कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाळू जोशी. फारच भयंकर प्रसंग. Sad

नंदिनी, होंडा सिटीचे ड्रायवर्स सीट उंच व्यक्तीसाठी कंफर्टेबल नाही. कारमध्ये ड्राइवर्ससिटवर जातानाच प्रॉब्लेम येतो.
फियाट लिनीया पण बघायला सांग.

दक्षिणा व स्वाती पुण्याच्या चौकाचौकात असे प्रसंग हरघडी घडत असतात. कर्वे रोडला एकदा एक मो.सा वाला तरुण (क्याटेगिरी न.३ मधला) उजवीकडचा सिग्नल सुरू होऊन आधीच क्रीजबाहेर आलेल्या दुसर्‍याला अडकला आणि रस्त्यावर पडून शम्भरेक फूट जमीनीवर घसरत गेलेला मी पाहिला आहे. सुदैवाने त्याला हेल्मेट होते म्हणून तो वाचला. कानात इअरफोन घालून बाहेरचं काहीच न ऐकता गाड्या चालवणारीही एक क्याटेगिरी आहे...

खरंय बाजो तुमचं म्हणणं, काही लोक (खास करून तरूण) फारच बेफामपणे गाड्या चालवतात. सिग्नल तोडताना, एकेरी मार्गावरून विरूद्ध दिशेने येताना, आपण आपल्याच जीवाशी खेळतोय याची जराही जाणिव का नसेल होत या लोकांना? Sad
मी म्हणते सिग्नल तोडणं एकवेळ फक्त सरळ रस्त्यावर ठिक आहे, चौकात हे धाडस? Sad

आपण आपल्याच जीवाशी खेळतोय याची जराही जाणिव का नसेल होत या लोकांना?
>>>>

हे पह 'त्रिकोण; एक हजार वर्षाच्या इतिहास ' या बीबी वरील लेखकाने दिलेली कबुली.

>>तुम्ही स्पीड वर नियंत्रण ठेवलेत म्हणून कौतूक.

'२००९ डिसेंबरला पायात एक रॉड व पाय-डोके धरून ३६ टाके सोसले तेव्हा कुठे हे नियंत्रण मिळवता आले
'

@नंदिनी-

होन्डा सिटीला नाव ठेवायला जागाच नाही. आता तर किंमतही कमी झालीये. Wink
सॉरी, पण स्विफ्ट डिझायर तिच्या जवळपासही फिरकत नाही. सिटीचा सेगमेन्टच वेगळा आहे तिच्यापेक्षा !

तरीही, डिझायरच हवी असेल पेट्रोल वि. डिजेल आर्ग्युमेन्ट वापरता येईल. Happy

डिझेलमधेही सिटीला रिप्लेसमेन्ट पाहिजे असेल तर डिझायरपेक्षा एस एक्स फोर उत्तम, हेमावैम.

ज्ञानेश, पण भावाला ती गाडी नको आहे. Happy वडलांना तीच हवी आहे. त्यामुळे घरात रोज (खरंतर वीकेंडला) द्वंद्वयुद्ध. योगेशला कमी किमतीत गाडी घेऊन उरलेल्या पैशामधे बुलेट घ्यायची आहे. Proud

स्वाती, योगेशची उंची कमीच आहे. पप्पाना पॉइंट मिळेल. Happy

बाजो. भयंकर आहे. परवा आम्ही रत्नागिरी मुंबई बाईक ट्रिप केली, तेव्हादेखील असे एक दोन वीर दिसले. हायवेवर गाडी चालवणे आणि सीटीमधे गाडी चालवणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. एका महाभागाने तर हायवेवर ट्रकला राँगसाईडने ओव्हर टेक मारलेला. Uhoh

पुण्यात नियम वेगळे अहेत. तिथे डाव्या बाजूनेच ओव्हरटेक करायचे असते हे बहुधा ते अमेरिकेहून जाऊन आल्यावर शिकले असावेत.

बाजो ते तीन स्थितीतील चालक पुपुवर लिहीले होते का? जबरी होते ते.

सीटबेल्ट न लावण्याबद्दल अचाट कारणे ऐकली आहेत येथे.

हो सापडले, धन्यवाद. एकदम चपखल आहे ते. या सगळ्याच्या मधून रस्ता ओलांडणारा पादचारीवर्ग हा आणखी यात भर घालतो.

म्हणजे धोका टाळण्यासाठी शक्यतो न. २ गटात राहणे हा एक मार्ग दिसतो. सिग्नल हिरवा असला तरी जर आपल्यापुढे थोडे अंतर कोणीही नसेल तर दुसरीकडची वाहतूक चालू होणार हे गृहीत धरायचे. पण एकदम स्लो डाउन होणे किंवा थांबणे ही डेंजरस, कारण न. ३ गटातील लोक आपल्यामागून तो सिग्नल लाल व्हायच्या आधी निसटायला बघत असतात.

आपल्याकडचा दुसरा एक पॅटर्न म्हणजे एका मोठ्या चौकात सिग्नल व पोलिस नसताना जर मधे मोठे आयलंड तयार केले तर तेथे एकाचे चार चौक तयार होतात. कोठूनही उजवीकडे जाणारे त्या आयलंडला वळसा न घालता थेट उजवीकडे वळतात. कोथरूड शिवाजी पुतळा चौकातील नेहमीचा सीन. महाराजांच्या डोळ्यासमोर कायदा तोडणे चालू असते.

जरा विषयांतर होते आहे, पाहिजे तर वेगळा बीबी उघडू.

काय बीबी उघडून उपयोग? इथले वाचणारे लोक तिथे नसतात आणि तिथले नियम तोडणारे इथे नसतात्.शनवारवाड्यासमोर सूर्या हॉस्पिटल समोरच्या तिथे वाड्याकडून कुम्भारवाड्याकडे जाणारे लोक आयलन्डला वळसा मारण्याचे ऐवजी डायरेक्ट उजवीकडून घुसतात आणि पुलावरून येणाराना धडकतात.

हे बहुधा ते अमेरिकेहून जाऊन आल्यावर शिकले असावेत. >> लोल. अमेरिकेचा काही संबंध नाही. भारतीय चालक फारच घाईत असतात. त्यांना रस्ता केवळ "त्यांच्या वैयक्तिक" वापरासाठी असतो असे वाटत असते. मग ते कुठूनही ओव्हरटेक करतात.

दहा-पंधरा वर्षांपूर्वी पुण्यात सायकलवाले कुठूनही घुसतात असे म्हणले जात होते आता बाईकवाले कुठूनही कसेही घुसतात. शिवाय ती नॉन स्ट्रायकर कॅटेगिरी डोक्याला ताप देते. सिग्नल ५ सेकंद असतानाच हे लोकं जोरात दुसरीकडे धाव घेतात. ( ही बहुदा भारतीयांचीच खासियत) Happy हे लोक म्हणजे मला ते विमानात लावलेले होमिंग रॉकेटच वाटतात, कधीही दुसर्‍यांवर कुठूनही येऊन डायरेक्ट आदळणार.

पाहिजे तर वेगळा बीबी उघडू. >> हो. कारण कोणती गाडीत, ट्रॅफिक मध्ये येत आहे. Happy

आमच्याकडे तर कारही उलट्या मार्गाने चालविने कायदेशीर धरले जाते. मामा लोक उभे असतात पण काहीच करत नाहीत. ( जगताप डेअरी - काळेवाडी मार्ग)

हे लोक म्हणजे मला ते विमानात लावलेले होमिंग रॉकेटच वाटतात, कधीही दुसर्‍यांवर कुठूनही येऊन डायरेक्ट आदळणार.>> पर्रफेक्ट. Lol

नॅनो २०१२ मधे खुप सुधारणा आहेत असे वाचले. कोणी TD केली आहे का ?
सिटी मधे वापरायला आणि क्वचित long drive ला कशी आहे ?

स्कोडाची रॅपिड कशी आहे ? रॅपिड अथवा वेंटो कोणती चांगली आहे? डिझेल गाडी हवी आहे. या सेग्मेंट्मधे कोणती चांगली आहे?

रॅपिड अन व्हेंटो बहिणी आहेत. रॅपिड थोडी स्वस्त. वेंटो बेसिक गाडी म्हणून चांगली आहे. पण काहीही बेल्स अन विसल्स नाहीत. ज्या आवश्यक असतात. उदा चांगला ऑडिओ किंवा स्टिअरिंग माऊंट बटणे. डिझेलच हवी असेल तर दोन्ही चालतील. पण त्याही पेक्षा जास्त चालेल (म्हणजे पळेल) ती निसान सन्नी डिझेल. किंमत कमी आणि निस्सान क्ल्वालिटी अन सगळ्या सोयी. व्हॉट एल्स डू यू वॉन्ट. Happy

होन्डाची नवीन सिटी २०१० लाँच झाली आहे. पेट्रोलची हरकत नसेल तर सब १० लॅक सेगमेंट मध्ये सर्वात चांगली गाडी तीच.

स्टे ट्युन्ड फॉर ओनरशिप रिव्हू ऑफ अ गेम चेंजर!

होन्डा सिटीला नाव ठेवायला जागाच नाही.<<<

पेट्रोल गाडी आहे. हे मोठ्ठं नाव ठेवणं आहे.
>>>>
आजच्या इ. टी. मध्ये मस्त रिव्ह्यु आला आहे पेट्रोल आणि डिझेल गाडीचा.

डिझेल गाडी वापरून पाहिली असेल, तर तुम्ही परत पेट्रोलचं नांव घेणार नाही ही पैज.>>
अगदी अगदी! माज्याकडे पण डिझेल गाडीच आहे! Happy

आमचा एक फ्यामेलीफ्रेन्ड ऑडीची कुठलीतरी पेट्रोल गाडी वापरत होता. ड्रायवर असुनही ट्राफीक मुळे कंटाळलेला. आता त्याने ऑडी वडलांना दिली. स्वता: निसान मयक्रा डिझेल चालवतो. जबरदस्त खुश आहे.

दिल्लीला ऑटो एक्सपो सुरू झाला आहे.
सुझुकी आणि फोर्ड ने कॉमप्याक्ट एस यु व्ही लॉन्च केली. बजाज ची रि गाडी पण आली आहे.
आज कदाचीत टाटा सफारी मेर्लीन लॉन्च होइल.

पण मी तर वाट बघत आहे यामाहाच्या स्कुटरची. आज टाइम्स मध्ये जाहिरात पण होती. खुप दिवस वाट पहात आहे.

फोर्ड ने कॉमप्याक्ट एस यु व्ही लॉन्च केली >> एकदम सही असणार आहे ही गाडी. १० लाखाच्या सेगमेंटमध्ये येणार्‍या या फिएस्टा बेस्ड एसयुव्हीची मीही वाट बघतो आहे. एसयुव्हीची हौस आहे, पण सिटी नेव्हीगेशन, बल्की साईझ, कमी मायलेज, जास्त किंमत इ. मुळे घेता येत नाहीये- हा प्रॉब्लेम असणार्‍यांनी नक्की बघा ही गाडी. मिडसाईझ सेदान कार आणि इकॉनॉमी एसयुव्ही- यांचे क्रॉसओव्हर. ही गाडी ट्रेंडसेटर ठरेल.

बजाजच्या नवीन गाडीने (आरई-६० असे काहीसे नाव आहे) नॅनोपेक्षा कमी किंमत आणि नॅनोपेक्षा जास्त मायलेजचा दावा केला आहे.

केदार, डिझेल सनी घेतलीस का?

आरे वा अल्पना फोटो अपडेट्स टाक हा इथे.

बजाजच्या नवीन गाडीने (आरई-६० असे काहीसे नाव आहे) नॅनोपेक्षा कमी किंमत आणि नॅनोपेक्षा जास्त मायलेजचा दावा केला आहे. >>
हो पण आज चक्क रिक्षाशी तुलना केलेला लेख ई टी मध्ये वाचला.

साजीरा यामाहाची सर्वीस कशी आहे?

केदार, डिझेल सनी घेतलीस का? >>> नाही रे. एक्झ यु व्ही ५०० अर्थातच डिझेल.

हो पण आज चक्क रिक्षाशी तुलना केलेला लेख ई टी मध्ये वाचला. >>> हो ती इनबिल्ट मिटर घेऊन येते. तीन चाकी रिक्षे ऐवजी चार चाकी टॅक्सी असे प्रपोझिशन आहे.

Pages