Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
न्यूझीलंड ५३-७ आता
न्यूझीलंड ५३-७
आता ह्यांच्याही फलंदाजीचं विश्लेषण करणं आलं !!:हहगलो: सेहवाग सोडला तर त्यांच्यात व आपल्यात तसा कांही फरक नाहीच आहे म्हणा !!
blame the pitch
blame the pitch
जिंकलो आता परत एकदा लंका वि.
जिंकलो आता परत एकदा लंका वि. भारत
भारतीय संघाचे अभिनंदन. आता
भारतीय संघाचे अभिनंदन.
आता अंतिम सामन्यात गेल्या वेळच्या अपमानास्पद, लांछनास्पद पराभवाचे उट्टे काढायला संधी आहे.
शुभेच्छा.
य वर्षांनी आपल्या टीम मधे ४
य वर्षांनी आपल्या टीम मधे ४ फास्ट बोलर होते. आणि सगळ्यांनी बरी बोलिंग टाकली. बर वाटल. विकेट पेक्षा वातावरणाचा जास्ती फायदा होतोय.
जय डॉन. आज त्याचा जन्म दिवस.
जय डॉन. आज त्याचा जन्म दिवस. थोर माणूस. त्याचे किस्से कणेकरांच्या क्रिकेट्वेध मध्ये खूप आहेत.
त्यातला एक --> तो विकेट किपर ला विचारायचा, पुढचा बॉल कुठे मारू म्हणून.
डॉन के विकेट की तलाश तो २-३
डॉन के विकेट की तलाश तो २-३ मुल्कोंके (इंग्लंड आणखीण विंडिज व इतर) बॉलर्स को थी पर डॉन को आउट करना मुश्किलही नही नामुम्कीन था
अरे, आपुनके पास भी ऐसे कम
अरे, आपुनके पास भी ऐसे कम "डॉन" है क्या ! वो भी पुछते है, बोल किसको टपकाऊं !! और, आउट तो छोडो, उनको अंदर करनाभी नामुम्कीन हय!!!:हहगलो:
सॉरी, सर डॉनच्या बाबतीत असला फालतूपणा केल्याबद्दल. माझं पण ते दैवतच आहे !
तर आता क्रिकेटच्या बाबतीत
तर आता क्रिकेटच्या बाबतीत फक्त इंग्लिश किंवा हिंदीतून बोलायचे तर!
ये बीबी उघड्या तो फर्ष्ट लैनच हिंदी इंग्रजी की. तभीच मालूम पडेला था! मगर कुछ कुछ लिखनेकी जबरदस्त खुजली! इसलिये मराठीतच लिह्या. मगर अभी कोशीश करेंगे. डरेंगे नही.
बोले तो, वो फायनल कब है भौ?
ऐसा लिख्या तो तो हरकत नही ना?
झक्कीसाहेब," ती बोययी तय
झक्कीसाहेब," ती बोययी तय बोययी, तू कयाला बोययी ? " गोष्ट माहीत आहे ना ?
फायनल उद्या [शनिवारी] आहे.
आज जडेजाला ड्रॉप करून सौरभ
आज जडेजाला ड्रॉप करून सौरभ तिवारीला घेतात का ते बघायच.
आमचा विनिंग घोडा - आपली टीम.
कशी का असेना.
.
विक्रम 'विनिंग पोझिशन' बघून
विक्रम 'विनिंग पोझिशन' बघून ठेव. तुझी बसायची
<<विक्रम 'विनिंग पोझिशन' बघून
<<विक्रम 'विनिंग पोझिशन' बघून ठेव. तुझी बसायची >> आणि, विश्वचषकासाठीही ती "फ्रीझ" करून जरा जपून ठेवा !:D

आज टाईम्समध्ये गावस्करने धोनीवर स्तुतिसुमनं उधळलीत; कुणीतरी इथंच म्हटल्याप्रमाणे जडेजा जर खरंच धोनीचा "ब्ल्यू आईड बॉय" असेल, तर त्याला फायनलमध्ये बसवणं कठीणच !
तिरंगी मालिकेचे सार :
तिरंगी मालिकेचे सार : फलंदाजांची अपेक्षेपेक्षा वाईट तर गोलंदाजांची अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी.
<<तिरंगी मालिकेचे सार :
<<तिरंगी मालिकेचे सार : फलंदाजांची अपेक्षेपेक्षा वाईट तर गोलंदाजांची अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी.>>भरतजी, खरंय; आतापर्यंत तरी ! पण आज तर खरा शेवटचा हात फिरायचाय यावर !!
आज दिनेश कार्तिक व जडेजाच्या
आज दिनेश कार्तिक व जडेजाच्या ऐवजी तिवारी व ओझाला खेळवावे.
<<विक्रम 'विनिंग पोझिशन' बघून
<<विक्रम 'विनिंग पोझिशन' बघून ठेव. तुझी बसायची >> आणि, विश्वचषकासाठीही ती "फ्रीझ" करून जरा जपून ठेवा >>
वा वा. काय आयडिया आहे. थ्यांकू. शनिवार संध्याकाळ, फायनल, (आज कुठली का असेना), वर्ल्ड कप फायनल साठी माझीही प्रॅक्टीस. कारण बाकी कॉम्बीनेशन पण आता टेस्ट करून फिक्स करायला पाहिजे ना.
म्हणजे स्टार्ट ला काय. पीच हार्ड की सॉफ्ट. स्लो की फास्ट, ग्रीन की ब्लू की अजून काही, हॉकाय नसला तर उत्तम :).
त्या कोणत्यातरी बिस्किटाच्या
त्या कोणत्यातरी बिस्किटाच्या जाहिरातीत टॉस जिंकलेल्या संघाला पंच विजेता घोषित करतात, तसंच का नाही करत लंकेतल्या या तिरंगी स्पर्धेत?
मागे भारताने ३८५ केल्या
मागे भारताने ३८५ केल्या होत्या. आता ३०० म्हणजे फार अवघड नाही ना?
इंग्लंड - ४४६. ४ जण शून्यावर
इंग्लंड - ४४६. ४ जण शून्यावर बाद, एक शून्य नाबाद, बाकीच्यात दोन दीडशेच्या वर. आणि फक्त एक २० च्या वर!
पाकिस्तानचा गेल्या ४ पैकी ३
पाकिस्तानचा गेल्या ४ पैकी ३ कसोटी सामन्यातल्या एका डावात १०० च्या आत सर्वबाद झालेत. या मालिकेतील इंग्लंडविरूध्दच्या पहिल्या कसोटीतील दुसर्या डावात सर्वबाद ८८, २ र्या कसोटीतल्या पहिल्या डावात सर्वबाद ७२ आणि या ४ थ्या कसोटीत पहिल्या डावात सर्वबाद ७४. आपल्यापेक्षा त्यांची दारूण अवस्था आहे.
इंग्लंडने मात्र या कसोटी ७ बाद १०२ वरून ४४६ पर्यंत डाव ओढला.
आपण आज पुन्हा एकदा हरलो.
आपण आज पुन्हा एकदा हरलो. धोनीचे जावई, कार्तिक (0 धावा) आणि रोहित शर्मा (५ धावा) पुन्हा एकदा आपल्या लौकिकाला जागले. आजतरी निदान त्यांच्याऐवजी तिवारी, अश्विन किंवा ओझाला खेळवायला पाहिजे होते.
भारत -२२५ [४६ षटकं] सध्या
भारत -२२५ [४६ षटकं]
सध्या मोठ्या भिंगातून पाहूनही आपल्या फलंदाजीत आत्मविश्वास कुठे दिसेल असं वाटत नाही ! प्रश्न हरल्याचा नाही तर स्वतःचा व संघाचा डाव सावरण्याची व उभारण्याची योजनाच फलंदाजांकडे नव्हती, हे घातक आहे; सेहवाग व कार्थिकचं समजू शकतो. पण युवराज ? वास्तविक पहिल्याच बॉलला तो आउट व्हायचा, नंतर स्लीपमध्येही झेल नशीबानं थोडा बाहेरून गेला, तरीही खेळावर सावध होऊन पकड घ्यायचं नाव नाही. कोहली व रैना खरंच छान खेळत होते पण म्हणूनच त्या परिस्थितीत त्यानी केलेले ते स्ट्रोक अक्षम्यच होते. रोहित शर्माच्या एकाग्रतेचाच सध्यां बहुधा चुथडा झाला असावा. विकेट हातात असल्या तर शेवटी १०-१२च्या सरासरीने पण धावा काढता येतात, हे अनेक संघानी दाखवून दिलं असताना, असं भाबाऊन खेळणं, हे आत्मविश्वासाचा अभावच नाही दर्शवत ? फलंदाजीत प्रतिभेच्या बाबतीत या सर्वात कांहीसा कमीच असलेला धोनी आत्मविश्वासात मात्र सर्वात सरस वाटतो.
षटक चालू असतानाही खेळपट्टीमधून "पॉप-अप" होणार्या जाहिराती दाखवणं, ही आता एक नवी डोकेदुखी होणार आहे !
जाउ दे हो, काही फरक पडत नाही.
जाउ दे हो, काही फरक पडत नाही. अजून वर्ल्ड कप खूप दूर आहे. आता सौरभ येईलच. तसेच तेंडू व गौतम आहेतच.
तसे बघायला गेले तर आपण अनलकी. दिनेश आउट नव्हता. (त्याचीं लायकी नाही हा भाग वेगळा). सेहवाग डिस्टर्ब झाला. रोहीत अनलकी.
पण खरे तर वन साईडेड मॅच.
रजत शर्माच खूप दिवसानी एक आवडल. रोहित शर्माची कंपॅरिझन थेट डेविड गोव्हर बरोबर. अगदी अॅप्ट शब्द प्रयोग. लेझी एलेगन्स. मला ही कन्सेप्टच खूप आवडते. लेझी एलेगन्स. मस्त
मला खूप आवडतात दोघेही,
फारेंडा - पोझीशन ओके. पण देशी कॉम्बीनेशन लकी नाही. त्याच्यावर आता क्रॉस. काही तरी विलायती पाहिजे. नाहीतर वर्ल्ड कप ला खर नाही.
११ विरूद्ध ९ असा सामना झाला.
११ विरूद्ध ९ असा सामना झाला. संघात ११ खेळाडूंना परवानगी असली तरी भारत फक्त ९ खेळाडू घेऊनच खेळत होता. त्यामुळे सामना हरणारच होता.
<<लेझी एलेगन्स....मला ही
<<लेझी एलेगन्स....मला ही कन्सेप्टच खूप आवडते>> थोड्या धांवाही जोडीला असत्या तर अधिकच आवडलं असतं ! अन, गॉवर सारख्या डावर्या फलंदाजांचा लेझी एलेगन्स तर खूपच भावतो [उदा. वाडेकर, सलीम दुराणी इ.]!
<<रोहीत अनलकी.>> कसं काय ? तो त्या चेंडूवर सहजच स्टंप व्हायचाच होता पण यष्टीरक्षकाच्या हातून बॉल सुटला व त्याच्याच पॅडवर आपटून यष्टीवर आदळला ! दैवानं यष्टीरक्षकाची चूक दुरूस्त केली इतकंच ! राष्ट्रीय संघातला मुंबईचा तो एकुलता एक खेळाडू [सचिन आता वेगळ्याच कॅटेगरीत मोडतो !] म्हणून त्याच्याकडे आपुलकीनं पहावं, तर तो निराशच करतोय.
<<जाउ दे हो, काही फरक पडत नाही. अजून वर्ल्ड कप खूप दूर आहे.>>खूप दूर दूर तर जात नाहीय ना ! भारतानं विश्वचषक जिंकावा असं खूप वाटतंय; आता सचिनच्या जबरदस्त ईच्छाशक्तीवर व कामगिरीवरच मुख्य मदार ठेवायची पाळी न येवो, म्हणजे झालं !
आता "मॅच फिक्सींग"चे वारे
आता "मॅच फिक्सींग"चे वारे पुन्हा वाहू लागलेत ! विश्वचषकावर त्यांनी आणलेल्या ढगांच सावट न पडो, हीच प्रार्थना !!
बिझिनेस स्टँडर्ड मधे राहुल
बिझिनेस स्टँडर्ड मधे राहुल द्रविडच्या एकदिवसीय सामन्यातील पुनरागमनाची दिलेली ही काही कारणे :
नुकत्याच एकदिवसीय सामन्यात पहिले द्विशतक झळकावणार्या फलंदाजापेक्षा राहुल फक्त एक वर्षाने मोठा आहे, त्यामुळे त्याचे वय आड येऊ नये.
नवीन खेळाडूंनी जागेवर हक्क सांगावा असे काहीही केलेले नाही, वारेमप संधी मिळून.
कार्तिक, कोहली, जडेजा, युसुफ
कार्तिक, कोहली, जडेजा, युसुफ पठाण, रोहीत शर्मा या तथाकथित यंग ब्रिगेडपेक्षा द्रविड शतपटीने श्रेष्ठ आहे. फलंदाजीव्यतिरिक्त तो चांगला यष्टीरक्षक असून तो स्लिपमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसुद्धा आहे.
राहुलबद्दल आत्यंतिक आदर व
राहुलबद्दल आत्यंतिक आदर व प्रेम असूनही, त्याचं एकदिवसीय सामन्यातलं पुनरागमन नाही पटत. प्रश्न फक्त वयाचा नाही. त्याचीही हल्लीची एकदिवसीय सामन्यातील कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी तर सोडाच पण तरूण खेळाडूंपेक्षा सरसही नाहीय. दुसरं, नविन खेळाडूनी जागेवर हक्क सांगण्यासारखं कांहीही केलेलं नसलं, तरी त्यातील बहुतेक जण प्रतिभाशाली आहेत हे नाकारता नाही येणार; मग, अजून संधी मिळण्याचा त्यांचा हक्क तरी राहुलपेक्षा अधिक मजबूत नाही होत ? आणि, त्यांच्या व भारतीय संघाच्या भविष्याच्या विचारातूनही तेंच अधिक हितावह नाही वाटत ?
राहुल यष्टीरक्षक असला तरी आता तो धोनीच्या ऐवजी ते काम करणार आहे का ? अन, एकदिवसीय सामन्यात स्लीपमध्ये किती क्षेत्ररक्षक लागतात ? त्याउलट, महत्वाच्या ऑऊटफील्डमधल्या क्षेत्ररक्षणात तो कमी पडणार नाही का ?
शिवाय, इथल्याच चर्चेत मागे म्हटल्याप्रमाणे, सचिनप्रमाणे राहुल या संघात समरस झाला असल्याचं नाही जाणवलं. उपरेपणाच्या भावनेने खेळून राहुल तरी आता चमकेल याची काय खात्री !
नवीन खेळाडूना समज देणं, विश्वास देणं व ताकीदही देणं समजण्यासारखं आहे पण सौरव, राहुल, लक्ष्मण इ.ना एकदिवसीय सामन्यांसाठी परत बोलावणं खरंच नाही पटत !
Pages