कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@नीधप- तुम्ही बजेटच्या आधी कार घ्यायला हवी होती. आता सगळ्यांनीच किंमती वाढवल्यात. Happy

माझा सल्ला-

१. बजेट ५ च्या आत.
६. मागचा वायपर, डिफॉगर असायला हवाय.

याची बेरीज अशी होते की तुम्हाला पेट्रोल हॅच घ्यावी लागणार.

राईड क्वालिटी, हँडलिंगला अग्रक्रम आणि लुक्स तिसर्‍या स्थानावर म्हटल्यावर मला 'होन्डा ब्रिओ' हाच पर्याय सुचवावासा वाटतो. माझ्या मते हा सर्वोत्तम पर्याय आहे. टोयोटा लिवा आणि हुंदाई आय-टेनसुद्धा त्याच स्लॉट्मधे येते पण हँडलिंग वगैरेवर तडजोड करावी लागेल.
ब्रिओ नवी आहे, टाईम्-टेस्टेड वगैरे पाहिजे असल्यास स्विफ्ट/रिट्ज पेट्रोलचे टॉप एंड मॉडेल घ्यावे. बजेट थोडाफार मागेपुढे होईल.

कार घेतली की इकडे कळवा.

बाय द वे, सेनापतींचा रथ टेम्प्टिंग आहे. Happy

@नीधप- तुम्ही बजेटच्या आधी कार घ्यायला हवी होती. आता सगळ्यांनीच किंमती वाढवल्यात. <<
काय करणार २८ तारखेला आधीच्या गाडीने 'आता पुरे' असं सांगितलं Happy

४-५ मधे इंडिका उत्तम कार आहे असे मला वाटते. व्हिस्टाचा अ‍ॅव्हरेज जबरदस्त आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्पेअर्स व मेन्टेनन्स खूपच कमी आहे.

डिझेल - पेट्रोल व रनिंगचा हिशोब कधीही कसाही करून पेट्रोल स्वस्त ठरवून दाखवता येते.
हे संपूर्णपणे चूक आहे असे मला वाटते.
पेट्रोल व डिझेल रोज महाग होत जाणार आहेत. पेट्रोल या वर्षीच शंभरी पार करील असे वाटते. काहीही झाले तरी पब्लिक ट्रान्स्पोर्ट व गुड्स ट्रान्स्पोर्ट डिझेलवर असल्याने डिझेल स्वस्तच ठेवावे लागेल.
वरून एका पुणे मुंबई ट्रिपला ८०० रु खर्चायचे, की १७५०?
>>
पुणेमुंबईपुणे- अंदाजे ३५० किमी. या फेरीची अंदाजे किंमत बघा.
डिझेल कार- ८३० रु.
पेट्रोल कार- १७५० रु.
<<
वरून टोल असतो. इतर फुटकळ खर्च असतातच. डिझेल गाडी असली तर २ लोक एस्टीच्या तिकिटाच्या किमतीत जाऊन येऊ शकतात. अन हेच महत्वाचे ठरते.

गाडी कोणतीही घेतली तरी ती रोखीने कुणी घेत नाही. बँक कर्जाच्या व्याजात आपल्याला किती लुटते याचा हिशोब कोण करील? डेप्रिसिएशन करून टॅक्स वाचवून टोटल सेव्हिंग किती याचा हिशोब कोण करील?

मी स्वतः टाटाच्या गाड्या वापरतो आहे. गेली १०-१२ वर्षे. फ्री सर्विसिंग संपल्यानंतरची मांझाची सर्विसिंग २५० रू. मधे झाली कालच. अ‍ॅम अ‍ॅबसोल्यूटली हॅपी.

निधप >>> रिट्झ स्विफ्ट पेक्षा छान आहे चालवायला टे स्ट ड्राइव्ह घ्याच . सद्य स्थितीत डिझेल गाडी मस्त , बजेट नुसार पण.

मी बरीच गणितं केली...
डिझेल गाडीची किंमत जनरली ७० हजार ते १ लाखाने जास्त असते पेट्रोल/ सीएनजी/ड्युअल पेक्षा. तेवढे लोन जास्त आणि व्याज जास्त. त्यामुळे इव्हन आउट व्हायलाच ५-७ वर्षे जाणार. कारण माझं रनिंग वर्षाला ६-७००० पेक्षा जास्त होणार नाहीये. अगदी ७ नाही तरी ४ तर किमान लागणारच.

या सगळ्यातून ड्युअल गाडी घ्यायची आणी नॉर्मली गॅसवर चालवायची, अगदीच कुठे मिळालं नाही तर तेवढ्यापुरतं पेट्रोल हे जास्त कॉस्ट इफेक्टिव्ह वाटतंय.

ड्युअल गाडी घ्यायची आणी नॉर्मली गॅसवर चालवायची, अगदीच कुठे मिळालं नाही तर तेवढ्यापुरतं पेट्रोल हे जास्त कॉस्ट इफेक्टिव्ह वाटतंय. >> नी मला चारचाकीतलं ठार काही कळत नाही, पण ड्युअल गाडी घेण्याची आयडीया फार कन्व्हिन्सिंग आहे.

लिहायच राहुन गेलं इथे. शेवटी Tata Indica Quadrajet limited edition nov 2009 गाडी घेतली. ४.५ लाख. गाडीचे ईंटेरीअर चांगले आहे, गाडी अजुन्ही स्मुथ आहे. टायर्स नविन आहेत. लिमिटेड एडिशन असल्यामुळे हायर एंड्चे सर्व फिचर्स आहेत. २०- २२ अ‍ॅव्हरेज पडते (१००% एसी).
सेकंड घ्यायचे कारण माझा खुप जुना दोस्त तो बिझिनेस करतो. त्याने सर्व काही चेक करुन मग घेतली. (२ वर्षासाठीच हवी होती)

सेकंड गाडी घेणार्यांसाठी रनिंग किती झालेय ते बघुन काही फायदा नाही. ९०० रु. ते सेट करुन मिळते हवे त्या किमी ला. Happy

डिझेल स्वस्त पडतं सोडून इतर काय फायदे आहेत ज्यासाठी विचार करावा?>>>> तोच खुप मोठा फायदा आहे. रनिंग खुप जास्त असेल तर खुप फरक पडतो, मेंटेनन्स धरुन सुध्हा.

बुलेट स्टील वेटींग... ५ महिने होउन गेले... Uhoh

काय करणार २८ तारखेला आधीच्या गाडीने 'आता पुरे' असं सांगितलं
>>>>>>>>>>

नीरजा, अजूनही तुम्हाला मारुती शोरूममध्ये जुन्या रेट्सने गाडी बुक करता येईल..... टाटा विस्टा केलीत तर डिस्काऊंट चांगलं आहे... पण मुळात टाटा घ्यावी का हे ठरवा. मारुती बेस्ट.

डोंट गो फॉर ब्रिओ.... Sad

या सगळ्यातून ड्युअल गाडी घ्यायची आणी नॉर्मली गॅसवर चालवायची, अगदीच कुठे मिळालं नाही तर तेवढ्यापुरतं पेट्रोल हे जास्त कॉस्ट इफेक्टिव्ह वाटतंय.
>>>>>>

नीधप, ड्युएल गाडी घ्यायचा प्लान असेल तर गो फॉर मारुती वॅगन आर. स्पेस जास्त, अ‍ॅव्हरेज पण चांगलं आहे. आता डिस्काऊंटही चांगलं देतायत ड्युएलवर.

रंनिंग जेमतेम ५०० किमी प्रतिमास पलिकडे जात नाही. तेही दर महिन्याला नाही. त्यामुळे आत्ता लाखभर जास्त द्यायचे फ्युएलमधे वाचणार म्हणून हे जमत नाहीये. ते जास्तीचे गेलेले लाख आणि फ्युएलमधे वाचलेले हे इव्हन व्हायला किमान ४-५ वर्ष तरी जाणारच ना.

गो फॉर मारुती वॅगन आर. <<
हो तोच विचार चालू आहे. पण या महिन्याच्या अखेरीपर्यंत काही करता येण्यासारखे नाही काही घरगुती अडचणींमुळे.

नी ताई,
कितीही रनिंग असलं तरी ते रनींग आहे. प्रत्येक वेळी पैसे मोजणार आहात. रोज.
गाडी एकदा घेतली की फुकट झाली हा हिशोब करा. पेट्रोल गाडी ५ लाखात मिळते अन विस्टा पण ५ लाखात. मग कुठे फरक पडला? मी सांगतो. इंडिका विकायला गेलात अन सँट्रो आय३०. कुणाला किम्मत जास्त येणारे? रस्त्यावर बघा. जास्त काय दिसते? पुणे/मुंबई सोडली, तर इंडिका ७ अन ३ वेगळ्या असे दिसते हायवे वर. १ लाखाचं पेट्रोल हा हिशोब करूच नका. अल्टिमेटली चुकीचा आहे. प्रत्येक वेळी पंपावर पाकीट काढताना फार जिवावर येते. अन हालही पडतात. तिकडे हप्ता सुरूच असतो. पेट्रोल असो की डिझेल कार. हप्ता सुरु अन पेट्रोल ची किम्मत वाढते. आजच कंपनी ९ रुपये + वाढ मागते आहे अशी बातमी आहे न्युजला.
मी वर हिशोब लिहिला आहे.
विकत घेतानाचा हिशोब 'एक्षपर्ट्स' करतात. रिसेल चा कोण करेल? आपले काका? डिझेल गाडी जास्त पैका देते रीसेल ला. अन जास्त टिकते पण.
बघा.
पूर्वी असायचा तसा डिझेल गाडीला आजकाळ मेन्टेनन्स नसतो. अँम्बेसॅडर च्या मेन्टॅलिटीतून लोक बाहेर यायला तयार नाहीत. टाटाने क्रिस्लर विकत घेतली, फियाट च्या लिनिया अन पुन्टो ला तेच इन्जिन लाऊन टाटाच विकत असतील तरी आम्हाला 'इन्डियन' गाडी आवडत नाही. ही आमची अन आमच्या 'एक्ष्पर्ट्स' ची मेन्त्यालिटी आहे.
धन्य वाद!

रच्याकने.
ग्यासची गाडी घेऊ नका.
लै हौस असेल अन फेकायला पैसे असतील तर ब्याटरी वाली गाडी घ्या. होण्डाने हायब्रीड काढली होती मागे. इलेक्ट्रिसिटि ही अंतिमतः स्वस्त ठरेल.
गॅसची नेहेमी अन कधी कधी पेट्रोल असे चालत नाही. काळ्याबाजारात डोमेस्टिक सिलेंडर मधून ग्यास घ्यायची धमक / निर्लज्जपणा लागतो. ग्यासवर चालणारी गाडी पेट्रोलवर अ‍ॅव्हरेज देत नाही. ८-१० मॅक्स. सगळीकडे ग्यासचे पंप नाहीत.

(इब्लिस कॉमेन्टः गावातच जास्त रनिंग असेल तर एक डिझेलची इंडीका अन एक सायकल हे कॉम्बो मस्त होईल ;))

>>
नीधप | 3 April, 2012 - 21:22
रंनिंग जेमतेम ५०० किमी प्रतिमास पलिकडे जात नाही. तेही दर महिन्याला नाही. त्यामुळे आत्ता लाखभर जास्त द्यायचे फ्युएलमधे वाचणार म्हणून हे जमत नाहीये. ते जास्तीचे गेलेले लाख आणि फ्युएलमधे वाचलेले हे इव्हन व्हायला किमान ४-५ वर्ष तरी जाणारच ना.
<<
एक लाखाला हजार रुपये हप्ता प्रतिमास लागतो व्याजा सकट.
एक महिन्यात एकदा मुंबईला गेलात, तरी
>>
पुणेमुंबईपुणे- अंदाजे ३५० किमी. या फेरीची अंदाजे किंमत बघा.
डिझेल कार- ८३० रु.
पेट्रोल कार- १७५० रु.
<<
९२० रुपये वाचलेत Wink इथेच. डायरेक्ट. (गाडी फुकट आहे. रिसेल चा हिशोब केला तर. चांगली सायकल सुमारे ३ हजाराला मिळते. वर कुठे तरी झेन ८ हजारात विकली असे वाचले..)
हिशोब करता येतो का? बघा प्रयत्न करून.....

नी,
माझ्या कडे रीट्झ डॅझल पेट्रोल आहे. उत्तम गाडी. मला तर स्विफ्ट पेक्षा चांगली वाटली कारण गाडीची उंची. गाडी लिमिटेड एडिशन (features aded over VXI model) आहे. फक्त त्यामध्ये रिअर वायपर नाहिये. मला मायलेज १४ वगरे मिळत होतं. तू डिझेल व्हर्जन चा विचार करु शकतेस.
धन्यवाद Happy

बुलेट स्टील वेटींग... ५ महिने होउन गेले.>> त्यांची प्रॉडक्शन कपॅसिटी अतिशय वाइट्ट आहे.
एका मित्राने जो तिथे काम करत होता त्यानेच सांगितलय. पण येत्या एक वर्षात त्यांचा नवीन प्लॅण्ट सुरु होइल तेव्हा कपॅसिटी वाढलेली असेल.

हिशोब करता येतो का? बघा प्रयत्न करून.<<<
याही बाफवर वैयक्तिक टिकाटिप्पण्या केल्याशिवाय राहवत नाही का इब्लिस?
कृपया तुम्ही मला सल्ले देण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका.
बाकीचे लोक आहेत.

नी मॅम.
चुकलं.
जरा जोशात टायपून गेलो. डिझेल प्रेम नडलं. तुमच्या साठी पर्सनल नव्हतं ते. असो.
मनापासून माफी मागतो. जमल्यास देऊन टाका.

पुढील वाक्ये इथे बोलत नाही. इब्लिसपणाच्या माझ्या व्याख्येत बसत नाहीत.

न राहवून इतकेच म्हणतो:
आपण "पब्लिक" धाग्यावर सल्ला विचारला होतात. अमुक ने च द्यावा असे स्पेसिफाय आपण केले नव्हतेत. म्हणून अनुभवातून बोललो. येथील प्रचलित पेट्रोल कार धारक 'सभ्य' लोकांच्या विचारधारेविरुद्ध असेल कदाचित. वर 'भावना दुखावल्या'बद्दल माफी मागितली आहेच.
धन्यवाद!

Lol
बाकीचे लोक आहेत.>>>> ज्या मायबोलीकरांनी गाडी वापरुन अनुभव लिहीलाय त्यावर जास्त विचार करावा शेवटी अनुभवाचे बोल, मदत नक्कीच होइल. ( हे सर्वांसाठी Happy )

<< गॅसची नेहेमी अन कधी कधी पेट्रोल असे चालत नाही. काळ्याबाजारात डोमेस्टिक सिलेंडर मधून ग्यास घ्यायची धमक / निर्लज्जपणा लागतो. ग्यासवर चालणारी गाडी पेट्रोलवर अ‍ॅव्हरेज देत नाही. ८-१० मॅक्स. सगळीकडे ग्यासचे पंप नाहीत. >>

रॉन्ग डिटेल्स.
गॅस म्हणजे LPGच असे नव्हे.

LPG वर साधारणत: ३ ते ३.५ रु प्र किमी पडते.
CNG वर २ ते २.५ रु प्र किमी.
डिझेल ३.५ ते ४.५ रु प्र किमी
पेट्रोल ५ ते ५.५ रु प्र किमी.

माझ्याकडे गॅस (CNG) + पेट्रोल कॉम्बो आहे. SWIFT LXI गॅसवरती २० आणि पेट्रोलवरती १३ अ‍ॅव्हरेज देते. पंपस् ची लिस्ट उपलब्ध आहे.

होय, डिक्की संपली. Sad पण हे नंतर कन्व्हर्ट केल्यामुळे. कंपनी फिटेड गाड्यात डिक्की स्पेस थोडीच कमी होते.

माझ्याकडे गॅस (CNG) + पेट्रोल कॉम्बो आहे. SWIFT LXI गॅसवरती २० आणि पेट्रोलवरती १३ अ‍ॅव्हरेज देते. पंपस् ची लिस्ट उपलब्ध आहे.>>>> पिक अप मध्ये तसेच मेंटनन्स मध्ये काही फरक पडतो का? अन गॅस टु पेट्रोल चालु गाडी स्विच होते का? कळवावे धन्यवाद Happy

हल्लीच बसवलाय त्यामुळे मेन्टेनन्सची फारशी कल्पना नाही, पण ईंजिन ऑईल थोडे लवकर बदली करावे असे कळले.

चालू गाडी गॅस टू पेट्रोल स्वीच ऑव्हर होते.

Pages