Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
त्यांचे श ष गंडलेत. उद्घोष,
त्यांचे श ष गंडलेत. उद्घोष, आक्रोश
अमुक यांचे शोचनीय निधन अस
अमुक यांचे शोचनीय निधन अस बरेचदा वाचायला मिळत . तर शोचनीय शब्दाचा नेमका अर्थ काय होतो ?
डबल पोस्ट
डबल पोस्ट
मोबाईल फोन टंकलेखन!
मोबाईल फोन टंकलेखन!
टण्या
टण्या
शोचनीय = दु:खप्रद
शोचनीय = दु:खप्रद
ओह ! थॅंक्स भरत.
ओह ! थॅंक्स भरत.
चिंतनीय - चिंतन करण्याजोगे,
चिंतनीय - चिंतन करण्याजोगे, , अ-तुलनीय - तुलना करणे अशक्य असलेले तसेच शोचनीय शोच ( मराठीत शोक ) करण्याजोगे
मथितार्थ = मथित + अर्थ मथित =
मथितार्थ = मथित + अर्थ
मथित = चर्चा केलेले
आता 'मथित' ची व्युत्पत्ती काय ? 'माथा' शी काही संबध ?
मथित = घुसळलेले मथि =
मथित = घुसळलेले
मथि = घुसलण्याची रवी
मथितार्थ = बरीच (वैचारिक) घुसळण करून काढलेला अर्थ
धन्स चिनूक्स.
धन्स चिनूक्स.
@चिनुक्स : मंथणी/नी = रवी,
@चिनुक्स :
मंथणी/नी = रवी, घुसळणी
मंथणी > मंथन > मथित > मथितार्थ असे दिसते.
अजून एक गोंधळ होणारी जोडी : प्रथितयश व प्रतिथयश. पहिले योग्य कारण प्रथित = प्रसिद्ध.
मथित, मन्थन, यातला मूळ धातु
मथित, मन्थन, यातला मूळ धातु 'मन्थ्' हा आहे. या मूळ धातूपासून झालेली ही विशेषणे, भाववाचक नामे, समास इ.आहेत.
'हरणकाळजी' म्हणजे काय ?
'हरणकाळजी' म्हणजे काय ?
घाबरट , हरणासारखे काळीज
घाबरट , हरणासारखे काळीज असणारा/री
आपले कुणी हरण करेल की काय अशी
आपले कुणी हरण करेल की काय अशी काळजी वाटणे = हरण काळजी.
अवचित म्हणजे अचानक, पूर्व
अवचित म्हणजे अचानक, पूर्व कल्पना नसताना झालेली घटना ;
सावचित म्हणजे सावध , जागरुक, ( अलर्ट) असलेली व्यक्ती
या दोन्ही शब्दांची व्युत्पत्ती काय ?
जीवात जीव आला, जीव भांड्यात पडला अशा वाकप्रचारांचा उगम कशावरुन असेल ?
अभिनिवेश चा अर्थ काय ?
चित = consciousness (सत चित
चित = consciousness (सत चित आनंद मधले चित).
अव हा विरुद्ध अर्थ दाखवणारा प्रत्यय आहे ( जसे की कृपा x अवकृपा).
अवचित म्हणजे चित नसताना = बेसावध असताना.
निवेश = गुंतून जाणे
अभि हा प्रत्यय अधिक या अर्थी वापरला जातो.
अभिनिवेश - खूप गुंतून जाणे (आणि त्या गुंतून जाण्यामुळे कड घेणे, biased होणे)
हरण की हरीण ? (प्राणी). हरण
हरण की हरीण ? (प्राणी). हरण म्हणजे दूर करणे ना?
हरण की हरीण ? (प्राणी). हरण
हरण की हरीण ? (प्राणी). हरण म्हणजे दूर करणे ना? >> हरण.
वाक्य असे होते : आम्हाला तिची हरणकाळजी वाटू लागली.
'हरीण' चा संबंध मला तरी वाटत नाही.
वदतोव्याघ्यात ह्या शब्दाचा
वदतोव्याघ्यात ह्या शब्दाचा काय अर्थ आहे?
दोन विरुद्ध गोष्टी बोलून आपणच
दोन विरुद्ध गोष्टी बोलून आपणच आपलं विधान खोडून काढायचं.
http://www.maayboli.com/node/24881?page=4 इथे गंमतशीर चर्चा झालीये बघा.
खरच की! वाघोबाचा संंदर्भ
खरच की! वाघोबाचा संंदर्भ एकदम!!!! गौरी देशपांडेंच्या पुस्तकात ' किसिंजर यांची पॅरीसला बारावी धावती गुप्त भेट' ह्या मथळ्यात किती वदतोव्याघ्यात आहेत', अस वाक्य वाचून प्रश्न पडला. त्वरीत उत्तर दिल्याबद्दल आभार!
दुसर्या एका संस्थळावर '
दुसर्या एका संस्थळावर ' शृंगापत्ती' या नावाच्या धाग्यावर चर्चा चालू आहे. 'शृंग' चे मोल्स्वर्थ मध्ये दोन अर्थ सापड ले. १) शिंग २) (लाक्षणिक अर्थाने) त्रस्त करणारा प्रश्न.
या संदर्भात काही 'शिन्गाची गोष्ट वगैरे आहे का?
कुमार, नक्की संदर्भ आठवत नाही
कुमार,
नक्की संदर्भ आठवत नाही पण बहुतेक सांबराला किंवा काळवीटाला शिंगांमूळे सारखं झाडाझुडूपात अडकून पडायला होत असे. आणि त्यामुळे त्याची शिकार होण्याची त्याला भिती वाटत असे.
तर तो देवाला म्हणाला की माझी शिंगे गायब कर.
मग शिंगे गायब झाल्यावर त्या शिंगांच्या भितीने त्याला वचकून रहाणारे प्राणी त्याला घाबरेनासे झाले.
आता सांबराला शिंगे असूनही नुकसान आणि शिंगे नसूनही.
या प्रकारच्या डायलेमाला शृंगापत्ती म्हणतात.
एक्झॅक्ट सुभाषित आत्ता आठवत नाही आहे.
शोधून सांगते.
(कारण मी पण तो धागा वाचल्यापासून तेच शोधत आहे. तर गुगल मेलं 'शृंगारपट्टी' नावाचा कंबरपट्टा दाखवतोय.)
जीवलगा राहिले रे दूर घर माझे
जीवलगा राहिले रे दूर घर माझे ह्या गाण्यात ही घटकेची सुटे सराई अशी ओळ आहे.
सराई म्हणजे काय? धर्मशाळा?
तरूवर, सुरवर असे शब्द अभंगात ऐकले आहेत. ह्यातील वर प्रत्ययाने अर्थ कसा बदलतो?
हो, सराई म्हणजे
हो, सराई म्हणजे धर्मशाळा.
'वर' प्रत्यय 'श्रेष्ठ' या अर्थी येतो. नरवर = नरश्रेष्ठ
शेंडेनक्षत्र, सराई म्हणजे
शेंडेनक्षत्र,
सराई म्हणजे धर्मशाळा /थोड्यावेळेकरताचा निवारा देणारी जागा बरोबर.
बहुतेक फारसी /अरेबिक ओरिजिनचा शब्द आहे आणि त्याचा अर्थ वाळवंटात प्रवास करताना खाणे /पिणे/मनोरंजन/विश्रांती यांची सोय असलेली जागा' असा असावा.
'वर' हा प्रत्यय तरतम भाव दाखविणारा (ही) आहे.
मुनिवर म्हणजे श्रेष्ठ मुनी, तरूवर म्हणजे श्रेष्ठ झाड.
किंवा कुणाला आदराने हाक मारायची असल्यास नरवर्/मुनीवर म्हणतात.
आमच्या कानडीत हेच वरे म्हणतात.

म्हंजे
लोक 'मॅडमवरे/ अम्मावरे' करून हाक मारतात.
अय्यो, दोघींना पण 'नरवर
अय्यो,
दोघींना पण 'नरवर कृष्णासमान' गाणं आठवलं की काय एकाच वेळीस!
साती, धन्स.
साती, धन्स.
Pages