कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आऊटडोअर्स, भारताबाहेरच्या/भारताबाहेर गाड्या कधी चालवल्या नाहीत. पण आजकाल सगळ्या कंपन्या एकच मॉडेल सर्व जगभर लाँच करायला लागल्या आहेत. पण असं असलं तरी गाडी घेण्याची भारतातली आणि भारताबाहेरची निर्णयप्रक्रिया- यांत अजूनही जमीन-अस्मानाचा फरक आहे.

हो साजिरा बरोबर आहे ते. मला इथे (यु.ए.ई.) मध्ये गाडी घ्यायचीये, त्यामुळे पर्याय शोधायला सुरुवात करायची आहे.

गाडीचं रिपासिंग १० वर्षांनी करावे लागते.. त्यामुळे नीरजा तुला गाडी विकताना रिपासिंग करुन विकावी लागेल किंवा जो घेईल त्याला ट्रान्सफर करुन घेताना ते सोपस्कार पार पाडावे लागतील..

ओके.. तर गाडी बदलायची आहे येत्या २ महिन्यात. ऑप्शन्स सुचवा.
माझी स्पेसिफिकेशन्स
१. बजेट ५ च्या आत.
२. रनिंग साधारण ४०% सिटीमधे आणि ६०% हायवेला.
३. पार्किंग च्या दृष्टीने सोपे असावी. त्यामुळे छोटी गाडी हे आलेच ओघाने. त्यात मागचा आरसाही असेल तर अजून बरे.
४. ही नवीन गाडी किमान ५ आणि कमाल १० वर्ष वापरली जाईल.
५. पेट्रोल कि डिझेल कि गॅस कि कॉम्बो हे काही ठरवले नाहीये अजून.
६. मागचा वायपर, डिफॉगर असायला हवाय.
७. माझे पाठीचे बरेच प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे ड्रायव्हिंग सीटला बसल्यावर खड्ड्यात तिरके बसल्यासारखे वाटायला नकोय (झेनला होते तसे). सीटची बॅक पूर्ण सरळ व्हायला हवी. उंच माणसाला ड्रायव्हिंग करताना लेगरूम व्यवस्थित हवी.

पसंतीक्रम किंवा स्पेसिफिकेशन्स मधला क्रम म्हणायचे तर
राइड क्वालिटी व हॅण्डलिंग, फ्युएल एफिशिअन्सी, किंमत, मेंटेनस फ्रेंडलीनेस, सेफ्टी यांना अग्रक्रम.
दुसर्‍या स्थानावर उंची आणि साइझ, मॉडेल बाजारात येऊन झालेली वर्षे, आतली स्पेस इत्यादी.
तिसर्‍या स्थानावर लुक्स आणि स्टाइल, स्लीकनेस इत्यादी.

थोडक्यात आखुड शिंगी-बहुदुधी अशी सुचवा Happy

कोणती गाडी घ्यायची हे आपापले ठरवावे पण बनवणार्‍या कंपनीची दिशा काय आहे ते ही एकदा पाहून घ्यावे.
अमेरिकी (ख्रायस्लर? की जी एम?) सारख्या कंपन्यांची अशी पॉलिसी होती की, गाडी पाच वर्षांनंतर बदलावीच लागली पाहिजे. मग ती ठप्प झालीच पाहिजे. असे ऐकले आहे.
निर्णय तुम्ही घ्या!

माझे अनुभव
जपानी - होंडा अ‍ॅकॉर्ड, होंडा सिव्हिक भरपूर वापरली - अनुभव उत्तम आला आहे. टोयोटा - अतिशय टिकाऊ - सध्या वापरात.
युरोपीय - फियाटने जाम दगा दिला आहे!
अमेरिकी - फोर्ड फिगो चालवली - चांगली वाटली आहे. (वापरली अशी नाहीये!)
भारतीय - महिंद्रा - भरपूर वापरली आहे - बिनधास्त घ्या असे म्हणेन!

I-20 petrol with 5 star safety..
Excellent condition Berry Red colour
Engine - 1.2 (o) with sunroof & 6 air bags.
Nov 2009 registration @ Thane.
Power windows
Power Mirrors
ABS
Power staring
Running 24,000 kms
Servicing done every 3 months since purchase.

खरच गाडी घ्यायची असेल <<<
खोटी कशी घेणार? Happy
या दोन महिन्यात व्यवहार पुरा करून नवीन गाडी घेऊन मुंबईस जाणे आहे.

मला आत्ता घेतली की मग एवढ्यात काढायची नाहीये त्यामुळे सेकण्डहॅण्ड नको वाटते. पण समजा घ्यायची असेल तर काय काय बघावे?

पण एक प्रामाणिक सल्ला देतो.. जर तुझे वरचेवर मुंबई - पुणे जाणे येणे असेल तर महाग पडते (किमान मला तरी) ह्यापेक्षा अश्या रनिंगसाठी डीझेल बरी.
पेट्रोल आता परवडत नाही... Sad

सेनापती... दीडच वर्षाच्या मानानी रंनिंग जरा जास्त वाटतय... लांबच्या ट्रीपा जास्त केलेल्या दिसताहेत..

वोक्की.. मग ठिक आहे... म्हणजे अ‍ॅव्हरेज रनिंग आहे... एकदम कंडिशन मधे असेल इंजिंन...

रोजचं रनिंग जर ६० किमी पेक्षा जास्त असेल तर डिझेल उत्तम..

ते इथे नको... ज्याला विकत घ्यायची असेल त्यालाच कळवा... इथे फक्त विकायची आहे एवढेच पुरेसे आहे..

नीरजा इतका डिटेलवार परफेक्ट प्रश्न अख्ख्या बाफात कुणी विचारला नसेल. Proud

सगळ्यात आधी डिझेल-पेट्रोलबाबत.

पेट्रोल आणि डिझेल कारचे मायलेज हिशेबासाठी घडीभर अनुक्रमे १४ आणि १९ धरू. पेट्रोल आणि डिझेलची एका लिटरची किंमत अनुक्रमे ७५ आणि ४५ रु. पकडू.
पुणेमुंबईपुणे- अंदाजे ३५० किमी. या फेरीची अंदाजे किंमत बघा.
डिझेल कार- ८३० रु.
पेट्रोल कार- १७५० रु.

आता महिन्यातल्या सरासरी रनिंग बद्दल विचार करू. शहरात आणि हायवेला ५०%-५०% रनिंग होईल असं पकडू. अशा रनिंगसाठी पेट्रोल आणि डिझेल कार्स अनुक्रमे १२ आणि १६ असं मायलेज देतात असं समजू. (असा माझापण अनुभव आहे.)

१) महिन्याचं रनिंग- २०० किमी
पेट्रोल कार- १२५० रु., डिझेल कार- ५६० रु.

१) महिन्याचं रनिंग- ५०० किमी
पेट्रोल कार- ३१२५ रु., डिझेल कार- १४०० रु.

२) महिन्याचं रनिंग- १००० किमी
पेट्रोल कार- ६२५० रु., डिझेल कार- २८०० रु.

आता पुढे ठरवा. पण पेट्रोल/डिझेल या प्रश्नाचा फारसा प्रॉब्लेम नसेल तर मग सोपं आहे. पेट्रोल गाडी डिझेल गाडीपेक्षा साधारण २० टक्क्याने स्वस्त असते.

***

रियर फॉग वायपर्स सहसा कुठच्याही गाडीच्या फक्त टॉप एंड मॉडेललाच येतात.

कितीला विकायची आहे ते पण लिहा सेनापती.
>>> इथे नको.. ज्यांना अधिक माहिती हवी त्यांनी मला संपर्क करायला हरकत नाही. मला १ महिन्याच्या आत गाडी विकायची आहे.

शक्यतो ओन्लाईन किमती बघून घ्याव्यात म्हणजे अंदाज येतो.. www.carvale.com सारख्या साईट्स आहेतच.

डिझेल आणि पेट्रोल यासंदर्भात
मंथली मेंटेनन्स, ड्रायव्हिंचा स्मूथनेस
या दोन मुद्द्यांच्या अनुषंगानेही सांग ना.

Pages