रानभाज्या

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2010 - 19:35

अ‍ॅडमिनचे प्रथम खुप खुप धन्यवाद. त्यांनी ह्या सगळ्या भाज्या एका जागी आणल्या.

मन्चा अरबकंद कसा असतो मलाही माहीत नाही. तुझ्याकडे फोटो असल्यास दाखव.

प्रिय जागु,
मनापासुन धन्यवाद, मि द्खुप दिवस रानभाज्या चा शोध घेत होते. महित आहेन पन ओल्खु शकत नव्हते.
तु दिलेल्य महिति मुले मला खुपच मद्त झलि. मि जरुर बनवुन बघेन . Thank you for the pictures of vegetables. Now i can identify and try to prepare them.

megh

जागू, तूमच्याकडे आघाडा असतो का ? त्यांच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. आदीवासींना तो माहीत असतोच. दात घासायला त्यांच्या काड्या वापरतात. त्याला जे तूरे येतात, त्यातले दाणे, पण खातात.
श्रावणात, मंगळागौर, जिवती आणि मग हरितालिका, गणपती च्या पूजेत आघाडा लागतो.

आज भाजीवालीकडून मी 'घोळू' ची भाजी आणलीय.

अगदी बारीक हिरवी पानं आहेत नाजूक नाजूक. आणि देठ लाल रंगाचे.

याची भाजी कशी करायची ?

ही भाजी स्वच्छ करून, शक्य तितकी बारीक चिरायची. मग मुगडाळ किंवा तूरडाळी बरोबर हळद हिंग मीठ घालून शिजवायची. मग लाल मिरची आणि लसूण यांची फोडणी द्यायची. हि भाजी थोडी चिकट आणि आंबट असते. बेसन पेरुन पण करता येते. बाकीच्या कृति पण आहेत इथे. (घोळ, राजघोळ या नावाने असतील.)

ज्याला तुम्ही घोळू म्हणत आहात त्याला आम्ही चिवळी म्हणतो, सासुबाई त्याचे मेथीच्या पिठल्यासारखे मोकळे पिठले करतात.. घोळ नावाची आणखी एक भाजी आहे..

आम्ही घोळ म्हणतो. मला अजुन मिळाली नव्हती म्हणुन ती नाही ह्या सिरिजमध्ये.

दिनेशदा आहो आमच्याकडे आघाडा अगदी भरपुर आहे. पण त्याची भाजी करतात हे मला माहीत नव्हत. अम्ही जिवतीच्या फोटोला आघाड्याच्या पानांची माळ घालतो. भाजी कशी करतात ?

धूळ्याला एका ठिकाणी कुळधर्माच्या जेवणात एक वेगळीच रानभाजी खाण्यात आली- "शिन्दडी".
ही साधारणतः तोंडल्या सारखी दिसणरी फळभाजी असते आणि पावसाळ्यातच मिळते. धूळ्याकडचे लोक शिन्दडीची फळे फोडी करून दही-मीठ लावून ऊन्हात कडक वाळवून ठेवतात आणि वर्षभर तळून खातात. विशेषतः कुळधर्माच्या जेवणात अगदी मस्ट असते.
धूळ्याकडचे लोक कुणी माबो वर "शिन्दडी" ची माहिती पोस्ट करा...प्रकाशचित्रांसहित....!

माठ, तांदूळका, करडी, अंबाडी अश्या भाज्या आमच्या लहानपणी मुबलक असत, पण कुठे दिसतच नाही आताशा...

इथे उत्तर द्यायचे राहिलेच. आघाड्याच्या पानांची भाजी इतर भाज्यांसारखीच म्हणजे फ़क्त
कांदा मिरची घालूनच करायची.
आणि रानभाज्या हे छोटेसे पुस्तक मला दादरला मिळाले होते, पण त्यातही सर्व भाज्या
नाहीतच. गोइण मधे, अनेक भाज्यांचा उल्लेख आहे पण त्याचा फ़ोटो आणि कृती नाही.

स्वामि. घोळीत पण साधी घोळ आणि राज घोळ असे दोन प्रकार आहेत.

गिरिश, स्वामी आमच्याकडे माठ अजुनही मुबलक प्रमाणात मिळतो. आणि काही भाजीवाल्यांकडे करडई, आंबाडी ह्या भाज्याही मिळतात. घोळ क्वचीतच दिसते. शिन्दडीचा खरच कोणीतरी फोटो टाका.

दिनेशदा आघाड्यांना आता तुरे येउन ते सुकायला लागलेत.

जागु आज उरणच्या एस्टीमधुन ऑफिसला येत होते. एक बाई भाजीचे टोपले घेऊन पुढेच बसलेली एस्टीत. मोठ्या शेंगा बघितल्यावर तिला विचारले, कसल्या बाई शेंगा. ती म्हणाली अबईच्या. मी घेणार होते पण नेमके माझा थांबा येतायेताच माझी नजर गेली होती त्या बाईच्या शेंगांवर. डरायवर काका थोडेच थांबणार माझ्यासाठी Happy

जागु आज उरणच्या एस्टीमधुन ऑफिसला येत होते.
अगदी भेट झाल्यासारख वाटल ग. अजुन येतायत अबईच्या शेंगा परत ती बाई दिसली की घे लगेच.

चिवळी ही वेल वर्गिय भाजी आहे, पाने अगदी छोटी छोटी असतात आणि देठांचे जाळे, त्यामुळे ही भाजी स्वच्छ करणं आणि निवडणं महाकठीण काम ! खान्देशात तूरीच्या वाटल्या डाळीत चिवळी घालून "फुनकें" करतात. त्याची पाकृ कोणी पोस्टेल का?

चिवळी मुंबईमधे कधी नाही मिळाली पण पुण्यात मात्र मिळते. खास करुन उन्हाळ्यात ही भाजी खातात, थंड असते म्हणुन. आम्ही पिठ पेरुन करतो.
पुण्यात अजुन तरी घोळ भाजी मिळाली नाही.

चाईत हि भाजी फक्त डोंगरातच मिळते मुळशी,मावळ,भोर या डोंगर रांगांत हमखास मिळते,
ओळखन्याची सोपी पध्दत, चाईतचे वेल फक्त डावीकडुन ऊजवीकडे झाडावर गेलेले असतात,
बाकी कोनतेच वेल डावीकडुन ऊजवीकडे जात नाहीत.