Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
इशान्त वेल कम बॅक !! ३
इशान्त वेल कम बॅक !! ३ विकेट्स
ऑस्ट्रेलिया ९६/३
<<गंभीर, भज्जी, लक्षमण, ईशांत
<<गंभीर, भज्जी, लक्षमण, ईशांत यांना हाकलून अनुक्रमे....>इशांतचं नांव यातून काढायचं कां आतां ? ;);-):डोमा:
क्लार्कला ज्या ओवर मधे घेतला
क्लार्कला ज्या ओवर मधे घेतला ती ओवर तर अप्रतिम, ईशांत अट हिज बेस्ट. सगळे नोबोल्स माफ.
>>इशांतचं नांव यातून काढायचं
>>इशांतचं नांव यातून काढायचं कां आतां ?
२००% हो! खराब खेळपट्टीवर त्याची गोलंदाजी भेदक वाटते आहे.. पहिल्या डावात गुडघ्याच्या वरही न ऊसळणारा चेंडू आता डोक्यावरून जावू पहातोय यातच काय ते आलं. आणि अजून बराच खेळ- म्हणजे ऑसीज ची शेपूट बाकी आहे.
या हिशोबाने ऑसीज नी २००+ केले तर आपली तारांबळ ऊडण्याची शक्यता आहे- अपवाद सेहवाग!
मिचेल जॉन्सन च्या हाताला खाज सुटली असेल...
आपल्या भारतीयांचा हाच प्रॉब्लेम आहे- आपल्याकडे एका सामन्यात हीरो बनवतात. ईशांत अजूनही ऑसी च्या गत दौर्याच्या यशावर संघात टीकून आहे नाहीतर गेले वर्षभरातील त्याची आकडेवारी पाहिली तर त्याला रणजी मध्ये सुध्धा स्थान मिळेल का ईतपत शंका आहे. लोचा हा आहे की ईशांत ला काढला तर पर्याय कोण? गोलंदाजी भागात सगळाच आनंदी आनंद आहे.. त्यामूळे ईशांत या कामगिरी च्या बळावर पुढचा सामना खेळेल हे निश्चीत!
वैयक्तीक मी अजूनही हेच म्हणेन की गंभीर, ईशांत, लक्षमण आणि भज्जी यांना बसवावे. निदान हा सामना जिंकलाच तर तसे करून पहायला काही हरकत नाही. पण...
लक्षमण ला बसवावे. ? >> का
लक्षमण ला बसवावे. ? >> का बरे. श्री लंके विरूद्ध कोणी जिंकून दिले होते विसरू नका.
लक्ष्मणच्या पाठीची वाट
लक्ष्मणच्या पाठीची वाट लागलीये. त्यामुळे तो बहुदा अनफीटच ठरेल पुढच्या कसोटी साठी.. त्यामुळे तो आपोआपच बाहेर बसेल.
>>लक्ष्मणच्या पाठीची वाट
>>लक्ष्मणच्या पाठीची वाट लागलीये. त्यामुळे तो बहुदा अनफीटच ठरेल पुढच्या कसोटी साठी.. त्यामुळे तो आपोआपच बाहेर बसेल.
लंकेतही त्याला पाठ्दुखीचा त्रास झाला होता. "वय" झालं आता.. शिवाय ढेरीचा घेर वाढल्यावर पाठीला कढ लागणारच ना.
cricinfo: the highest
cricinfo:
the highest successfully chased target at Mohali has been 144 against England in 2006, when India won by 9 wickets. Australia lost by 320 runs in 2008 chasing 516 and India lost by 243 runs to West Indies chasing a target of 358."
थोडक्यात २००+ चा पल्ला देखिल निर्णायक ठरू शकतो. पण सेहवाग, सचिन, द्रविड ज्या फॉर्म मध्ये खेळत आहेत (साहेब दुसर्या डावात लवकर बाद होतात अशी आकडेवारी आहे) आणि रैनाचे भाग्य जोरावर आहे त्या बळावर अपाल्याला संधी आहे. कॅटीच अन हसी ची भागीदारी निर्णायक ठरू शकते. जोडी फोडायला हवी आहे...
चहापानानंतर पडझड होईल का? (या कसोटीत तेच चित्र दिसून आले)
हिम्स, बघ मी येवून पोस्टलो अन
हिम्स,
बघ मी येवून पोस्टलो अन कॅटीच गेला (जिंक्स चालूच आहे!)
आज ईथे अधून मधून वारंवर येतच रहातो कसा.. ऊद्या पण आपली फलंदाजी चालू असताना येवू का?:फिदी:
६ बाद १६५. ऑस्ट्रेलियाकडे आता
६ बाद १६५. ऑस्ट्रेलियाकडे आता एकूण १८८ धावांची आघाडी आहे. २००४ सालच्या ऑस्ट्रेलियातल्या कसोटी मालिकेत २ र्या सामन्यात साधारण अशीच परिस्थिती होती. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला ३९ धावांची आघाडी मिळाली होती. दुसर्या डावात ४ थ्या दिवशी ३ बाद १५० च्या आसपास ऑस्ट्रेलिया असताना आगरकरने एक भन्नाट स्पेल टाकून ६ बळी मिळविले व १९८ वर ऑस्ट्रेलियाला रोखले. ५ व्या दिवशी भारताने २३८ धावा करून विजय मिळविला होता (द्रविड नाबाद ७०). या सामन्यात तसेच व्हावे हीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना !
७ वा बळी. पेन गेला. पुजाराने
७ वा बळी. पेन गेला. पुजाराने सिली पॉईंटला दोन झेल घेतले. ७ बाद १६५.
८ बाद १७४. शेपूट वळवळलं नाही
८ बाद १७४. शेपूट वळवळलं नाही तर भारताला सामना जिंकायची उत्तम संधी आहे.
गेला अजून एक, ९ बाद १८५
गेला अजून एक, ९ बाद १८५
९ बाद १८७....
९ बाद १८७....
सर्वबाद १९२. जिंकायला फक्त
सर्वबाद १९२. जिंकायला फक्त २१६ करायच्या (११९ पेक्षा जास्त षटकात). हा सामना जिंकलाच पाहिजे.
अगदी अगदी. जिंकलाच पाहिजे.
अगदी अगदी. जिंकलाच पाहिजे.
योग.. आता फिरकू नकोस अजिबातच
योग.. आता फिरकू नकोस अजिबातच इकडे... मेच जिंकण्याचे प्रचंड चान्सेस आहेत... अगदी द्रविड पद्धतीत नांगर टाकून खेळले तरी.. पण गंभीर गंभीररित्या न खेळता आऊट झालाच आहे... आणि लिहिपर्यंत वॉलपण पडलीये.. साहेब आता तुम्ही आणि तुमची सावलीच जिंकून देऊ शकाल.. नाहीतर ब्रेबॉर्नचा इतिहास रिपीट व्हायला वेळ लागणार नाही...
बर.. नाही फिरकत... (ऊद्या
बर.. नाही फिरकत...
(ऊद्या ईकडे यायची गरज भासणार नाही बहुतेक.. आजच संपेल सामना!)
जिंकायला फक्त २१६ करायच्या
जिंकायला फक्त २१६ करायच्या
एका एकी 'फक्त २१६' हे खोटे ठरले.
४ बाद ५५! द्रविड, गंभीर, रैना, नि सेहवाग परत तंबूत! सुनील गावासकरांच्या मते झहीर खानला पाठवण्यात चूक झाली, पण तो शेवटपर्यंत टिकला.
उद्या खरोखरच भारतीय शेपटाची परीक्षा आहे. इशांत शर्मा, ओझा, यांच्यावर अवलंबून आहे. त्यातून तेंडूलकर टिकले तर आशा आहे.
पण पूर्वीच्या काळचे शब्द आठवायचे तर 'तंबूमे घबराहट है' .
काहीही असले तरी आम्ही पंखे
काहीही असले तरी आम्ही पंखे ना. काळजी आहे पण आमचा घोडा जिंकणारच.
साहेबांना म्हणाव आता अजून एक संधी आहे. एकदा तरी मॅच "फिनिश" करायला. लक्ष्मण ची पाठ बरी होण्या साठी फिजीओ ला साकडे. त्याला मैदानात उतरण आणि टिकण आवश्यक. कॅप्टन ने चार कॅच सोडल्याची भरपाई करावी.
सिली बिली खरच सिली होत चाललाय.
"साहेबांना म्हणाव आता अजून एक
"साहेबांना म्हणाव आता अजून एक संधी आहे. एकदा तरी मॅच "फिनिश" करायला"
जेव्हा साहेब मॅच फिनिश करायला तंबू टाकतात, तेव्हा बाकीच्या १० ना मॅच संपवायची घाई का लागते? सीतामाईला दुसर्यांदा अग्नीपरीक्षा द्यायला सांगितले तेव्हा तिने सरळ भूमातेच्या पोटी जाणे पसंत केले. सचिनला मात्र या अशा अग्निपरीक्षा (मॅच विनिंग खेळी न खेळण्याच्या) त्यांची संपूर्ण कारकीर्द आणि प्रत्येक प्रकारच्या क्रिकेटमधे दर सामन्याला द्यावी लागते.
भरत, अनुमोदन
भरत, अनुमोदन
कामावर असल्याने प्रत्त्यक्ष
कामावर असल्याने प्रत्त्यक्ष बघायला मिळाले नाही. आज रात्री क्षणचित्रे बघून मगच आपल्या फलंदाजीबद्दल मत देईन. न बघताच असे म्हणता येईल "भरवशाच्या बैलांना टोणगा"
चालेल ना हिम्स?
______________________________________________
एकंदरीत गरज खेळपट्टीवर किमान अर्धा दिवस ऊभे रहायची आहे तर..
झक्की,
मी म्हटलं होत ना नुसतं "ऊभं" रहायला देखिल खूप किम्मत मोजावी लागते!
भरत वेल सेड. अनुमोदन. ही मॅच
भरत वेल सेड. अनुमोदन. ही मॅच पण अगदी श्रीलंकेच्या शेवटच्या कसोटी सारखे झाली आहे. एकुण अवघड आहे.
नक्कीच योग.. बाकी गंभीरला
नक्कीच योग..
बाकी गंभीरला फारच महान पद्धतीत ढापलाय... पण द्रविड, सेहवाग आणि रैनाच्या विकेट्स पूर्णपणे अभ्यास पूर्वक काढल्या आहेत.. द्रविडला योग्य रित्या प्लॅन करुन एक बॉल आत एक बॉल बाहेर आणि आऊट.... आणि सेहवाग आणि रैना दोघेही बाऊन्सरवर आऊट झालेत..
एकंदरीत, परिस्थिती कठीण आहे.
एकंदरीत, परिस्थिती कठीण आहे. पण..... लक्ष्य फार मोठे नाही व साहेब अजून ठामपणे उभे आहेत हा आशेचा एक किरण व... अशा अवस्थेत कुणीतरी एक जण अनपेक्षितपणे झपाटल्यासारखा खेळण्याची
अंधुकशी का होईना शक्यता असते [उदा. किर्ती आझादची पाकिस्तानविरुद्धची खेळी !]. झहीरचे आजचे अफलातून "रीव्हर्स स्विंग" बघता, चेंडू जुना होण्याच्या आधीच शक्य होईल तितक्या धावा जमवणे अपरिहार्य. "शेपटी"कडून अपेक्षा ठेवणं म्हणूनच कांही खरं नाही ! चला,.... प्रार्थनेला जातो !!
सचिन व लक्ष्मण खेळले तरच आपण
सचिन व लक्ष्मण खेळले तरच आपण जिंकू शकतो. धोनी मॅचविनर नाही. तो नांगर टाकून किंवा एक बाजू लावून धरून खेळू शकत नाही. आपल्या ४ मॅचविनर पैकी सेहवाग व द्रविड बाद झालेले आहेत. लक्ष्मण कितपत फिट आहे याची कल्पना नाही. सचिनला साथ द्यायला खंदा साथीदार समोर नाही. जिंकणे अवघड आहे.
मॅच किंवा हायलाईट्स काहीच
मॅच किंवा हायलाईट्स काहीच बघितलेले नाही - १९२ आणि ४/५५ व्हायला एवढा काय बदल झाला पिच मधे? स्विंग आणि बाउन्स आला आहे का अचानक?
पाहिली क्षणचित्रे.. हिम्स
पाहिली क्षणचित्रे..
हिम्स म्हणतोय तसे रैना अन द्रविड ला अभ्यासपूर्वक बाद केले. द्रविड सुरुवातीला सेट होताना ऊजव्या यष्टीबाहेरील चेंडू ला बॅट लावू की नको या दुविधेत बरेच वेळा बाद झाला आहे. सेहवाग आज टीकून रहायच हे ठरवून आला होता बहुदा त्यामूळेच बाद झाला. सेहवाग ने असे ठरवून खेळायला जावू नये ते तयच्या नैसर्गिक खेळीविरुध्ध आहे परिणाम अर्थातच दुविधा मनस्थितीत खेळलेला बचावात्मक फटका अन झेलबाद.
रैना ला जिमी अॅकॅडमी (मोहींदर अमरनाथ) मध्ये जावून ऊसळते चेंडू खेळण्याचं प्रशीक्षण घेण्याची अत्यंत गरज आहे. (रैना ने गांगुलीची जागा घेतली असे साधारण मानले जाते ते या अर्थी एकदम बरोबर आहे)
गंभीर ला बसवायला नाही ऊचलायला हवाय....... अगदी चूकीचा निर्णय दिला गेला असला तरी गंभीर कधीच काँफीडंट वाटला नाही.
पुजारा ने घेतलेला झेल त्याला पुढील सामन्यात स्थान मिळवायला पुरेसा असावा (राव अजून काय काय करून दाखवायचं एखाद्या खेळाडूने भारतीय संघात स्थान मिळवायला?).
साहेब पुन्हा एकदा विश्वाचे ओझे खांद्यावर घेवून खेळतील, जे धोकादायक आहे. पण काय करणार समोरून एक एक बुरूज असे पडत असताना किल्ला लढवायचा तर नको ते ओझे येतेच. अशा वेळी नेमके साहेब नको तो फटका खेळून बाद होतात. धोणी ला ऊद्या पुन्हा एकदा कप्तानाची खेळी करून सामना जिंकून द्यायची सुवर्णसंधी आहे. तर झहीर सकट ऊर्वरीत शेपटाने अत्यंत चिवटपणा दाखवून कुठल्याही प्रकारची हाराकिरी न करता साहेब अन धोणी च्या बरोबरीने झुंज देण्याची वृत्ती दाखवणे आवश्यक आहे.
अजूनही खेळपट्टीत एखादा ऊसळी घेणारा किंव्वा मधेच थांबून येणारा चेंडू सोडला तर विशेष काही धोकादायक गोष्ट नाहीये. त्यामूळे सामना अर्थातच मानसिक प्राबल्यावर अवलंबून असेल. आणि अर्थातच साहेबांचा अफाट अनुभव ऊद्या खूप महत्वाचा ठरेल. पहिला तासभर एकही गडी न गमावता ऊभे राहीले (म्हणजे झहीर खान) तरी २५-३० धावा अपोआप होतील अन ऑसीज चे मानसिक खच्चीकरण होवू शकते. ३५+ धावा करून सेट झालेले साहेब अन नंतर दबावाखाली न खेळणारा धोणी या दोन गोष्टी कांगारुंसाठी पुरेशा तापदायक आहेत. सन्नीभाय चा जुना मट्र कामी येवू शकतो: चांगल्या चेंडूला चांगलं खेळा, वाईट चेंडूवर धावा करा. अर्थात आजकाल सन्नीभाय चे कुणीच ऐकेनासे झालेय.
---------------------------------------------------------------------------------------
मोहाली मध्ये चंपी तेल मॉलिश वाला मिळत नाही काय? नसल्यास त्या लक्षमणाला आज रात्री वेदनाशामक सुया टोचून ऊभे करा. नाहीतर आमचे तिकीटाचे पैसे परत अन त्याची मॅच फी पण रद्द करा. शिवाय ईडली डोसा असे वातकारक पदार्थ त्याला देणे बंद करा. अजून चाळीशी नाही गाठली अन पाठीत ऊसण भरते कशी?
कुंबळे डोक्याला प्लॅस्टर घालून लाज राखायला मैदानावर ऊतरतो तर लक्षमणाने कमरपट्टा घालून ऊतरायला काय हरकत आहे?
ऊद्याचा धावफलकः साहेब ५०+, झहीर २०+, धोणी ३०+, भज्जी २०, ईशांत १०, ओझा ५, ऊरलेल्या धावा लक्षमण करेलः
मला वाटतं उद्या लक्ष्मण-
मला वाटतं उद्या लक्ष्मण- तेंडल्या व धोणी मिळून मॅच काढतील. (मी आशावादी आहे, सचिन असल्यामुळे, नेहमीप्रमाणे!!) फक्त पहिल्या १५ ओव्हर्स सचिननेच नीट खेळायला हव्यात.
Pages