
२-३ भारंगीच्या जुड्या (पाने खुडून, धुवून, चिरून)
२ मोठे कांदे
चणा डाळ पाव वाटी भिजवून
५-६ लसुण पाकळ्या
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
२-३ मिरच्या
चवी पुरते मिठ
अर्धा चमचा साखर
पाव वाटी खवलेला ओला नारळ
२ मोठे चमचे तेल
भारंगीचा चिरलेला पाला पाणी घालून उकडत ठेवावा उकळी आली की पाच मिनीटांनी गॅस बंद करुन त्यातील पाणी काढून हा पाला पिळून घ्यायचा. मग तेलावर लसुण, मिरची, हिंग, ची फोडणी देउन कांदा घालावा व हळद घालून चणाडाळ व भारंगीचा पाला घालावा. झाकण देउन थोडावेळ शिजवावे. चणाडाळ शिजत आली की त्यात मिठ व साखर घालून थोडावेळ शिजू द्यावे. डाळ शिजली की त्यात खोबर घालून गॅस बंद करावा.
कुरडूची भाजी - http://www.maayboli.com/node/9313
कंटोळी - http://www.maayboli.com/node/9329
टाकळा - http://www.maayboli.com/node/9351
ह्या भाजीत एक दिवस भिजत घातलेले वाल साल न काढता घालूनही भाजी करता येते तसेच चणा डाळ ऐवजी मुगडाळ, तुरडाळ, उडीदडाळ घालता येते. नॉनव्हेजमध्ये सुकट व ओल्या करंदीतही (छोटी कोलंबी) घालता येते.
भारंगीची
भारंगीची भाजी

तु
तु दिलेल्या भाज्या खरंच मस्त आहेत. बाजारात शोधायला हव्यात. नेरुळला कातकरणी येत नाहीत ना
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
साधना पण
साधना पण ह्या भाज्या कातकरणीकडेच मिळतात , जागु रेसीपी छान आहे , करून बघेन फोटो टाकल्याबद्द्ल धन्यवाद
****************************************
सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वाथ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
जागु-
जागु- तुमच्या सर्व कृती नेमाने वाचतेय. भाज्या कधी मिळाल्या तर जरुर करुन पाहीन.
जागू, आमचे
जागू, आमचे नशीब नाही ना असल्या भाज्यी इथे मिळण्याचे. वाशीची एक ओळखीची भाजीवाली अश्या भाज्या घरी आणून द्यायची. लहानपणी यायची ही बाई तेव्हा भिती वाटायची तिच्या केसाचा लांब पर्यन्त एकत्र झलेला कसला तरी जुडगा(कधीच न विंचरलेले केसाचा गुंता होतो तसा). डोक्यावर आडवे कुंकू. असो.
कितीतरी
कितीतरी दिवसांनी भारंगीचं नाव ऐकलं!
ही पण शेपूसारखीच उग्र वासा/चवीमुळे सर्वांनाच आवडते असं नाही.
पावसाळ्यातच येते मला वाटतं, आणि तेव्हा पोटाला चांगली म्हणून खावी असं आई सांगत असे.
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism!
स्वाती ताई
स्वाती ताई खर आहे ही भाजी पोटाला चांगली असते. आणि ह्याला थोडा कडवटपणा असतो पण जर मी वर केल्याप्रमाणे भाजी केली तर ती कडवट नाही लागत.
काल सुधागड-पालीला गेले होते.
काल सुधागड-पालीला गेले होते. तिथे भारंगीची भाजी मिळाली. या आधी कधी केलेली नाही, म्हणून एकच जुडी घेतली.
तुम्ही सान्गितल्याप्रमाणे भाजी केली. फारच छान झाली. अजिबात कडवट झाली नाही.
मधु धन्स
मधु धन्स
कोकणात असताना खाल्लेय. पण आता
कोकणात असताना खाल्लेय. पण आता चवही आठवत नाही.

याच्या फुलांची पण भाजी करतात ना?
भारांगी ची फुले काढून ,स्वच्छ
भारांगी ची फुले काढून ,स्वच्छ धुवून, घ्याची..
# भाजणी मध्ये तिखट मीठ हिंग हळद आणि ही फुले मिक्स करावी...न ज्याप्रमाणे आपण मोकळी भाजणी करतो,त्याप्रमनेच तेलावर परतून परतून भाजी करावी...
## पोटाच्या सर्व प्रकारच्या विकारावर ही भाजी अत्यंत उपयोगी..
## वर्षातून एकदा भाजी जरूर खावी...