कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरण्यके भारतात मिळत नाही. इम्पोर्ट असेल पण ती गाडी आता इम्पोर्ट करण्याच्या लायकीची नाही.

ह्याला Active Fuel Managment Technology (AFM) असे नाव आहे. गाडी जर गावात किंवा कमी स्पिडवर चालत असेल तर ३ सिलेन्डर्स डिअ‍ॅक्टिव्हेट होतात आणि हायवेला लागल्यावर परत पूर्ण ६ चालतात, शिवाय जर क्रुझकरत असू तर परत आणखी दोन डिअ‍ॅक्टिव्हेट होऊन गाडी चार वर चालते पण जोरात अ‍ॅक्सलरेट केले की परत चार. आता अशी टेक्नॉलॉजी का आली तर अमेरिकेत भारत / युरोप सारख्या १.२ किंवा १.६ लिटर च्या गाड्या नसतात तर २ किंवा २.५ लिटरच्या अ‍ॅव्हरजे आणि सगळ्या प्रिमियम ह्या ३ + लिटर च्या व्हि ६ किंवा व्हि ८. थोडक्यात गॅझ गझलर्स. मग गॅस गझलर्स वर जास्त टॅक्स बसायला सुरू झाली आणि मग कंपन्याना असे ऑप्शन देऊन गाडीची पावर जास्त आणि कमी व्हायची (अ‍ॅटोमॅटीक) आणि शिवाय फ्लेक्स फ्युयल गाड्या इन्ट्रोड्युस करून त्यात ही टेक्नॉलॉजी घातली जेणे करून जुन्या ब्रॅण्ड इमेज असणार्‍या मोठ्या कार परत चालतील. इम्पाला ही हेवीडुटी बिग साईस कार आहे, जिच्यावर हा प्रयोग करण्यात आला. आता तर होण्डा अकॉर्ड पण ही टेक्नॉलॉजी वापरते.

रेनॉ कार्स ह्या गरज नसताना प्रचंड महाग आहेत. फ्युएन्सचा स्टान्स मला आवड्ला पण किंमत महाग ठेवून रेनॉने स्वतःची वाट लावली आहे. तसे कोलोसचे.

धन्यवाद केदार इतकी माहीती दिल्याबद्धल. एकट्या माणसाकडे एवढी information असू शकते?
आमची मजल किंमत, cc, average ह्या पुढे कधिच गेली नाही

@केदार-

३ सिलेंडर म्हणजे वाईट असे नाही तर ३ सिलेंडर मुळे माईलेज जास्त वाढते. शिवाय किंमतही कमी होते त्यामुळे नवीन ट्रेंड असा की कमी किमतीत जास्त माईलेज हवे असेल तर ३ सिलेंडर वापरा.

हे बरोबरच आहे. नवी बीट डिझेलसुद्धा सुद्धा ३ सिलेंडर आहे आणि मायलेज २४ किमीप्रलि. म्हणजे जोरदार आहे. ३ सिलेंडर वाईट असे म्हणायचे नाही, पण स्विफ्टची ची ड्राईव्हॅबिलेटी/फन टू ड्राईव्ह फॅक्टर आहे ते या गाड्यांमधे नाही. स्विफ्टचे फॅन फॉलोईंग त्यामुळेच जास्त आहे- केवळ मारुती किंवा अ‍ॅव्हरेज हे फॅक्टर्स नाहीत ! स्विफ्ट ही नुसती सिटी कार नाही, तर हायवे परफॉर्मरसुद्धा आहे.
(इंपालाचे हे तंत्रज्ञान मला माहीत नव्हते, धन्यवाद !)
पण शेवटी बीट हायवेला नेल्यावर फायर करण्यासाठी एक्स्ट्रा सिलेंडर कुठून आणायचे असा प्रश्न पडायला नको, म्हणून स्विफ्ट. Wink
आय २० चांगलीच आहे- सेव्ह फॉर द स्टिअरींग.

पण शेवटी बीट हायवेला नेल्यावर फायर करण्यासाठी एक्स्ट्रा सिलेंडर कुठून आणायचे असा प्रश्न पडायला नको >> Lol ह्या सगळ्या सिटी कार्स आहेत. ह्यांना १०० किमीने पळविने म्हणजे अधू माणसाला दोन्ही पाय चांगल्या स्थितीत असणार्‍यांशी धाव घ्या म्हणने होईल. Happy

सेव्ह फॉर द स्टिअरींग. >> राईट ऑन! तो सोनाटा / वर्ना सोडला तर त्यांच्या सगळ्याच कार्स मध्ये.

SACO धन्यवाद आवड Happy

कोणी बुलेट वाले लोक आहेत का आपल्यामध्ये? शनवारी नवीन स्टॉर्म पाहून आलो, घ्यावी वाटत आहे. बुलेटला १ वर्षाचे वेटींग :|

टू व्हीलर मध्ये क्रूझर बाइक सध्या बजाज अ‍ॅवेंजर हीच आहे भारतात. बुलेट परवडत नाय. बजाज अ‍ॅवेंजर बद्द्ल कुणी माहिती देऊ शकाल काय? बजाज च्या गाड्यांना मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आहे असे ऐकून आहे.

चांगलीये अ‍ॅव्हेंजर. नोन प्रॉब्लेम्स नाहियेत काही.

मी एन्टायसर चालवतोय. बंद झालीये पण ती कधीच. एकाकडे अकीला आहे कायनेटीकची (ह्योत्संग) महिंद्रानेही काही क्रूझर आणल्यात म्हणे बाजारात.

बादवे किरु आहे बुलेटर

कोणी बुलेट वाले लोक आहेत का आपल्यामध्ये?>>> बुलेट क्लासिक ३५० बुक केलीय, सांगताना त्याने सांगीतलय कि पुढच्या दिवाळीला मिळेल... पुण्यात चौकशी केल्यावर कळाले कि कधी मिळेल ते फेब. मध्ये कळेल Happy

भावाला १० च्या budget मधे गाडी घ्याचीय, साध्य तो vento च विचार करतोय ....vento सेगमेंट मधे काय पर्याय आहेत??

गाडी डिजेल च घ्याचिये

डिझेलमधे वेन्टो आणि लिनीआ सर्वोत्तम. पण दोन्ही कंपन्यांचे आफ्टर सेल्स सर्व्हिस तितकेसे चांगले नाही. अर्थात, मोठ्या शहरात अडचण येऊ नये, पण लहान गावात राहत असाल तर माझ्या मते एस एक्स फोर ! (इंटिरीअरवर कॉम्प्रोमाईज करावे लागेल.)
डिजेल वर्ना/फोर्ड फिएस्टा शक्यतो टाळावी असे माझे मत.

दिवाळीत माझी नवीन I20 आली
कलर: क्रिस्टल व्हाईट
मॉडेल: अ‍ॅस्टा, पेट्रोल
डीलर: कणसे ह्युंदाई, सातारा
ऑन रोड किंमत: ६,५२,८०० (१२,८०० कॅश डिस्काउंट आणि ३,००० कार्पोरेट डिस्काउंट वजा करुन ६,३७,०००)
फ्री अ‍ॅक्सेसरीज: मॅटींग, मडफ्लॅप आणि बॉडी कव्हर

घेतल्याघेतल्या टाकी फुल्ल केली होती... ४५ लिटर्स... साधारणत ६५० किमी (सिटी + NH4) नंतर काटा empty वर आला... अ‍ॅव्हरेज साधारण १४.५!
तसेही इतक्यात अ‍ॅव्हरेज काढण्यात फारसा अर्थ नाही.... पहिले सर्विसींग होऊन जाउ दे मग बघू Happy

गाडी मस्त आहे.... हायवेपेक्षा सिटीत चालवायला मजा आली... खूपच स्मूथ आहे
स्टाईल आणि इंटिरिअर जबरदस्त.... खुप सारे फीचर्स आहेत... अजून एक्स्प्लोअर करतोय!
म्युझिक सिस्टिम पण चांगली आहे Happy

फक्त 2nd gear थोडासा underpower वाटतो... विशेषत: एसी चालू असताना आणि थोड्याश्या चढावर हे जास्त जाणवते!

बाकी लूक्सवाइ़ज एकदम जबरदस्त आहे.... स्टाईल स्टेटमेंट Wink

.

RX100 >>> मस्त!

फारएन्ड आय २० चांगलीच गाडी आहे फक्त स्टिअरिंगचा थोडा प्रॉब्लेम होता, तो करेक्ट केला ते बघावे लागेल.

आर एक्स १०० मस्त आहे. Happy
आरसे बदलावेत, काढून टाकू नये असे वाटते. त्याचबरोबर मोठे कॅरिअर आणि (गरज नसल्यास) सारी गार्डला सुट्टी द्यावी.

होन्डा ब्रिओ घेतली का आपल्यापैकी कोणी? रिव्ह्यूज येऊ द्या.

आरटीओ साठी ते दोन्ही बाजुला आरसे ठेवले आहेत. ते काम झालं कि पहिल्यांदा काढुन टाकणार आहे. मला ते गावठी वाटतात म्हणुन मी तो पर्यंत मी चालवतही नाहीए

>>>
हे विधान अत्यन्त धक्कादायक आहे. केवळ कायद्यासाठी आरसे ठेवणे, हेल्मेट बाळगणे,सीटबेल्ट लावणे याचा अर्थ न समजण्यासारखा आहे. मुळात असे नियम करण्याचा उद्देश चालकाची सुरक्षा नसून आरटीओ चे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी असतो असे का वाटावे.?बहुसंख्य लोकाना हेल्मेट , बेल्ट, हे बेंगरूळपणाचे लक्षण वाटते. हेल्मेट न वापरल्याने व सीटबेल्ट
न लावल्याने माझ्या अगदी जवळच्या माणसांचे मृत्यु मी अनुभवले आहेत त्यामुळे कळकळीने बोलतो राग मानू नका. मी स्वतः आरसे नसलेल्य गाडीला हात देखील लावत नाही किम्बहुना मला बिनाआरशाची गाडीच चालवता येत नाही. पुण्यात वाहतुकीचे नियम मोडणारे अथवा सुरक्षा काळजी न घेणार्‍यात अशिक्षीत लोक १ टक्काही नसावेत. शिक्षणाच्या प्रमाणात ही टक्केवारी वाढत जाते. Happy

असो . अधिक काय सांगणे माझे एक स्नेही मोटारसायकलला दारी ठेवलेला "यमदूत' म्हणतो. व त्यांच्या मतानुसार प्रत्येक टूव्हीलरवाल्याच्या खिशात महापालिकेने नाव न टाकलेले ,सह्या केलेले मृत्युपास ठेवले पाहिजेत Sad

Sad चांगलीच झाप पडली आहे मला. कळतं पण वळत नाही. Wink

त्याचबरोबर मोठे कॅरिअर आणि (गरज नसल्यास) सारी गार्डला सुट्टी द्यावी. >>>>
ज्ञानेश, हो रे ते कॅरियर उपयोगी नाही. काढुनच टाकलं तरी हरकत नाही. मी गाडी चालवताना मागे कोणीही नसतं आणि हा बाइक फार कमी चालवतो त्यामुळे सारी गार्ड पण अनावश्यकच आहे.

.

बाळूजोशी +१.. गाडीबरोबर कंपनीने दिलेल्या अ‍ॅक्सेसरीज कधीच काढून नयेत.. त्या देताना काहीतरी विचार करूनच दिलेल्या असतात..

होंडा सीटी घेऊ नये यासाठी सपोर्ट करणारी माहिती द्या. Happy पप्पाना होंडा सीटीच घ्यायची आहे. भावाला ती नकोय. रोज घरात झक्क्डपक्कड चालू आहे यावरून. गाडी रत्नागिरीमधे चालवली जाईल. वर्षातून चारपाचदा तरी रोड ट्रीप होइल. (हजार किमीच्या आसपास).

भावाच्या डोक्यात स्विफ्ट डीझायर फिक्स बसलय. पण त्याला सहा महिन्याचे वेटिंग आहे म्हणे.

होंडा सीटी घेऊ नये यासाठी सपोर्ट करणारी माहिती द्या.>>>>> नंदू.. फारच अवघड गोष्ट आहे.. तुला गाडी घे म्हणून सपोर्ट करणारे भरपूर मिळतील.. घेऊ नको असे सांगणारे फारच कमी.. रत्नागिरीतल्या काही गल्ल्यात होंडा सिटीच काय स्विफ्ट डिझायर पण चालवायला अवघड आहे.. फियेस्टा त्या गल्ल्यात नेऊन अनुभव घेतलाय..

हे अशासाठी की पुण्यात तुमची चूक नसली तरी काहीही होउ शकते. परवा अभिषेक हॉटेलच्या पुढचा सिग्नल (कमिन्स. ) पटवर्धन बागेकडून येनारा रस्ता एस एन डी टी कडे जातो अन मेहेन्दळे ग्यारेजचा रस्ता सिटी पराईडक्दे जातो ते क्रॉसिंग. अगदी कमी गर्दीचा सिग्नल आहे. माझ्या शेजारी एक पस्तीशीची महिला स्कूटरवर बसून समोर लाल सिग्नल पडला म्हणून वाट पहात होती. तिला एस एन डी टी कडे जायचे होते . समोर लाल सिग्नल होता म्हनजे आडवा रस्ता चालू होता. सिग्नल हिरवा असताना वाहतुकीचे साधारण ३ टप्पे पडतात. एक : नॉन स्ट्रायकर फलंदाजासारखे पार पुढे अर्ध्या रस्त्यावर येऊन फुरफुरत थाम्बलेले.दोनः- नन्तर सिग्नल वाहतूक स्ट्रीमलाईन झालेने , मागेपुढे वाहने असल्याने मॉडरेट स्प्पीडने चालेली वाहने. तीन :- आता केव्हाही सिग्नल बन्द होऊ शकतो, त्याआधी आपली नैय्या बेडा पार झालीच पाहिजे या हेतूने करकचून अ‍ॅक्सिलरेटर पिळणारी माणसे. यातील एक आणि तीनमधली माणसे कायम यमाचे समन्स खिशात ठेवून असतात. (चारचाकीवाले सहसा असे वर्तन करीत नाहीत)

असो.

तर माझ्या शेजारच्या या पस्तीशीच्या बाईंनी समोरची आडवी वाहतूक विरळ झाल्याचे अचूक हेरले आणि 'उसपार' यम सैंय्या खडे असल्याने व ' मिलनेकी आस' असल्याने , त्यानी लाल सिग्नल असतानाही आपला 'घोडा फेकला '...
बाई जवळ जवल उसपार पोचल्याच होत्या पन हाय आडव्या चालू वाहतुकीत उपरिनिर्दिष्ट क्याटेगरी तीन मधले एक मोटारसायकलवाले सहकुटुम्ब फर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करीत शेवटची 'स्प्रिन्ट 'मारीत आले. (त्यांचे यमसैया देखील 'उसपार ' वाट पहात असल्याने तेही घाईत होते.)...

आणि...
मोटारसायकलवाल्याने बाइंच्या मागच्या चाकाला जोरदार धडक दिली. (त्यावेळीही बाईंसाठी लाल सिग्नल चालूच होता.). मग काय या बाई , मो.सा. वाले बाबा त्यांची पत्नी आपपल्या गाड्यांवरून उंच उडाले व गाड्या एकीकडे व ते एकीकडे पडले. बाबांचा पाय त्यांच्याच गाडीच्या चाकाच्या स्पोक्समध्ये अडकला वगैरे. मग पुढचे सोपस्कार यथासांग पार पडले. त्यातले कोणी मेले की नाही माहीत नाही

आमच्या मुलाच्या मते क्याटेगरी तीनमधले 'सैंयाप्रेमी' अतिशय धोकादायक असतात. व तो स्वतः बाकी कोणापेक्षा या तीन नंबरींवर सतर्कतेने लक्ष ठेवून असतो.

तुम्ही यातल्या कोणत्या क्याट्यागरीत मोडता?

(क्याटेगरी दोनमधले फार शहाणे असतात असे नाही . ते संधीअभावी व मागेपुढे वाहने असल्याने त्याना मर्यादा येतात. अन्यथा पुढच्या सिग्नलला तेही 'नदिया पार सजनदा ठाना...' म्हणतच 'रेडीच' असतात. पन इतरंना नम्बर दोन कमी धोकादायक असतात एवढेच....)

Pages