Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
पिवळाजर्द / जर्द पिवळा हे
पिवळाजर्द / जर्द पिवळा हे जास्त योग्य
आज फेसबुकर एका स्त्रिने
आज फेसबुकर एका स्त्रिने पिवळाशार रंग असा उल्लेख केला आणि मला तो चुकीचा वाटला.
<<
फेसबुकवर ना? मग जाऊ द्या हो साहेब. मराठी लिहिताहेत यात खुश रहा
रच्याकने : स्त्रीने की स्त्रिने?
फारसी भाषेत जर्द (उच्चार
फारसी भाषेत जर्द (उच्चार जॅर्ड) ह्या शब्दाचा अर्थ पिवळा असा आहे. तिथूनच तो भारतीय भाषांत आलेला आहे.
बोलीभाषेत पिवळाजर्द हा प्रयोग बरोबर आहे पण शब्दशः अर्थ पाहिला तर द्विरुक्ती आहे, पिवळा पीतांबरसारखी.
अवांतरः लाल रंगाकरता फारसीमधे केर्मेझ असा शब्द आहे मराठीत जुन्या काळात किरमिजी हा शब्द लाल रंगाच्या छटेकरता वापरला जात असे. हल्ली फार ऐकू येत नाही हा शब्द. तो शब्दही फारसी भाषेतून आपण आयात केला आहे. पांढरा रंग ह्याकरता सफेद हाही तसाच एक आयात शब्द.
आम्ही 'पिवळाधम्मक' असा शब्द
आम्ही 'पिवळाधम्मक' असा शब्द वापरतो.
एल्गार ह्या शब्दाची
एल्गार ह्या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे ?
पिवळाधम्मक (इथे म ला म आहे
पिवळाधम्मक (इथे म ला म आहे का?) शब्द पण आहे हे बरोबर आहे.
सर्वांचे आभार.
@shendenaxatra जर्द आणि सफेद
@shendenaxatra
जर्द आणि सफेद हे पर्शियनमध्ये अनुक्रमे पिवळा आणि पांढरा यासाठी वापरतात हे खरे आहे.
पण गर्मेझ हा शब्द लाल रंगाच्या एका विशिष्ठ छटेसाठीच (किरमिजी) वापरतात. लालभडकसाठी 'सुर्ख' असा शब्द आहे. जो हिंदीत जास्त वापरला जातो उदा. सुर्ख होठ.
हिरव्यासाठी सब्ज हा अजून एक ओळखीचा शब्द!
हिरव्यासाठी धानी हा अजून एक
हिरव्यासाठी धानी हा अजून एक शब्द आहे. बाजार ह्या सिनेमात फारुख शेखला सुप्रिया पाठक म्हणते "हमे धानी चुडिया चाहिये" आणि नंतर लगेच एक गाणे आहे - फिर छिडी रात बात फुलो की!!!! (धानी नावाचा एक राग पण आहे.)
सुनिलटी जर, सुर्ख ह्या शब्दाचा अर्थ लालभडक रंग असेल तर होठ तर कधीच लालभडक नसतात. ते गुलाबी असतात. मला सुर्ख ह्या शब्दाचा अर्थ सुरकुत्या पडलेल्या, कोरडा असा वाटायला.
रंगांच्या छटाबद्दल जी माहिती इथे मिळते आहे ती फार फार गोड वाटते आहे. प्लीज तुमच्याकडे रंगांच्या विविध छटाबद्दल जी काही माहिती असेल ती इथे लिहा.
मला सुर्ख ह्या शब्दाचा अर्थ
मला सुर्ख ह्या शब्दाचा अर्थ सुरकुत्या पडलेल्या, कोरडा असा वाटायला
हा हा हा. एकेकाळी मलादेखिल!!!
लाल रंगाच्या अजून एका गडद छटेला शराबी असा शब्द आहे.
नारंगी हा शब्दही मूळचा पर्शियनच.
बी, माझ्या माहितीप्रमाणे धानी
बी, माझ्या माहितीप्रमाणे धानी म्हणजे पिकत आलेल्या धान्यासारखा रंग.
लाल रंगाच्या अजून एका गडद
लाल रंगाच्या अजून एका गडद छटेला शराबी असा शब्द आहे.<<< पण आपल्याकडे तर हा शब्द वेगळ्याच अर्थाने वापरतात.
सुनिलटी, शराबी म्हणजे दारु
सुनिलटी, शराबी म्हणजे दारु पिणारा असाही होतो ना? आणि दारु प्यायल्या नंतर डोळे लाल होतात त्या डोळ्यांचा रंगाला शराबी आखे असे म्हणतात. हे मी फक्त हिन्दी गाण्यातच ऐकले आहे. शराबी ह्या शब्दात एक नशा आहे खरच!
सुनीलटी म्हणताना सुनीलजी ऐवजी सुनीलटी असा टायपो झाला असे वाटते
माधवजी, पिकत आलेले धान नाही तर कोवळे अंकुर जे नुकतेच उगवले आहे. नवरात्रात म्हणूनच तर धान पेरले असे आपण म्हणतो. बेसिकली अंकुर बोटभर वाढले की जो रंग दिसतो त्याला धानी रंग म्हणतात.
पिवळाधम्मक (इथे म ला म आहे
पिवळाधम्मक (इथे म ला म आहे का?) >> हो, इथे धम्मकच अपेक्षित आहे. धमक या शब्दाचा अर्थ वेगळा आहे.
मला पण सुर्ख म्हणजे सुकलेले, कोरडे असंच वाटत आलंय.
केर्मेझ (qermez) असा लाल
केर्मेझ (qermez) असा लाल रंगाकरता शब्द मला तरी डिक्शनरीत आढळला. गूगलचा अनुवादक वापरलात तर red ला पर्शियन प्रतिशब्द केरमेझ असा येतो. इराणी लोकांना विचारले तरी तेच उत्तर.
फारसी भाषेची ओळख करून देणारा हा व्हिडियो पहा https://www.youtube.com/watch?v=BdLvlyXp2sE
नारंगी हा शब्द फारसीत संत्रे ह्या अर्थी आहे पण तो तसा शब्द संस्कृतमधेही आहे, नारिंग. संस्कृत आणि फार्सी अनेकदा बहिणी भाषा असल्याचे जाणवते. त्यामुळे मूळ शब्द कुठे आधी होता हे सांगणे अवघड आहे.
रंग हा शब्ददेखील मूळ फारसी आहे संस्कृत नाही! संस्कृतमधे वर्ण आहे. रंग आजही फारसी भाषेत त्याच अर्थाने वापरला जातो. उदा. रंगीन कमान फारसीत म्हणजे इंद्रधनुष्य !
सुकलेला ह्या अर्थी खुश्क हा शब्द आहे सुर्ख नाही. इतिहास मराठीतून शिकला असाल तर खुष़्कीचा मार्ग म्हणजे जमिनीवरून जाणारा मार्ग (समुद्रातून बोटीने जाणारा नाही). हा शब्द संस़्कृत शुष्कचा भाऊ आहे.
शराब हा मूळचा अरबी शब्द आहे. शरब म्हणजे पिणे ह्या अर्थी असणारा धातू आहे त्याचे नाम बनले आहे. . रंगाकरता फारसी भाषेत हा शब्द वापरलेला मी पाहिलेला नाही.
फारसीमधे अरबी शब्द अनेक आहेत. भारतीय भाषेतले अनेक अरबी शब्द हे थेट अरबीतून न येता फारसीतून आलेले आहेत.
Turquoise ह्या रंगाला फिरोझा/झी असा फारसी शब्द आहे. हा अरबीतून आलेला असणे शक्य आहे. खात्री नाही. साड्यांच्या रंगाचे वर्णन करताना हा ऐकलेला आहे. ह्या रंगाकरता अन्य मराठी शब्द आहे का?
एल्गारचे मूळ. गार किंवा गर हा
एल्गारचे मूळ. गार किंवा गर हा प्रत्यय फारसी भाषेत काहीतरी करणारा ह्या अर्थाने वापरला जातो. (इंग्रजीतील -er प्रत्ययाप्रमाणे). जसे जादूगार, कारीगर (मराठीत कारागीर), बाजीगर (बाजी म्हणजे खेळ), खिदमतगार इ.
एल्गारचे मूळ रुप यल्गार असावे. यल ह्या शब्दाचा फारसी भाषेत सुटका करणे (liberate) असा काहीसा आढळला. त्यामुळे liberator वा liberation असा काही अर्थ असावा असा अंदाज.
बी, ok शेंन, मस्त माहिती.
बी, ok
शेंन, मस्त माहिती. एल्गारची व्युत्पत्ती अगदीच पटली.
शेंडेनक्षत्र, तुमचे ज्ञान
शेंडेनक्षत्र, तुमचे ज्ञान अफाट आहे शब्दांबद्दलचे. तुम्ही फारसी आणि अरबी भाषा कोठे शिकलात?
हर्टः गैरसमज नसावा. मी ह्या
हर्टः गैरसमज नसावा. मी ह्या भाषा अद्याप शिकलेलो नाही. थोडे थोडे, जमेल तितके शिकणे चालू आहे. उर्दू लिपी वाचता येत असल्यामुळे ह्या भाषा वाचणे थोडे सोपे झाले आहे एवढेच.
रंग और नूर की बारात किसे पेश
रंग और नूर की बारात किसे पेश करुं या गाण्यात पण सुर्ख जोडे की तब ओ ताब मुबारक हो तुझे असे शब्द आहेत . सिनेमा कृष्ण धवल असल्याने मीनाकुमारीने खरोखर लाल कपडे घातलेत की नाहीत ते कळत नाही
तेरे प्यार में दिलदार जो है मेरा हाल\-ए\-इज़ार या गाण्यात पण मीठा मीठा दर्द है, होंठों पे आहें सर्द हैं,
चेहरा भी मेरा ज़र्द है अशी तक्रार आहे
हंगेरीत संत्र्यांना नारांच
हंगेरीत संत्र्यांना नारांच म्हणतात. तो नारिंगी या फारसी (मग पुढे बहुतेक टर्कीत पण असेल हा शब्द) शब्दावरून आला असेल. या नारांच बद्दल एक गंमतशीर माहिती https://en.wikipedia.org/wiki/Magyar_Narancs
छान आहे रंग आणि रंगाच्या छटा
छान आहे रंग आणि रंगाच्या छटा ह्याबद्दलची चर्चा.
चुरुन खाणे, चाखुन खाणे, चोखुन
चुरुन खाणे, चाखुन खाणे, चोखुन खाणे हे शब्द मला माहिती आहेत बोलीभाषेत अनेकदा आपण वापरतो पण चुफुन खाणे हे मी कधी ऐकले नाही. इथे माबोवर अमितवने हा शब्द दोनदा वापरला आहे. जर गुगल करुन हा शब्द शोधला तर दोन्ही वेळा तो फक्त अमितवनीचं लिहिलेला आहे. अजून कुणि हा शब्द कधी ऐकला आहे का - चुफुन खाणे???
https://www.google.com.sg/search?q=%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%AB%E0%A5%81%...
मला 'चुपून खाणे' हा शब्द
मला 'चुपून खाणे' हा शब्द माहितेय. आमच्या इथे कोकणात सर्रास वापरतात. त्याचा अर्थ 'चोखून खाणे' असाच आहे.
मला वाटत अमितवचे अनुभव
मला वाटत अमितवचे अनुभव कोकणातलेचं आहेत.
धन्यवाद निधी.
एल्गार च्या बाबतीत
एल्गार च्या बाबतीत शेन्डेनक्शत्राचे म्हणणे पटले. फिरोजखानच्या चित्रपटाचे नाव 'यल्गार' असेच होते. मात्र सुरेश भट हे उर्दूचे जाणकार असूनही त्यांच्या कवितासंग्रहाचे नाव 'एल्गार ' असे आहे. ह्याचे लॉजिक कळले नाही.
ह्या रंगाकरता अन्य मराठी शब्द
ह्या रंगाकरता अन्य मराठी शब्द आहे का?>> आनंदी किंवा चिंतामणी रंग म्हणतात बर्याचदा. मला त्यापेक्षा फिरोझी हा शब्द आवडतो.
मतिमंद या शब्दाऐवजी अलीकडे
मतिमंद या शब्दाऐवजी अलीकडे गतिमंद असा शब्द वापरण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे त्यात तुच्छता नको म्हणून. मंदमती योग्य असेल, तर मंदगती असाच शब्द वापरावा का?
टर्कॉइज म्हणजे मोरपिशी नव्हे
टर्कॉइज म्हणजे मोरपिशी नव्हे का?
>>> एल्गारचे मूळ. गार किंवा
>>> एल्गारचे मूळ. गार किंवा गर हा प्रत्यय फारसी भाषेत काहीतरी करणारा
मग ते अल् गार (सुरूवात करणारा) असं असेल का?
टर्काॅयज रंग मराठीत पाचुच्या
टर्काॅयज रंग मराठीत पाचुच्या जवळ जातो. फ्लोरीडा पॅनहॅंडल मधले सगळे बीचेस टर्काॅयज आहेत...
Pages