रानभाज्या - १०) वाघेटी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 June, 2010 - 01:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वाघेटीची फळे
वालाचे बिरडे किंवा चणाडाळ किंवा पाढरे वाटाणे.

क्रमवार पाककृती: 

वाघेटीची फळे असतात. त्याचे साल काढुन व आतील बिया काढून फोडी करुन त्या बिरड्यात किंवा पाढर्‍या वाटाण्यात बटाट्या प्रमाणे टाकतात.
तसेच दिनेशदांच्या माहीती प्रमाणे. ह्याची भाजी चणाडाळ घालून किंवा तोंडलीच्या भाजी प्रमाणे करतात. ही फळे थोडी कडवट असतात.

अधिक टिपा: 

जाणकारांनी अजुन माहीती द्यावी वाघेटीवर.

माहितीचा स्रोत: 
कातकरीण व दिनेशदांनी दिलेली माहीती
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी आई क्वचित ही भाजी बनवत असे, आम्हाला खुप आवडायची.

एकदा वाघेटी आणली होती.... पण त्याची भाजी केल्यावर ती जांभळ्या रंगाची झाली. Sad कदाचित ती वाघेटी नसावीत.

त्यामुळे आम्ही परत कधीच आणली नाहित.

म्हणून मला वाटते की, जाणकाराच्या मदतीशिवाय ही फळे खरेदी करू नयेत.

जागू ,
खूप वर्षांनी हि भाजी बघितली.
अमिने लिहिल्याप्रमाणे जाणकारांशिवाय या भाज्या कुणाला ओळखता येत नाहीत.

विदर्भात, ही फळे फार प्रसिद्ध आहेत. आम्ही वाघाटे या नावानी ओळखतो. या भाजीचा मान खास महाशिवरात्रीला असतो. श्रावणात ही फळे विकायला येतात. चव कडू असते या फळांची. महाशिवरात्रीचा उपास या फळांची भाजी करुन त्यावर सोडतात.

जागू, अशा सगळ्या माबोकरांना जंगल सर्व्हायवल टिप्स देशील तर माबोकरं सर्व्हाईव्ह होतील पण जंगलांच काय ? Wink

वाघेटी शिजवायला थोडे त्रासदायक असतात.. वाघेटी फोडुन बिया मिठ लाऊन काढणे.. कुकर मधे थोडेसे मिठ टाकून एक शिट्टी होऊ द्यावी.. यामुळे भाजीचा कडवटपणा कमी होईल.. कांदा, लसूण, शेंगदाण्याचा कूट , थोडा काळा मसाला, थोडा गरम मसाला, लाल तिखट, धने जिरे पावडर, चवीनुसार मिठ टाकावे.. आवडीनुसार साखर टाकू शकता..

माझ्या आईच्या आठवणीत हि भाजी फक्त परतून करतात. इथे नवनवीन प्रकार दिसताहेत. बी ची कृति पण आली पाहिजे. (मुंबईला, दादरच्या फूलमार्केट जवळ, स्टेशनच्या जवळ ज्या बायका बसतात, त्यांच्याकडे, वाघेटी, बेलफळे, धोतर्‍याची फळे, अशी खास शंकराच्या पूजेला लागणारी फळे मिळतात.)

माझ्या सासूबाई वरवंट्याने वाघेटी फोडतात.. त्यातल्या बिया काढताना थोडेसे मीठ लाऊन काढतात.. भोकराच्या काढतो ना तश्याच..

दिनेशदा, वाघेटी शंकराच्या पुजेसाठी वापरतात हे प्रथमच ऐकल, धन्स माहीती बद्दल.
मन्चा खरच वरवंट्यानेच फोडायला पाहीजेत. मी सुरीने काढल्या होत्या बिया खुप त्रास पडला तेंव्हा.

रानवाघाटी आणि बाग वाघाटी त्यालाच गोविंद फळ असही म्हणतात. क्षयरोगावर अप्रतीम औषध. भाजी एकादशीला आणि महाशिवरात्रीला मुद्दाम खातात.

भाजी एकादशीला आणि महाशिवरात्रीला मुद्दाम खातात. एका नाही द्वादशी ! आणि महाशिवरात्री उद्यापण !

ही भाजी कडू असुनदेखील खायला चांगली लागते. ईथे कोकनातसुद्धा याच्या वेली आढळतात मात्र फारच दुर्मिळ, त्यामुळे इथल्या बहुतांशी लोकांनासुद्धा ही भाजी माहीत नाही. एकदा या वेलींना फळे लागली कि याची पाने आणि रंग आजूबाजूच्या वातावरणाशी इतके समरूप असतात कि ते ओळखणे महाकठीण. परंतु डिसेंबर महिन्यात ज्या वेळी या वेलींना फुले लागतात त्यावेळी त्या फुलांच्या विशिष्ट रंग-रुपामुळे ही वेल सहज ओळखता येते.

https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-vaghoti-usefull-stomach...

आमच्या गावी आमच्या शेताच्या बांधावरच्या रामफळीवर याचा वेल आहे. आमच्याकडे याला वाघाटे म्हणतात. याचं पातळ कालवण फार झक्कास बनवते माझी काकी. कडु असतं थोडं फार पण त्यात घातलेल्या कांदा-लसूण चटणी अन चिंचेमुळे आजीबात तसं वाटत नाही. ही भाजी औषधी असते असं म्हणतात. आषाढी एकादशीला वाघाटे बाजारात दिसतात..