तुझ्याशी सहमत.
अश्विनी अगदी तुझ्याशी सहमत.
जगात सगळ्या प्रकारची मते
जगात सगळ्या प्रकारची मते असलेले लोक राहतात. आणि आपली मतेच योग्य आहेत हे ठसवण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात.
चातक म्हणतो ते खरेतर खरे आहे. शार्कच्या पंखात नी शेपटात हाडे असतात (शेपटाने तो बोटसुद्धा उलटवु शकतो). खाण्यासाठी योग्य असे त्यात काही असते असे वाटत तरी नाही. त्या मानाने बाकीच्या भागात भरपुर मांस असते ज्याला किंमतही भरपुर आहे. शार्क पकडणेही सोपे नाहीय. त्यामुळे एवढी मेहनत घेऊन पकडलेल्या प्राण्याची जमेल तितकी किंमत वसुल करण्याचा प्रयत्न केला जाईल. नुसते पंख नी शेपटी काढुन उरलेला मासा जिवंत अवस्थेत (शार्क पाण्याबाहेर जास्त काळ जिवंत राहु शकत नाही) परत आत टाकणे जरा अतिशयोक्त वाटते.
ओशन कोणी बनवलाय नी का बनवलाय यावर वर जे दाखवलंय ते का दाखवलंय हे ठरेल.
दिनेशदांनी सांगितलेला 'human
दिनेशदांनी सांगितलेला 'human planet' पाहिला का सगळ्यांनी ? तू-नळी वर आहेत सगळे भाग. नक्की बघा. दिनेशदा धन्स ! वेळ घालवायचा म्हणून जालावर उगाच काही बाही bollywood सिनेमे बघतो आम्ही. त्यापेक्षा हे कार्यक्रम खुपच उपयुक्त. हा धागा (आणि आधिचे दोन्ही) चालू करून इतका वाढवणा-यांचे आभार ! खूप छान माहिती मिळते आहे.
दुर्दैवाने हि माहिती खरी आहे
दुर्दैवाने हि माहिती खरी आहे कारण याबद्दल मी आधीही ऐकले आहे. जपान चायना कोरिया या देशात शार्क फिन चे सुप आणि काही पदार्थ खातात. सरसकट सगळी कडे मिळत नाही पण स्पेशालिटि रेस्टॉरण्ट मधे मिळतात.
पुर्ण खात नाहित कारण त्याचे मीट चांगले लागत नाही म्हणे.
ती मुव्ही म्हणजे खरतर डॉक्युमेंटरी टाईप होती.
शार्क नक्की कसा आवाज करतो ते माहीत नाही. पण खरच तो शार्क विव्हळत असल्यासारखा ओरडत होता त्यावेळि बॅकराऊंड म्युझिकच होते त्यामुले कळले नाही.
अगं सावली तु लिहिलेले खरेच
अगं सावली तु लिहिलेले खरेच आहे.
त्या फिल्मबद्दल मी वाचलेय. त्यात त्यांनी इतर अनेक गोष्टींबरोबर माणसांचे समुद्र व समुद्रजीवांवरील दुष्परिणामांबद्दल चित्रिकरण् केलेय. पण काही गोष्टी मुद्दाम भडक दाखवतात कारण त्यांना त्यांचे जे काही बरेवाईट मत असते ते अगदी ठासुन सांगायचे असते. ग्रिन पिस सारख्या संस्थाही काही गोष्टी खुपच काळ्या रंगवतात. अर्थात मुळात काळा रंग असतोच तिथे, नाही असे नाही. त्यामुळे तु लिहिलेस ते खरेच असावे. पण एवढा दुष्टपणा सगळेच कदाचित करत नसतील. आणि जे करत असतील त्याना रात्रीची झोप कशी येत असेल तेच जाणे
दिनेशदांनी सांगितलेला 'human planet' पाहिला का सगळ्यांनी ? तू-नळी वर आहेत सगळे भाग
अरे वा. शोधायला पाहिजे आता.
व्हेल मासा तर चक्क गाणे गातो.
व्हेल मासा तर चक्क गाणे गातो. बीबीसी ने ते रेकॉर्ड केले आहे. खुप वर्षांपुर्वी नॅशनल जिओग्राफिक मासिकात त्या गाण्यांची एल पी रेकॉर्ड पण होती.
बँकॉक विमानतळावर देखील, शार्क फिन्स आणि बर्ड नेस्ट (आपल्या लाळेने घरटी बांधणार्या एका छोट्या पक्ष्याची घरटी ) सुपसाठी ठेवलेले होते. या दोन्हींचा "शक्तीवर्धक" म्हणून व्यापार होतो.
शार्क बद्दल माहित नाही, पण व्हेल मासे जर खाणे कमी झाले तर आपणहुन आत्महत्या करतात. किनार्यावर आलेले असे मासे, कितिही ढकलले तरी पाण्यात जात नाहीत.
ब्ल्यू प्लॅनेट या प्रदिर्घ मालिकेत याचे खुप सुंदर चित्रण आहे. हि मालिका खुप जूनी आहे आणि जून्या फॉर्मॅटमधे चित्रित झालीय.
ह्यूमन प्लॅनेट सर्व उपलब्ध असेल तर सोन्याहून पिवळे. बघाच सगळ्यांनी (आफ्रिकेतील टोळीयुद्धाचा एक भाग सोडला तर मूलांना बघायलाही हरकत नाही. त्या भागात थोडासा रक्तपात आहे आणि योद्धे नग्न आहेत.)
मासे चक्क गाणे गातात ? नवलच.
मासे चक्क गाणे गातात ? नवलच.
वय झालेले पेंग्विनही पुढच्या पिढीचे व्यवस्थित पालन पोषण व्हावे म्हणुन जीव देतात असे वाचले आहे.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=WabT1L-nN-E
जागू, इथे ऐकता येईल त्यांचे गाणे.
व्हेल (देवमासा) हा मासा नसून
व्हेल (देवमासा) हा मासा नसून सस्तन प्राणी आहे.
पेंग्विन वर एक सुंदर माहितीपट
पेंग्विन वर एक सुंदर माहितीपट पाहीला होता हिंदीमधे भाषांतर अमिताभ बच्चन चे आहे.
आमच्या घराला छान शी बागेची
आमच्या घराला छान शी बागेची जागा आहे. बरेच झाडं लावली पण आहेत. पण तिथे खूप च कमी ऊन येतं. त्यामुळे खूप फुलं कधी लागत नाहीत झाडांना. उत्साहानी झाडं लावतो आम्ही. पण फुलांनी डवरलेली झाडं पहायला मिळत नाहीत. वाईट वाटतं जरा. पण असो. जागा आहे आणी हिरवाई बहरते आहे हे काय कमी आहे !
आफ़्रिकन चिमणी का ही ? आपल्या
आफ़्रिकन चिमणी का ही ? आपल्या चिमण्याही दिसतात इथे खुप.
पण हा पक्षी तिच्यापेक्षा जरा मोठा होता. आणि फोटो काढतोय,असे बघितल्यावर अशी छाती फुगवून पण दाखवली.
ओळखीची झाडे वेगळ्या रुपात
ओळखीची झाडे वेगळ्या रुपात दिसतात, कधी कधी.
पचोडीया, स्क्वीर्ट ट्री, आफ़्रिकन ट्यीलिप, युगांडा फ़्लेम ट्री आदी नावाने ओळखले जाणारे हे
झाड आपल्याकडे नेहमी, लाल फुलांचे दिसते. इथल्या उहुरु पार्क मधे ते पिवळ्या रंगाचे दिसले.
जरा जवळून फुले बघू या !
मस्तच! दिनेशदा फुलं वेगळीच
मस्तच! दिनेशदा फुलं वेगळीच आहेत. आणि फ्लेम ट्री हे नाव अगदी शोभून दिस्तंय!
या झाडाकडे लांबून बघितल्यावर
या झाडाकडे लांबून बघितल्यावर वडाच्या झाडाचाच भास होतो कि नाही ? इथल्या बायका
वटपोर्णिमेला याच झाडाची फांदी पूजतात.
पानेही साधारण वडासारखीच.
पण हा वड नाही. कूळही ते नसावे कारण पारंब्या नाहीत. पण हे झाड दाट पर्णसंभाराचे
असते आणि सावलीसाठी लावतात बहुदा.
तसे वरचे झाड लहानच म्हणायचे कारण, नायजेरियात ओटा रस्त्यावर अशी दोन मोठी
झाडे माझ्या बघण्यात होती. त्या झाडांचा विस्तार एवढा मोठा होता, कि त्याखाली प्रत्येकी
सहज आठ गाड्या उभ्या राहू शकल्या असत्या. आणि त्या तशा असतही.
आणि हा सर्वपरिचित
आणि हा सर्वपरिचित बॉटलब्रश.
आपण नेहमी पाहतो त्याच्या फांद्या वरुन खाली झुकलेल्या असतात. याच्या मात्र
आभाळाकडे झेपावणाऱ्या.
फुले आकारानी लहान असली, तर गुच्छ करण्याकडे झाडांचा कल असतो.
या कळ्यांच्या फोटो पण टाकायचा मोह आवरत नाही.
तूमच्या बघण्यात जर एखादे बॉटलब्रशचे झाड असेल तर नीट निरिक्षण करा. फुले हि
फांदीला मधेच आलेली असतात. त्यापुढेही फांदी वाढतच असते. फुले गळुन गेली तरी
फळे झाडाला तशीच असतात. बहुतेक झाडे बीप्रसारासाठी काही ना काही उपाय योजतातच.
कधी मधुर फळे तर कधी वाऱ्यावर उडण्यासाठी पंख. कधी पाण्यात तरंगण्यासाठी होडी.
आणि असे काहीच नसले तर निदान शेंगा तडकून बिया उडवल्या / फेकल्या तरी
जातात. या झाडाने असा कुठलाच उपाय का योजला नसेल ?
याचे कारण आहे कि हे झाड वणव्याची वाट बघते. वणवा लागला की भोवतालची पाने
जळून जातील आणि बिया मुक्त होतील, वणव्यानंतर जमिनही सुपीक झालेली असेल,
आणि स्पर्धा करणारी झाडे जळून गेलेली असतील.
यात नवल असे काही नाही. हे झाड ज्या ऑस्ट्रेलियामधून आलेय तिथे असे वणवे
लागत असतातच. आपल्याकडे मात्र वणवे तितके कॉमन नसल्याने या झाडाचा
नैसर्गिक प्रसार होत नाही.
निसर्गाच्या गप्पा मारता मारता
निसर्गाच्या गप्पा मारता मारता एक धक्का चांगलाच बसला. घरात मी एकटीच. लेक जावई हपिसात. मी टाइम पास म्हणून कौशिकी चक्रवर्तीचा खमाज ऐकत बेक्ड व्हेजिटेबल बनवत होते. जीटॉकवर लेकीशी (तिला जमेल तेव्हा) गप्पाही चालल्या होत्या. तेवढ्यात काही तरी हललं. एक धक्काच बसला. आधी वाटलं इथला एसी सारखा अॅडजस्ट होत असतो. तसंच काही असेल. पण आता मात्र चक्क स्वेइंग व्हायला लागलं. खूप भयानक फीलिंग आलं. पटकन दार उघडून बाहेर पाहिलं. नेहेमीप्रमाणे इथे कधीच पटकन माणूस दिसत नाही. आता घराच्या किल्ल्या, पर्स घेतली. बाहेर जाण्याचा विचार केला. पण हळूहळू थांबलं. घाबरून जीव गोळा झाला. तोंडाला कोरड पडली. मग बाहेर जाण्याचा विचार कॅन्सल केला. मग लक्षात आलं ...एका मिनिटात काय काय होऊ शकतं! लगेच टीव्ही लावला.
इथे माबोवरही रूनी, वैद्यबुवा, परदेसाई यांच्याही हितगुजमधे पोष्टी आल्या. त्याही पाहिल्या.
आता वाटतं बरं झालं घाईघाईत खाली गेले नाही( ९व्या मजल्यावरून). लिफ्ट मधेच बंद पडली किंवा अजूनही काही?
तेवढ्यात लेकीला जीटॉक वर विचारलंही होतं की ...तुला काही जाणवलं का?
तर ती ऑफ लाईन होती.
३/४ मिनिटांनी तिचा मेसेज आला , " आम्हाला इव्हॅक्युएट केलं आहे. आम्ही सारे रस्त्यावर आहोत." आता तिने आयफोनवरून मेसेज दिला. कारण ती बाहेर आली होती.
दार वाजलं .....जावई आला होता. जिवात जीव आला. लेकीचा मेसेज आला, " कॅन यू पिक मी अप?" ती मेट्रोने हपिसला जाते.
आता जावई तिला आणायला गेलाय. बाप रे.........!
देवाची कृपा म्हणून कुठेही जीवित/वित्तहानी नाही.
मानुषी.. नशीब... दिनेश, मस्त
मानुषी.. नशीब...
दिनेश, मस्त फोटो ..
जिप्सी आज पार्टी देतोय. आज एक वर्षाने मोठे झाले साहेब..
(रच्याकने सगळेच ऑगस्टातले कसे??????)
जिप्सी वाढदिवसाच्या हार्दिक
जिप्सी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गोकुळाष्टमीचाच जन्म का ?
===
मानुषी, काळजी घ्या सगळ्यांनी.
जिप्सी, वाढदिवसाच्या हार्दिक
जिप्सी,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज माझ्या आईचा पण वाढदिवस
गोकुळाष्टमीचाच जन्म
गोकुळाष्टमीचाच जन्म का
म्हणुन्तर योगेश नाव..
रच्याकने, सांगायला विसरलेच... खरेतर जिप्सिनेच पार्टी दिलीय आपल्याला... इथे पाहा http://www.maayboli.com/node/28358
जिप्सी, तुम जियो हजारो साल,
जिप्सी, तुम जियो हजारो साल, सालके दिन हो पचास हजार! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
जिप्स्या तुला मेसेज पाठवला
जिप्स्या तुला मेसेज पाठवला मघाशिच. फोन करत होते लागत नाही. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज माझ्या आहोंचा पण आहे वाढदिवस. त्यांचाही जन्स गोकुळ अष्टमीचाच आहे.
शुभेच्छांबद्दल मनापासुन
शुभेच्छांबद्दल मनापासुन धन्यवाद!!!!
निकिता, "आईंना" आणि जागू, तुमच्या "अहोंना" वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
जिप्सि धन्स. निकिता आईला
जिप्सि धन्स. निकिता आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा सांग व आमच्या तर्फे काहीतरी नैसर्गिक वस्तु भेट दे.
आईचा वाढदिवस किती गमतिदार
आईचा वाढदिवस किती गमतिदार गोष्ट ना?
मी आईला शुभेच्छा दिल्या आणि मग आम्ही हसत होतो बराच वेळ
मी आईला शुभेच्छा दिल्या आणि
मी आईला शुभेच्छा दिल्या आणि मग आम्ही हसत होतो बराच वेळ
चांगले आहे. माझी लेक मला तर धमकी देत होती आता फेसबुकवर ब्रेकिंग न्युज टाकते माझी आई अमुक अमुक वर्षांची झाली म्हणुन
साधना ऑगस्ट मध्ये खुप म्हणजे
साधना
ऑगस्ट मध्ये खुप म्हणजे खुपच वाढदिवस असतात.
२५ ऑगस्ट ला माझ्या चांगल्या ओळखीतल्या ५ जणांचे वाढदिवस आहेत
Pages