क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑसीज पूर्वी सारखे खेळत आहेत... झकास! नॉर्थ टिकला तर ४५०+ करतील बहुतेक. अन्यथा ४०० नक्कीच शक्य आहे.
ओझा, भज्जी आणि कं अगदीच निष्प्रभ. सेहवाग अन रैना या मुख्य फिरकी गोलंदाजांना आणावे Happy

<<पण परत एकदा जहीर इज स्विगींग द चेरी अमेझिंगली... >>कारण सचिन प्रत्येक वेळी चेंडू घासून पुसून त्याच्या हातात देतोय !);-):डोमा:
हेडनप्रंमाणेच आता नॉर्थ व पेन ऑसीजसाठी भारताने दिलेली देणगी ठरणारसं दिसतंय !
ही खेळपट्टी दिवसेंदिवस सुधारत जाणार कीं खराब होत, यावर निर्णय बराचसा अवलंबून राहील असं आता तरी वाटतंय.

>>ही खेळपट्टी दिवसेंदिवस सुधारत जाणार कीं खराब होत, यावर निर्णय बराचसा अवलंबून राहील असं आता तरी वाटतंय
अहो भाऊ, अशी दिवसागणीक सुधारणारी खेळपट्टी बनायची आहे अजून.. ९९%, खेळपट्टी खराब नाही झाली तरी तुटते, खडबडीत होते..
ऑसीज चे ४५०+ झाले तर त्यांच्या विजयाला वाव आहे. आपण कदाचित सामना वाचवू शकू. मला ऊगाच असं वाटतय तो ६ १/२ फूटी गोलंदाज निव्वळ धो धो बाऊंसर्स टाकून सेहवाग, रैना, विजय आणि कं ना किरकोळ मध्ये बाद करेल. (मग आहेच पुन्हा जुना वाद- आपले लोक बाऊंसर्स खेळू शकत नाहीत वगैरे. असो.. फारच पुढच्या गोष्टी अन भाकीते झाली... )

खेळपट्टी कशी आहे ते कळत नाहीय्ये. काल चेंडू बर्‍यापैकी वळत होता. आज खेळपट्टी तेवढी प्रभावी वाटली नाही. अनिर्णित किंवा हार असे दोनच पर्याय भारतापुढे आहेत असे आतापर्यंतच्या खेळावरून वाटत आहे.

अवघड आहे योग.... शेवाग नेहमीप्रमाणेच शेण खाऊन बाद झाला आहे... प्रत्येक मॅच २०-२० सारखीच खेळतो..

ह्म्म्म.. सेहवाग ने नेहेमीप्रमाणेच हळूच दार ऊघडले आहे. कांगारू दिवसाखेर आत घुसतात का ते पहायचे Happy

आता द्रविड अन विजय मध्ये कोण कमीत कमी धावा काढतो याची शर्यत लागेल.. त्यातही दोघे दिवस खेळून काढायला म्हणून खेळणार म्हणजे बघायलाच नको... सर्वांच्या सहनशीलतेची परिक्षा आहे. शेवटी
बिली बोअर होवून एकाला लाटण्याची शक्यता अधिक आहे Happy
----------------------------
रे गेला की द्रविड!!!
हिम्स, जिंक्स आला काय परत?

>>जिंकायचे वांधे होतील..
जिंकायचे..? अशक्य आशावादी आहेस रे.. Happy

बाकी द्रविड ने कधी निवृत्त व्हायचे हा प्रश्ण विचारायची फारेंडाने मनाई केली आहे.. अन्यथा Happy

बरं झालं मी आज सकाळी लवकर उठून कॉमेंटरी वाचायला लागलो. मी झोपलो असे पाहून तिकडे नॉर्थ नि पेन ने नुसता धुमाकुळ घातला. अरे काय हे ऑस्ट्रेलियन, फसवतात! शेपट्या जड करून ठेवतात!

शिवाय द्रवीड नि सेहेवाग सारख्या खंद्या, खर्‍या फलंदाजांना लाटले.

बरं झालं मी आलो!!

आता आपली फलंदाजी अशी ठेवावी:
१. श्रीसंथ, २. ओझा, ३. हरभजन सिंग, ५. झहीर खान, ५. धोणि, ६. पुजारा, ७. रैना, ८. विजय ९. सेहेवाग १०. तेंडूलकर ११. द्रविड!!

म्हणजे आपले शेपूट एव्हढे जड होईल की ऑस्ट्रेलियाच्या वर ताण!!
Happy

>>चला साहेबांच्या नावावर अजून एक विक्रम लागू झाला... १४००० धावा करणारा पहिला फलंदाज.
थोडक्यात पुढील प्रत्त्येक धाव विक्रमी असेल.. Happy
साहेब शतकाच्या ईराद्याने ऊतरल्यागत वाटत आहेत- आपल्या तंबूत आनंद, ऑसी मध्ये घबराहट.

१२८/२ या स्थिती वरून आपण ४५० च्या जवळ पोहचू अशी आशा आहे. ऊद्या पहिल्या सत्राचा खेळ ऊर्वरीत सामन्याची दीशा ठरवू शकतो, सचिन, मुरली टिकले तर सामन्यात पुन्हा जान आहे.

>>खेळपट्टी कशी आहे ते कळत नाहीय्ये. काल चेंडू बर्‍यापैकी वळत होता. आज खेळपट्टी तेवढी प्रभावी वाटली नाही
मला वाटतं सूर्य वर येत नाही तोवर सकाळी ढगाळ वातावरणात खेळपट्टी बरी असते, चेंडू फारसे उडत्/वळत नाहीत. सूर्य वर आला की खेळपट्टीतील दव/ओलावा जावून ति टणक अन लवकर खडबडीत होते- फिरकीला अनुकूल होते. पण ऑसीची मदार वेगवान गोलंदाजांवरच आहे आणि सेहवाग अन राहुल ची विकेट पाहता, चूक केल्याशिवाय कींव्वा अती सकारात्मक्/फाजील फटका खेळल्याशिवाय फलंदाज बाद होईल असे वाटत नाही.
------------------------------------------------------------------------------------
ऊद्या साहेबांनी शतक ठोकावे. शिवाय पुजाराची फलंदाजी पाहण्यास ही ऊत्सुक.

<<अहो भाऊ, अशी दिवसागणीक सुधारणारी खेळपट्टी बनायची आहे अजून.. >>योगजी, तिथं गेले कांही दिवस जोरदार पाऊस होता. त्यामुळे आंतला ओलावा आतां उन्हामुळे गेल्यास खेळपट्टी सुधारण्याचीही शक्यता असते; आज सेहवागही कुठंतरी असं म्हणाला आहे. सर्वसाधारणपणे मात्र तुमचं म्हणणं बरोबर आहे.
मुरली विजयचं नांव सलामीचा फलंदाज म्हणून सुचवल्याने मला इथं टपल्या खाव्या लागल्या होत्या. आज त्याने त्यावर मलमपट्टी केली म्हणायला हवं !
पाँटींगचा उद्दामपणा सोडला तर त्याची गणना सर्वकालीन "ग्रेट"मध्ये सहज होऊ शकते !

गेले २ दिवस मैदानात जाऊन ही मॅच पाहतोय . दोन्ही दिवस जवळ्जवळ पूर्ण मैदान भरल होत (कोण म्हणाल रे ते टेस्ट क्रिकेटला वाईट दिवस आले म्हणून )
पब्लिक दंगा करण्यात पटाईत आहेच . पाँटीग आऊट झाल्यावर त्या॑च बू~~~~ अफलातूनच . सेहवाग च्या प्रत्येक फटक्याला ही जबरी दाद मिळाली आणी तो बाद झाल्यावर Pindrop silence
सगळ्यात मोठा रिस्पॉन्स मात्र आपल्या साहेबानाच . ते फिल्डींग करतानाही , बॅटींग ला येतानाही , आणी १४००० होतानाही .... सचिन सचिन चा नारा तर ओझा बॉलिंग करतानाही सुरु होता .सचिन भारताचा हे पटत असल काही पाहून . Happy
पण जनरल पब्लिक ला टेस्टची understanding फारशी नाही अस वाटल . शेवटची ओवर टाकायची अस umpire नी जाहीर केल (साहेब नको म्हणत नसताना आणी आमच्यासारखे काही Bad Light ओरडत असताना ) तेव्हा जल्लोष झाला यासाठी की १ ओवर जास्त बघायला मिळेल . Sad आम्ही मात्र जीव मुठीत धरून बसलो शेवटी umpire ना च ते पट्ल आणी खेळ थांबला .

असो . उद्या परत जातोय . अर्धशतक तर बघेनच . पण साहेबांच शतक ही पाहायला मिळू दे यासाठी प्लीज Best Luck द्या Happy

"कॉमनवेल्थ गेम्स- शब्बास इंडिया" या धाग्यावर टाकलेलं हें व्यंगचित्र इथंही औचित्यपूर्ण होईल,असं कुणीतरी सुचवलं म्हणून---

cwgrunnear.JPGआत्ताच दिल्लीत धावण्याच्या शर्यतीत पदक मिळवलंय ! आता चार पैसे मिळवावे म्हणून इथं आलोय. हल्ली इथं चांगल्या "रनर"ना मागणी आहे असं कळलं !!

आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध फक्त जॅक हॉब्ज च्याच जास्त आहेत (१२. सचिन-११). पण हॉब्ज्स ने ४१ टेस्ट्स मधे केल्यात. सचिन ३१ वी खेळतोय.

आयडी बदलला का? सही आहे. Happy

आज २०० होतील असे दिसतेय. मजा म्हणजे तो टिझर आल्यावर सचिनने मान हलवली, मला टिझर टाकतोय का? बघतोच ते. Happy

भाऊ, धन्यवाद येथे टाकल्याबद्दल. आज आता सचिन च्या शतकात हे कदाचित वाहून जाईल पण भारतात इतर खेळांडूंकडे होणारे दुर्लक्ष, त्यांची आर्थिक चणचण वगैरे वर अचूक भाष्य आहे. आणि त्यात लक्ष्मण ने घेतलेले रनर्स वगैरे वर ही. एकदम आवडले हे कार्टून Happy

आयडी बदलला का?>>> आशा आहे लौकरच साहेब ५० वे मारून आम्हाला आमचा मूळ आयडी परत घेउ देतील Happy

सचिनने ऑस्ट्रेलियाविरूध्द ३१ व्या कसोटी सामन्यात ३००० धावा पूर्ण केल्या. त्याच्यापेक्षा जास्त धावा कोणी केल्या आहेत का हे एखाद्या संख्याशास्त्रीलाच माहिती असेल. असो. सचिनचे हे २०१० मधल्या ९ कसोटीतले ६ वे शतक !!!

त्याच्यापेक्षा जास्त धावा कोणी केल्या आहेत का हे एखाद्या संख्याशास्त्रीलाच माहिती असेल.>>> जॅक हॉब्स आणि डेव्हिड गावर- इति क्रिकइन्फो

अरे, त्या मुरली विजयच्या शतकाबद्दल बोला ना कुणी तरी ! त्याचं शतक झाल्यावर शिवरामकृष्णन म्हणाला "So, now he got his Cricketing Degree, isn't it, Sunil !". त्यावरचं सुनील गावस्करचं उत्तर " Yes, and that too when Cricket Univesity itself was watching from the other end !"
पुजाराचं मात्र वाईट वाटलं. त्याच्याच वाटेला दिवसातला सगळ्यात सरपटत आलेला वेगवान चेंडू यावा, याचं.
साहेबांबद्दल आता काय बोलण्यासारखं राहिलंय का ! त्रिवार मुजरा !!
फॉर्टीनाईनर, व्यंगचित्रावरील दिलखुलास अभिप्रायांबद्दल धन्यवाद.
४००च्यावर पोचलो. साहेब १७७. केदारजी, द्विशतकाचं आपण बोललो, म्हणून साहेब "बरं, हवं तर तसं करतो",म्हणाले असावेत !! चुकलं, आपण तीनशेंचंच बोलायला हवं होतं !! );-):डोमा:

सचिनने सर्वात जास्त ६ वेळा एका वर्षात १००० पेक्षा जास्त धावा काढल्या. लारा आणि हेडन प्रत्येकी ५ वेळा.

Pages