क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साहेब जिंदाबाद.

आपल्याला जिंकायची पुनः एकदा संधी. कांगारू दुसर्‍या डावात खूप प्रेशर खाली खेळतील. मालिकेचा निकाल १-० ऐवजी २-० असण न्याय्य ठरेल. आता १-१ रुल्ड आउट.

मुरली विजयचे अभिनंदन.

भाउ साहेब तुमचे व्यंगचित्र आवडले.

shout.JPG

अग, ऑफीसमध्ये ज्याने मला जीव नकोसा केला आहे तो "साहेब" वेगळा आणि ज्याच्यावरून मी जीव ओवाळून टाकतो तो हा "साहेब" वेगळा, समजलं !

आताच घरी आलो . साहेबांच शतक झाल्यावर झालेला जल्लोष अवर्णनीय ............
९९ वरून 6 मारून साहेबांनी हात आकाशाकडे ऊंचावले आणी सचिनच शतक बघायच आमच एक स्वप्न पूर्ण झाल (त्याला काय ४९ वेळा तेच तेच :))
१५० ही झाले . पण भाऊ तुमच्या शुभेच्छा थोड्या कमी पडल्या . १९१ .....
उद्या ऑफीसला जायलाच पाहिजे . Sad

<<पण भाऊ तुमच्या शुभेच्छा थोड्या कमी पडल्या . १९१ .....>> केदारजी, १९१ [नॉट आऊट]; शुभेच्छा कमी नाही पडल्या, कॅरी फॉरवर्ड झाल्यात, त्याही या डावासाठीच !
एक गोष्ट लक्षात आली का ? प्रत्येक वेळी खेळाडू मैदानातून परत येताना पाँटींग मुद्दाम थांबून, टाळ्या वाजवून आपल्या फलंदाजाना सौजन्यपूर्वक पुढे जायची खूण करत होता ! आपल्या "साहेबा'कडून गोरे साहेबही आता कांहीतरी शिकायला लागलेत, तर !!

>>अरे, त्या मुरली विजयच्या शतकाबद्दल बोला ना कुणी तरी ! त्याचं शतक झाल्यावर शिवरामकृष्णन म्हणाला "So, now he got his Cricketing Degree, isn't it, Sunil !". त्यावरचं सुनील गावस्करचं उत्तर " Yes, and that too when Cricket Univesity itself was watching from the other end !"
पुजाराचं मात्र वाईट वाटलं. त्याच्याच वाटेला दिवसातला सगळ्यात सरपटत आलेला वेगवान चेंडू यावा, याचं.

दिवसभरात देवाने दिलेला न्सहीबाचा सर्व कोटा विजय ने वापरला त्यामूळे बिचारा पुजारा कमनशीबी ठरला.. अख्ख्या दिवसातला भयानक वेगातईल सरपटी चेंडू वाट्याला येणं म्हणजे मोठच दुर्भाग्य!

असो. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुध्ध खेळवतील अशी आशा करूया..

साहेबांचा विजय असो.. ऊद्या तृशतक चालेल. आज मी अन हिम्स ईथे आलो नाहीयोत तेव्हा साहेबांना धास्ती नसावी Happy
ऊद्या ऊपाहारापर्यंत धोणी अन साहेब टीकले तर २०० ची आघाडी घेता येईल मग द्या पुन्हा कांगारूंना खेळायला.. ही खेळपट्टी चौथ्या पाच्व्या दिवशी भयानक वागेल अशी लक्षणे दिसत आहेत.

व्वा. आणि शिवाय विजयने पॅडवर जास्त जाहिराती लावल्या म्हणून पंचाने त्याला वर्निंग पण दिली म्हणे!
अहो आता शतक केले म्हणून, पण पुजारासारखा लवकर बाद झाला नि पुनः सामन्यात घेतले नाही तर सध्या मिळताहेत तेव्हढे कमावून घ्यायला नकोत का?
आता पंचांना कुणि जाहीरात करण्याबद्द॑ल पैसे देत नाहीत म्हणून त्यांच्या पोटात दुखते बहुतेक.

साहेब २००* अभिनंदन Happy

अग, ऑफीसमध्ये ज्याने मला जीव नकोसा केला आहे तो "साहेब" वेगळा आणि ज्याच्यावरून मी जीव ओवाळून टाकतो तो हा "साहेब" वेगळा, समजलं ! >>> भाऊ @ :d

पुजाराचे मलाही फार वाईट वाटले, मोठ्या इनिंग्ज खेळायचे टेंपरामेंट त्याच्याकडे आहे. सौराष्ट्रसारख्या नॉनग्लॅमरस टीमकडून खेळत असल्याने तो लवकर नजरेत आला नाही. अजून संधी मिळायला हवी.

झाले रे झाले. Happy त्रिवार मुजरा. फारएंडा तुझ्या सर्व मनोकामना पुर्ण होवोत ही साहेबा चरणी प्रार्थना. Happy

हुरित्झ बरोबर मिचेल जॉन्सनचेही शतक पूर्ण!! अभिनंदन Happy
तिसरी टेस्ट नाही ते बरेच आहे, ऑसीज काय या दणक्यातून लवकर उठणार नाहीत.

ऑस्ट्रेलिया सकाळपासून निगेटिव्ह खेळत आहे. (नेहमीचेच म्हणा!!) ऑफसाईडला ठिक, पण च्यायला बॉल बॅट पासून कैक योजने दुर. आता १७५ पर्यंत लिड देऊन आज ऑसींना खेळायला बोलवावे. ऑफकोर्स धोनी व इतर लोकांनी जास्त जोरात खेळायला पाहिजे आता. ड्रॉ पेक्षा जिंकन्याचा प्रयत्न करावा.

पाँटिंग अपील करतो की निकाल देतो? तर्जनी उंचावून? कधीपासून? मी याच सामन्यात पाहिले. धोनीने चोरटी धाव घेताना सचिनच्या धावबाद असण्याबद्दलचा निर्णय तिसर्‍या पंचाकडे गेला तेव्हा. (धोनी बरा आहे ना?काय गरज होती तिथे धावायची?)

मयेकर तो नेहमी तसेच करतो, अगदी काल रैना आउट झाल्यावर पण त्याने तसेच केले होते. मागे ऑस्ट्रेलियात स्वतः कॅच घेऊन खोटेच आउट असल्याचा दबाव त्याने टाकला होता. तो एक चांगला फलंदाज असेलही, मला त्याच्याबद्दल अजिबात आदर नाही. (स्टिव वॉ असताना मात्र तसे नव्हते. Happy )

साहेबांनी लौकीक कायम राखला.. नविन गोलंदाजाला विकेट देण्याचा Happy
असो. महान खेळी!
आता आपले शेपूट किती वळवळते ते पहायचे. १००+ किमान आघाडी घेतली तरी आपल्याला संधी आहे. अन्यथा अनिर्णीत राहण्याची शक्यता जास्त.

हरभजन साहेबांचे अभिनन्दन करण्यासाठी पव्हेलियन मध्ये गेला. चला माळ सुरू झाली. सगळे लवकरात लवकर साहेबांचे अभिनन्दन करायला जातील.

योग अगदी अगदी. घसरगुंडी चालु पण झाली.

साहेब ३०० पर्यंत टिकले असते तर जिंकलोच असतो आपण. आता अनिर्णीत रहाणार.

<< आज मी अन हिम्स ईथे आलो नाहीयोत तेव्हा साहेबांना धास्ती नसावी >> साहेबाना धास्ती असते ती फक्त आपल्याबरोबर शेवटपर्यंत साथ द्यायला कुणी टीकून रहातो कीं नाही याची !
केदारजी, माझ्या शुभेच्छांचा जोर आत्ताच संपला! साहेब द्विशतकाचं आश्वासन पुरं करून आत्ताच आऊट .
<<पाँटिंग अपील करतो की निकाल देतो? तर्जनी उंचावून?>> जॉनसनने आज म्हटलंय " We will go all out for the kill". म्हणजेच, मराठीत, प्रत्येक चेंडूनंतर आम्ही " जीवाच्या आकांताने "आऊट" म्हणून कोकलूं " !

बायदवे धोनीचे शॉट्स कुठे गेले? आता तो स्लो का खेळतोय हे कळले नाही. सकाळपासून मारायला सुरुवात करायला हवी होती.

बायदवे धोनीचे शॉट्स कुठे गेले?
>>
धोनीचे शॉट्स २००८ टी२० वर्ल्डकप पासूनच त्याला ऐन मोक्यावर विसरायला होतात...
अधून मधून क्वचित त्याला ते आठवतात... पण ते ही फारच अपवादानी...
नाहितर हल्ली बरेचदा त्याचा 'कर्ण' च होतो... बॅटिंगची 'धार' गेलीये बिलकुल...

>>आता आपले शेपूट किती वळवळते ते पहायचे. १००+ किमान आघाडी घेतली तरी आपल्याला संधी आहे. अन्यथा अनिर्णीत राहण्याची शक्यता जास्त.

विधान मागे घेतो... आपली आघाडी जेमेतेम २५-४० होवू शकते.

पण या खेळपट्टीवर कांगारू पुन्हा १५० मध्ये सर्वबाद होवू शकतात... आपण पुन्हा तेव्हडी धावसंख्या शेवटच्या दिवशी गाठू का.. माहित नाही!! पुन्हा काही असे नाट्य घडले तर साहेब अन खेळपट्टी बनवणार्‍यास विभागून सामनावीर म्हणून घोषित करावे.

------------------------------------------------------------------------------------
या खेळपट्टीवर आता चेंडू फक्त नागमोडी जाणे शिल्लक आहे Happy

आपण पुन्हा तेव्हडी धावसंख्या शेवटच्या दिवशी गाठू का.. माहित नाही!!
>>
लक्ष्मण नाहिये... Wink

तसं एकेकाळी तारणाहार होण्यात द्रविड पण एक्स्पर्ट होता...
सध्या त्याला कॉन्फिडन्स सिरप ची नितांत गरज आहे...

>>तसं एकेकाळी तारणाहार होण्यात द्रविड पण एक्स्पर्ट होता..

गेले ते दीन गेले... आता त्याच्या बॅट पॅड मध्ये तोरण बांधण्याएव्हडी जागा असते.

>>बायदवे धोनीचे शॉट्स कुठे गेले
पाट्यावरचे शॉट्स गवतावर कसे येणार? (आडात नाही तर...)

गेला तो पण. अरेरे. तेंडल्याने धावा काढल्या नसत्यातर फॉलो ऑन घेउन बसलो असतो. आता मला मॅच बद्दल अवघड वाटायला सुरुवात झाली. आज दोन सेशन बाकी आहेत. बॉल टर्न होत आहे. आपण ऑल आउट ४९५. ४७८ वर पाच आणि ४९५ वर सर्व.
त्यांनी आज २०० काढून उद्या लंचच्या आधी एक तास (एक तास खेळून) आपल्याल्या खेळायला दिले तर अवघड जाईल.

Pages