Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
sayuri, असं होय,
sayuri, असं होय, बघते मी ऐकून मला कळतं का, आमच्याकडे ते टायटल म्युझिक आणि राणी गुणाजी आणि प्रशांत दामलेची आधीची बड्बड म्युट करतात
काल "मै हू ना" मधलं "तुमसे मिलके दिलका है जो हाल क्या कहे' ऐकत होते, त्यात "चेक दॅट", "लाईक दॅट" ह्याबरोबर तिसरं काय आहे? मला "प्रिपेड", "क्रिकेट", "विकेट" आणि "विकेड" असं बरंच काही ऐकू आलं, बहुतेक "विकेड" बरोबर असावं
विकेड आहे
विकेड आहे ते.
सिनेमासाठ
सिनेमासाठी वजन कमी करताना सतत तंदुरी पदार्थ खावे लागल्याने हे गाणे स्फुरले असं हिमेशचे सांगणे आहे.:-)
जानकीमधल्या 'विसरु नको श्रीरामा मला'च्या ़कडव्यात 'कितिदा नव्याने तुला भेटले मी; अशी ओळ आहे.ती मी बरेच दिवस,'कितीदा न व्याले' असे ऐकुन जाम चक्रावलो होतो.:-)
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
'कितीदा न
'कितीदा न व्याले'
आगाऊ
आगाऊ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मी शाळेत
मी शाळेत असतांना.... पाकिस्तानी गायिका असलेल्या नाझिया हसनच एक सुंदर गाणं
आप जैसा कोई मेरे जिंदगी मे आये..."
हे गाणं मला ," आप जैसा कोई मेरे जिंदगी मे आए
तो बाप बन जाए ,ओ हो हो बाप बन जाए" असंच ऐकु यायचे...!
कॉलेजला गेल्यावर त्या गाण्याचे खरे बोल कळले....
अगदी तस्सच...! एक जुने हिंदी गाणे आहे," साला मै तो साब बन गया"
मी ते " साला मै तो बाप बन गया" असे म्हणायचे .
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
खबरदार जर एके ४७ घेउनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या......
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
एका पेक्षा
एका पेक्षा एक रे
नंतर पाय शेक रे.... मी तर असच एकते...
आनेवाला पल जानेवाला है
आईशप्पथ....!
आईशप्पथ....! काल एकापेक्षा एक ला ते "दिल मांगे मोर" चे 'ये दुरियाँ' गाणे पाहिले अन सगळे आठवले...!
असे रेडिओ/सिडीवर कित्ती तरी दिवस मी ते गाणे "जयसुर्या...अब है कहॉं" असेच ऐकायचे...खुप मन लावुन ऐकले तरी पुन्हा तेच्...अन मग इथे जयसुर्या ( श्रीलंकेचा) चा काय संबंध ..! असे विचार मनात यायचे..शेवटी एकदा माझ्या भाच्यांनी सांगीतले की ते गाणे " ये दुरिया..अब है कहा? असे आहे. अजुनही मी हे गाणे जेव्हा जेव्हा ऐकते...तेव्हा मला तसाच भास होतो..!
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
खबरदार जर एके ४७ घेउनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या......
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
नयने, कान
नयने,
कान तपासून घे तुझे
) सही.. सगळे
:)) सही.. सगळे कानसेन सॉलेड आहेत...
काशी ते बोल
एका पेक्षा एक बेबी
लेट द बॉडी शेक बेबी
असे आहेत
माझी पाच वर्षाची मुलगी जब वि मेट च गाण म्हणते
ये इश्क हाये, बैथे बिथाये जन्गल दिखाये हो रामा...
श्रदधा
श्रदधा ,
बैथे बिथाये जन्गल दिखाये
वर जानकीचे
वर जानकीचे गाणे वाचुन, त्याच गाण्याची अजुन एक आठवण आली..
'विसरु नको श्रीरामा मला' ह्या गाण्याच्या सुरवातीला सीमा हातात शि-याची बशी घेऊन येते आणि मग गाणे सुरू होते. माझ्या भावाला कित्येक वर्षे ते गाणे
'विसरु नको शिरा खायला' असे आहे असेच वाटायचे.
साधना
श्रध्दा,
श्रध्दा, माझी लेकही ते गाणे असेच म्हणते. ( हे पुर्वी मी याच बीबीवर लिहिले आहे.)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे...:)
परतीच्या
परतीच्या गोलमाल मधल गाण :
चारही गोलमालकर ठो ठो करुन बेंबटत असतात :
लग जा गले से मेरे ठा कर के
सारी दूनीयको इश्क बया कर दे म्हणून
.
त्या गाण्यात मध्येच ओळी येतात
मै इरादा जोकर लू ....
फैसला मै जोकर लू ...
.
ह्या गाण्यात अर्शद स्वतःला जोकर कशाला म्हणून घेतो दोन दोनदा ते नाय कळल बुवा
जो कर
जो कर लुं
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
"लग जा गले
"लग जा गले से मेरे ठा कर के" हे असंच आहे ना? मला पण असंच ऐकायला येतं पण त्याचा अर्थ काय? का "लग जा गले से मेरे हा कर के" असं आहे ते? "ठा" हे काही पंजाबी प्रकरण आहे का कारण दिवसेंदिवस पंजाबी गाणी अशक्य होत चालली आहेत हिंदी सिनेमात
लहानपणी
लहानपणी विकत आणलेल्या आशा भोसलेंच्या गाण्याच्या कॅसेटवर 'गेले द्यायचे राहुनी' हे गाणे 'गेले प्यायचे राहुनी' असे छापलेले होते.
त्याच कॅसेटवर 'तरुण आहे रात्र अजुनी' हे गाणे 'तरुण आहे राम अजुनी' असे छापलेले होते.:)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नवीन वर्ष सर्वांना सुख-समृध्दीचे ,भरभराटीचे ,समाधानाचे आणि आनंदाचे जावो , ही शुभेच्छा!
:)
लग जा गले
लग जा गले से मेरे ठा कर के >>>
हे मूळातल नूरजहान च गाण आहे. त्यावेळी पाकीस्तानात ह्या गाण्यावर बराच वादंग उठलेला म्हणे
मोहोब्बते
मोहोब्बते मधल ' हमको हमीसे चुरालो' हे गाण पैल्यांदा ऐकल तेंव्हा मज्जा वाटलेली.
ऐश्वर्या 'पास आओ गलेसे लगालो' कळवळून कळवळून म्हणते तेंव्हा शहारुख भैया तत्परतेने तिच्या गळ्याला सुरी/चाकू अस काहीस लावत असेल अस चित्र डोळ्यासमोर यायच.
पण प्रत्यक्षात बघीतल तेंव्हा अपेक्षाभंग झाला
प्राची टी
प्राची टी सिरीज वाल्या डुप्लिकेट कॅसेट तर नव्हत्या ना...
पुर्वी टी सिरीज च्या नावाने कुठ्ल्याहि कॅसेटस निघत..
'गेले
'गेले द्यायचे राहुनी' हे गाणे 'गेले प्यायचे राहुनी' असे छापलेले होते
-----------------------------
जबरी!!!!:)))))
मराठी
मराठी गोलमाल चित्रपटात गाणं आहे एक...'परी म्हणू की सुंदरा..'
त्यातल्या एका कडव्याची पहिली ओळ मला अशी ऐकू यायची:
'हजार दाती भेटते....'
नंतर कळलं ते 'हजारदा ती भेटते..'
"चलती का
"चलती का नाम गाडी" मधलं, "बाबू समझो इशारे , हौरन पुकारे पम पम पम" मला पहिल्यांदा "बाबू समझो इशारे , औरत पुकारे पम पम पम" वाटलं!
मी म्हणायचे हे चौघे गाडीत बसून असे का म्हणतायत शिवाय एकही औरत दिसत नाही मग कोण पुकारतंय? आणि पुढे 'पम पम पम' काय? 

पण जेव्हा नीट ऐकले तेव्हा माझी हसून हसून मुरकुंडी वळली!
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!!
माझा मुलगा
माझा मुलगा लहानपणी एकदा घरी आल्यावर "बेबी पन्दा ऽऽऽऽ तोल" चं गाणं म्हण म्हणून मागे लागला. त्याने अगदी ताला सुरात म्हणूनही दाखवलं. शेवटी त्याच्या शाळेत जाऊन विचरपुस केली तेव्हा " बेबी ओपन द डोअर " हे कळल.
एक उन्चा
एक उन्चा लम्बा कद, दुजा सोणी ही तू हद...
तिजा रुप तेरा चमचम करदा नी
मै एवीतेवी (:अओ:) तेरे उत्ते मरदानी....
( तु कितीही उंच असलीस , कसलीही हद्द
असलीस आणि तुझं रूप कितीही चमचम करत असलं तरीही तू मर्दानीच दिसतेस. )
एकदम सही
एकदम सही dakshina
अग आशु, मला
अग आशु,
मला तर 'हौरन' ज्या जागी आत्तापर्यन्त 'फौरन' असे ऐकु येयचे.....
:D,
वर्षा
वर्षा, सेम
वर्षा, सेम हियर...
ते बाबू
ते बाबू समझो इशारे मधे 'आडी तिरछी चला चला के झूम' म्हणतात ते मला आधी वाटायचं की 'गाडी तिरछी चला चला के' च्या ऐवजी 'आडी..' म्हणत आहेत. नंतर कळाले की 'आडी तिरछी' म्हणजे वेडीवाकडी या अर्थाने ते होते.
Pages