क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मांजरेकरचा मॅच अ‍ॅनॅलिसिस ऐकतोय. तो म्हणाला, 'लेट लक्ष्मण बॅट ब्लांईडफोल्डेड अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया" खरय. तो त्यांच्यासाठीचा शनि आहे. Happy

हा मान्जरेकर म्हनजे तोच ना २-३ वर्षापूर्वी सचिनने निवृत्ती घेतली पाहिजे म्हणणारा. ? त्याची क्रिकेटची अक्कल तेव्हाच समजली होती....

जबरी! आज सकाळी ७२ नवीन पोस्ट होत्या येथे आणि सुरूवातीपासून वाचताना मॅच जशी पुढे जात होती तशा येथील कॉमेंट्स वाचताना मजा आली.

लक्ष्मण तर ऑसीच्या बाबतीत डॉन जख्मी है तो क्या, फिर भी डॉन है!

विक्रम - साहेबांनी मागच्या तीन वर्षात २-३ मॅचेस तरी जिंकून दिलेल्या आहेत. इंग्लंड विरूद्ध चेन्नईला आणि पाक विरूद्ध दिल्लीला. अजून बहुधा एखादी आहे.

आपल्याला २००७ च्या जून नंतरच्या साहेबांच्या कोणत्याच खेळीबद्दल काही कंप्लेंट नाही.

लक्ष्मण आणि इशंत शर्मा यांची जोडी १३० चेंडू मैदानात होती, त्यातले ९२ चेंडू इशांतने खेळून काढले, तेव्हा त्याचे पण थोडेसे कौतुक करूया.

<<हा मान्जरेकर म्हनजे तोच ना २-३ वर्षापूर्वी सचिनने निवृत्ती घेतली पाहिजे म्हणणारा. ? त्याची क्रिकेटची अक्कल तेव्हाच समजली होती....>>असं नका हो म्हणूं ! संजय मांजरेकर त्याच्या वेळचा एक "खानदानी" फलंदाज होता, सचिनबद्दल मनस्वी कौतुक असलेला त्याचा तो हितचिंतक आहे, एक कॉमेंटेटर/एक्सपर्ट म्हणून तर आता अभिमानास्पद कामगिरी करतोय व कधीही हिणकस बोलणं, वागणं
त्याच्याकडून होणं अशक्य वाटतं. सचिनबद्दल जर तो असं म्हणालाच असेल, तर त्याला त्यावेळी ते प्रामाणिकपणे सचिनच्या हिताचे वाटले म्हणून, आकसाने किंवा क्रिकेटच्या अज्ञानामुळे नव्हे. [संजय माझा नातेवाईक किंवा व्यक्तिगत परिचयाचा पण नाही !]

सचिनबद्दलची मांजरेकरची ही कमेंट...सचिन अपयशी होण्याची भीती वाटते तेव्हा तंदुरुस्त नसल्याचे नाटक करतो.
Manjrekar had written in a column recently that Tendulkar should play even if he was not 100 per cent fit since he brought in a lot of experience to the side, and that the timings of his injuries were dubious.
सचिनने स्वतःवर झालेल्या टीकेला कधी उत्तर दिले नाही , पण याला मात्र दिले होते.
"I don't want to comment much but I feel sorry that an ex-India player has made statements without checking the facts and without talking to the people concerned. I also find it surprising that he has made the statements without being in the dressing room and knowing the true situation," Tendulkar was quoted as saying by a newspaper.

http://www.indiaexpress.com/news/sports/cricket/20060722-0.html

मांजरेकर हा तंद्रशुद्ध फलंदाज होता, तरी त्याच्या लेखणी आणि वाणीतून जितक्या कमेंट्स निघाल्या तितक्या धावा त्याच्या बॅटीतून नाही निघाल्या.

भरत व बाळू जोशी,
मी सचिनसंदर्भातले मांजरेकरबद्दलचे माझे कॉमेंटस दिलगिरीपूर्वक मागे घेतो.

साहेबांनी मागच्या तीन वर्षात २-३ मॅचेस तरी जिंकून दिलेल्या आहेत. इंग्लंड विरूद्ध चेन्नईला आणि पाक विरूद्ध दिल्लीला>> फारेंडा अ‍ॅग्रीड. पण साहेबांकडून अजून एखादी अगदी अशक्य अशी मॅच जिंकून देण्याची अपेक्षा आहेच. त्यांच्या साठी बार अजून वर इतरांपेक्षा.

काल डिन जोन्स सचिन आणि पाँटिंगची तूलना करत होता. अजय जडेजाचे नाक काल तर आधिच वर. पाँटिंग आधी ऑस्ट्रेलियात तरी ब्रॅडमन नंतरचा सर्वोत्तम आहे का बघा आणि मग सचिन शी तूलना करा असे लगेच फटकारल.

पाँटिंग रड्या आहे आपळ्या सगळ्यांनाच माहित आहे. काल अजून एक्दा रडला. काय पण चेहरा दिसत होता.
परत वेळ आली तर लक्ष्मण ला रनर देणार नाही असे त्याचे उदगार. म्हणजे पुन्हा मी रनर दिला म्हणून भारत जिंकला असे त्याला म्हणायचे होते. येवढ रडायच तर कशाला खेळतो क्रिकेट.

काल एक ऑस्ट्रेलियन पैलवान सुद्धा अनिलकुमारशी फायनलला अगदी कन्विनसिंगली हरल्यावर चिडला. अनिलकुमारला बुक्की मारली. प्रेक्षकांकडे पाहून अश्लिल हावभाव केले. शेवटी त्याचे मेडल काढून घेतले.
मुरली म्हणाला तेच खर. हे ऑसी आपली रूटस नेहमीच कृतीने दाखवून देतात.

शालजोडीतले देण्याची कला गावसकर साहेबांइतकी कोणाकडे नाही.
भारत जिंकताच क्षणी त्यांनी ऑस्ट्रेलियाने शेवटपर्यंत चांगली लढत दिल्याबद्दल(!) त्यांचे कौतुक केले!!जणु काही भारतीय संघाचा विजय सामना सुरू होण्यापासून निश्चित होता आणि समोर बांग्ला देश किंवा झिंबाब्वेचा संघ होता.
खरे तर संपूर्ण सामन्यात भारतीय संघ सतत पिछाडी भरून काढायच्या प्रयत्नात होता.
For a change the Indian tem snatched victory out of the jaws of defeat.
की विजयाचे पराभवात रूपांतर करायची कला आता ऑस्ट्रेलियाला शिकवली आपण?

आपल्या विजयाचं श्रेय पाँटींगलाही जातंच ! त्याचा सततचा उद्दामपणा हा आपल्या खेळाडूंसाठी अमूल्य असा "मोटीव्हेटींग फॅक्टर", खुन्नस म्हणा हवं तर, ठरतोय असं नाही वाटत ?

अरे लोकांनो,
एकंदर कांगारूं बद्दलचा अन त्यातूनही पाँटीग बद्दलचा दुस्वास समजू शकतो पण कालचा सामना ईतका रोचक, ऊत्कंटावर्धक अन थरारक झाला त्याचं बरचसं श्रेय पाँटींगच्या नेतृत्वाला अन कांगारूंनाही जातं, ते द्यायलाच हव. धोणीनेही ते मान्य केलय. त्यांच्या जागी आपण असतो तर कधीच खांदे टाकून सामना बहाल केला असता. त्यांन्नी प्रत्त्येक धावेसाठी आपल्याला झुंजवलं हे खरं आहे.

सन्नीभाय देखिल काल हेच म्हणला की गेली अनेक वर्षे सातत्याने ऑसीज चा संघ क्र. १ वर आहे, आणि ईतर संघ त्यांची बरोबरी करायचा प्रयत्न करतात यातच कांगारूंचं खेळातील स्थान निर्विवादपणे स्पष्ट होतं.

असो.
---------------------------------------------------------------------------------
खरा कूल ड्यूड लक्षमण आहे.
ऊनाडकट हे काय नाव झालं? काहीही... Happy
मांजरेकरचं राहू द्या- कोल्ह्याला द्राक्षे आंबट त्यातला प्रकार आहे. त्याला बोलायचे पैसे मिळतात- तो बोलतो- बस्स!
-----------------------------------------------------------------------------------
मला तरी दुसर्‍या सामन्यासाठी या क्रमवारीत संघ आवडेलः
विजय, सेहवाग, रैना, सचिन, द्रविड, लक्षमण, धोणी, पुजारा, झहीर, श्रीशांत, फिरकी गोलंदाज.
धोणीने किमान नाणेफेक जिंकावी ही अपेक्षा- तेही जमत नसेल तर बसवा रे त्याला Happy अन खेळवा अजून एक फिरकी गोलंदाज.
नाणेफेक जिंकून आपण ५५०+ केल्यावर दबावाखाली खेळणारा ऑसी संघ बघायला आवडेल.
ईयान चॅपल म्हणतो तसे दोन्ही संघ तुलनेत सारखे आहेत (त्यांची गोलंदाजी चांगली आहे, आपली फलंदाजी), फरक एकच आहे- सेहवाग! पुढे जावून मी म्हणेन, मोठ्ठा फरक आहे- लक्षमण. हा चॅपल दुसर्‍या चॅपल पेक्षा फारच बुध्धीमान आहे Happy

सेहवाग सुटला की अन लक्षमण टीकला की सामना आपला असतो.
(साहेब या गणितात कधी बसतील याची वाट पहातो!)

साहेबांनी पहिल्या डावात ९८ करून पाया मजबूत केला, म्हणुन लक्ष्मणला शर्माच्या साथीने कळस बांधता आला. समीकरणातले अन्य फॅक्टर्स साहेबांच्या अवताभवतीनेच!

काल लक्षमणाने मारलेले काही फटके विशेषतः बॅकफूट पंच, स्लिप कव्हर ड्राईव्ह वगैरे अत्यंत देखणे होते.
हाण तीच्या मा.... या प्रकारात त्याचे फटके मोडत नाहीत. चेंडूला अलगद कुरवाळल्यागत फक्त दीशा देतो अन अर्थातच टायमिंग!! लक्षमणाच्या टायमिंग वर एखादे डीजीटल मिलीसेकंदाचे घड्याळ सेट करता येईल. काही समालोचक त्याची तुलना अझ्झूभाईशी करतात कारण लक्षमणाचे फटकेही मनगटी असतात. पण अज्झूभाईचे फटके हे मला थोडे अ‍ॅक्रोबॅटीक जास्त वाटायचे. म्हणजे ऊजव्या यष्टीच्या "य" बाहेर असणारा चेंडू तो स्क्वेयर लेग किंव्वा पोईंट मधून तडीपार करत असे, सर्व भूमीती अन मोशन डायनॅमिक्स चे नियम फाट्यावर बसवून. एक नक्की आहे फिरकी ला ऊत्क्रूष्ट खेळणार्‍यांपेकी अज्झूभाई होता. लक्षमण मात्र वेगवान गोलंदाजांना अधिक चांगला खेळतो असे माझे मत आहे.

थोडक्यात अज्झूच्या मनगटाला हाड नव्हते (जीभेला होते म्हणून तो सहसा शिव्या देत नसे.) अन लक्षमणाच्या मनगटावर मिलिसेकंदाचे अचूक घड्याळ आहे.

बाकी पाँटींगची तुलना साहेबांशी करणे म्हणजे ललित मोदी ची तुलना शरद पवारांशी करण्यासारखे आहे.
---------------------------------------------------------------------------------
>>साहेबांनी पहिल्या डावात ९८ करून पाया मजबूत केला, म्हणुन लक्ष्मणला शर्माच्या साथीने कळस बांधता आला.
अहो मयेकर.. तसं तर सेहवाग, द्रविड, रैना नेही बरच काही केलं.. मी निर्णायक खेळीबदल म्हणतोय! साहेब त्यात थोडेसे मागे आहेत.. ते त्यांन्नी पुढील विश्वचषकासाठी राखून ठेवलय असं म्हणुया.. Happy

>>ते उनाडकट नाही 'उंदकट' आहे
असं होय.. हाणा रे त्या असाम्याला.

तरिही उनाडकट, उंदकट, उनदकत कुठलाही अपभ्रंश लावला तरी नाव भंन्नट आहे Happy
असो. १५ च्या यादीत येण्या आधी तो कुठे ऊनाडक्या करत होता? जरा त्या बद्दल अन पुजारा बद्दल आकडेवारी टाकावी जाणकारांनी. अन हा मुकुंद कोण? आपला मा.बो. वरचा तर नव्हे ना? Happy

आपल्या विजयाचं श्रेय पाँटींगलाही जातंच ! त्याचा सततचा उद्दामपणा हा आपल्या खेळाडूंसाठी अमूल्य असा "मोटीव्हेटींग फॅक्टर", खुन्नस म्हणा हवं तर, ठरतोय असं नाही वाटत >> भाउ साहेब एकदम बरोबर. आपल्या टीम वर्क च श्रेय पाँटिंगला काहिस द्यायला हरकत नाही. एकदाच आपण एक ऑसी आपल्यात घेतला (ग्रेग चॅप्पल ) आणि टीम वर्क चा पार लोच्या झाला.

योग,
पाँटींग व ऑसीजबद्दलच्या मताशी १००%सहमत. इथेच पूर्वी पाँटींग व ऑसीजविरूद्ध झोड उठली होती तेंव्हा मी हेंच म्हटलं होतं. तरी पण उद्दामपणा त्याने समर्थनीय ठरत नाही, हेही आहेच !
लक्ष्मण जर "फिट"नसेल तर गंभीरला मधल्या फळीत खेळवणं शहाणपणाचं ठरेल. सेहवागबरोबर त्याला सलामीला पाठवणं हे घातक ठरलंय; मधल्या फळीत तो चमकेल, याची मला खात्री वाटते.

तो जयदेव (पुढे जे काही आहे ते) अंडर १९ मधला.फक्त ४ प्रथम दर्जाचे सामने खेळलाय.
http://www.cricinfo.com/india/content/player/390484.html
पुजारा रणजीमधून खोर्‍याने धावा काढत आलाय, आणि शतक काढले की तो तिथेच थांबत नाही
http://www.cricinfo.com/india/content/player/32540.html
ही माहिती मी जाणकार नसूनही देतोय Happy

योग - अझर आणि लक्ष्मन मधला माझ्या मते मुख्य फरक (खेळातला) म्हणजे अझर मुख्यतः बॅक फूट प्लेयर होता. फ्रंट फूट वर लीनिंग ऑन द नीज असे फटके अझरचे मला तरी फारसे आठवत नाहीत. नजाकत मात्र दोघांचीही सारखीच.
कालच्या इनिंग नंतर लक्ष्मणला वन डे मधे का ड्रॉप केला हा प्रश्न पुन्हा पडतो. स्ट्राइक रोटेत करणे. गॅप्स मधून बाउन्ड्र्या मारणे ७९ बॉल मधे ७३ काढणे यापेक्षा वन डे मधे अजून काय असते.? फिल्डिंगच म्हणाल तर बाकी कोणी फारसा शोध लावल्याच ऐकिवात नाही. लक्ष्मणाला रिटायर होण्या आधी वन डे मधे पुन्हा घ्यावे व एकदा तरी कर्णधार करावा.

हा मान्जरेकर म्हनजे

हा विजय मांजरेकर यांचा मुलगा. विजय मांजरेकर हे १९५० मधले भारतातील सर्वोत्तम फलंदाज होते असे बर्‍याच जाणकारांचे मत होते. त्या काळात फक्त कसोटी सामने होत नि तेहि दरवर्षी बहुधा एकच मालिका असे होत, झाली तर. त्यामुळे त्यांची पूर्ण धावसंख्या किंवा शतके ही आजकालच्या फद्या फलंदाजापेक्षाहि कमी ठरतील.

आजच्या सारखे शरद पवार नि त्यांचे बीसीसीआय नव्हते क्रिकेट खेळाडूंना पगार द्यायला. एकदा करार केला की पुढे मैदानावर उभे रहायचे पैसे!

म्हणून शहाणपणा पत्करून, क्रिकेट संपल्यावर सेक्युरिटी गार्डची नोकरी धरली.

हे चिरंजीव भाग्यवान. जो तो आपले भाग्य घेऊन येतो म्हणतात. तुम्ही कितीहि शिव्या दिल्या, अक्कल काढली, तरी क्रिकेट खेळणे संपल्यावर काहीहि बोलण्यासाठी सुद्धा त्याला पैसे मिळतातच!

हा मान्जरेकर म्हनजे

हा विजय.....त्याला पैसे मिळतातच! >> पूर्ण पोस्ट्मधे दहा-एक वाक्ये आहेत त्यातली दोन वाक्ये संजय मांजरेकरबद्दल Lol

असं होय.. हाणा रे त्या असाम्याला.>>अरे मी नाहि ठेवले रे नाव Lol

आज आयसीसीचे अवॉर्ड्स जाहिर झाले.
तेंडुलकर cricketer of the year
sehwag test player of the year
dhoni : captain of test team for the year
ponting :captain of odi team
a b devilliers :odi player of the year

सन्मान मिळवलेल्या सर्वांचं अभिनंदन.
कालच्या सामन्याला "टेस्ट मॅच ऑफ द इअर" म्हणून खास अ‍ॅवार्ड द्यायला हवं !
कालच्या सामन्यावर कांही खास मालवणी ढंगातील कॉमेंटस -

पाँटींगची दुसर्‍या डावातील विकेट - तो पाँटींग दुसर्‍या़क सांपळो लावण्यातच सदाचो गुंग; म्हणानच त्येकां आपल्या झिलग्यानी लावलेलो सांपळो कळांकच नाय !
पाँटींगची लक्ष्मणला रनर दिल्याची फुशारकी - काय फुशारक्यो मारताहा ! रनर नाय दिलो ,तर चौके ,छक्के मारून लक्ष्मण मॅच खेचतलो ह्यां ठाऊक होता त्येकां ! आणि रनराकडून चूक झाली तरच लक्ष्मण आउट होऊचो एकच चान्स आसा, होही प्लान होतो त्या पाँटींगचो !!
साहेब ९८वर बाद- सचिन मोठो उस्ताद आसा रे ! शतकांच्या शर्यतीत मुद्दाम त्या पाँटींगाक जवळ येऊंक देताहा !! मांजर ऊंदराक खेळवता मा, तसांच !!!
धोनीने सोडलेले झेल आता तर त्येकां दोनाचे चार हात करून विकेटकीपींग कर असांही सांगूक येणा नाय ! पण झील सुधारण्यातलो आसा, त्येची काळजी नको.
पंचांचे चुकीचे निर्णय- हल्ली मैदानात सगळेच एकमेकाक गाळी घालत असतत ! पंचांकही मग वाटताच मा, आपणही थोडे गाळी कां खाऊंन बघु नये ,असां !

पण हे सारं आपलं गमतीत , बरं का !

योग तुझ्या टिममधे तीनच बॉलर्स आहेत आणि तो फार मोठा प्रश्न बनू शकतो. एक जरी जण जायबंदी झाला कि संपले सगळे. पुजाराला घेण्याबद्दल अनुमोदन. त्याला RSA मधे घेऊन जाण्याची शक्यता जवळजवळ नाहि आणि त्यानंतर पुढच्या टेस्ट मालिकेपर्यंत अजून कोणी (युवराज, मुकुंद) आले कि पुजाराचा पत्ता कटला असे धरायला हरकत नाहि. पण त्यासाठी ३ गोलंदाज घेणे अतिशय रिस्की आहे. एकच फिरकी असला कि भज्जीला डोळे बंद करून घेतात. (त्याने २००१ मधे केलेल्या भरोशावर किती दिवस automatic selection होणार हे देवच जाणे. ओझा नि भज्जी ह्यामधे नक्की leading (read : wicket tacking aggressive) spinner कोण हे कधी ठरवणार ? ) भज्जीचा एकंदर form and fitness पाहता आपण मुळातच दोन बॉलर्स घेऊन खेळणार असे धरायला हरकत नाहि. पुजाराला आणायचेच असेल तर विजयच्या जागी येउन द्रविड्ला ओपन करायला सांगावे लागेल. ( श्रिकांत असेतो ह्याची शक्यता शून्य)

हाण तीच्या मा हे ओझाला होते रे. आणि ते ही आनंदात!! कारण ४ आणि २. तो पळायलाच तयार नव्हता आधी. कन्फ्युज्ड होता. असो.

मांजरेकरचे करियर सचिन मुळे संपले आहे, जुन्या द्वेषात तो सचिनबद्दल काहीबाही बोलतो असे मला वाटते. २० वर्षाचे व्हिडिओ काढायचे ठरले तेंव्हा त्याला मुद्दामच घेतले असावे. एन्डुलकर मध्ये त्याचा भरपुर पाठींबा होता हे विसरता कामा नये.

मांजरेकर हा तंद्रशुद्ध फलंदाज होता, तरी त्याच्या लेखणी आणि वाणीतून जितक्या कमेंट्स निघाल्या तितक्या धावा त्याच्या बॅटीतून नाही निघाल्या. >>> अगदी योग्य भरत. Happy अपवाद फक्त सचिनची पदार्पनाची पाक सिरीज त्या ९५ च्या अ‍ॅव्हरेजने मांजरेकरने धावा काढल्या होत्या.

मांजरेकरचे करियर सचिन मुळे संपले आहे,>>म्हणजे काय ? मला आठवते त्याप्रमाणे मांजरेकर उतरणीला लागला ते ९१ च्या down under tour (incl World Cup) नंतर. त्यातही त्याच्या सारख्या तंत्रशुद्ध फलंदाजाला बदलत्या लिमिटेड matches मधे ढकलण्याच्या अट्टाहासामूळे, त्याचे वरचे वर run outs आठवतात. त्याचा confidence ढासळण्याचे ते एक मुख्य कारण होते. दुसरे कारण, त्याचा slow scoring rate, जो टेस्ट्मधे योग्य असला तरी दिवसेंदिवस वेगवान होत गेलेल्या ODI ला अजिबात पूरक ठरत नव्ह्ता. तिसरे कारण Aussies media. त्यांनी हे faults ज्या तर्हेने highlight करायला सुरू केले ते फारच विचित्र होते. (आगरकर बद्दल पण असेच झालेले आठवतेय ? त्याचे शून्यावर बाद होणेच कसे सतत उचलले गेले ? ). ह्यात सचिन चा फारसा संबंध नाही.

असाम्या,
मला वाटलं पुजारा गोलंदाजी पण करतो... हम्म मग अवघड आहे. श्रीशांत, झहीर आणि अजून दोन गोलंदाज हवेतच... भज्जीला घेतीलच दुसरं आहेच कोण? आणि मग अजून एक गोलंदाज म्हणून मुनाफ ला घेतील बहुदा.

केदार,
मला माहीतीये ते ओझा साठी होते... मी फक्त ती फ्रेज वापरत होतो..चालेल ना? Happy

झक्की,
क्रीकेट मधलं बरच माहीत आहे की तुम्हाला. ऊगाच शिव्या देत फिरता मग त्या खेळाला.

Pages