Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
सराई म्हणजे धर्मशाळा
सराई म्हणजे धर्मशाळा /थोड्यावेळेकरताचा निवारा देणारी जागा बरोबर.>>>
मुगलसराय ह्या ठीकाणाचे नाव अश्या प्रकारे पडले असेल का?
मॅक्स, हो. अगदी शब्दशः
मॅक्स, हो.
अगदी शब्दशः मुघलांच्या रात्रीच्या निवार्याची जागा (ईन) असा अर्थ आहे.
गुगललं तर इंडियन रेलच्या साईटवर हे मिळालं.
During Mughal Raj India Days, various Mughal People used to travel from East/South-East India towards North India via the Grand Trunk Road built by Mughal Ruler Sher Shah Suri. Since that road was from Decca(now Dhaka) to Peshawar, it's route was via Calcutta-Mirzapur-Cawnpore-Delhi-Umbala-Amritsar-L ahore. Most of these Mughal Caravans used to stop at a particular place between Chanduali Majwr and Jeonathpur. Being a place also having direct access towards Benaras in Vyasnagar Direction, it was used as an Inn (Sarai as in Hindi) for Overnight Stay by these caravans. Thus, the local people over there named that place as Mughalsarai.
अमितव, ब्रेस्ट फीडींग हा शब्दच बरोबर आहे.
कसा ते इथं काकांनी समजावलेले आहे.
साती, मलाही ब्रेस्ट फीडिंग
साती,
मलाही ब्रेस्ट फीडिंग जसं बरोबर आहे तसच स्तनपान ही बरोबर आहे. त्याचं स्तन्यपान करायची गरज नाही हेच म्हणायचं आहे. आणि स्तनपान हा ब्रेस्ट फीडिंग वरून सही सही उचललेला शब्द आहे असही आडून म्हणायचं आहे. त्यासाठी विंक पण केलंय की.
'सुटवंग' म्हणजे काय
'सुटवंग' म्हणजे काय ?
...मोकळाढाकळा वागणारा?
सुटसुटीत ?
सुट्वंग हा शब्द मी लिबरेटेड
सुट्वंग हा शब्द मी लिबरेटेड याअर्थी वाचलाय.
सुटवांग हा शब्द लहान
सुटवांग हा शब्द लहान मुलांबद्दल ऐकलाय. सुटवांग मुल म्हणजे स्वतः चालू फिरु शकणारे मुल असं.
जंगलात काथ गोळा करणारे ते
जंगलात काथ गोळा करणारे ते कातकरी असं नाव पडलंय ना ? पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यात वगैरे आहेत कातकरी. देशातल्या सगळ्यात मागास आदिवासी जमातींमध्ये समावेश आहे त्यांचा. (मला वाटतं पश्चिम घाटात बर्याच ठिकाणी आहेत.) भिल्ल वेगळे. ते सातपुड्यातले.
गौरी, हो!
गौरी, हो!
'स्तनपान' या शब्दाबद्दल - हा
'स्तनपान' या शब्दाबद्दल -
हा मध्यमपदलोपी असावा काय?
स्तनातील दुधाचे पान= स्तनपान.
चैतन्य, मध्यमपदलोपी समास
चैतन्य,

मध्यमपदलोपी समास किंवा लुप्तपद कर्मधारय समास ही शक्यता बरिच जास्त योग्य वाटतेय.
धन्यवाद!
हुश्श! असं वाटलं.
" मय किंवा मेय " याचा अर्थ मळ
" मय किंवा मेय " याचा अर्थ मळ असा होतो. जो अमेय किंवा अनामेय आहे त्यात मळ नाही , म्हणजेच तो सात्विक आहे, सत्व गुणी आहे . म्हणून अनामय म्हणजे सात्विक असा अर्थ होतो. तसाच निरामय हा शब्दहि त्याच अर्थाचा आहे. तसेच निरंजन म्हणजे ज्यात अंजन नाही म्हणजे काजळी नाही , जो
स्वच्छ आहे.
अंजना / अंजनी असे नाव असते.
अंजना / अंजनी असे नाव असते. त्याचा अर्थ काय?
आपटे शब्दकोश आमयः [āmayḥ],
आपटे शब्दकोश
आमयः [āmayḥ], [आ-मी करणे अच्; Tv.; said to be fr. अम् also the word may also be derived as आमेन अय्यते इति आमयः]
Disease, sickness, distemper; दुःखशोकामयप्रदाः Bg.17.9; दर्पामयः Mv.4.22; आमयस्तु रतिरागसंभवः R.19.48; समौ हि शिष्टैराम्नातौ वर्त्स्यन्तावामयः स च Śi.2.1.
Damage, hurt, distruction; देवानामिव सैन्यानि सङ्ग्रामे तारकामये Rām.6.4.54.
Monier-Williams
आमय m. sickness , disease S3Br. Ka1tyS3r. Ya1jn5. R. etc.
आमय m. indigestion L.
म्हणून निरामय म्हणजे निर्मळ नाही तर निरोगी.
मी तरी अमेय शब्दाचा अर्थ न
मी तरी अमेय शब्दाचा अर्थ न मोजता येण्याजोगा असा ऐकला होता
उत्पत्ती आठवत नाही.
पण मेय म्हणजे मोजण्यासारखे , अमेय म्हणजे न मोजता येण्याइतके . असे ऐकले होते.
गणपतीच्या संदर्भात न मोजता येण्यासारखी (अमर्याद ) बुद्धी असलेला असे विवेचन वाचल्याचे आठवते.
कुठे वाचले आठवत नाही.
साती, मेय [mēya], a.
साती,
मेय [mēya], a. [मा-मि-वा यत्]
Measured.
Capable of being estimated; तथा धरिममेयानां शतादभ्यधिके वधः Ms. 8.321.
Discernible, capable of being known (ज्ञेय).
< आपटे शब्दकोश
तसेच, मय हा शब्द मळ शब्दाचा अपभ्रंश म्हणून मराठीच्या बोली भाषांत आढळत असेलही, परंतू वर दिलेल्या संदर्भात संस्कृत शोधू जाता
>>
मय [maya], a. (-यी f.) An affix used to indicate 'made of', 'consisting or composed of', 'full of'; कनकमय, काष्ठमय, तेजोमय, जलमय &c.
यः N. of a demon, the architect of the demons. (He built the 'three cities' for the demons; cf. त्रिपुर. He is also said to have built a splendid hall for the Pāṇḍavas); सानन्दं देवताभिर्मयपुरदहने धूर्जटिः पातु युष्मान् Ve.1.3.
A horse.
A camel.
A mule. -या Medical treatment. -यी A mare.
मय [maya] यु [yu] ष्टः [ṣṭḥ] ष्टकः [ṣṭakḥ], (यु) ष्टः ष्टकः A kind of bean.
<<
हे असे अर्थ दिसतात.
>> अंजना / अंजनी असे नाव
>> अंजना / अंजनी असे नाव असते. त्याचा अर्थ काय?
मारूतीसारख्या शक्तीमान, लॉयल पुत्राला जन्म देऊ शकणारी आई?
वाव! म्हणजे मी ऐकलेला अर्थ
वाव!

म्हणजे मी ऐकलेला अर्थ सार्थ बरोबर आहे.
हे सप्रमाण सिद्ध झाले.
धन्यवाद झाडू!
हरतालिका चा अर्थ काय ? १. हर
हरतालिका चा अर्थ काय ?
१. हर म्हणजे शंकर आणि तालिका ?
२ हरत आलिका ...... सखीने हरत ...अपहरत .... तप करण्यासाठी वनात पळवून नेलेली असे काही ?
"अघहरणा' / "अघनाशना' म्हणजे
"अघहरणा' / "अघनाशना' म्हणजे काय?
"भवतारक या तुझ्या पादुका, वन्दिन मी माथा".... या भजनात असा उल्लेख आहे.
अघ = संकट अघहरणा = संकटाचे
अघ = संकट
अघहरणा = संकटाचे हरण करणारा
'गणेशकुसुम' म्हणजे जास्वंद
'गणेशकुसुम' म्हणजे जास्वंद का?
एक लालचुटूक फुले येणारी
एक लालचुटूक फुले येणारी गणेशवेल नावाची वेल असते. गणेशकुसुम म्हणजे या वेलीची फुले असाही अर्थ होऊ शकतो का?
अघ = संकट अघहरणा = संकटाचे
अघ = संकट
अघहरणा = संकटाचे हरण करणारा<< धन्यवाद माधवजी!
'Countdown begins' चे
'Countdown begins' चे बातम्यांमध्ये 'उलटी गणती सुरू' असे ऐकले. ते कानाला छान वाटत नाही.
समर्पक भाषांतर सुचवा.
जी.ए.कुलकर्णी यानी एका कथेत
जी.ए.कुलकर्णी यानी एका कथेत असा उल्लेख केला आहे....आईच्या संदर्भात ~
".... मी एकदा अतिशय आजारी पडलो. डॉक्टरला आणावयास तर आईजवळ पैसा नाही. तिच्याजवळ तर काय असणार ? अवघे दोनतीन दागिने. माझी बाळलेणी व तिच्या तांदळ्या. अखेरीस तिने माझ्याकरता त्या बाळलेण्यास हात न लावता त्या तांदळ्या विकल्या व डॉक्टरला आणले."
"तांदळ्या" हा अनेकवचनी दागिना कसला ? किंवा तांदळ्याचा अर्थ नेमका काय होतो ?
http://www.loksatta.com/lokpr
http://www.loksatta.com/lokprabha/gold-and-ornaments-special-4-1000449/
@भरत, 'आपले मराठी अलंकार’ फार
@भरत, 'आपले मराठी अलंकार’ फार सुंदर आणि माहितीपूर्ण लिंक दिलीत. आभार!
धन्यवाद भरत....पाहिला
धन्यवाद भरत....पाहिला "तांदळ्या". लिंक वाचताना (आणि पाहताना) अनेक प्रकार समजले या निमित्ताने.
भरत, धन्यवाद!! ह्यातले बरेच
भरत, धन्यवाद!! ह्यातले बरेच नांव ऐकून माहिती होते आईच्या, मावशीच्या तोंडी असायचे.. पण कसे ते चित्र पाहायला मिळाले...
Thanda faral shabdacha artha
Thanda faral shabdacha artha kay? Marathi shabd aahe ka?
Pages