मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेहमानने गायलेलं कोणतंच गाणं तसंही पुर्ण कळत नाही...

त्यात पुन्हा रेहमान-गुलजार जोडी असेल तर नादच सोडा!!
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

रेहमानबद्दल बरोबर आहे पण युवात त्यानी कळसच केला आहे.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

'जब वी मेट' मधलं 'जग सारा जग सारा निखर गया' या गाण्यात मधे कोरसचे काही शब्द आहेत...
ते मला नेहमी 'काठेवाडी माहीया' असे ऐकू येतात. Happy

-योगेश

माझा आणि माझ्या मित्राचा या ओळिन्वरुन झालेला वाद आठवतो.
चित्रपटः ईजाजत
गाणे: "मेरा कुछ सामान"
ओळी: त्याच्यामते-
"एक सो सोला चान्द की राते , एक तुम्हारे कान्धे कातिल"
ओळी: माझ्यामते-
"एक सो सोला चान्द की राते , एक तुम्हारे कान्धे का तिल"

नक्की काय ते एक गुलजार जाणे नाहीतर गुल्रजार उमगलेले जाणोत.

एक सो सोला चान्द की राते, और तुम्हारे कान्धे का तिल.
अस मला तरी ऐकु येत.

एक सौ सोला चाँद की राते, एक तुम्हारे कांधे का तिल
हे बरोबर आहे, नासिरुद्दीन शाहच्या खांद्यावरच्या तिळाची तुलना एकशे सोळा पोर्णिमेच्या रात्रींबरोबर केली आहे...

गिली मेहंदी की खूशबू झूटमूट के वादे कुछ ...
व्वा सही गाण्याची आठवण करून दिलीत ...
-----------------------------------------
सह्हीच !

शाळेच्या ऑफ पिरियडला एक मुलगी हमखास गाणं गायची
"जादुगर सैय्या, छोडो मेरे भय्या"

विशेष म्हणजे यात काही वेगळं / चुकीचं आहे हे आम्हालाच काय, पण आमच्या शिक्षकांनाही कधीच वाटलं नाही.

तसंच आणखी एक गाणं -

" रेशमी तलवार, उडता गालीचा
रुप सहा नही जाये, नखरेवालीका "

हे गाणं साधारण पाचवी-सहावीत, म्हणजे नवीनच हिंदी शिकायला लागल्यावर ऐकलं. हे गाणं चुकीचं न वाटण्यामागे एक कारण होतं, चौथीपर्यंत मी त्यावेळी ५० पैशाला मिळणारी जादुच्या सुरस कथा असलेली बरीच पुस्तकं वाचली होती. त्यामुळे, जादुची तलवार, उडता गालीचा या गोष्टी खर्‍याच वाटायच्या. त्यात नविन हिंदी शिक्षणाची भर. त्यामुळे "एखाद्या सुंदर रुपवतीच्या रुपाचा मत्सर वाटून एखादी चेटकीण आपल्या कडच्या जादूच्या वस्तूना काही आज्ञा देत असावी" असा साधा सरळ अर्थ मी लावला होता.

>> रेशमी तलवार, उडता गालीचा << Lol
(शमशाद बेगम ने टाहो फोडला असता हे ऐकल्यावर... )

आइशप्पथ मधल ढ्ग दाटुनी येतात
मध्ये ती सर माझ्यात म्हनते .असे का अजुन कळले नाही.

नविन गुरु मधल्या मल्लिकाच्या आय्या अय्या का छय्या छय्या गान्याचा अर्थ कोणी सांगेल का?

एक सौ सोला चाँद की राते, एक तुम्हारे कांधे का तिल
या गाण्यात ती तिच्या मागे उरलेल्या सर्व गोष्टींची यादी त्याला पाठवते त्यात ती त्या तिळाचीही मागणी करते .असा त्या ओळींचा अर्थ आहे.

शर्मिला, राखी, राजेश खन्ना च्या दाग मधले एक गाणे

अब चाहे मार उठ्ठे या बाबा, यारा मैने तो हा करली
असे ऐकू यायचे,
खरे तर ते
अब चाहे मा रुठे या बाबा, असे आहे.

देल्ही ६ मधलं 'मसकल्ली ' ऐकल तर ते असं ऐकू आलं
' ए मसकली मसकली उड मटकली मटकली
ए मसकली मसकली उड मटकली मटकली
जरा बम को झटक , गयी धुल अटक और लचक मचक के दुर भटक '

आत्ता गुगल वर सर्च केल तर ते 'पंख झटक' अस आहे Proud

-----------------------------------------
सह्हीच !

दिनेश.. :p

मी 'चाफा बोलेना' चे ओरिजिनल गाणे सध्ध्या रोज ऐकतेय, त्यात 'चल ये रे गड्या . नाचु... घालु फुगड्या' या ओळीमधील नाचु.. नंतरचा एक शब्द गळाल्यासारखा वाटतो.. खरोखरच तसे आहे का? कोणी सांगु शकेल का?

मला खालिल गाणे,

ती येते.ए.ए.ए....अणिक जाते.ए.ए.ई
आणी येताना..कधी कळ्या आणिते...

ती येते.ए.ए.ए....अणिक जाते.ए.ए.ई
आणी येताना..कधी गोळ्या आणिते... असेच वाटते कायम्...;)..कारण का ते माहित नाही

०--------------------------------०
उद्या उद्याची किती काळजी, बघ रांगेतुन
परवा आहे उद्याच नंतर......बोलु काही.

'चल ये रे गड्या . नाचु... घालु फुगड्या' या ओळीमधील नाचु.. नंतरचा एक शब्द गळाल्यासारखा वाटतो.. खरोखरच तसे आहे का? कोणी सांगु शकेल का?>>>

'चल ये रे गड्या . नाचु उडू घालु फुगड्या' असं आहे Happy

किस्मत कनेक्शन मधलं ते गाणं काय आहे! काहीही बोल कळत नाहीत! टॅ टॅडॅडॅ टॅ टॅडॅडॅ टॅ टॅडॅडॅ टॅ
हाय सेक्सी *********
किस्मतकनेक्शन हो जाये
>>
मला ते गाय बकुली गाय बकुली and then take u higher.....असं एकु यायचं मी आतापण तसच म्हणते. पण रुनी नि टाकलेल original गाणं पण सापड्लं.

rupa

कुणीतरी लिहिलय आधी, मलाही
"सांस कीले पे तेरा नाम लिये जाउंगा" असंच ऐकु यायचं.

खरं असं आहे,
गम उठाने के लिये, मै तो जिये जाउंगा|
"सांस की लय पे तेरा नाम लिये जाउंगा|

दुसरं,
पर्बत वोह सबसे उंचा हमसा यहॉ स माका|
ते असं आहे,
पर्बत वोह सबसे उंचा हमसाया आसमाका|

किस्मत कनेक्शन हो जाये हे गाण मला
अब ईलेक्शन हो जाये अस ऐकायला यायच Proud
------------------------
देवा तुझे किती सुंदर आभाळ

सिंग इस किंग मधले तेरी ओर ह्या गाण्यामधे "आँचल तेरा रब्बा फलक बन गया है" असे चक्क हिरविनीच्या तोंडी आहे .... हो ना?

आचल के तुजे मै ले के चालू हे माला बरेच वर्षानी उमगले की आ चल आहे !!

विश्वेशजी, त्यात ती "आभाळ हा देवाचा पदर वाटू लागलाय" असं म्हणते.. हे जर हीरोच्या तोंडी दिलं असतं तर हिरवीणीच्या पदराचा अनुल्लेख नसता का झाला? Lol
(शी: !! काय ते शब्दशः भाषांतर.. :हाहा:)
----------------------
एवढंच ना!

आपल इरसाल पब्लीक कसल्याही ओळी कुणाच्याही वदने घालू शकत
आमच्या कॉलेज मध्ये वात्रटांनी 'छोड दो आचल जमाना क्या कहेगा ' हे गाण गाय भैयाला उद्देशून गाते असा शोध लावलेला Uhoh
------------------------
देवा तुझे किती सुंदर आभाळ

ईईईई केद्या.. Rofl
----------------------
एवढंच ना!

केद्या...

'आवाज' मधे तसं व्यंगचित्र ही आलं होतं...
_______
इंडिया वर्क्स... द पीपल मेक इट वर्क...!!!

मला वाटते आवाजमधले व्यंगचित्र असे होते की गायीने लाथेने भैय्या अन त्याच्या हातातले भांडे उडवून दिले आहे. (भैया अगदी हवेत उडालेला अन भांडे तिसरेकडेच उडालेले..)आणि गाय म्हणतेय 'मेल्या तुला काही आया बहिणी आहेत की नाहीत? Proud

Pages