Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
पाकड्यांनी पुन्हा एकदा
पाकड्यांनी पुन्हा एकदा मॅच-फिक्सिंग वादात उतरून धुमाकूळ घालायला सुरूवात केलीय. शेवटची टेस्ट मॅच किती भयानक हरलेत.
>>> दुसरं, नविन खेळाडूनी
>>> दुसरं, नविन खेळाडूनी जागेवर हक्क सांगण्यासारखं कांहीही केलेलं नसलं, तरी त्यातील बहुतेक जण प्रतिभाशाली आहेत हे नाकारता नाही येणार; मग, अजून संधी मिळण्याचा त्यांचा हक्क तरी राहुलपेक्षा अधिक मजबूत नाही होत ?
भाऊ,
माफ करा, पण कार्तिक, कोहली, जडेजा, युसुफ पठाण, रोहीत शर्मा यांपैकी कोण प्रतिभाशाली वाटतो तुम्हाला? यातला कोहली सोडला तर इतरांना अनेकवेळा संधी मिळूनसुद्धा त्यांनी ती वाया घालविली आहे. जर प्रतिभा असती तर त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले असते.
'त्या' लेखातलं शेवटचं वाक्य :
'त्या' लेखातलं शेवटचं वाक्य : मुळात राहुलला एकदिवसीय संघातून वगळावं असं काही झालेलं नव्हतं.
मुळात राहुलला एकदिवसीय
मुळात राहुलला एकदिवसीय संघातून वगळावं असं काही झालेलं नव्हतं.
>>
२१ मोदक...
'त्या' लेखातलं
>>
लिंक द्या ना प्लीज...
हा लेख बिझिनेस स्टँडर्ड
हा लेख बिझिनेस स्टँडर्ड शनिवार २८ ऑगस्टच्या विकेंड पुरवणीत आलाय, पण त्याची लिंक शोधूनही सापडली नाही. लेखक : सुवीन के सिन्हा - सदर : अंपायर्स पोस्ट - शीर्षक : द एज ओल्ड डिबेट.
यातले काही मुद्दे :(ज्यातले बरेचसे इथे आधीच मांडले गेलेत)
१) भारतीय संघातल्या नव्या दमाच्या खेळाडूंनी मिळालेल्या अनेक संधी अक्षरशः उधळून लावल्यात. त्यामुळे विश्वचषक काही महिन्यांवर येऊन ठेपला तरी भारतीय संघाचे चित्र स्पष्ट होत नाही.
२) धोनीच्या कर्णधारपदात भारताच्या नवोदित खेळाडूंनी टी २० चषक जिंकल्यापासून ज्येष्ठ खेळाडूंनी ग्रेसफुलि निवृत्त व्हावे अशी कुजबूज चालू आहे. नव्या खेळाडूंनी कठोर मेहनत आणि वजनदार कामगिरीच्या जोरावरच संघात स्थान मिळवायला हवे.
3) सचिन आणि गंभीरच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाजीची पहिल्या षटकातली यथातथा कामगिरी, तीही सेहवाग चांगला खेळत असताना.
4) संघ निवड कामगिरीच्य जोरावर व्हायला हवी, खेळाडूचे वय न पाहता, आणि हा संघ आताच ठरवायला हवा, तर चषकापर्यंत तो सेटल होइल.
5) लेखातले शेवटचे वाक्य : द्रविड संदर्भात (वासिम अक्रमचे द्रविडला परत आणावे हे विधान quote करून) It is not a bad idea. First , he is just a year older thean the player who recnetly hइt the first double century in the odis. Secondly, why was Dravid dropped in the first place?
अर्थात लेख मुळातून वाचण्यातली मजा या अनुवादात नाही.
मी हटवादीपणा करतोय असं माझं
मी हटवादीपणा करतोय असं माझं मलाच वाटूं लागलंय ! पण कुत्र्याचं शेपूट.......
१] आत्ताच द्वीशतक मारणार्या खेळाडूपेक्षा राहुल फक्त एका वर्षानेच मोठा आहे ,हे वाचायला चमकदार व चमचमीत वाटलं तरी खरंच तर्कशुद्ध आहे का ? वय ह्या केवळ एकाच मुद्यावरून एकदिवसीय सामन्यातून राहुलला बाहेर ठेवण्यात आलंय, हे गॄहीत १००%बरोबर आहे ? आणि त्याच्या वयाच्या एखाद्यानं द्वीशतक झळकावलं [जी तर एकदिवसीय सामन्यातील एक अद्वितीय गोष्ट आहे], तर ते राहुल किंवा कोणत्याही त्या वयाच्या फलंदाजासाठी संघात स्थान मिळवण्याचं आपोआप समर्थन ठरतं ?
२]<<धोनीच्या कर्णधारपदात भारताच्या नवोदित खेळाडूंनी टी २० चषक जिंकल्यापासून ज्येष्ठ खेळाडूंनी ग्रेसफुलि निवृत्त व्हावे अशी कुजबूज चालू आहे. >>हे तर बाहेरही लोक त्यावेळी खुल्लम-खुल्ला बोलत असत ! पण संघ तर ह्यापैकी कुणी निवडत नाही ना. आणि, सचिनबद्दल असं कुजबुजायची सुद्धा हिम्मत नवोदितातही कुणी कां नाही दाखवत !
३]<<सचिन आणि गंभीरच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाजीची पहिल्या षटकातली यथातथा कामगिरी, तीही सेहवाग चांगला खेळत असताना.>> पण विश्वचषक संघात हे दोघेही असणार असं तर आपण धरून चाललोयच ना ?
४]<<माफ करा, पण कार्तिक, कोहली, जडेजा, युसुफ पठाण, रोहीत शर्मा यांपैकी कोण प्रतिभाशाली वाटतो तुम्हाला?>> कोहली व रोहित शर्मा, निश्चितपणे. शर्माचा आता कांहीतरी "प्रॉब्लेम"असावा पण प्रतिभेबद्दल शंका नसावी. पण, विचार जर राहुलच्या संघातल्या स्थानाबद्दलच आहे, तर त्यामुळे बाहेर कोण जाणार, ती नांवच तपासायला हवीत. सात फलंदाज खेळवायचे ठरलं तरीही - सचिन, सेहवाग, गंभीर,धोनी या चौघांविषयी दुमत नसावं.उरलेल्या तीन जागांसाठी- द्रविड,युवराज, रैना, कोहली व रोहित शर्मा. द्रविडमुळे बाहेर जाणारा यातील प्रत्येक जण प्रतिभाशालीच आहे, असं आपलं माझं मत.
भारताला गेल्या ५ वर्षात (२००५
भारताला गेल्या ५ वर्षात (२००५ पासून) केवळ ३ च प्रतिभाशाली खेळाडू मिळालेत. ते म्हणजे धोनी, रैना आणि प्रवीणकुमार. नवीन आलेले बाकी सर्वजण १-२ मालिकेचे धनी. वरील काही तथाकथित यंग ब्रिगेडव्यतिरिक्त संधी मिळालेले इतर नवीन खेळाडू सुध्दा फारसे चमकले नाहीत (उदा. मुरली विजय, नमन ओझा, विनयकुमार, बद्रीनाथ इ.) श्रीशांत, रुद्र प्रताप सिंग सुरवातीच्या काही काळानंतर थंड झालेत. इशांत शर्मा २००८ च्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्यानंतर फार काही करू शकलेला नाही, पण तो पहिल्या १६ मध्ये स्थान टिकवून आहे. रॉबिन उथप्पाला का बाहेर ठेवले आहे ते कळतच नाही.
भारताला विश्वचषकासाठीचा १६ जणांचा संघ निवडणे अवघड जाणार आहे. रविंद्र जडेजा, कार्तिक, रोहीत शर्मा, युसुफ पठाण इ. नावे पुन्हा एकदा संघात दिसली तरी आश्चर्य वाटणार नाही.
मास्तुरे म्हणजे अजून नवीन
मास्तुरे म्हणजे अजून नवीन खेळाडूंच्या बाबतीत दादा-राईट जोडीने निवडलेले लोकच आहेत. त्यानंतर द्रविड-चॅपेल पुरस्कृत systems, methods, processes मधून येणार्यांपेक्षा आधी असलेले बाहेरच जास्त गेलेत (उदा: इरफान पठाण)
आज क्रिकईन्फो वरती सकाळी आलेले कार्टून जबरी होते
http://www.cricinfo.com/page2/content/story/475025.html?selected=1
ज्यांना संदर्भ माहीत नाही त्यांच्यासाठी ही लिन्क
http://www.cricinfo.com/england-v-pakistan-2010/content/current/story/47...
द्रविड माझ्यामते भारताचा ऑल
द्रविड माझ्यामते भारताचा ऑल टाईम वन ऑफ द ग्रेट टेस्ट प्लेयर.
पण वन डे. नो वे. टीम मधे राहण्यासाठी याने काय काय नाटक करावीत. ओपनिंग काय, किपिंग काय. जमले तर काहीच नाही. तेंव्हा तो येणार नाही हे नक्की. सौरव तिवारी आणि रॉबिन ला संधी देतील, रोहीतचा जो काय प्रॉब्लेम आहे तो त्याला समजेल अशी आशा.
कार्तिक सारख्या माणसाला, ज्याची बॅट सरळ खाली येत नाही, त्याला सारखे ओपनिंग ला खेळवणे म्हणजे काही तरी पाणी मुरतेय. त्यापेक्षा पार्थीव बरा.
धोनीने तेंड्या विरूद्ध आडून आडून इतक्या वेळेला बोंब मारली आहे आणि अॅप्रीसिएशन तर कधीच नाही. म्हणूनच तो टी२० खेळत नाही.
द्रविड चॅपेल ही जोडगोळी
द्रविड चॅपेल ही जोडगोळी भारतीय क्रिकेटला लागलेले ग्रहण होते. सतत डिव्हीजीव वृत्ती.
>>> टीम मधे राहण्यासाठी याने
>>> टीम मधे राहण्यासाठी याने काय काय नाटक करावीत. ओपनिंग काय, किपिंग काय. जमले तर काहीच नाही.
तुम्हाला द्रविडबद्दल व्यक्तिगत मत बाळगण्यचा पूर्ण हक्क आहे. दोनच उदाहरणे देतो.
(१) २००३ च्या विश्वचषकात द्रविडने सर्व ११ सामन्यात यष्टीरक्षण केले. त्या स्पर्धेत भारत अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेला होता. त्याला किपिंग जमले नाही हे जरा धाडसी विधान आहे.
(२) तो एक दिवसीय सामन्यात ओपनिंगला गेल्याचे मला आठवत नाही. गेला असला तरी फारच क्वचितच गेला असेल. कसोटीत सुद्धा फक्त एकाच पाकिस्तानविरूध्दच्या मालिकेत तो ओपनिंगला गेला होता. त्या मालिकेतल्या एका कसोटीत त्याने व सेहवागने पहिल्या जोडीसाठी ४०९ धावांची भागीदारी केली होती.
तो मुळात सलामीचा फलंदाज नाही. त्यामुळे तो सलामीला फार वेळा गेलेला नाही किंवा अयशस्वी ठरला असेल तर त्यात काही विशेष नाही. पण त्याचे यष्टीरक्षण दिनेश कार्तिक किंवा दीप दासगुप्तासारख्या रेग्युलर कीपरपेक्षा चांगले होते.
मलाही असेच वाटते की द्रविड
मलाही असेच वाटते की द्रविड वर्ल्ड कप ला असावा. निदान १६ मधे. पण त्याने संघात जास्त इन्वॉल्व्ह होण्याची गरज आहे. सध्या तसे वाटत नाही. अर्थात त्याला त्याबाबतीत बीसीसीआय ने व सचिन्/धोनी/कर्स्टन ने विश्वासात घेउन काहीतरी सांगण्याची सुद्धा गरज आहे.
माझ्या वरच्या कॉमेंट त्याने कप्तान म्हणून केलेल्या चुकांसंबंधी आहेत. २००५ साली तो चॅपेल च्या जास्तच आहारी गेला होता असे वाटते. त्याचे प्रयत्न सिन्सियर असतील यात वादच नाही. पण ते चुकले हे ही खरे आहे.
बाकी मास्तुरेंच्या वरच्या पोस्टशी सहमत.
>>> त्याचीही हल्लीची एकदिवसीय
>>> त्याचीही हल्लीची एकदिवसीय सामन्यातील कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी तर सोडाच पण तरूण खेळाडूंपेक्षा सरसही नाहीय.
द्रविड भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना २००९ मध्ये द. आफ्रिकेत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला. त्यात त्याने बर्यापैकी फलंदाजी केली होती. एका सामन्यात ७० धावा केल्याचे मला आठवते. उरलेल्या सामन्यात किती धावा केल्या ते आठवत नाही. पण जवळपास सर्वच खेळाडू त्या स्पर्घेत अपयशी ठरले होते.
>>> शिवाय, इथल्याच चर्चेत मागे म्हटल्याप्रमाणे, सचिनप्रमाणे राहुल या संघात समरस झाला असल्याचं नाही जाणवलं. उपरेपणाच्या भावनेने खेळून राहुल तरी आता चमकेल याची काय खात्री !
त्याच्या बरोबरीचे सर्व जण (सचिन सोडून) निवृत्त झाले आहेत. गांगुलीला घालविण्यात आले. कुम्बळे शहाणपणा दाखवून स्वतःहून गेला. सचिनला हाकला अशी दर ५-६ महिन्यांनी मागणी होतच असते. पण तो आपल्या बॅटच्या दरार्याने टिकून आहे. द्रविडला कर्णधारपद अनपेक्षितपणे सोडावे लागले. त्याची निवृत्तीचे वय जवळ आले आहे. त्यामुळे तो बराचसा एकाकी वाटतो.
मुख्य प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे चांगले युवा खेळाडू फारसे नाहीत. ज्यांना ज्यांना संधी मिळाली ते बहुतेक सर्व जण अपयशी ठरले. पहिल्या २-३ विकेट झटपट गेल्यावर पाय रोवून खेळणारा सचिनशिवाय दुसरा फलंदाज सध्या आपल्याकडे नाही. सचिन गेला तर आपली वाटच लागते. गेल्याच आठवड्यातल्या मालिकेत भारताचा एकदा ८८ व एकदा १०३ सर्वबाद असा दारूण खेळ झाला. अशा परिस्थितीत द्रविड उपयुक्त वाटतो.
न्यूज ऑफ द वर्ल्ड: स्पॉट
न्यूज ऑफ द वर्ल्ड: स्पॉट फिक्सिंग ची लिन्क. तेथे तो व्हिडीओ ही आहे.
http://www.newsoftheworld.co.uk/news/924349/Cricket-in-the-dock-as-we-ex...
टीम मधे राहण्यासाठी याने काय
टीम मधे राहण्यासाठी याने काय काय नाटक करावीत. ओपनिंग काय, किपिंग काय. जमले तर काहीच नाही. >> १००% असहमत!!! द्रविडचे किपींग रेकॉर्ड बरे (चांगले नाही बरका) होते त्याकाळी, आणि बाकी कोणी धड बॅटींग करणारा कीपर नव्हता धोनी यायच्या आधी...
८८ व एकदा १०३ सर्वबाद असा दारूण खेळ झाला. अशा परिस्थितीत द्रविड उपयुक्त वाटतो.>> अनुमोदन, फायनललापण दुसर्या बाजुन कोणी थांबायलाच तयार नव्हत, अशावेळी भागीदारी करुन शेवटी हाणामारी करायच्या ऐवजी नवे गडी २०-२० च्या सारखी मॅच संपवायला गेले.
हे
हे वाचा:
http://www.cricinfo.com/england-v-pakistan-2010/content/current/story/47...
नव्या गड्यांनाचा प्रॉब्लेमच
नव्या गड्यांनाचा प्रॉब्लेमच तो आहे. सगळं काही झटपट! म्हणून मग हाराकिरी होते बहुदा. जुन्या पैकी युवराजचा भरोसा २०-२० च्या आधिही खूप वाटत नव्हताच. आता अनिल कुंबळे पण कोच झाला आहे, त्याचाकडून मानसिक संतुलनाचे धडे ह्या लोकांनी घ्यावेत व गिरवावेत. कदाचित फायदा होईल. हे गिअर शिफ्टींग सहज झाले पाहिजे पण ते होत नाही असेच दिसते. रैना अपवाद आणि म्हणूनच तो तुलनेने नविन असून एकदम भरवश्याचा वाटतो.
द्रविड मला नाही वाटत येईल म्हणून. ( मला तो खूप आवडतो, पण आता शक्य नाही असे दिसते, अनलेस ऑसिंविरुद्ध पण अशीच गडबड झाली तरच ते शक्य आहे.)
रोहित शर्माला इगो काढून मानसिक ताकदीची फार गरज आहे अन्यथा तो ही विझणार. तो जेंव्हा आला तेंव्हा मलाही आवडला होता, त्याच्याकडे टेक्नीक आहे जे जडेजा किंवा युसूफ सारख्या इसमांकडे नाही, स्पेशालिस्ट बॅटसमन म्हणून त्याला खेळवायचे असेल तर त्याने, त्याचाकडे कुठल्याही नंबरला खेळायची ताकद आहे हे दाखवून दिले पाहिजे. त्याचाकडे विविध शॉटस आहेत. आणि तो त्या वापरतो ही. गरज आहे इगो सोडण्याची, रन्स काढून इगो दाखवला बरेच वाटेल.
गल्ली क्रिकेट मध्ये (IPL) हे सर्व खूप रन्स काढतात, पण प्रतिपक्षाचे गोलंदाज पण टुकार असतात, त्यामुळेच नेहरा किंवा खुद्द कुंबळेच्या गोलंदाजीवर ४ - ५ पेक्षा जास्त रन्स निघाले नाहीत.
ह्या लोकांना आपल्या स्वतःच्या कामगिरीचा अॅनॅलिसिस करायला लावावा. बॅटींग प्रॅक्टीस पेक्षा सलग आठवडा भर त्यांना त्यांची स्वतःची बॅटिंग IPL मधली दाखवावी. दे विल रियलाईज!!
कुंबळेवर मोठी जबाबदारी आहे. त्याने एखाद्या जबरदस्त मानसोपचार तज्ञाची मदत घेऊन रोहितची सध्याची मानसिक अडचण दुर करावी. भारतीय क्रिकेटला झाला तर फायदाच होईल. (नाहीतर अजून ३ वर्षांनी रोहित आपल्याला चारु शर्मा अन अतूल वासन सारख्यांसोबत मॅचची चर्चा करताना दिसेल.)
सौरभ तिवारी मलाही आवडतो पण त्यालाही असेच ४ मॅच मध्ये घेऊन "पुश" केले तर त्याचा रोहित शर्मा होईल. त्याला संधी जास्त मिळायला पाहिजे. रायडूला का घेत नाहीत काय माहित? रायडूकडे गिअर शिफ्ट आहे!! तो एक उत्तम खेळाडू होऊ शकतो. पण तो धोणीचा आवडता नसावा.
<<नव्या गड्यांनाचा प्रॉब्लेमच
<<नव्या गड्यांनाचा प्रॉब्लेमच तो आहे. सगळं काही झटपट! म्हणून मग हाराकिरी होते बहुदा>> त्याना बाळकडूच जर झटपटचंच पाजलं जातं, काय करणार बिचारे !
द्रविड हा नि:संशय "ग्रेट " या संज्ञेत मोडणारा खेळाडू आहे. माझा खूप आवडता पण आहे.पण The Wall need not be a Dam ! नवीन खेळाडूंच्या चुका होताहेत पण त्यालादेखील कांही अंशीं तरी आजचं क्रिकेटच जबाबदार आहे. उच्चतम स्तरावर खेळण्याची प्रतिभा व कुवत आहे की नाही एव्हढं जोखून झाल्यावर त्याना कमाल संधी मिळणं न्याय्य व अपरिहार्य आहे. कारण दूरदृष्टीनं पाहिलं तर तेंच शहाणपणाचं ठरणार आहे. द्रविड जर सचिनसारखा अखंड एकदिवसीय राष्ट्रीय संघात असता व सातत्याने चांगली कामगिरी करत असता, तर त्याला आता वगळणं मूर्खपणाचा कळसच झाला असता. पण आता नवीन खेळाडूंच्या जागी त्याला पाचारण करणं मात्र गैर वाटतं.
फारेंड, कार्टून खरंच छानच आहे. धन्यवाद.
रायडूला का घेत नाहीत काय
रायडूला का घेत नाहीत काय माहित? रायडूकडे गिअर शिफ्ट आहे!! तो एक उत्तम खेळाडू होऊ शकतो. पण तो धोणीचा आवडता नसावा.
>>
रायडु आयसीएल खेळला...
त्यामुळे त्याच्यावर बॅन आहे अजून...
तो आयपीएल खेळू शकतो, पण अजून काही काळ तरी राष्ट्रीय संघात येऊ शकत नाही...
द्रविड जर सचिनसारखा अखंड एकदिवसीय राष्ट्रीय संघात असता व सातत्याने चांगली कामगिरी करत असता, तर त्याला आता वगळणं मूर्खपणाचा कळसच झाला असता.
>>
मुळात जेंव्हा २००७ मधे त्याला डच्चू दिला त्याच्या ४ सामने आधीपर्यंत तो कॅप्टन होता आणि चांगला खेळत होता... (कॅप्टनशिपच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्यानी ६० बॉल मधे ९६ केले होते... आणि शेवटच्या ओव्हरमधे पलिकडच्या बॅट्समननी फक्त १ बॉल स्ट्राईक दिल्यामुळे त्याला शतकापासून वंचित रहावं लागलं होतं, त्य एका बॉलवरही त्यानी चौव्वा मारला होता... )
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ मॅचेस मधे परफॉर्मन्स न दाखवल्याबद्दल त्याला आधी पाचव्या सामन्यात १२वा खेळाडू केलं आणि मग पुढच्या सिरीजला घेतलंच नाही...
मूर्खपणाचा कळस तेंव्हाच झाला होता... फक्त आता तो अंगवळणी पडलाय...
<<मूर्खपणाचा कळस तेंव्हाच
<<मूर्खपणाचा कळस तेंव्हाच झाला होता>> १००% सहमत. पण त्या मूर्खपणाचं [व राहुलवरच्या अन्यायाचं] निवारण आता त्याला संघात स्थान देऊन होईल का, याबद्दल फक्त शंका आहे. [वाईट एव्हढंच वाटतं कीं या चर्चेच्या ओघात माझ्याही अत्यंत आवडीच्या खेळाडूच्या व व्यक्तीच्या विरोधातच मला लिहावं लागतंय !]
राहूल द्रविड माझा सुद्धा
राहूल द्रविड माझा सुद्धा अतिशय आवडता बॅटसमन आहे. त्याची कलकत्त्याची लक्ष्मण बरोबरची भागीदारी म्हणजे त्याच्या कारकिर्दीचा मुगट्मणी. त्यात टेंपरामेंट, क्लास सगळच आल. अगदी सचिन किंवा सुनिलही अशी खेळी खेळले नाहीत.
पण वन डे साठी द्रविड. अजिबात नाही. द्रविडच्या ५० रन्स म्हणजे मॅच हरण्याची शक्यता जास्ती. त्याला किती वेळा मॅन ऑफ दं मॅच मिळालेत हे सचिन, सेहवाग, गांगुली बरोबर कंपेअर करण मजेच राहील. (मी हे चेक केलेल नाही)
त्याचा मुख्य प्रॉब्लेम, स्ट्राईक रोटेट न करणे आणि एकदम पूअर रनिंग बीट्वीन द विकेटस.
अर्थात भारता बाहेर त्याच बॅटिंग स्कील वन डे मधे पण उपयोगाला यायचे. ऑल आउट न होण्यासाठी.
पण झाले ते गेले. आता वर्ल्ड कप भारतात आहे. द्रविड काही परत येणार नाही.
भारतात जिंकायच असेल तर सतत प्रत्येक मॅच मधे ३०० च्या वर रन काढणारी टीम लागेल. ती केपेबिलिटी आपल्या टीम मध्ये आहे.
शेवटी नॉक आउट मधे काय ज्या दिवशी च त्या दिवशी. जशी साउथ आफ्रिके मधली फायनल. पाँटिंगचा लागला, सचिनचा नाही.
मॅन ऑफ द मॅच अॅवार्ड्स. एक
मॅन ऑफ द मॅच अॅवार्ड्स. एक चांगली लिस्ट मिळाली.
http://stats.cricinfo.com/ci/content/records/283705.html
सचिन ६१/४४२, सौरभ ३१/३११, सेहवाग २१/२२८, युवी २०/२५४ , अझर १८/३३४, द्रविड १४/३३९
लिस्ट डॉमिनेटेड बाय बॅटसमेन.
एक विशेष गोष्ट प्यूअर बॉलर असलेल्यांपैकी वकार १७/२६२ मधे ३३ व्या नंबरावर, तर वॉर्न आणि मुरली १२ आणि १३ अॅवॉर्डस मिळवून पार खाली.
ऑल राऊंडर्स - कालीस, जयसूर्या, अक्रम, क्लूस्नर बर्यापैकी वर
व्हिवियन रिचर्डस चे % सचिन पेक्षाही खूप जास्त ३१/१८७
विक्रमजी, खूपच छान माहिती [
विक्रमजी, खूपच छान माहिती [ मी आंकडेवारीचा आशिक नसूनही !].
<<ऑल राऊंडर्स - कालीस, जयसूर्या, अक्रम, क्लूस्नर बर्यापैकी वर >>आपल्याकडे जागतिक दर्जाचे ऑलराऊंडर्स नाहीत, ही एकदिवसीय स्पर्धेतील आपली खरी गोची आहे. मला सुचतो तो उपाय म्हणजे गोलंदाजांकडून नेटसमध्ये फलंदाजीवर सक्तीने मेहनत करून घेणं. सामने आपल्याकडेच असल्याने "स्विंग" खेळण्याचं कसब फारसं घोटावं लागणार नाही. ४ गोलंदाज ५-१० धावात गुंडाळले जातात हे चालणार नाही, ही समज द्यायला हवी. कुंबळेच्या जिगरीचा दाखला द्यायला हवा; सेट झालेला वरचा फलंदाज अजून खेळत असेल तर त्याला त्यांच्या साथीने ७०-८० धावा वाढवूं शकतो असा विश्वास वाटला पहिजे. विरोधी संघालाही तसा वचक वाटला पाहिजे; जे सध्या अजिबात होत नाहीय.
उपलब्ध असलेल्या प्रत्येक घटकाचा व संधीचा कमाल उपयोग करून घेतल्याशिवाय विश्वचषक विजेतेपदाची स्वप्नं कोणत्याच संघाला नाही पहाता येणार !
"मला सुचतो तो उपाय म्हणजे
"मला सुचतो तो उपाय म्हणजे गोलंदाजांकडून नेटसमध्ये फलंदाजीवर सक्तीने मेहनत करून घेणं"
हे असे चाललेय कधीपासून.प्रत्येक गोलंदाजाला एकेक स्पेशल ट्युटर दिलेला आहे. झहीरचा गुरु लक्ष्मण आहे. हरभजन आणि झहीर दोघेही बॅट चांगली चालवतात. झहीरने तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा मुंबईतला एकदिवसीय सामना कार्तिकच्या साथीने जिंकून दिला होता. हरभजन आयपीएल मधे कुणाला ऐकत नव्हता.
पुन्हा द्रविड : एकदिवसीय सामन्यात सुद्धा परिस्थिती प्रमाणे खेळ करायला, डाव बांधायला,त्याला आकार द्यायला कोणीतरी लागेलच. त्यामुळे त्याच्या आतापर्यंतच्या एकदिवसीय कारकीर्दीला टाकाऊ म्हणणे योग्य वाटत नाही.
सेहवाग एकदिवसीय सामन्यात आताआताच चमकू लागलाय, नाहीतर कसोटीतली त्याची कामगिरी आणि आकडेवारी पाहून एकदिवसीय सामन्यात खेळणारा हाच का तो असा प्रश्न पडे.
रहित शर्माला फक्त कसोटीत खेळवावे, उगाच एकदिवसीय २०-२० मधे खेळवून त्याच्या चांगल्या तंत्राचे वाटोळे करू नये असे मला वाटते. सेम अबाउट इशांत शर्मा. दोघे मॅच्युअर झाले की मग बघता येईल.
क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा
क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ म्हटला जात असला तरी तो नेहमीच सभ्यपणे खेळला गेलाय असं नाही. बरं खिलाडूवृत्तीची सीता पळवणारे रावण फक्त श्रीलंकेतच आहेत आणि इतरत्र नाहीत किंवा भारतात फक्त खिलाडूवृत्तीच्या कांचनमृगामागे पळणारे राम आहेत आणि होते असंही नाही.
http://loksatta.com/lokprabha/20100903/crkciet.htm
<<हे असे चाललेय कधीपासून>>
<<हे असे चाललेय कधीपासून>> तसं असेल तर उत्तमच. पण आत्ताची श्रीलंकेतली कामगिरी पाहून हा उपाय सुचला. ज्या चार एकदिवसीय सामन्यात चारही गोलंदाजाना [ज्यात प्रविण कुमार, जो रणजीतला फलंदाज आहे, तोही आहे] फलंदाजीची संधी मिळाली, त्यात त्यांची एकंदर व्यक्तिगत धावांची भर ९,७,२१ व १६ [यात प्रविण कुमारच्याच १४ धावा], अशी होती.
मला सुचतो तो उपाय म्हणजे
मला सुचतो तो उपाय म्हणजे गोलंदाजांकडून नेटसमध्ये फलंदाजीवर सक्तीने मेहनत करून घेणं.>>थोडक्यात त्यांचा इर्फान पठाण करावा ? मूळात जे आहे त्याची practice करायची गरज अधिक आहे त्यांना (ballers). फायनल मधे दिलशान ला width दिली, निकाल काय लागला हे जाहीर आहे.
IPL च्या बळावर ODI मधे घेणे ह्याच प्रकारत मूळात गोच आहे. आधी ODI मधे कसे खेळतात हे बघून tests मधे घेत, त्याची पुढची पायरी. रोहित काय, कोहली काय किंबा मनिष वर्मा काय, ह्यांच्यापैकी फारच र्कमी जणांना वेगवेगळ्या match situations अनुभव आहे. मुळात वेगवेगळ्या match situations मधून घेल्याशिवाय भांडे पक्के कसे होणार ? (सगळेच सचिन नसतात ) गंभिर दोन वर्षे रणजी खेळल्यावर त्याच्यातला फरक बघण्यासारखा होता. (रणजी कुठल्या pitches वर खेळतात हा भाग अलहिदा) रैनाचे temperament सुधारले. रोहित एक वर्ष जेमतेम रणजी खेळलाय. domestic cricket मधे १-२ वर्षे उमेदवारी करायची सक्त गरज आहे.
असामी यांना अनुमोदन.
असामी यांना अनुमोदन. दुर्दैवाने आजकाल 'झटपट' जमाना आहे. 'लायकी' असण्यापेक्षा 'संधि' देणे महत्वाचे आहे. लॉटरी खेळून श्रीमंत होणे हे, काम करून, पैसे नीट वापरून श्रीमंत होण्यापेक्षा केंव्हाहि सनसनाटी!
द्रविडचा प्रोब्लेम मानसिक
द्रविडचा प्रोब्लेम मानसिक आहे..... या मस्तीखोर युवा खेळाडुंच्यात शांत, संयमी राहुल एकटा पडत असावा.... मुळात धोनीला अनुभवी खेळाडुंना नीट हाताळताच आले नाही.... त्याला या लिजंडसबद्दल कायम असुरक्षितच वाटत आलय
हाच द्रविड बंगरुळुच्या संघाकडुन कुंबळेच्या नेतृत्वाखाली खेळताना जास्त दिलखुलास वाटतो
बाकी त्याच्या दर्जाबद्दल कुणातच दुमत नसावे!
वनडेच काय मला तर तो २०-२० साठी सुद्ध्हा योग्य वाटतो.... फक्त त्याला योग्यरितीने हाताळले पाहिजेल!
बुमरँगना १००१ टक्के
बुमरँगना १००१ टक्के अनुमोदन!!!
Pages