रानभाजी - आंबट वेल

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 June, 2010 - 04:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आंबट वेल
आमटीचे साहित्य किंवा
कालवणाचे साहित्य

क्रमवार पाककृती: 

कोणत्याही आमटी, आंबट वरण किंवा मच्छीच्या कालवणामध्ये ही आंबटवेल आंबटपणासाठी टाकतात. ह्या वेलीचे वरचे साल काढुन छोटे छोटे तुकडे करुन कालवणात किंवा आमटीत घालावेत.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
अधिक टिपा: 

एक वेलही एका वेळेसाठी पुरते. ही वेल जुलै च्या एंड पर्यंत येते बाजारात.

माहितीचा स्रोत: 
सा.बा
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू. मी तुझी सीरीज वाचते नेहमी. या भाज्या कधीच पाहिल्या नाहीत. तुझ्यामुळे त्या दिसतात.
धन्यवाद.

खरच जागु. खुप छान आहे तुझी ही मालिका.

या सगळ्या भाज्या मी कधी पाहिल्यापण नव्हत्या, त्या तुझ्यामुळे समजल्या.

जागु तु उरणला आहेस म्हणुन तुला या भाज्या पाहायला आणि खायला मिळतात.. माझ्याकडे सगळ्या नाहीत पण काही भाज्या तरी मिळतील अशी आशा करते.. मिळाल्या तर नक्कीच घेईन विकत..

मुंबईत अशा खास भाज्या, दादर, बोरीवली, ठाणे, डोंबीवली ला मिळतात.
ज्यावेळी परळ लालबाग ला मराठी वस्ती होती, त्यावेळी तिथेही मिळायच्या.

अशा प्रकारचा वेल शनिवारी बाजारात विकायला होता, पण त्या भाजीवालीने ती मायाळूची भाजी आहे असे सांगितले.

एक वर्ष कळव्यात राहण्याचा योग आला होता. तिथेही बर्याच पावसाळी भाज्या मिळतात. त्याहि ताज्या आणि वाजवी दराने. तिथे असताना कुळू, कोरळ, टाकळा, सातपुती , कंटोळी इ. भाज्या खुप खाल्ल्या.