क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

११०/२ म्हणजेही तसा वाईट स्कोअर नाही. नाईट वॉचमन म्हणून आलेल्या ईशांतने स्वतःच्या वाट्याच्या
नवीन बॉलचा उपयोग नाही केला; आता उद्या सकाळी त्याची भरपाई म्हणून तरी एक तास खेळून काढावा ! हुकमी त्रयी मग आहेच !!

नाही तरी, गोंजारण्याचं नाटक करत मला व्यंगचित्रातच ढकलून देण्याचा बेत शिजतोयच ना इथंही !! >> आँ हे कधी केलं मी. अहो भाऊ आपल्या व्यंगचित्रात कधी कधी खास बात दिसायची म्हणून
तुम्हाला खरचं विनंती केली तर तुम्ही असे का विचार करताय? असो आपली मर्जी. आपण थोर आहात.

आणी होम, अवे पिच ह्या फक्त क्रिकेट बाफ असल्यामुळे लिहलेल्या गोष्टी आहेत. त्या कविता बाफवर तर माझे एकही पोस्ट नाही. आपणास त्रास झाल तर माफी मागायला मला लाज वाटत नाही. माफ करा. पण कृपया असे विचित्र आरोप नका करु.

केदार,
ईनोद, फिरकी या गोष्टी तरूण मायबोलीकरांचीच मक्तेदारी आहे कीं काय ? जरा मस्करी केली तर उलट मला टपली मारायची सोडून, चक्क माफीची भाषा ? आणि, वर मला "थोर" म्हणण्याचं धाडस !
केदार, मी फार वेळ गंभीर राहिलो, तर माझं बी.पी. एकदम वाढतं; तेंव्हा माझं असलं लिहीणं नका हो सिरीयसली घेऊ ! स्वतःवर विनोद करणं हा तर व्यंगचित्रकारितेचा पहिला धडा आहे आणि तुम्ही त्याला तुमच्यावरचे आरोप म्हणता ?

जम्बो नाहीये, मग काय होणार.शेपुट वळवळतच राहणार. हरभजन ला अजुनही शेपुट कापता येत नाही. Sad
भाऊनी, म्हणाल्याप्रमाणे सुरवात तर चान्ग्ली झाली आहे. हुकमी त्रयीन्ना धोनी, रैना साथ दिली तर ५०० धावा जमतील सहज, तरच आपण जिन्कु शकतो.
मला तरी असे होप्स आहेत Happy

<<हुकमी त्रयीन्ना धोनी, रैना साथ दिली तर ५०० धावा जमतील सहज, तरच आपण जिन्कु शकतो.>>सिद्धार्थ, तुमच्या तोंडात साखर पडो ! जिंकलो नाही तरी निदान त्रयीचा खेळ डोळ्यात साठवून तरी ठेवता येईल!! द्रविड तर काल सर्व मरगळ झटकूनच खेळत होता; लई बरं वाटलं.

ईशांतनं सकाळचा एक तास काढला खेळून, माझ्या आदेशानुसार !! आता त्रयीची करामत, आपल्या प्रार्थनेनुसार !! १५९-३.

आजकाल प्रत्येक कसोटी संघातले शेपूट वळवळतेच. मिचेल जॉन्सनच्या नावावर कसोटी शतक आहे ना? १ शतक ४ अर्धशतके..त्यांचा विकेटकीपर पण फलंदाज असणारच की.
भारताचे शेपूट पण बर्‍यापैकी वळवळते. द्रविडच्या कप्तानीत भारताने इंग्लंडमधे मालिका जिंकली, तेव्हा पहिल्या कसोटीत भारताच्या दहाव्या विकेटच्या जोडीने सामना अनिर्णित ठेवला होता.
ही मालिका द्रविड आणि पाँटिंग दोघांसाठी कसोटी ठरावी.

भारतीय क्रिकेटमधले २ सर्वोत्तम खेळाडू मैदानात आहेत....
त्यांना खेळताना बघणे हाच खर म्हणजे सगळ्यात मोठा आनंद आहे Happy

>>हुकमी त्रयीन्ना धोनी, रैना साथ दिली तर ५०० धावा जमतील सहज, तरच आपण जिन्कु शकतो.

भावना पोचल्या/स्वागतार्ह!

पण Happy
त्यासाठी पुन्हा ऑसीज चे दहा खेळाडू बाद करावे लागतील. तुम्ही आम्ही गोलंदाजीला ऊतरलो तरच ते शक्य आहे Happy

त्या अनुशंगाने पुन्हा एकदा सेहवाग चे कसोटी सामन्यातील एकहाती वर्चस्व/महत्वाचे स्थान सिध्द होते. कारण जेव्हा प्रतीस्पर्धी संघ ३००+ धावा करतो तेव्हा सेहवाग खेळत असेल तोवर त्या धावा एक दिवसात कुटून पुन्हा दुसर्‍या दिवसात प्रतीस्पर्ध्यांवर आघाडी घेता येण्याची दाट शक्यता असते. पण तो बाद झाला की आपला अ‍ॅप्रोच आघाडी घेण्याचा नसून प्रथम धावसंख्या "पार करण्याचा" असतो. अर्थातच अशा वेळी सामन्याचा निकाल आपल्या बाजूले लावायचा तर बरेच चमत्कार घडून यावे लागतात.

तेव्हा आज दिवसाखेर आपण कुठल्या पोझिशन मध्ये आहोत यावर बरेच काही ऊर्वरीत अवलंबून असेल.
तूर्तास साहेब अन द्रविड मस्त चाललय..

साहेब ८० वर नाबाद आहेत. त्यांनी शतक झळकावलं तर त्यांचं हे शतक २०१० सालातल्या ८ कसोटीतलं ६ वे शतक असेल. २०१० मध्ये जानेवारीत बांगलाविरूध्द दोन्ही कसोटीत शतके, नंतर मार्चमध्ये द. आफ्रिकेविरूध्द दोन्ही कसोटीत शतके, नंतर ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरूध्दच्या ३ कसोटींच्या मालिकेत २ र्‍या कसोटीत शतक आणि बाद नाही झाले तर आजचं हे सहावे शतक.

नजर नका लावू... Happy

रैना ला पाठवून मस्त काम केलय धोनी ने. धावगती कायम राहील- निदान ४+ च्या आस पास. शिवाय लेफ्टी राईटी जोडी म्हणजे गोलंदाजाला डोकेदुखीच असते. लक्षमण वेळ घेतो सेट व्हायला आणि पर्यायाने धावफलक हालला नाही की साहेबंची चलबिचल होते. रैना, साहेब जोडी मस्त आहे. आज दिवसभर टीकले की ऊद्या लक्षमण अन धोणी येवून बिंधास्त खेळू शकतात.

खेळपट्टी मधूनच धोकादायक वागते आहे. आज दिवसाखेर किमान धावांची बरोबरी साधली तर ऊद्या सकाळच्या सत्रात १००+ ची आघाडी घेता येईल. या खेळपट्टीवर चौथ्या दिवशी (ऊद्या) चापानापर्यंत २५० पर्यंत आघाडी घेतली तर ऊरलेला दीड दिवस ऑसीज ना खेळून काढणे तितके सोपे जाणार नाहीये-- खेळपट्टी तुटेल, असे वाटते. भज्जी अन ओझा अशा तुटलेल्या खेळपट्टीवर भेदक ठरू शकतात.

थोडक्यात रैना अन साहेब आज दिवसाखेर नाबाद राहीले तर सूत्रे भारताच्या हातात असतील.

साहेब बाद झाल्याचं दु:ख आहेच पण अजूनही सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. चेंडूचा टप्पा पडल्यावर धूळ उडत्येय ! शेवटच्या दोन दिवसात कोणत्याही संघाला मोठी धांवसंख्या उभी करणं कठीणच. लक्ष्मण अजून आहे . निकाल लागण्याचीच शक्यता अधिक. ओझा, सेहवाग व भज्जीला हीरो होण्याची सुवर्णसंधि !!!

निदान रैना चे तरी शतक व्हावे.. सेहवाग, द्रविड, साहेब तीघांचेही हुकले तेही अगदी साध्या चेंडूवर..

भाऊ,
आपण ऊद्या २०० पर्यंत आघाडी घेवू शकलो तर सामना आपला आहे. सेहवाग चे चेंडू या खेळपट्टीवर भज्जी पेक्षा अधिक वळतील Happy ओझा च बॅडलक खराब आहे नाहीतर तोही छान फिरकी टाकतो.
---------------------------------------------------------------------------
ईशांत शर्माने फिरकी टाकण्याचा विचार करावा- विकेट मिळायची शक्यता अधिक आहे! Happy
----------------------------------------------------------------------------
(अरे गेला की धोणी- माझा ईथला जुना जिंक्स परत आला की काय? पोस्ट्लो की कुणीतरी बाद होतय.. हाणा रे मास्तुरे ला ) Happy

३७०/५ वरून ४०८ ला सर्वबाद!! कसोटी आहे का t-20?
रैना ला शतक करू द्यायचे नाही असा चंग आपल्या शेपटाने बांधला होता बहुतेक. आजच्या आपल्या खेळाचे वर्णन एका वाक्यात करता येईल- "ऑसीज च्या बाजूने सामना झुकवायचे अटोकाट प्रयत्न आपल्या शेपटाने केले आहेत". शेपूट म्हणावं तर त्या घसरगुंडीत धोणी, लक्षमण, रैना हे फलंदाज देखिल आहेत.

ऊद्या ते प्रयत्न फळाला येवोत अशी प्रार्थना कांगारू करत असतील. साहेब, म्हणून ९८ वर बाद होणं हा घोर अपराध आहे.

ऊद्या सेहवाग, रैना आणि ओझा या फिरकी त्रिकूटावर भारताची मदार असेल. Happy

ईशांत लक्षमण पेक्षा अधिक फीट खेळाडू आहे. त्याचा पुढील सामन्यात जागा असली तर फलंदाज म्हणून विचार केला जावा. गंभीर, भज्जी, लक्षमण, ईशांत यांना हाकलून अनुक्रमे मुरली विजय, पुजारा, श्रीशांत, आणि कुणी गोलंदाज असल्यास त्यांचा विचार केला जावा. प्रयत्नपूर्वक हारायचेच आहे तर सर्वांना समान संधी द्यावी. Happy
------------------------------------------------------------------------------------
सामना फिक्स्ड नसेल असे गृहीत धरले तर आज रात्री युवी ने मोहालीत बॉलीवूड-बेब्स ची ओली पार्टी ठेवली आहे का अशी शंका येतीये. एव्हडी कसली घाई या पोरांना?
------------------------------------------------------------------------------------
एकंदरीत या मालिकेबद्दल चपळ भाऊंचे विश्लेषण एकदम योग्य आहे:
"If all the batsmen in this series are in peak form, there's very little difference between the two line-ups, except for one man - Virender Sehwag.
This series could well provide a bit of competitive relief; that is, provided either side has the bowling resources to push through to victory."
(http://www.cricinfo.com/magazine/content/story/478657.html?addata=col_mod)

खालील सर्व लेखनासाठी:

Proud Proud Proud !

"भारताचे शेपूट पण बर्‍यापैकी वळवळते. "
ते शेपूट शरीराच्या मागे न ठेवता समोर ठेवावे. जसे, इशांत शर्मा आधी आला नि बरा खेळला, पण धोनी जवळजवळ शेपटापाशी गेला नि लवकर बाद झाला.

मला वाटते आजकालच्या जागतिकीकरणाच्या जगात, भारताने काही चांगली शेपटे परदेशातून आणावीत. नाहीतरी आजकाल क्रिकेट म्हणजे मोठ्ठा धंदाच, मग धंद्याप्रमाणे, जिथे जे स्वस्त मिळते ते विकत घ्यायचे नि जिथे जास्त भावात खपते तिथे विकायचे.

अरे हो, आय पी एल म्हणजे तेच नाही का? मग हे बाकीचे सामने बंद करून आय पी एलच आय पी एल करावे.

"त्यासाठी पुन्हा ऑसीज चे दहा खेळाडू बाद करावे लागतील. तुम्ही आम्ही गोलंदाजीला ऊतरलो तरच ते शक्य आहे "

क्षेत्ररक्षणाला कुणि हवे आहेत का? दोन्ही संघांचे क्षेत्ररक्षण चांगले झाले नाही असे धावते समालोचन करणार्‍यांनी सांगितले, म्हणून हवे असतील क्षेत्ररक्षक तर आम्हाला हि बोलवा. (किती मिळतात मैदानावर उभे रहाण्याबद्दल? दिवसाला २५००० रु.? पुरवून घेऊ.)

Light 1 Light 1 Light 1

>>(किती मिळतात मैदानावर उभे रहाण्याबद्दल? दिवसाला २५००० रु.? पुरवून घेऊ.

काय हे झक्की, शोभत नाही. भारतात नुसतं "ऊभं" रहायला यापेक्षा कईक अधिक पैसे मोजतात, आहात कुठे? Happy

अरे, हो,हो,हो ! सामन्याचे अजून दोन दिवस शिल्लक आहेत !! दोन दिवसात काहीही होऊं शकतं क्रिकेटमध्ये. नंतर करूंच कीं "पोस्ट मॉर्टेम" आपण सगळे मिळून !!!
<<साहेब, म्हणून ९८ वर बाद होणं हा घोर अपराध आहे.>> योगजी, साहेब तीन दिवस कडक ऊन खाताहेत मैदानात, त्यातच प्रत्येक चेंडू आपल्या लहरीप्रमाणे वळतोय, उसळतोय हे टेन्शन, पाँटींग सतत दबा धरून बसलेला, तरी संघाकरता जीव तोडून खेळले ना ते - नका हो त्याना तरी असं बोलूं !

"आज रात्री युवी ने मोहालीत बॉलीवूड-बेब्स ची ओली पार्टी ठेवली आहे का अशी शंका येतीये. एव्हडी कसली घाई या पोरांना?"

बहुतेक त्यांना वाटते आहे, आपण ५०-५० खेळतो आहोत. म्हणून शेवटी शेवटी लवकर लवकर धावा करायचा प्रयत्न केला, पण नाही जमले. दोन्ही संघांचे डाव संपले. सामना संपला. असो. सगळेच सामने जिंकता येत नाहीत. आता 'ओली पार्टी!'

उद्या बहुतेक बरेचसे खेळाडू येणारच नाहीत, मैदानावर. मग तर नक्कीच योग नि सिद्धार्थ गोलंदाजी करतील नि आपण क्षेत्ररक्षक म्हणून इकडे तिकडे उभे राहून बघू ऑस्ट्रेलियाचे फलंदाज कसे नुसतेच दोन विकेट मधे पुढे मागे धावत बसतात ते! आपल्या कडे चेंडू आला, नि कुणि म्हणले "बॉल प्लीज", तर आपण त्यांना चेंडू परत देऊ.
Proud Light 1

>>लक्ष्मणला इतक्या खाली का पाठवलं.
पाठदुखी.

बहुतेक साहेब अर्जुनचा सल्ला (नव्वदीत ४-६ च मारयचा) विसरले.

Pages