शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुंडीबाई नाव आहे की. आमच्या एका चुलत आत्याच्या जावेचे नाव. आम्ही त्यांना गुंडाज्जी म्हणत असू. इतर लोकं त्यांना गुंडाव्वा म्हणत. दगडीबाई पण नाव ऐकलंय. कळ्ळव्वा पण आमच्याकडे आहेत.
वत्सलाचे जनरली वच्छी आणि मग त्याला जोडून वच्छक्का वगैरे रूपे ऐकली आहेत.
यशोदेचे येशी आणि मग येशामामी, येशाकाकू अशी नावे ऐकली आहेत.
आमच्याकडे येसूबाई असेदेखील नाव होते. या नावांना "बाई" हे जनरली लग्नानंतर वगैरे लागायचे. पण पाळण्यातले नाव येसू, यंकू, गुंडी अशीच असायची. आमच्यकडे कर्नाटकात या नावांना "अव्वा" पण लागायचे. माझ्या आज्जीचे नाव यंकू. तिला यंकव्वा असे तिच्या वयाचे लोक म्हणत. तिच्याहून लहान पण नावाने हाक मारू शकणारे यंकम्मा म्हणत. तिच्याहून वयाने मोठे पण मानाने लहान (उदा. व्याही) तिला यंकूबायर म्हणत.

हीरा,
माझे एक पेशंट जोडपे आहे.
दोघांचेही नाव 'माणिक'
बाई नाही, अम्मा नाही, अप्पा नाही. नुसते माणिक.
मी एकदा त्या काकांना म्हटलंही काय भारी नाव ठेवलंत मुद्दामहून बायकोचं.
तर म्हणाले आमच्या आईवडिलांचं काम आहे.
माणिक हे त्या दोन्ही माणकांचं पाळण्यातलं नावच आहे.
Happy

पुण्यात एक लेखक आहेत. त्यांचं नाव वसंत वसंत लिमये. वसंत यांच्या वडिलांचे नावही वसंत च आहे . आहे की नाही गम्मत

हो. ते मुद्दाम ठेवलेले आहे.
अनिल अवचटांच्या बर्‍याच लेखांत उल्लेख वाचलाय त्यांचा.

पुण्यात एक लेखक आहेत. त्यांचं नाव वसंत वसंत लिमये<<<
पा.नं. ते लेखक नसून पर्सनॅलीटी डेव्हलपमेंट ट्रेनर आहेत.

दासू, ते ट्रेनर तर आहेतच पण त्यांची एक सस्पेन्स थ्रिलर कादंबरी ही प्रसिद्ध झाली आहे गतवर्षी. तिचे नाव विसरलो पण ती बरीच बरी आहे.

>>पुण्यात एक लेखक आहेत. त्यांचं नाव वसंत वसंत लिमये. वसंत यांच्या वडिलांचे नावही वसंत च आहे . आहे की नाही गम्मत<<

इंग्लंड्/अमेरिकेत हे सर्रास आढळतं. मुळात मुलांची नावंच कमी किंवा आपल्यासारखी नांवं ठेवण्यात क्रिएटिविटी नाहि. बापाने आपल्या लेकाचं तेच नांव ठेवलं कि मुल्गा जुनियर हे सफिक्स लावतो; आजोबा/पण्जोबांपासुन तेच नांव चालत आलेलं असेल तर नावाच्या पुढे आकडे लागतात. उदा: बॉब स्मिथ II, III, IV इ.

तर या वरच्या लिमयांनी वसंत लिमये जु. असं लिहायला हरकत नाहि... Happy

R.S.V.P.- आगमननिश्चिती कळवणे. उपस्थिती आगाऊ कळवावी. येणे-न-येणे कळवावे.
याची लघुरूपे रूढ करता येतील. आरेस्वीपी हे सुद्धा तीन फ्रेन्च शब्दांचे लघुरूपच आहे. (Respondez Sil Vous Plait) त्याचा अर्थ 'कृपया उत्तर द्यावे' असा होतो. त्यामुळे 'पत्रोत्तर अपेक्षित' ,'उत्तराच्या प्रतीक्षेत' किंवा 'उत्तर अपेक्षित' असेही लिहिता येईल.

हीरा, राज धन्यवाद!

राज, न येणार्‍यांनी नाही कळवलं तरी चालणार आहे. कार्यक्रम देवळात आहे.

"आगमनाची पूर्वसूचना द्यावी" हे कसं वाटतंय?

R.S.V.P. to >>>> याचं मराठी काय होईल? (एक किंवा दोन शब्द)
R.S.V.P. stands for a French phrase, "répondez, s'il vous plaît," which means "please reply." ...

मराठीत हा शब्दप्रयोग केंव्हापासून आहे.

  1. तुमच्या प्रतिसादाची अपेक्षा
  2. उत्तराची वाट बघत आहे
  3. उत्तराच्या प्रतिक्षेत
  1. ताबडतोब उत्तर कळवणे

असे अनेक प्रकारे तुम्ही लिहू शकता.

R.S.V.P. to >>>> याचं मराठी काय होईल? >> "खादाडणार का सांगा". Happy Wink
"आगमनाची पूर्वसूचना द्यावी" >> योग्य आहे पण थोडे जनरल वाटते. म्हणजे एरवीही कधी येणार्‍या लोकांना हे लागू होईल.
"निमंत्रण-स्वीकृती कळवणे" अचूक होईल. निमंत्रण स्वीकारतो किंवा नाकारतो. पैकी स्वीकृती असेल तर कळवणे एवढेच अपेक्षित आहे ना मग तेवढेच लिहायचे.

'आगमनाची पूर्वसूचना द्यावी' योग्य वाटतंय.

निमंत्रण-स्विकृती कळवणे - शब्द प्रयोग योग्य आहे. पण निमंत्रण नाकारत कोणीच नाही. स्विकार आहे पण येऊ शकत नाही असे असते.

सीमंतिनी, बी, मानव धन्यवाद!

"निमंत्रण-स्वीकृती कळवणे" >>> यावरचं पृथ्वीकरांचं म्हणणं पटलं.

"आगमनाची पूर्वसूचना द्यावी" >> योग्य आहे पण थोडे जनरल वाटते.>>> म्हणजे नक्की काय ते समजलं नाही.

'आगमनाची पूर्वसूचना द्यावी >> हेच घेते आता.

सर्वांना पुन्हा धन्यवाद!

निमंत्रण नाकारत कोणीच नाही. स्विकार आहे पण येऊ शकत नाही असे असते. >> Happy असं मी तरी ऐकले नाही. अर्थात मी मराठीची तज्ञ नाही. निमंत्रणाचा स्वीकार केला म्हणजे ज्याला बोलावले त्याने येणे मान्य केले. निमंत्रण मिळाले/पोहोचले पण ज्याला बोलावले तो येऊ शकत नाही म्हणजे निमंत्रणास नकार दिला.

"येण्याचे ठरले की कळवा" "येणार की नाही ते कळवा." हा सोपे पर्याय का नकोत? अनेक शब्द असले तरी ते वापरातले शब्द आहेत.

आर एस व्ही पी म्हणजे रिस्पॉन्देज सिल्वू प्ले म्हणजे शब्दशः कृपया उत्तर द्या असा असावा. त्यामुळे जो अर्थ वापरात आहे तो शब्दशः अर्थापेक्षा वेगळा आहे. वापराने रुढ झालेला अर्थ आहे. तसा "प्रतिसाद कळवा" अथवा प्रक असे काही लघुरुप मराठीत प्रचलित होऊ शकेल.

मी आत्तापर्यंत या शब्दांचा असा वापर पाहिलाय की दुविधा ही बाहेरची परिस्थिती असते आणि द्विधा ही मनाची अवस्था.

म्हणजे आर्टसला जाऊ की सायन्सला अशी दुविधा निर्माण झाली आणि आर्टस घेऊ की सायन्स याबाबत माझे मन द्विधा झाले.

फार काही फरक नाही.

Pages