Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
टर्कॉईज = माबोवरील यूजरनेम,
टर्कॉईज = माबोवरील यूजरनेम, निवडक १०त नोंदवा, इ. अक्षरांचे, व पाननंबरांखालच्या पट्टीचाही रंग. निळ्या रंगाची एक छटा.
ते राज म्हणतात पाचू, तुम्ही
ते राज म्हणतात पाचू, तुम्ही म्हणता निळा! कायसमजायचं!

मला टर्कॉइज आणि मोरपिशी शेजारी शेजारी ठेवून फरक दाखवा कोणीतरी प्लीज.
यल्गारचा मी लावलेला अर्थ
यल्गारचा मी लावलेला अर्थ चुकीचा आहे असे वाटते आहे. एकतर फारसीत असाच्या असा सापडलेला नाही. उर्दू डिक्शनरीत पाहिला त्यात ग हे अक्षर नाही. ग + नुक्ता असणारे (घैन) ग आणि घ च्या मधले अक्षर आहे. (गरीब, गैर हे शब्द उर्दूत घरीब, घैर असे काहीसे उच्चारले जातात).
त्यामुळे मी केलेला विग्रह यल + गार हा इथे बहुधा लागू होत नाही.
त्याचा अर्थ आक्रमण, हल्ला असा सापडला आहे. लिबरेशन असा नाही.
क्षमस्व.
टर्कॉइझ नावाचे सेमि प्रेशस
टर्कॉइझ नावाचे सेमि प्रेशस जेम्स्टोन्स असतात ते तरी पाचू ( एमराल्ड) किंवा नील मणी ( सॅफायर ) या पेक्षा रंगाने वेगळे असतात .
टर्क्वाइस
टर्क्वाइस
सफायर
सफायर

एमेराल्ड
एमेराल्ड
लाल हा शब्द फारसी भाषेत माणिक
लाल हा शब्द फारसी भाषेत माणिक (गार्नेट वा रुबी) ह्या अर्थी वापरला जातो. हिंदी, उर्दू आणि मराठीत ह्या शब्दाचा अर्थ बदलून त्या रंगाचे नाव बनला आहे.
मागच्या एक दोन पानांवर
मागच्या एक दोन पानांवर (६४-६५-६६) केर्मेझ, जर्द आणि सुर्ख बद्दल चर्चा वाचली. यातल्या 'केर्मेझ'चे मूळ, असे म्हणतात की 'कृमिज' या संस्कृत शब्दात आहे. खूप जुन्या काळी एक प्रकारच्या लाल रंगाच्या किड्यांपासून लल रंग बनवला जाई. म्हणून तो कृमिज.
'सुर्ख'विषयी चर्चा करताना 'सुर्ख आँचल को दबाकर जो निचोडा उसने' ही सुप्रसिद्ध ओल कुणाला कशी आठवली नाही?
तसेच 'जर्द'बाबत 'आ के अब तो चाँदनी भी जर्द हो चली, धडकनों की नर्म आज सर्द हो चली हो चली' हेही नाही आठवले. इथे मला वाटते जर्द म्हणजे गडद. चांदणे गडद होत चाललेय, रात्र चढत चाललीय, आता तरी येऊन भेट.
"सुप्रसिद्ध ओल" टायपो असला
"सुप्रसिद्ध ओल"
टायपो असला तरी अर्थ बरोबर आहे.
'cyberspace' ला मराठी शब्द
'cyberspace' ला मराठी शब्द 'महाजाल' असा इ-कोशामध्ये आहे. याहून वेगळा कोणाला सुचतोय ?
भम, 'सुप्रसिद्ध ओल'!
भम, 'सुप्रसिद्ध ओल'!

"यल्गार" संदर्भात त्याचा अर्थ
"यल्गार" संदर्भात त्याचा अर्थ आक्रमण, हल्ला असाच असणार.
सुप्रसिद्ध "मुघल-ई-आझम" चित्रपटातील एका युद्धदृश्यात सम्राट अकबरचे राजकुमार सलिमसमवेत समोरासमोर युद्ध दाखविले आहे. दोन्ही गट रणांगणावर येतात. युद्धाच्या सुरुवातीस हत्तीवर आरुढ झालेले पृथ्वीराज कपूर आपल्या सैन्याला "यल्गार हो...." अशी घोषणा देताना दाखविले आहे. हल्ला करा असाच त्याचा अर्थ.
(No subject)
एल्गार आणि यल्गार एकच का?
एल्गार आणि यल्गार एकच का?
निचोड निचोड के 'ओल' कम की
निचोड निचोड के 'ओल' कम की क्या?

"एल्गार" नावाची
"एल्गार" नावाची श्री.ना.पेंडसे यांची एक कादंबरी होती. रघू आणि कादर अशा हिंदू-मुसलमान मित्रांची ती कहाणी. पण राजकीय स्वार्थापोटी त्यांची होरपळ होते असे काहीसे कथानक. इथेही पेंडश्यांनी एल्गार चा अर्थ हल्ला, आक्रमण या अर्थानेच घेतला असल्याने मला वाटते एल्गार आणि यल्गार दोन्हीचा अर्थ एकच असणार.
>> मला वाटते जर्द म्हणजे गडद.
>> मला वाटते जर्द म्हणजे गडद. चांदणे गडद होत चाललेय, रात्र चढत चाललीय, आता तरी येऊन भेट.
जर्द हा मूळ फारसी शब्द आहे ज्याचा अर्थ पिवळा असा आहे. उदा. जर्दाळू. मूळ फारसी जर्द + आलू. आलू हे प्लम किंवा पीचला म्हणतात. आपण गूगल ट्रान्स्लेट वापरलेत तर स्वतः बघू शकता की पिवळ्याला फारसीत काय म्हणतात. इराणच्या फारसीत त्याचा उच्चार झॅर्ड असा काहीसा होतो पण तोच शब्द आहे.
मराठीने हा शब्द घेतला तेव्हा त्याचा अर्थ थोडा बदलला असेलही. पण उर्दूत तसे नाही. चांदणे पांढरे होते ते पिवळे पडत आहे, अर्थात चंद्र मावळायला आला आहे असा अर्थ असेल.
केर्मेझ हा शब्द कृमीशी
केर्मेझ हा शब्द कृमीशी संबंधित असणे शक्य आहे. गंमत म्हणजे फारसीत कृमी करता केर्म असा कृमीशी मिळताजुळता शब्द आहे.
जात हा जन्माशी संबंधित शब्द (उदा जन्मजात, नवजात इत्यादि) ह्याच्याशी मिळताजुळता शब्द जाद हा फार्सीत आहे ( शाहजादा/दी (राजाचा पुत्र/कन्या), हरामजादा (पापाचा पुत्र /बास्टर्ड)).
संस्कृत आणि फारसी ह्या बहिणी असल्याची वेळोवेळी प्रचिती येत असते.
पेन्डषयांच्या कादंबरीवरूनच
पेन्डषयांच्या कादंबरीवरूनच विचारले. माझ्या वडिलांच्या मते पेंडषयांनी तो उदघोश अथवा आक्रोष या अर्थाने वापरला आहे. तुम्ही दिलेला वरचा अर्थ त्याप्रमाणेच आहे असे दिसते
'cyberspace' ला मराठी शब्द
'cyberspace' ला मराठी शब्द 'महाजाल' असा इ-कोशामध्ये आहे. याहून वेगळा कोणाला सुचतोय ?
<<
छद्मदुनिया किंवा स्वप्ननगरी कसा वाटतोय? महाजाल = इंटरनेट/वर्ल्ड वाईड वेब.
"इथे मला वाटते जर्द म्हणजे
"इथे मला वाटते जर्द म्हणजे गडद. रात्र चढत चालली आहे, चांदणे गडद होत आहे..."
फक्त या ओळीच्या संदर्भात कदाचित जर्द हा शब्द गडद या अर्थाने वापरला असावा की काय असे वाटले. बाकी फारसीत जर्द म्हणजे पिवळा हे बहुतेकांना ठाउक असेल. त्या साठी गूगलची जरूर नसावी.
काळाशार, हिरवागार, पिवळाजर्द, निळाजर्द/गर्द/शार, गर्द हिरवा yaatale garda, jarda, shaar, gaar,हे प्रत्यय आपण मराठीत रंगाचा गडदपणा दाखवण्यासाठी वापरतो. तसे हिंदीतही एखादवेळी होत असावे की काय असे वाटले. पण 'चंद्र मावळायला आलाय, चांदणे पिवळट होऊ लागलेय' हेही योग्यच वाटते.
धन्यवाद.
छद्मदुनिया किंवा स्वप्ननगरी
छद्मदुनिया किंवा स्वप्ननगरी कसा वाटतोय? महाजाल = इंटरनेट/वर्ल्ड वाईड वेब.>>
Internet = आंतरजाल , www. = संकेत स्थळ असे वाटते.
हे जालावर सापडले Let’s learn
हे जालावर सापडले
Let’s learn some of them now.
Red = /ghermez/.
Ghermez
Yellow = /zærd/.
Blue = /a:bi:/.
Aabi
Green = /sæbz/.
Sabz
White = /sefid/.
Sefid
Black = /siya:h/.
Siyah
Or /meshki:/.
Meshki
Purple = /bænæfsh/.
Banafsh
Now lets’ see some examples:
A red flower = /gol-e- ghermez/.
A yellow car = /ma:shin-e- zærd/.
A blue door = /dær-e- a:bi:/.
A green tree = /derækht-e- sæbz/.
A white cat = /gorbeh ye sefid/.
A black dog = /sæg-e- siya:h/. Or
सैराट चित्रपटात, जेव्हा आर्ची
सैराट चित्रपटात, जेव्हा आर्ची पळून गेली असे कळते तेव्हा आर्चीचा भाऊ प्रिन्स परश्याच्या घरी येतो नि त्याच्या वडिलांना विचारतो की "तुझं आळपणं कुठाय?"
यात आळपणं या शब्दाचा अर्थ काय आहे? हा नक्की शब्द आळपणं आहे की आळतणं आहे?
मूळ शब्द 'आळंपणं आहे ( ळं,णं
मूळ शब्द 'आळंपणं आहे ( ळं,णं वरचा अनुस्वार उच्चारित नाही , त्याचं मधल्यासारखं दीर्घोच्चार आहे)
आळंपणं म्हणजे शेळीचं दूध पिल्लांनी पिऊ नये म्हणून तिच्या प्रत्येक सडांभोवती ओले फडके गुंडाळून ते 'सील करणे . जसे आपण पाण्याच्या बाटलीला गार राहण्यासाठी फडके गुंडाळतो किंवा चिलमीला फडके गुंडाळतो तसे. त्या फडक्याला आळापणं म्हणतात. थोडक्यात तुझी 'अॅटचमेन्ट 'अथवा शेपूट कुठे आहे. जसे तुझं 'सामान 'कुठे आहे असे म्हटले जाते तसे गर्लफ्रेंड हा सभ्य शब्द न वापरता खेड्यातल्या मुलांच्यात बोलले जाते तसे जरा तुच्छतेच्या अंगाने जाणारे विशेषण आहे असे समजा
धन्यवाद अजय!!
धन्यवाद अजय!!
अय्यो.असं आहे होय.मी 'कहां है
अय्यो.असं आहे होय.मी 'कहां है तुम्हारी वो नाजायज नामाकूल औलाद' असा काहीसा अर्थ लावत होते.
हिरा छान माहिती. ज्या ओळी
हिरा छान माहिती. ज्या ओळी आठवायला हव्या होत्या असे तुला वाटते त्या मुळात माहितीचं नव्हत्या तर कशा आठवणार
पेन्डषयांच्या कादंबरीवरूनच
पेन्डषयांच्या कादंबरीवरूनच विचारले. माझ्या वडिलांच्या मते पेंडषयांनी तो
>>
टण्याबापूंना पेंडश्यां च्या/नी लिहिण्यात काय अडचण असावी बरे? एखादा लेखक आवडत नसेल तर सूड घेण्याची ही पद्धत बरी नव्हे
Pages