इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू.
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
अमा गाडी हैद्राबादलाच विकली
अमा गाडी हैद्राबादलाच विकली पाहिजे अस काही नाही... तुम्ही ती मुंबईला घेऊन आल्यावर पण विकु शकताना.....
पण रजिस्ट्रेशन वगैरे चा
पण रजिस्ट्रेशन वगैरे चा प्रॉब्लेम येइल मुंबईत विकली तर त्यापेक्षा इथेच किस्सा खतम केलेला बरा.:)
काही अपडेटस C , C+ १.सिटी वर
काही अपडेटस
C , C+
१.सिटी वर ५ तारखेपर्यंत ८०,००० रू चा डिस्काउंट आहे. (अर्थात नवीन सिटी लाँच होणार आहे त्यामुळे व निसान सन्नीच्या कॉम्पीटिशन मुळे असे करणे भाग पडले असावे. फेसलिफ्ट सिटी ह्या महिन्यात मिळेल अशी आशा आहे. MMC मध्ये फार बदल नाहीत त्यामुळे ९ लाखात टॉप ऑफ द लाईन सिटी घ्यायची इच्छा असेल तर दसर्याच्या आधी शोरूमला भेट द्या.
२. व्हेन्टो फेसलिफ्ट येते आहे. आक्टो मध्ये मिळेल. बरेच बदल केले आहेत पण तरीही अजून कॉम्पिटिशनच्या बरीच मागे आहे. अर्थात ज्याला कुठलेही अत्याधुनिक आणि आवश्यक असे फिचर नको पण जर्मन इंजिनिअरिंग हवे त्याने व्हेंटो कडे वळावे. पण नॉट माय कप ऑफ टि. अर्थात प्रत्यक्ष पाहिल्यावर परत अपडेट करेन.
३. निसान सन्नी सगळे मस्त, फक्त पावर सेगमेंट पेक्षा कमी ९९ बिचपी. पण बाकी सगळे भारी. सन्नी ही अमेरिकेतील व्हर्सा आहे. डिझेल लगेच मिळणार नाही तसेच आटो ट्रान्समिशन देखील नाही त्यामुळे नक्कीच फरक पडेल, पण निसान नावावर बरेच जण ही गाडी घेऊ शकतात.
D / SUV
४.. फोर्स वन चालवली नाही, पण बराच वेळ बसून निरिक्षण केले. सुखद धक्का. फोर्स इतकी चांगली गाडी काढेल ह्यावर माझा विश्वास नव्हता. फोर्सचे इंजिन हे मर्सिडिजचे आहे. २.२ CRDi टर्बो. पण महिंद्रा XUV भारी आहे. व्हॅल्यु फॉर मनी त्यामुळे फोर्स किती चालेल हे सांगता येत नाही, पण जे SUV पाहत आहेत त्यांनी एकदा टेस्ट डाईव्ह घ्यावी हे मात्र नक्की.
५ टाटा मर्लिन (नवीन सफारी) ची अजून खबर नाही, पण टाटावर सध्यातरी महिंद्राने मात केली असे म्हणावे लागेल. जर मर्लिन ९ लाखाला लाँच झाली तर गेम चेंजर ठरेल.
6. रेनॉ डस्टर २०१२ मध्ये १० लाखाच्या आसपास मिळेल.
XUV500 रोड टेस्ट - फर्स्ट
XUV500 रोड टेस्ट - फर्स्ट हॅण्ड रिव्हू.
आज कॅम्पातल्या सिल्वर ज्युबली मोटार्स कडे भेट दिली. XUV500 प्रत्यक्षात जास्त चांगली दिसते. पहिल्या पाहण्यात मलाही ती टुकार डिझाईन वाटली होती पण इट ग्रोज ऑन यू. २८ सप्टेला ही गाडी लाँच झाली. अॅपल जसे प्रोडक्ट अॅन्टीसिपेशन बिल्ड करते तसेच ह्या XUV500 हे होते. आधी W201 असे कोड नेम ह्या प्रोजेक्टला होते पण महिंद्रा आता X म्हणजे क्रॉसओव्हर सिरीज आणत आहे म्हणून तिला रि ब्रान्ड XUV500 असे केले. क्रॉसओव्हरला खरेतर कार चासी वापरून तिला SUV केली जाते, महिंद्राकडे अशी कुठलीही कार नाही त्यामुळे हिला क्रॉसओव्हर म्हणने म्हणजे जरा अतिच ... पण ते असो.
शोरूम मध्ये तुफान गर्दी होती जणू काही चतुश्रॄंगी देवीचे दर्शनच. गंमत म्हणजे ७० टक्के पब्लीक हे गाववालं होतं तर ३० टक्के एकदम हाय फाय. गाडीची टेस्ट ड्राईव्ह उद्या पासून चालू होणार असे मला सांगण्यात आले पण अचानक आजच दुपारी सुरू होईल अशी घोषणाही केली. आम्ही मग नंबर लावला तर अहो भाग्यम! कारण आमच पहिला. तर पुण्यात ह्या गाडीची पहिली टेस्ट ड्राईव्ह घेण्याचा मान आम्हाला लाभला. पुण्यात फक्त एकाच शोरूम मध्ये ही गाडी उपलब्ध आहे.. त्या आधी लै वेळ लावून डिलरने पुजा वगैरे केली, मग रितसर लायसन्स देऊन मी आणि सौ गाडीत बसलो.
फर्स्ट इम्र्पेशन्स :
१. गाडी चिता दिसते, पण मागील टायर वर आर्क देण्याचे प्रयोजन नव्हते असे मला वाटते.
२. मॅश ग्रिल हे मित्सूबिशी आउटलॅण्डर सारखे डिझाईन करून वर मंहिद्राचे बेढब ग्रील त्यावर लावले त्यामुळे बर्याच जणांना ही गाडी आवडली नाही.
३. सेकंड रो सिट - रिक्लाईन होते (वॉव) लेग रूम उच्च. अगदी अमेरिकन गाड्यातही अशी लेग रूम मिळणार नाही.
४ ३र्ड सिट म्हणजे जोक आहे. केवळ मुलच बसू शकतील.
५. दुसरी व तिसरी रो फ्लॅट होते म्हणजे वाटेल तेवढे सामान सहज नेता येईल.
६. स्टेपनी फुल साईज, ३र्ड रो खाली आहे.
७. कन्सोल कलर अजून चांगला ठेवता आला असता. माझ्यासारख्या चुझी लोकांसाठी भ्रमनिरास पण फिचर्स खूपच आहे. मी W8 टेस्ट केले त्यात डिव्हीडी प्लेअर आणि जिपीएस आहेत. व्हॉईस रिकगनिशन, ब्लु टूथ ह्या सर्व सोयी आहेत. शिवाय बाहेरील आरसे इलेक्टॉनिकली फोल्ड होतात.
८. हॅन्ड ब्रेकची जागा जरा बदलता आली असती तर बरं झाले असते.
९. चालवताना गाडी मस्त पिक अप घेते. कॅम्पात असल्यामूळे मला ३००० RPM वर किती आवाज करते हे टेस्ट करता आले नाही पण एकुणात केबीन बरीच शांत होती. मे बी जर हायवे वर नेली तर थोडा आवाज ऐकू येईल पण तो निग्लीजिबल असेल.
९. गिअर बदलायला अल्टिस सारखे स्मुथ नाहीत. महिंद्रा म्हणते की एका सर्व्हिस नंतर ते स्मुथ होतील. (पण तसे इतके वाईट अजिबात नाहीत)
१० राईड SUV लाईक आहे क्रॉसओव्हर लाईक मला तरी वाटली नाही पण तशी खुपच स्मुथ आहे.
११. चिप प्लास्टिक - समहौ भारतीय कार निर्माते चिप प्लास्टीक का वापरतात हे मला अजूनही कळाले नाही. आणि त्याचा कलरही अगम्य आहे.
माझ्यादृष्टीने सुधारता येण्याजोग्या गोष्टी
१. कन्सोल कलर
२, चिप प्लास्टिक
३. ३र्ड रो सिट
ओव्हरऑल - मला गाडी आवडली. W8 प्रिंपीत १३.४३ ऑन रोड आणि पुण्यात १४+. ही गाडी कॅप्टीव्हा, फॉर्चुनर वगैरेंना (ज्या २२ लाखावर आहेत) टक्कर देणारी आहे, त्यामुळे चिप प्लास्टिक खपवून घेतले तरी चालतील. २.२. लिटर mhawk इंजिन टाईम टेस्टेड आहे. नो प्रॉब्लेमो देअर. निगलींग इश्युज असतील तरी ते आत्ता कळणार नाहीत पण सध्यातरी 500 ने व्हेवज निर्माण केल्या आहेत. गो फॉर इट!
www.mahindraxuv500.com
विस्तृत वर्णनाबद्दल धन्यवाद
विस्तृत वर्णनाबद्दल धन्यवाद
मी आधीच म्हणालो होतो थर्ड रो सिट बद्दल. कोणत्या गाडीमधे तिन्ही रोज सिट (लेगस्पेस, इ.) चांगल्या आहेत ?
तुला थर्ड रो हवीच असेल तर मग
तुला थर्ड रो हवीच असेल तर मग भारतात सध्या तरी इनोव्हाला पर्याय नाही. बाकी सगळ्या थर्ड रो तश्या यथातथाच आहेत पण XUV मध्ये जरा जोक झाला इतकाच. पण सेकन्ड रो XUV मध्ये टॉप क्लास आहे. तशीही XUV ही ५ जनांसाठी चांगली आहे कारण मग बॅग्स वा सामान ठेवता येणार नाही.
धन्यवाद केदार, उपयुक्त
धन्यवाद केदार, उपयुक्त माहितीबद्दल.
८. हॅन्ड ब्रेकची जागा जरा बदलता आली असती तर बरं झाले असते- तो ब्रेक म्हणजे होन्डा सिविकचे कॉपी-पेस्ट आहे.
--------------------
@महेश- तिसर्या रो मधे स्पेस पाहिजे तर (सध्या तरी) फक्त झायलो.
अरे नाही इनोव्हाच्या थर्ड रो
अरे नाही इनोव्हाच्या थर्ड रो मधे बसुन खुप प्रवास करून पाहिला आहे. मला ते पण कम्फर्टेबल वाटले नाही. स्कॉर्पिओ, झायलो, इ. मधे कसे आहे ?
असो, या मुद्द्याला गौण स्थान द्यावे हेच बरे असे दिसते.
झायलोची तिसरी सिइट खूप स्पेस
झायलोची तिसरी सिइट खूप स्पेस आहे इनोव्हाच्या तुलनेने. इनोव्हात तिसर्या सिटवर बसून प्रवास म्हणजे त्रासच आहे.
टोयोटाची "अवान्झा" लाँच होणार आहे असं ऐकून आहे...... मस्त कार......
टाटा आरीया थोडी लांब आहेना या
टाटा आरीया थोडी लांब आहेना या सगळ्या MUV पेक्षा? कदाचित त्याला ३rd रो ला जागा असेल.
भुंगोबा, कोणीतरी माझ्या
भुंगोबा, कोणीतरी माझ्या इनोव्हा बद्दलच्या मताशी सहमत आहे हे पाहून बरे वाटले.
नेमक्या ज्या गाड्या आवडतात त्या परवडत नाहीत. (उदा. फॉर्च्युनर, एन्डेवर, इ.)
अर्थात हे फक्त गाड्यांच्याच बाबतीत आहे असे नाही
ह्युन्डाई वर्ना आणि निस्सान
ह्युन्डाई वर्ना आणि निस्सान सनी पैकी कोणती जास्त चांगली वाटेल..??
वर्ना ही डीझेल मध्ये आहे हे
वर्ना ही डीझेल मध्ये आहे हे एक अॅडव्हांटेज आहे. बाहेरून स्टायलींग खास ह्यूंडाई स्टाईल अॅग्रेसीव्ह आहेत. मला तर आवडले.
सनी लूक्स बेटर फ्रॉम आउटसाईट ...अॅण्ड फार बेटर इनसाईड दॅन वर्ना! पण डिझेल अजून आली नाही.
निस्सान चा बिल्ट क्वालिटीमध्ये नाद करायचा नाही. होंडानेही नाही !
माझी मायक्रा येतेय दीवाळीत !
माझी मायक्रा येतेय दीवाळीत !
केदार धन्स. उपयुक्त
केदार धन्स. उपयुक्त माहितीबद्दल.
वर्ना - कोणती घेत आहात त्यावर
वर्ना - कोणती घेत आहात त्यावर खूप काही अवलंबून आहे. मी टॉप ऑफ द लाईन डिझेल टेस्ट आणि पेट्रोल टेस्ट केली आहे. ऑन रोड १२.५ ला डिझेल जाईल.
आवडणार्या गोष्टी.
१. डिझेल
२. रिव्हर्स कॅमेरा
३. पावर OVRM
४. पावर (१.६ लिटर)
५. मस्त राईड
६ फ्युचरिस्टिक लुक्स
७. अॅटोमॅटिक ट्रान्समिशन
न आवडलेल्या गोष्टी
१. किंमत
२. मागच्या सिटवर मधली सीट बसायला फारशी चांगली नाही.
३. १.४ मध्ये ABS नाही. बरेच फिचर्स कमी त्यामुळे १.६ ला जास्त किमंत द्यावी लागते.
निसान सनी
१. नो नॉनसेन्स कार. प्युअर व्हॅल्यू फॉर मनी.
२. मागच्या सिट मध्ये पूर्ण सेगमेंट मध्ये जास्त जागा.
३. एक्सलंट ड्राईव्ह.
४. सुंदर इंटिरर्स
५. सर्व लेटेस्ट व सेफ्टी फिचर्स अगदी स्वस्तात ९ लाख ऑन रोड.
न आवडलेल्या गोष्टी.
१. डिझेल नाही.
२. पेट्रोल सेगमेंट मध्ये पावर कमी ( ९९ बिएचपी, अॅव्हरेज १२०+)
३. अॅटोमॅटिक व डिझेल[ हवी असेल तर उपलब्ध नाही.
व्हर्ना पेक्षा मला निसान जास्त चांगली वाटते. (तुम्हाला डिझेल व अॅटो हवी असेल तर पर्याय नाही) पण मॅन्युअल ची तयारी असेल तर माय २ सेंट गोज टू सनी.
प्रकाश अभिनंदन.
मी आजच आणली मारुती स्विफ्ट
मी आजच आणली मारुती स्विफ्ट डिझायर...........
अभिनंदन उदय! व्हाइट कलर रॉक्स
अभिनंदन उदय!
व्हाइट कलर रॉक्स
दोस्त लोक्स....महिन्द्रा
दोस्त लोक्स....महिन्द्रा XUV500 चा कंपॅरीझन चार्ट इथे बघायला मिळेल...
MAHINDRA XUV 500 Comparison.xls (89.5 KB)
धन्यवाद स्वरुप जी
धन्यवाद स्वरुप जी
धन्यवाद केदार , प्रकाश.. पण
धन्यवाद केदार , प्रकाश..
पण मी शक्यतो डिझेल गाडीचाच विचार करत होते.. निसान मधे 'सनी डिझेल' डिसें.- जाने. मधे येइल असे सांगत आहेत. सो त्याची वाट पहावी की आता वर्ना घ्यावी असा विचार चालु आहे.
सनी डिझेल ची किंमत ९ व पुढे असेल असे सांगतात..
ह्या बजेट मध्ये डिझेल
ह्या बजेट मध्ये डिझेल गाड्यांवर आणखी जास्त कर लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही कारण आजच्याच TOI प्रमाणे गेल्या १० वर्षात प्रथमच डिझेलला पेट्रोलपेक्षा जास्त मागणी आहे. पेट्रोल डि रेग्युलेटेड आहे पण डिझेल अजून नाही, कारण ते तसे केले तर अन्नधान्याच्या किमती वाढतील. मग पर्याय दोन एक डिझेलची किंमत ७ रू ने वाढवणे अन्यथा डिझेलवर कर लावणे. (हे माझे मत आहे TOIचे नाही.)
शिवाय पेट्रोल कार्स कडे सध्या लोक पाठ फिरवत आहेत त्यामुळे त्यावर ५०-६०००० ची सुट मिळत आहे. डिझेल साधारण १ ते दिड लाखाने महाग असते त्यामुळे हा डिफरंस आता २ + लाखाने वाढला आहे. (सुट सहित) जर रनिंग रोज ३०-३५ किमी पेक्षा जास्त असेल तर डिझेल परवडते, केवळ १० किमी रनिंग असेल तर डिझेलसाठी उगाच जास्त पैसे मोजू नयेत.
हॅविंग सेड दॅट - मी पण डिझेलचा पंखा आहे पण रनिंग जास्त नसेल तर मी पेट्रोलला पण प्राधान्य देईल.
XUV चे बुकिंग बंद झाले. वॉव ही पहिली भारतीय गाडी आहे जिचे बुकिंग केवळ ८-९ दिवसात बंद करावे लागले.
केदार, सही रिव्ह्यु दिला आहेस
केदार, सही रिव्ह्यु दिला आहेस XUV चा. माझ्याही मते XUV हे सॉलिड डील आहे.
नवीन टाटा सफारीने मला हायवेला १४ आणि पुण्यात ९-१० असे मायलेज दिले. क्वाईट इंटरेस्टिंग.
या दिवाळीतली आकर्षणे- होंडा ब्रिओ (५ लाख व पुढे), हुंडाई इऑन (३ लाख व पुढे), मारूती सर्वो (३ लाख व पुढे), नवीन फियेस्टा (डिझेल- १०.५ लाख व पुढे)
नवीन डिझेल स्विफ्ट सव्वा सहा लाखांच्या पुढे! पोलो, आय२०, पुंटो का घेऊ नये मग? ब्रँड लॉयल्टी नाडते ती अशी. ए-स्टार आणि वॅगनार अजूनही ते ४ लाखांच्या वर विकत आहेत, आणि लोकही घेताहेत.. मारूती काहीही करू शकते, हेच खरे.
इतिऑस लिवा पाहिली. टोटली अनेक्सायटिंग. फिगो कितीतरी चांगली तिच्यापेक्षा. लुक्स आणि प्लास्टीक्सबद्दल टोयोटा कधी नीट विचार करेल?
स्विफ्ट आली, तशी डिझायर पण नवीन आलीय का?
नवीन डिझायर २०१२ मध्ये येणार
नवीन डिझायर २०१२ मध्ये येणार आहे. टेस्ट चालू आहेत. पण अगेन डिझायर गाडी बाहेरून बेढब दिसते. लोकं घेतात, गाडी चांगली आहे पण अग्ली.
इटिऑस ही टॅक्सी साठी पण चांगली गाडी नाही असे माझे झाले आहे.
नवीन टाटा सफारी काही दिवसात जुनी होईल.:) मर्लिन ऑन द कार्ड. काही महिन्यात बाहेर येईल. पण XUV मुळे टाटांची तंतरलेली असणार. होप मर्लिन आणखी चांगली असेल. बायदवे सफारीची किंमत २५,००० ने कमी झाली आहे.
हो बघितलीये नविन डिझायर.
हो बघितलीये नविन डिझायर. भावाकडे टेस्टिंगसाठी आली होती अश्यात. लूकमध्ये काही फरक वाटला नाही मला.
बाकी डिटेल्स त्याला विचारावे लागतिल, मी त्याकडे जास्त लक्ष दिलं नव्हतं.
धन्स..
धन्स..
मला ५ -६ लाखांपर्यंत चांगली
मला ५ -६ लाखांपर्यंत चांगली गाडी सुचवाल का? सध्यातरी I-20 डोक्यात आहे. माझे रर्नींग रोज २० km पेक्षा जास्त नसेल त्यामुळे वर केदार ने सांगीतल्या प्रमाणे petrol वर चालनारीच बघतोय.
खरतर XUV500, सफारी सारखी गाडी घेण्याची इच्छा आहे पण परवडत नाही. ह्या "used" ५ -६ लाखांपर्यंत चांगल्या मिळू शकतील का?
@साजिरा- या दिवाळीतली
@साजिरा-
या दिवाळीतली आकर्षणे- होंडा ब्रिओ (५ लाख व पुढे), हुंडाई इऑन (३ लाख व पुढे), मारूती सर्वो (३ लाख व पुढे), नवीन फियेस्टा (डिझेल- १०.५ लाख व पुढे)
फियेस्टा तर आली आहे ना कधीच...
तिचा खप फारसा होत नाहीये पण. इंटिरीअर बोरिंग आहे. उलट ही आल्यानंतर जुन्या फिएस्टाचा (जिला ते आता 'फिएस्टा क्लासिक' म्हणतात,) खप वाढू लागला आहे.
नवीन डिझेल स्विफ्ट सव्वा सहा लाखांच्या पुढे! पोलो, आय२०, पुंटो का घेऊ नये मग?
पुंटो घ्यावी !
बाकी पोलो आणि आय २० पेक्षा मला नवी स्विफ्ट उजवी वाटते. ३ सिलेंडर पोलोपेक्षा तर नक्कीच !
बाकी मारुती काहीही करू शकते याच्याशी सहमत आहे !
------------------------------
@केदार- सॉलिड माहिती देतो आहेस मित्रा, लिहित रहा.
ज्ञानेश धन्यवाद. ५ लाख ऑन
ज्ञानेश धन्यवाद.
५ लाख ऑन रोड मध्ये इंडिका व्हिस्टाचा पण विचार करा.. (नवीन). कारण त्यात सेक्युरीटी सर्वात जास्त. ABS वगैरे. पण आपण इंडिकाला टॅक्सी म्हणून बघत असल्यामुळे तिचा विचार मनात येत नाही. पोलो ब्रिझचा विचारही करू शकता. आय २० तर चांगलीच गाडी आहे.
फियेस्टा येऊन बरेच महिने झाले. म्हणावा तेवढे मार्केट नाही आले त्यांच्याकडे. दिवाळी साठी ह्युंदाई इऑन व सुझुकीची अल्टो एक्सप्लोअर नावाचे नवीन व्हर्जन आले आहे.
. ३ सिलेंडर पोलोपेक्षा तर नक्कीच >>
चारेक वर्षापूर्वी मला एका आठवड्यात इंपाला मिळली. मला टेक ऑफ लॅग वाटला म्हणून मी गाडीचे स्पेसीफिकेशन चेक केले तर ती होती शेव्ही फ्लेक्स फ्युअल इंपाला. गाडी व्ही ६ असूनही खास गावात चालविन्यासाठी फक्त ३ सिलेंडर फायर करते आणि जेंव्हा गरज पडेल तेंव्हा ऑल ऑन. इंपालासारखी अवजड आणि मोठी गाडी ३ सिलेंडर मध्ये चालते तर बाकी का नाही? असा विचार करून खूप सार्या शेव्ही अशा डिझाईन वाल्या बनविल्या गेल्या. ३ सिलेंडर म्हणजे वाईट असे नाही तर ३ सिलेंडर मुळे माईलेज जास्त वाढते. शिवाय किंमतही कमी होते त्यामुळे नवीन ट्रेंड असा की कमी किमतीत जास्त माईलेज हवे असेल तर ३ सिलेंडर वापरा.
गाडी व्ही ६ असूनही खास गावात
गाडी व्ही ६ असूनही खास गावात चालविन्यासाठी फक्त ३ सिलेंडर फायर करते आणि जेंव्हा गरज पडेल तेंव्हा ऑल ऑन.
नेमकी काय टेक्नॉलॉजी आहे ही केदार ? जरा डिटेल्स मिळाले तर छान होईल. ( इंपाला आपल्याकडे मिळते ? नवीन इंपाला का ? किंमत पण द्या ना प्लीज.. )
Pages