कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोर्डच्या कॉम्पॅक्ट एसयुव्हीचं इंजिन १००० CC आहे.. एसयुव्हीच्या मानाने हे इंजिन छोटे वाटत नाही का??

केदार अभिनंदन..

अभिनंदन केदार ! महिंद्राची जबरदस्त एक्स यु व्ही घेतल्याबद्दल.
रिव्ह्यू येऊ दे लवकरच. कलर कुठला- मिलिटरी ग्रीन का? Happy

--------------------------------------

हुंदई ईऑन घेतली का कोणी इकडे?

---------------------------------------

बजाज आरई ६० ही रिक्षाच आहे. २०० सीसी, दरवाजे, छप्पर वगैरे फीचर्स असलेली रिक्षा. Happy
पण बजाज + निस्सानची ची ८०० सीसी स्मॉल कार येणार आहे बहुधा.

ज्ञानेश कलर पांढरा घेतला. पांढर्‍यात मस्त दिसतो चिता. अर्थात पर्पल मध्ये पण. Happy मिल्ट्री ग्रिन मध्ये बुलेट घेणार. Happy रिव्हू लिहतो लवकरच.

रिमा गाडी मस्त. अतिशय सुंदर.

XUV ला ड्युअल मास फ्लाय व्हिल आहे त्यामुळे काही जनांना गाडी जोरात पुढे जाऊन जर्क देऊन पुढे जाण्याचा प्रॉब्लेम वाटतो त्यामुळे काही लोक परेशान आहेत. पण ते फिचर आहे. Happy पण एक मुख्य प्रॉब्लेम आहे तो म्हणजे क्लचचा. काही गाड्यात क्लच असेंब्ली मधील काही पार्ट खराब झाले तर काहीत दुसरे काही पण सर्व क्लच रिलेटेड. गंमत म्हणजे मी आनंद महिंद्राना ट्विट केले की नॉट एक्झ्पेटेड म्हणून, तर माझी गाडी तपासन्यासाठी त्यांनी दुसरी XUV पाठविली व महिंद्राच्या रिजनल मॅनेजरला घरी पाठवले. त्याने सांगीतले तुमची ट्विट वाचून आलो. मला ही सर्व्हिस फार आवडली. दे आर सिरियस अबाऊट इट! आणि XUV ची किंमत (मी घेतलेल्या मॉडेलची) ५०००० ने वाढली देखील. नवीन बुकींग अजून ओपन झाले नाही. राईड फारच मस्त! टॉर्क क्लास.

मी डिझेलचे रेशो शोधत आहे. ज्यात ५ व्या व ६ व्या गिअर मध्ये विदाऊट क्लच जाता येते. एकदा १९०० आर पी एअम मध्ये पडला होता पण स्पिड वर लक्ष नव्हते. नंतर ट्राय केला तर जमत नाही. (कृपया हे सर्वांनी ड्राईव्हींग मध्ये माहिर असल्याशिवाय बिलकुल करू नये. गिअर बॉक्स खराब होईल.) कोणाला हे रेशो माहित आहेत का इथे?

मस्त केदार! अभिनंदन. सही गाडी घेतलीस. Happy

रेशोबद्दल- माहिती असण्यापेक्षा सरावाने जमेल ते, असं वाटतं. गाडीच्या जरा जास्त जवळ जातो आपण काही दिवसांत. तिला हवं-नको ते तिच्या आवाजावरून आणि एकंदरच वागण्यावरून कळतं. Happy मी असे प्रयोग केलेत, पण तेव्हा स्पीड आणि आरपीएमकडे लक्ष नव्हतं. लाँग रनमध्ये इंजिन टेंपरेचर जास्त असताना डिझेल इंजिन भरात येते आणि मस्त रिस्पॉन्स देते. गाडी चालू करून काही मिनिटे झाली असताना आणि काही तास झाले असताना- या दोन केसेसमध्ये एकच स्पीड आणि एकच आरपीएम असूनही रिस्पॉन्स वेगळा असू शकतो.

.

केदार ट्विट अनुभवाबद्दल विस्तारून लिहीशिल का? मी ग्राहकसेवा कशी सुधारता येइल याबद्दल एक प्रॉजेक्ट करत आहे. त्यात मला मदत होइल. नव्या गाडी बद्दल अभिनंदन.

फोर्स मोटर काय आहे? त्यांची शोरूम तर रोज दिसते पण गाड्यांबद्दल माहीत नाही.

सध्या Automatic transmission + Decent mileage on petrol यात कोणती गाडी आहे? आय-२० चे अ‍ॅव्हरेज ऑटो मॉडेल मधे घसरते असे ऐकले.

मामी.. फोर्स मोटर्स म्हणजेच पूर्वीचे बजाज टेम्पो.. बजाज आणि फिरोदीया यांच्यात भांडणे झाल्यावर बजाज टेम्पोचे नाव बदलून फोर्स मोटर्स झाले.. त्यांनी नुकतीच एक एसयुव्ही लाँच केली आहे.. फोर्स वन अशी.. आणि मान बरोबर त्यांचा करार होता ट्रक साठी.. तसेच थ्री व्हीलर टेम्पो, टेम्पो ट्रॅव्हलर आणि टेम्पो ट्रॅक्स ह्या त्यांच्या सगळ्यात जास्त चाललेल्या गाड्या..

झायलो अहे ना ती?? >> नाही हो इब्लीस. XUV500 ही महिंद्राची नवीन प्रिमियम SUV आहे. टॉप ऑफ द लाईन फॉर देम. ती भारतासोबतच एक्स्पोर्ट देखील होणार आहे. साउथ अफ्रिका व अन्य अनेक देशात. त्यामुळे त्यांनी तयार करताना ग्लोबल SUV स्टॅन्डर्डस वापरले होते.

आय-२० चे अ‍ॅव्हरेज ऑटो मॉडेल मधे घसरते असे ऐकले. >> अमोल कुठल्याही ऑटो गाडीचे मायलेज हे मॅन्युअल पेक्षा कमीच असते कारण मॅन्युअल मध्ये हव्या त्या गिअर मध्ये चालविता आल्यामुळे गाडीवर कंट्रोल (माईलेज व स्टेबिलिटी) दोन्ही जास्त असते. ऑफकोर्स ऑटो मध्ये गिअर टाकायची गरज नाही त्याची प्राईज म्हणून थोडेसे माईलेज Happy

फोर्सची फोर्स वन सुंदर गाडी आहे. त्यातील इंजिन हे मर्सेडिज बेन्झचे CRDi आहे. लॅडर बेस्ड चासी आणि गाडी फोर्सची असून सुद्धा दिसायला व चालायला चांगली आहे. मला खरच फोर्स कडून इतक्या चांगल्या गाडीची अपेक्षा नव्हती. इंजिन मर्कचे असल्यामुळे परफॉर्मन्स बद्दल बोलायलाच नको. पण ही गाडी विकली जात नाही कारण फोर्सचे नाव Happy

व्हर्ना फ्लॉप गेली का हो >> इतकीही नाही कारण अजूनही वेटींग आहेच. आणि वर्ना तशीही (पहिले वर्जन) फ्लॉपच होती. पण त्यावर जाऊ नका, फोर्ड फिएस्टा पण प्लॉपच आहे. पण दोन्ही गाड्या अतिशय उत्कृष्ट.

महिंद्र सारख्या देशी कंपनीच्या एसयुवीवर लाखो खर्च करणे म्हणजे मुर्खपणा आहे. त्यापेक्षा फोर्ड, टोयाटा बेस्ट.

केदार, माईलेज कमी होणार हे गृहीत धरले आहे पण साधारण "नॉर्म" काय - स्टिक व ऑटो मधे किती फरक असेल अशी अपेक्षा ठेवावी?

अजून ऑटोमॅटिक मधे कोणत्या आहेत? होंडा सिटी आधीपासूनच आहे बहुधा. फोर्डची कोणती आहे का?

महिंद्र सारख्या देशी कंपनीच्या एसयुवीवर लाखो खर्च करणे म्हणजे मुर्खपणा आहे. >>> मी ही तसा मुर्खच. म्हणून मुर्खपणा केला. ते जाऊदे तुम्ही गाडी निदान फ्लेश मध्ये बघितली का? चालवून पण बघा. अमेरिकेत देखील शेवी अन फोर्ड घेऊ नका म्हणणारे पावलोपावली भेटतातच. तसेच इथेही. Happy आणि येऊकामी, येत्या ५ वर्षात महिंदा भारतातील प्रिमियम कार उत्पादक होणार. मार्क माय वर्डस. त्यांच्या कोरांडो आणि रेक्स्टॉन येत आहेत. मी खरी कोरांडो घेणार होतो पण ती अजून आली नाही. XUV आउटसोल्ड झाली. बुकींग ८ दिवसात बंद केले. आणि सुरू करायच्या आधी परत ५०,००० ने किंमत वाढली. आणि आय अ‍ॅम शुअर नवीन बुकींग सुरू झाल्यावर परत मुर्खांची ती बुक करायला झुंबंड उडेल. तुमच्या भाषेत त्याला मुर्खांचा बाजार ही उपमा योग्य ठरेल कदाचित. Happy

स्टिक व ऑटो मधे किती फरक असेल अशी अपेक्षा ठेवावी? >> ४ ते ५ नक्कीच. (कमी पावर असेल तर)

अजून ऑटोमॅटिक मधे कोणत्या आहेत >> अरे आता य आहेत. ह्युंदाई, फोर्ड, टोयोटा, फोक्सवॅगन, निस्सान आणि अगदी टाटा पण! (अजून येते आहे). फिएस्टा पण चांगली आहे. बजेट कळवलेस तर एक दोनचे कम्पॅरिझन करता येईल.

फारेंडा.. कमीतकमी १-२ किमी चा फरक पडतोच (सिटी ड्रायविंगमध्ये). आता बहुतेक सगळ्या गाड्यांचे ऑटोमॅटिक व्हर्जन्स आहेत..

फोर्ड फिएस्टा पण प्लॉपच आहे. पण दोन्ही गाड्या अतिशय उत्कृष्ट >> होंडा सिटीएवढा खप नसेल पण फोर्ड फिएस्टा फ्लॉप आहे असं मला तरी नाही वाटत. त्या सेगमेंटमधली ती उत्कृष्ट कार आहे (SX4 नंतर Wink ) अमेरिकन गाड्यांना मेंटेनन्सचा, पार्टस् चा प्रॉब्लेम आहे असं बर्‍याच जणांकडून ऐकलं. कोणी जाणकार याबद्दल सांगू शकेल काय?

केदार.. XUV500 बद्दल अभिनंदन.. आम्हाला पार्टी आणि राईड कधी आहे ते सांग Happy

केदार तू गाडी घेऊन इकडे ये, मग आपण मनीषकडे कॉफी, स्नॅक्स वगैरे खायला जाऊ Happy

साधारण ५ किमीपर्यंत फरक ठीक वाटतो. मला कोणीतरी ८-१० किमीचा पडतो म्हणून सांगितले.

केदार - फोन करतो.

टच वूड.. अद्याप फिएस्टाला काही प्रॉब्लेम आलेला नाही. त्यामुळे स्पेअरपार्टस बद्दल फारशी कल्पना नाही.. पण बाहेर सहजासहजी उपलब्ध नाहीत.. टाटा, महिंद्रा किंवा मारुतीच्या गाड्यांचे OEM पार्टस पण सहज मिळतात बाहेर पण होंडा, फोर्डचे त्यांच्या सर्व्हीस सेंटर मधूनच घ्यावे लागतायेत.. मेंटेनन्सचा अद्याप तरी प्रॉब्लेम आलेला नाही.. सहा महिन्यातून एकदा सर्व्हिसिंग केले की झाले काम..

केदार mahindra च्या लोगन आणि व्हेरीटोची पुंगी वाजलेलीच आहे त्यामुळे कोरांडो व रेक्स्टानकडून अपेक्षा नकोत.XUV मी ड्राईव केली आहे.किमतीच्या मानाने not impresive.आणखी एक, मुर्ख संबोधन आपणास नव्हते.

लोगन आणि व्हेरिटो एकच गाडी आहे. Happy ती कार खरी रेनॉची. त्यामुळे महिंद्राला दोष नको. कारण रेनॉच्या कुठल्याही कार, कितिही भारी असोत लोक घेत नाहीत. उदा त्यांची कोलियोस किंवा फ्ल्युएन्स. दोन्हीची विक्री केवळ काही शे मध्ये होते. लेट अलोन हजारो. दुसरे उदाहरण टोयोटाची व्हेन्झा गाडी (अमेरिकेत राहणार्‍यांना माहिती असेल) फारशी विकली गेली नाही. फोर्डच्या अनेक गाड्या देखील विकल्या जात नव्हत्या. एखादे मॉडेल फसते. पण बोलेरो बघा. Happy

कोरांडो आणि रेक्स्टान ह्या कोरियन गाड्या आहेत. ती कंपनीच महिंद्राने विकत घेतली आहे. आणि आता ह्या दोन्ही गाड्याचे लोकलायझेशन चालू आहे. ( ६०% पार्ट इंडियन मेड) ह्या दोन्ही गाड्या दिसायला व फिचर्स मध्ये चांगल्या आहेत. लोक घेतील की नाही ही गोष्ट अलहिदा पण महिंद्रा १५ लाखाची इंडियन कार विकू शकते हे XUV मुळे सिद्ध झाले. टाटाची आरिया मात्र फेल गेली कारण तुम्ही म्हणता तसे इंडियन कारला १० लाखापेक्षा जास्त द्यायला लोक घाबरतात कारण ब्रॅन्ड व्हॅल्यु नाही. ती महिंद्रासाठी XUV मुळे बिल्ड होते आहे. शिवाय स्कॉर्पियोमुळे महिंद्रा म्हणजे SUV असे काहीसे समिकरन जे झाले आहे ते ह्या वरील दोन गाड्या लाँच करायला कामास येईल. त्या चालतील की नाही ही गोष्ट अलहिदा पण आज लोकांचे माईंड सेट XUV मुळे बदलेल ह्याचे मार्क महिंद्राला द्यायला हरकत नसावी.

XUV व्हॅल्यु फॉर मनी आहे का? उत्तर हो आणि नाही दोन्ही आहे.

का नाही? कारण १४ लाख (ऑन रोड, W8) साठी खूप मोठी रक्कम आहे.
१. त्या रकमेप्रमाणे मधील प्लास्टिक फिनिश असायला हवी आणि डॅशमधील प्लास्टिक काही ठिकाणी फारच साधारण आहे.
२. क्लचचे निगल्स अजूनही चालू आहेत. (पहिल्या तीन महिन्यातील बॅचला)
३. स्टिअरींग पूर्ण फिरवल्यावर रॉड पायला लागतो. नॉट एक्सपेक्टेड

का आहे? कारण
१. कॅप्टिव्हा, फोर्ड आणि टि रनर ह्यांच्या कंप्यारिझनम मध्ये कुठेही ही गाडी कमी नाही. दुसरी अशी गाडी ( T Runner किंवा फोर्ड ) ह्या २० ते २४ लाखा दरम्यान आहेत. ८ लाख कमी देऊन त्याच टाईपची गाडी मिळते, थोडेसे - पॉईंटस त्यामुळे चालतात.
२. टि रनर दुसर्‍या देशात १६-१८ लाखा दरम्यान मिळते आपल्याकडे मात्र ऑन रोड २४ लाखाला. हे जस्टिफाय होते तर महिंद्राने १ ते १/१२ लाख जास्त घेतले तर ते देखील व्हायला पाहिजेत. टि रनर तर मधून इनोव्हा आहे. फक्त बाहेरून काय ती वेगळी. अतिशय मिडिऑकर डॅश. तरी फक्त टोयोटा म्हणून २४ द्यावेत का?
३. http://www.cardekho.com/compare-4car/Renault_Koleos_2.0_Diesel/Toyota_Fo... इथे बघा सर्व फिचर्स ह्या गाड्यांसारखे आहेत. शिवाय लेदर इनबिल्ट. उगाच गिमिक्स नाहीत. टाटाची नवीन स्टॉर्म अकाईज मर्लिन एक्स्पो मध्ये लाँच झाली. अतिशय बेसिक डॅश घेऊन १० लाख द्यावे लागणार.
४. व्हॅल्यु फॉर मनी ही कन्सेप्ट इंडियात नाहीये असे माझे म्हणने आहे. जी सिव्हिक तिथे ११ लाखाला मिळते, तिच इथे मात्र १६, जी कोरोला तिथे २०००० डॉलर पेक्षा कमी आहे ती इथे ऑन रोड १६ लाखाला. ही व्हॅल्यु कुठे आहे? उलट इथे येऊन ह्या बेसिक गाड्या प्रिमियम सेगमेंट म्हणून मिरवत आहेत. त्यामुळे इंडियन ऑटो मार्केट अजून मॅच्युअर व्हायचे आहेत. त्यात तुम्हाला १४ लाखाला एक चांगली (परिपूर्ण नाही) गाडी मिळते तर काय हरकत. ऑफकोर्स आधी लिहिल्याप्रमाणे आणखी १ लाखने कमी असायला हरकत नाही. पण सध्या तरी १२ लाख ते १५ लाख ह्या सेगमेंट मध्ये कुठलीच चांगली गाडी नव्हती, त्या सेगमेंट मध्ये XUV आली. शिवाय जे २०+ लाखवाले SUV बायर्स आहेत ते देखील ह्या १४ लाखाच्या व्हॅल्यु प्रपोझिशन कडे वळले त्यामुळेच महिंद्राला ओव्हरव्हेमिंग रिस्पॉन्स मिळाला. द नेस्ट कार त्या सेगमेंट (कार सेगमेंट) मधली २० लाखाला आहे इथेच व्हॅल्यु प्रपोझिशन दिसते.

टाटा अरिया महाफेल गाडी आहे.XUVची किंमत 20% कमी ठेवली तर value for money वाटेल.compact suv मधे महिंद्र बेस्ट आहे.

>> Maruti Suzuki XA Alpha << बद्दल काय माहिती? लाँच कधी होईल? डिझेल वर्झन वगेरे कधी? K- series चं इंजिन आहे असं ऐकलंय. या गाडीच्या प्रतिक्षेत.

मस्त चर्चा सुरु आहे रे. बरीच माहिती मिळते.
केदार अभिनंदन. समोरुन ती गाडी खत्रा दिसते. Happy

बजाज आणि फिरोदीया यांच्यात भांडणे झाल्यावर बजाज टेम्पोचे नाव बदलून फोर्स मोटर्स झाले.>>>
थोडसं करेक्शन करतो रे.
त्यांच्यात भांडण होउन जमाना उलटला. त्यावेळीच त्याच नाव टेम्पो असच केल होत. त्यातल बजाज काढुन टाकल तरी लोकांची सवय सुटली नव्हती इतकच. त्यानी हल्लीच (तरी ३-४ वर्षे झाले बहुद्धा) टेम्पो वरुन नामकरण फोर्स मोटर्स केल. ब्रँडनेम बदललं आहे शिवाय लोगो वैगेरे. ह्याच कारण नाही माहिती पण काळासोबत एक बदल केला असेल, जसा बजाजने त्याचा लोगो बदलला आहे.

Pages