कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निवांत पाटील, रोजचे 150 KM असतील तर SUV योग्य पर्याय आहे.आणखी बजेट वाढवुन स्कॉर्पियो वगैरेच्या रेंजमधे बघा.

SUV योग्य पर्याय आहे>>> ज्या रस्त्यावर चालवायची आहे त्याचा अ‍ॅव्ह्रेज स्पीड आहे ४०-४५ (जव्ळ जवळ ७३% अंतर, २७% रस्ता हायवे आहे). खुप गर्दीचा. त्यामुळे SUV पेक्षा छोटी कार बरी पडेल.

सिटी - १९-२० (ऐ सी) हायवे - २२ देते (लागेल तसा ऐ सी)..>> मग ठिक आहे. २० छान आहे. कोणतं मॉडेल आहे आपलं. आणि काही प्रोब्लेम आहेत का? धन्यवाद Happy

Ford Figo top end laa hi rear power windows yet naahit aataa...>>> होय Sad

मारुतीची स्विफ्ट डीझायर (Dzire) >> फारएण्ड नवीन मॉडेल पाहिलेस का त्यांचे? मी अ‍ॅड पाहिली.
काल स्विफ्ट डीझायर आणि निसान सनीची तुलना दाखवत होते एका कार्यक्रमामध्ये. Uhoh

Ford Figo top end laa hi rear power windows yet naahit aataa>> त्याचे कारण ते असे देतात, लोकांना इमर्जंसीमध्ये गाडीतून बाहेर पडता यावे म्हणून असे केले आहे.

Dzire ऑड लुकिंग आहे पण गाडी म्हणून चांगलीच आहे. फक्त डिलेव्हरीसाठी खूप वेटिंग असणार कारण ती फारच फेमस आहे. Happy

६ लाखाच्या रेंज मध्ये मान्झाचा पण विचार करावा. आत बसल्यावर खरच खूप मोठी गाडी वाटते. इंजिन तशेही फियाटचेच आहे.

एकत्र कुटुंब (५-६ पेक्षा जास्त सभासद) असलेल्या लोकांसाठी महिंद्राने 'नवीन xylo' चा एक चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

आधीच्या xylo मध्ये गाडीचे बाह्य स्वरूप (साधारण MUV टाईप) व महामार्गावर वेगात असताना गाडीची हाताळणी हे दोन मुख्य इश्यू होते व दोन्ही सोडवण्यात महिन्द्राला बर्याच प्रमाणात यश आले आहे असे दिसते.

http://www.mahindraxylo.co.in/default.aspx?mx=xylo

छायाचित्रात तर गाडी उत्तम दिसतेच आहे (XUV चा महिंद्रा डीझाइन टीम वर बराच प्रभाव टिकून आहे), किंमतही इनोवाच्या ( दोन्ही गाड्या एका सेग्मेंट मध्ये असल्याने तुलना ) मानाने स्पर्धात्मक आहे, ७.३७ ते १०.२५ लाख.

फोर्ड फिगो कॅन्सल केली...... सगळ छान जमुन आले होते, पण ....
गाडी सधारण पणे २ वर्षासाठी घ्यायची आहे, फोर्ड्ची रीसेल व्हॅल्यु खुपच कमी आहे हे खुपच लवकर लक्षात आलं Happy
मित्राच्या म्हणण्यानुसार ६.५ मधले २.५ ते ३ तरी नक्किच कमी होतील (७०००० किमी साठी). माहितगारांनी थोडी माहिती द्यावी. माझ्या हिशोबाप्रमाणे १०% (वार्षिल) डिप्रिसिएशन ग्रुहित धरले होते.
आता TOYOTA बघणे सुरु आहे... पण बहुतेक गाडी टाटा/मारुती वर येउन थांबेल असे वाटते. Happy

फोर्ड चा मेंटेनन्स जास्त असतो असे साधारण गृहीतक बाजारात आहे त्यामुळे रिसेल व्हॅल्यु कमी येते. जुन्या फीएस्टा च्या बाबतीत हे खरे होते, फिगो अजून रिसेल मार्केट मध्ये विशेष दिसत नाही.

फिगो विषयी पुनर्विचार करणार असाल तर मग मारुती रिट्झ VDI हादेखील एक पर्याय आहे (मारुतीची रिसेल व्हॅल्यु सगळ्यात बेस्ट!). फक्त तुम्हाला गाडीच्या रिअर लुक्स बद्दल मनाची समजूत घालावी लागेल. Happy
टाटा इंडिका विस्टा देखील छान गाडी आहे, परंतु रिसेल व्हॅल्यु मारुती एवढी नाही.

टोयोटा लिवा(डीझेल) ची ऑन रोड किंमत पुण्यात ६,२५,००० रुपये पर्यन्त आहे, यात पॉवर विंडोज, पॉवर स्टेरिंग वगैरे आहेच शिवाय ABS देखील आहे.
बजेट ६ लाखाच्या वरती थोडेसे वाढवू शकलात तर हा सर्वोत्तम पर्याय वाटतो, परंतु गाडीला किमान ३ महिने वेटिंग आहेच.

मला हुन्दाई गेट्झ १.१ जीएलएस, जुलै २००७ (४५,००० किमी), फुल लोडेड २ लाखात मिळत आहे. मालक ओळखीचे आहेत व गाडी एकहाती वापरली आहे. ही गाडी घेणे योग्य होईल का? कारण या गाडीचे उत्पादन आता होत नाही.

ह्युंडाई इऑन (मॅग्ना) फायनल करतो आहे, गारवे ह्युंडाईकडे. अजून बुकिंग केलेले नाही. ह्या डिलरचा रिपोर्ट कसा आहे?
आधी कुंदन ह्युंडाईकडे घ्यायचा विचार होता पण मग नेटवर त्याचे बेक्कार रेप्युटेशन वाचून विचार बदलला

हाय एवरिबडी.

स्कॉर्पिओ अगदी मक्खखन गाडी आहे बसायला, अन चालवायला ही असेल पण तिची उंची जास्त आहे. मागे बसताना उतरताना घरातील ४० + पब्लिकला जरा त्रास होण्याची शक्यता आहे. मी दोनदा चढ उतार केली अन गुढघा दुखायला लागला.

बरे ते जौदे. एविएटर घेणारच आहे. पन त्या ऐवजी महिन्द्रा दिओ घेउ का? काय रिपोर्ट?

स्कॉर्पिओ अगदी मक्खखन गाडी आहे बसायला, अन चालवायला ही असेल >>> अगदी अगदी. एकदम रॉयल फिलींग येते गाडी चालवतांना. पिकअप एकदम मस्त. १६०/१७० च्या स्पिड ला पण स्टेबल रहाते गाडी (मुम्बई - पुणे एक्सप्रेस वे वर). मी मागच्या जुलै मधे घेतली स्कॉर्पिओ व्हिएलक्स. एकच महिना चालवली आणी मग इकडे अफ्रिकेत आलो. आता अशिच धुळ खात पडलिय गाडी घरी Sad

मला आमची उत्तम स्थितीमधील ह्युंदाई I-20 (with Sunroof) त्वरित विकणे आहे. कोणाला अधिक माहिती हवी असल्यास मला विपु करा.. Happy

होंडा ब्रिओ (SMT) बुक करायचा विचार आहे. SMT आणि S(O)MT मध्ये फक्त एअरबॅग्जचा काय तो फरक आहे. (S(O)MT मध्ये एअरबॅग्स आहेत) तेवढ्यासाठी किंमतीत ५०००० रुपयांचा फरक पडतोय. कुणी वापरली आहे का ब्रिओ? कशी आहे?

कोणती गाडी घ्यावी या स्टेपला पोचायच्या आधीचा प्रश्न विचारतेय.

माझ्या वडिलांची जुनी झेन आहे. जवळजवळ १५ वर्ष झालेली आहेत/ होतायत. गेले चार वर्ष ती मी पुणे-मुंबई ताबडतेय. इंजिन फर्स्टक्लास आहे. गाडी पळते उत्तम. जेव्हा ती गाडी पुण्यात बसून होती तेव्हा बॉडीची कंडिशन उत्तम होती पण चार वर्षात भरपूर वापरलीये हायवेला. बाकी अवयवांमधे बारीक सारीक कामं दर दोन-तीन महिन्यांनी निघत असतात.

नवरा म्हणतोय ती काढून नवीन घ्यायला हवी. आत्ताच काढली तर किंमत पण बरी येईल.
आमचा नेहमीचा गॅरेजवाला जो आहे त्याने गेल्यावर्षी सांगितले होते की बदलायची गरज नाही. माझा अर्थातच नवर्‍यापेक्षा गॅरेजवाल्यावर विश्वास आहे ( Wink ). पण पर्वा मुंबईहून पुण्याला येताना पुण्यात पोचल्यावर अ‍ॅक्सेल तुटला. गाडी अर्थातच रस्त्यात ठप्प. हे झाल्यापासून मी आणि बाबा पण विचार करतोय गाडी बदलायचा. पण परत इंजिन उत्तम आहे इत्यादी गोष्टी सुचतायत.

अजून संभ्रम आहे पण. हल्ली २-४ वर्षात गाड्या बदलल्या जाण्याचा जमाना आहे ते बघता माझा प्रश्न तर हास्यास्पदच वाटेल. पण तरी.. मला जरा इथल्या तज्ञांनी सांगा की गाडी बदलण्यासाठी काय डिसायडिंग फॅक्टर्स असावेत? बदलावी की अजून न बदलावी?

होंडा ब्रिओ (SMT) बुक करायचा विचार आहे. SMT आणि S(O)MT मध्ये फक्त एअरबॅग्जचा काय तो फरक आहे. (S(O)MT मध्ये एअरबॅग्स आहेत) तेवढ्यासाठी किंमतीत ५०००० रुपयांचा फरक पडतोय. कुणी वापरली आहे का ब्रिओ? कशी आहे? >>
आम्ही ह्या दीवाळी ला होंडा ब्रिओ (S(O)MT ) घेतली .. मस्त आहे. Avg ही छान देतेय , सुरुवातीला थोड कमी होत, आता १४-१५ देते.

गाडी बदलण्यासाठी काय डिसायडिंग फॅक्टर्स असावेत? >> तुझ्या केसमध्ये 'गाडीला १५ वर्षे झाली आहेत' हा सर्वात मोठा डिसायडिंग फॅक्टर आहे. बदलायलाच हवी.

पंधरा वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्या वापरू नका, असं सरकार आणि वाहतुक खाते, इंशुरन्स कंपन्यांसारख्या संस्था वारंवार आवाहन करत असतात. १५ वर्षांपेक्षा जुन्या गाडीला माझ्या माहितीप्रमाणे नव्याने पासिंग करून घ्यावे लागते. टॅक्सवर भरपूर लोडिंग लागते. शिवाय इंशुरन्सच्या अन्युअल प्रिमियमवरही भरमसाठ लोडिंग लागते. (याबाबत नक्की माहिती काढून लिहितो. किंवा कुणाला माहिती असेल तर कृपया लिहा.)

नैतिक जबाबदारी म्हणून तरी १५ वर्षांपेक्षा जास्त जुनी गाडी वापरू नये. तरीही वापरायचीच असेल, तर आरटीओ, इंशुरन्सच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून मगच वापरावी. पण मग सुरक्षिततेचा उपाय म्हणून ती लांबच्या प्रवासाला, हायवेवर वापरू नये.

(अवांतर- मित्राची १० वर्षे जुनी झेन(एसी, पॉवर स्टिअरिंग, सर्व पॉवर विंडोज्) नुकतीच ८०००० ला विकली गेली. थोडी बरी किंमत मिळायची असेल, तर तुझ्या गाडीची १५ वर्षे पूर्ण होण्याच्या आत विक.)

विशाल, एअरबॅग्जसाठी ५०००० जास्त हे बरोबर वाटते आहे. आपल्या सुरक्षित असण्यापुढे ही किंमत काहीच नाही. (मोठ्या रस्त्यांवर आणि जास्त वेगात स्मॉल कार्स ह्या सेदानच्या तुलनेत अशाही थोड्या कमी सुरक्षित असतात, त्या दृष्टीने एअरबॅग्ज आवश्यक वाटतात.)

बाकी ब्रिओ मी वापरलेली नाही. स्मित_ जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील.

ह्म्म पटतंय. येत्या दोन महिन्यात ही काढून टाकणे, नवीन घेणे करायला हवे. आता सगळा बाफ वाचून काढते आणि मग प्रश्न विचारते Happy

Pages